नाकातून रक्त येणे यावर काही घरगुती उपाय

0
1627
नाकातून रक्त येणे यावर काही घरगुती उपाय
नाकातून रक्त येणे यावर काही घरगुती उपाय

 

नमस्कार, नाकातून रक्त येणे, म्हणजे तुमचे नकाचे ढोमणे फुटणे होय. सहसा करून नाकातून रक्त येण्याची समस्या हिवाळ्यात व उन्हाळ्यात होते. कारण हिवाळ्यामध्ये सर्दी झाल्यामुळे, तुमचे नाक सारखे-सारखे चुळचुळ करते व सर्दी मध्ये सारखे नाक पुसून-पुसून नाकामधील नसांना इजा होऊन, तुमच्या नाकातून रक्त येण्याची समस्या होऊ शकते. तसेच उन्हाळ्यामध्ये अति उष्णतेचा त्रास होऊन, नाक फुटण्याच्या समस्या भरपूर बघावयास मिळतात. तसेच नाकातून रक्त येणे क्रियेला एपिस्टॅक्सिस असेही म्हणतात. पण ही गंभीर समस्या नाही, जर नाकातून रक्त हे पाच ते दहा मिनिटात आले, तर त्याला घाबरू नका. आणि  जर 10 ते 20 मिनिटापर्यंत जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल, तर तुम्ही जरूर डॉक्टरांना दाखवावे. तसेच अजून कोण कोणत्या कारणांमुळे नाकातून रक्त येते? ते आपण बघूयात ! 

नाकातून रक्त येण्याची कारणे ? 

नाकातून रक्त येण्याची अनेक कारणे आहेत, चला तर मग जाणून घेऊयात ! 

  • नाकाला कोरडेपणा आल्यामुळे, ही नाकातून रक्त येते.
  • उन्हाळ्यात अति उष्णते मध्ये, बाहेर गेल्यामुळे नाकातून रक्त येते. 
  • अति प्रमाणात तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे हे नाकातून रक्त येते. 
  • सर्दी-पडसे झाल्यानंतर, नाक चुळचुळ करून नाकातील  नसांना इजा पोहोचून, नाकातून रक्त येते. 
  • डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे, नाकातून रक्त येते. 
  • ज्यांना सायनसचा त्रास आहे, त्यांच्या नाकातून रक्त येते. 
  • नाकाचा ट्यूमर झाल्यानेही, नाकातून रक्त येते. 
  • उच्च रक्तदाब असलेल्यांना, नाकातून रक्त येण्याची, समस्या होऊ शकतात. 
  • तसेच लहानपणी नाकाला मुका मार लागला, असेल त्यांना नाकातून रक्त येण्याचे समस्या होतात. 
  • केमिकल संयुक्त वातावरणात राहिल्यामुळे, ही नाकातून रक्त येते. 
  • अति धूम्रपान, दारू यांचे व्यसन असलेल्या, लोकांच्या नाकातून रक्त येण्याची समस्या होतात. 
  • अति पावर फुल औषधे घेतल्यामुळे, ही नाकातून रक्त येते. 
  • नाकात सारखे सारखे बोट टाकल्याने जखम होऊ शकते, व नख लागल्यामुळे, सुद्धा नाकाच्या आतील त्वचा वर जखम होऊन रक्त येऊ शकते.
वाचा  श्वास घेताना त्रास होणे या समस्येवर घरगुती उपाय 

नाकातून रक्त येणे पूर्वीची काही लक्षणे   

नकातून रक्त येण्याची, काही लक्षणे आहेत, ते जाणून घेऊयात ! 

  • नाकातून रक्त येण्याअगोदर तुमच्या डोक्यात गरगर करते. 
  • नाक सारखे चुळचुळ करते, 
  • जीव घाबरल्यासारखे वाटते, 
  • डोके दुखते, डोके जड असल्या सारखे वाटते, 
  • चक्कर येते, 

नाकातून रक्त आल्यावर काय काय घरगुती उपाय करावे ते जाणून घेऊया

वरील, दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला नाकातून रक्त येण्याची कारणे, व लक्षणे नेमकी कोण-कोणती ते सांगितलेले आहेत. तर मग आपण ज्या वेळी तुमच्या नाकातून रक्त येत असेल, अशा वेळी तुम्ही कोणते घरगुती उपाय करायला हवे ? ते जाणून घेऊयात ! 

