ओठ काळे का पडतात ?

0
1116
ओठ काळे का पडतात
ओठ काळे का पडतात

 

नमस्कार, म्हणतात ना आपले सौंदर्य हे आपल्या चेहऱ्यावर, केसांवर, आपल्या दिसन्यावर, तसेच आपल्या ओठांवरही अवलंबून असते. तर मग  यातच तुमची ओठ हे सारखे फाटलेले असतील, काळे पडत असतील, तर मधून रक्त येत असेल, तर आपल्या चेहऱ्यावर त्याचा प्रादुर्भाव दिसतो. आपल्या सौंदर्यात थोडीशी कमतरता येते, हल्ली या वाढत्या प्रदूषणामुळे, अवेळी खानपान मुळे, आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे, लक्ष देत नाही. त्याच्या प्रादुर्भावामुळे आपल्या शरीरात ही रक्ताची कमतरता येते, रक्ताची शरीरात कमतरता आल्यामुळे तुमच्या अंग पांढरे पडते, ओठ काळे पडतात. यासारख्या समस्या तुम्हाला होऊ शकतात. तर ओठ काळे होण्याची, अजून बरीच काही कारणे आहेत, चला तर मग जाणून घेऊयात. 

 ओठ काळे होण्याची कारणे ? 

हल्लीच्या धावपळीच्या युगात आपण बऱ्याच लोकांकडे बघतो, की त्यांची ओठ काळे दिसतात, अक्षरशहा त्यावर काळे चट्टे पडतात, कोरडे पडतात. तर मग ओठ काळे होण्याची नेमकी कारणे कोणती आहेत ? ती जाणून घेऊयात !

  • चहा, कॉफी जास्त प्रमाणात पिल्यामुळे. 
  • अमली पदार्थांचे व्यसन असल्यामुळे, जसे की, दारू, सिगरेट, तंबाखू यासारख्या मुळे. 
  • जास्ती प्रमाणात केमिकल्स युक्त लिपस्टिक लावल्यामुळे, 
  • अंगात ताप असल्यामुळे, ओठ कोरडे पडतात, काळे पडतात. 
  • शरीरात रक्ताची कमतरता असल्यामुळे, 
  • बाहेरील वातावरणाची धुळीची ऍलर्जी असल्यामुळे, 
  • अतिशय कडक उन्हात उन्हाळ्यामध्ये बाहेर गेल्यामुळे, 
  • औषधींचा ओव्हरडोस झाल्यामुळे, 
  • हिवाळ्यामध्ये ओठ काळे पडतात, 

ओठ काळे पडल्यावर, व गुलाबी करण्यासाठी काही घरगुती उपाय ! 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की तुमचे ओठ काळे का पडतात, तर मग जर तुमचे ओठ काळे पडले असतील, तर त्यावर तुम्ही नेमके कोणकोणते घरगुती उपाय करायला हवे? चला तर मग जाणून घेऊयात! 

वाचा   नाकाचा शेंडा कसा वाढवायचा

बीट चा वापर करून बघा :

हो, खरंच बीट हे जर तुमचे ओठ काळे पडले असतील, त्यावर फार फायदेशीर ठरेल. कारण बीटचा रंग हा मुळातच नैसर्गिक लाल आहे, जो तुमच्या ओठांसाठी खूप फायद्याचा आहे. त्यासाठी तुम्ही बीट हे एका वाटीत किसून, त्याची पेस्ट बनवून, त्यात खोबरेल तेल टाकून, ते एका डब्यात भरुन, सकाळ-संध्याकाळ तुमच्या ओठांवर लावावे. त्याने तुमच्या ओठांना नैसर्गिक रंग येईल, शिवाय तुमची ओठ मुलायम व चमकदार होतील. 

लिंबू साखर चा वापर करून बघा :

ज्यावेळी तुमचे ओठ काळे पडतात, त्यांना तडा जातो, ओठांची पापडी निघते, अशावेळी तुम्ही लिंबू आणि साखरेचा वापर करू शकतात. कारण लिंबू मध्ये विटामिन सी असते, जे आपल्या शरीरासाठी व त्वचेसाठी खूप फायद्याचे ठरते. त्यासाठी तुम्हाला लिंबू हा मधोमध कापून, त्यात साखरेचे दाणे घालून, तुमच्या ओठांवर हळुवारपणे सकाळ-संध्याकाळ मसाज करा. असे दोन ते तीन आठवडे केल्यास, तुमच्या ओठांचा रंगही उजळेल, व तुमचे ओठांना कोरडेपणा व तडे जाण्याची समस्याही कमी होईल. 

भरपूर प्रमाणात पाणी प्या :

आपले शरीर हे 55 ते 65 टक्के पाण्याने भरलेले आहे, जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता आली, तर आपल्याला डीहायड्रेशन सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे थकवा येणे, कमजोरी होणे, अशक्तपणा येणे, यासारख्या समस्या होतात. जर यासारख्या समस्या झाली, तर त्याचा प्रादुर्भाव आपल्या सौंदर्यावर, चेहऱ्यावर, तसेच ओठांवरही होतो. त्यासाठी तुम्ही दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी प्यायला हवे, जर शरीरात योग्य प्रकारे पाणी राहिले, तर तुमचे ओठांचा रंग ही टिकेल, ओठ कोरडे पडण्यासारख्या समस्यांवर ही तुम्हाला आराम मिळेल. 