थंड पाण्याचा वापर करा :

ज्यावेळी तुमच्या नाकातून रक्त येते, त्यावेळी तुम्ही नाकाला थंड पाण्याने  धुवावे व डोके खाली वाकून बसावे तसेच तुम्ही बर्फाचा वापरही करू शकतात. त्यांनीही नाकातून रक्त येणे, या समस्या वर तुम्हाला थोडा आराम मिळेल, व तुम्ही सरळ झोपून मान उंच करून झोपावे. म्हणजे नाकातून येणारा रक्तप्रवाह कमी होतो. 

तुरटी वापरून बघा :

हो, तुरटी वापरल्याने तुमच्या नाकातून रक्त येणे, या समस्यावर त्वरित आराम मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही तुरटी ही पाण्यात उगळून नाकातून रक्त येणाऱ्या ठिकाणी लावावे, त्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येणे त्वरित थांबते. 

कांद्याचा वापर करून बघा :

ज्यावेळी तुमच्या नाकातून रक्त येते, त्यावेळी तुम्ही कांद्याचा वापर हा नक्की करून बघा. कारण कांदा हा उष्णता दूर करण्याचे काम करतो, तसेच कांदा मध्ये एंटीबॅक्टेरीयल, अँटिमायक्रोबल, गुणधर्म असतात. ज्यावेळी तुमच्या नाकातून रक्त येते, त्या इन्फेक्शन वर जर तुम्ही नाकाला कांद्याचा रस लावला, तर तुम्हाला त्वरित फायदा मिळू शकतो. 

एप्पल साइडर विनेगर चा वापर करून बघा :

नाकातून रक्त येत असेल, त्यावेळी जर तुम्ही एप्पल साइडर विनेगर चा वापर केला, तर तुमच्या त्या समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल. त्यासाठी तुम्हाला कापसाच्या बोळ्यावर एप्पल साइडर विनेगर चे काही थेंब टाकून, ते नाकातून रक्त येणाऱ्या ठिकाणी लावावे, व सरळ झोपावे. त्याने तुम्हाला फरक जाणवेल. 

वाचा  स्वप्नात वांगे दिसणे शुभ की अशुभ!

विटामिन ई कैप्सूल की टेबलेट वापरून बघा :

हो , विटामिन ई कैप्सूल ही तुमच्या नाकासाठी फायदेशीर ठरेल. विटामिन ई कैप्सूल तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअर्समध्ये मिळेल. विटामिन ई कैप्सूल ही नैसर्गिक ऑइल आहे. हिवाळ्यात नाक हे कोरडे होते, आणि नाकाला कोरडेपणा आल्यामुळे, नाकातून रक्त येण्याचे समस्या होतात. अशा वेळी जर तुम्ही विटामिन ई कैप्सूल, कापसाच्या बोळ्यावर घेऊन, रात्री नाकाला लावले, तर तुमच्या नाकाचा कोरडेपणा दूर होईल. आणि नाकातून रक्त येण्याची समस्याही कमी होईल. 

वाफ घ्यावी :

काही लोकांमध्ये नाकातून रक्त येण्याचे अनुवंशिक गुण असतात. त्यांच्या नाकातून सारखे-सारखे रक्त येते. नाकातून रक्त येण्याची कारणे आम्ही तुम्हाला सांगितलेली  आहेत, की नाकाला कोरडेपणा आला, तर नाकातून रक्त येते.  ज्या लोकांना अशा समस्या असतील, त्यांनी नियमित वाफ घ्यावी. कारण नियमित वाफ घेतल्यामुळे, तुमच्या नाकात एक ओलसरपणा टिकून राहतो. व नाक फुटण्याच्या समस्या कमी होतात. 

उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याची समस्या असेल तर काय करावे ?

भरपूर जणांना उन्हाळ्याचा त्रास होतो, नाकातून रक्त येणे, म्हणजे उन्हाळी लागणे असेही म्हणतात. अश्यावेळी जर तुम्हाला काही कामानिमित्त उन्हात जावे लागत असेल, अशावेळी तुम्ही कोकम सरबत, ग्लुकोज पावडर किंवा निंबू सरबत चा वापर हा करावा. कारण तुमच्या शरीरात एनर्जी टिकून राहते. शिवाय उन्हाळ्यात बाहेर जाताना, नाकाला कपडा ओलसर करून लावावा, म्हणजे तुमच्या नाकाला थंडावा राहतो, आणि उन्हाचा त्रास होत नाही. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला नाकातून रक्त येणे, यावर काही कारणे, त्यांची लक्षणे, आणि त्यावर कोणकोणते घरगुती उपचार करावेत, तेही सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करून, तुम्हाला फरक जाणवत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना जरूर दाखवावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

वाचा  उंदरापासून पसरणारा लासा ताप 

 

                      धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here