विटामिन सी युक्त फळे तसेच हिरवा भाजीपाला खा :

हल्लीच्या धावपळीच्या युगात, तर आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे व खाण्यापिण्यावर हे लक्ष देत नाही, आपण विटामिन, युक्त भाजीपाला व फळे ही खात नाही.  घाईघाई ने आपण उघड्यावरचे, बाहेरचे, जंक फ्रूट्स व चहा, कॉफी वर आपला उदरनिर्वाह करून घेतो. तर ते आपल्या शरीरासाठी अगदी चुकीचे आहे, आपल्या शरीरात हिरव्या पालेभाज्या आणि फळांची खूप गरज आहेत. कारण त्यामध्ये आपल्याला कार्बोदके, प्रोटिन्स, मिनरल्स, विटामिन्स, फॉलिक ऍसिड, प्रथिने या सारखे गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरतात. हिरव्या भाज्या आणि फळे खाल्ल्यामुळे, तुमचे आरोग्य अगदी उत्तम राहते. तुमच्या शरीरात रक्ताची कमी, अशक्तपणा, थकवा येणे, शरीरात रक्ताची कमतरता होणे, डोळ्यांची आग होणे, ओठ काळे पडणे, जळजळ होणे, या समस्यांवर आपल्याला आराम मिळतो. जर तुम्ही तुमचा आहार योग्य घेतला, फळे, भाज्या खाल्ल्या तर, तुम्ही बदलत्या ऋतूनुसार होणारे आजारांपासून दूर राहणार. अगदी साधे सोपे उपाय आहे, मग करायला काय हरकत आहे, करून बघा. 

वाचा  कांद्याची पात याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध बहुमूल्य फायदे

हळदीचा वापर करून बघा :

जर तुमची ओठ काळे पडले, असून त्यातून रक्त किंवा काळे चट्टे पडले असतील, त्यावेळी तुम्ही हळदीचा वापर करून बघा. कारण हळद मध्ये, एंटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. हळदीचा वापर हा आयुर्वेदिक औषधांमध्ये ही केला जातोय, ओठांसाठी हळद ही फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला हळद पावडर+ त्यात दोन चमचे दुध घालून, तुमच्या ओठांवर पाच ते दहा मिनिटे मसाज करावा. व थंड पाण्याने धुऊन टाकावे, असे तुम्ही दोन ते तीन आठवडे केल्यास, तुमच्या ओठांवरील काळेपणा व त्यातून रक्त येणे, यासारख्या समस्यांवर तुम्हाला आराम मिळू शकतो. 

कोरफड चा वापर करून बघा :

कोरफड ही घरोघरी, दारोदारी आहे. कोरफड अतिशय आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफड ही जशी चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते, तशी तुमच्या ओठांसाठी ही फायदेशीर ठरते. कोरफड मध्ये विटामिन ए ,बी ,सी तसेच लोह, मॅग्नेशियम, फॉलिक ऍसिड, असे अनेक गुणधर्मांनी भरलेली असते. जी तुमच्या शरीरासाठी, तसेच ओठांसाठी ही फायद्याचे ठरते. जर तुमचे ओठ फाटले असतील, त्या मधून रक्त येत असेल, त्यांची आग होत असेल, त्यांना तडे पडले असतील, अशा वेळी तुम्हाला कोरफड फायद्याचे ठरेल. त्यासाठी तुम्ही कोरफडीचा गर काढून +त्यात चिमूटभर हळद टाकून त्याने तुमच्या ओठांवर अलगद हळुवार पणे गोल वार मसाज करावा. त्याने तुम्हाला रिलॅक्स वाटेल, आणि ओठांची जळजळ ही कमी होईल, तसेच कोरफड गर काढून , फ्रिजमध्ये आईस ट्रे टाकून, त्याचा बर्फ करून तुमच्या ओठांवर घासल्याने ही तुमच्या ओठां मधील ब्लड सर्कुलेशन सुरळीत राहील, व ओठांचा रंग लाल होईल, व तजेलदार होईल. 

ग्लिसरीन चा वापर करून बघा :

ओठांवर काळपटपणा, तडे पडणे, यासारख्या समस्या होत असेल, तर ग्लिसरीन चा वापर करून बघा. ग्लिसरीन हे तुम्हाला कुठलेही मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळेल. ग्लिसरीन मध्ये नॅचरल ऑइल असते. जे तुमच्या ओठांवरील ओलसरपणा टिकून ठेवण्याचे काम करते. तसेच तुम्ही ग्लिसरीन लावल्यामुळे, ओठ तजेलदार व गुलाबी होतात, तुम्ही ग्लिसरीन+हळद +मध या तिघांचे मिश्रण एकत्र करून, तुमच्या ओठांवर हळुवारपणे पाच ते दहा मिनिटे मसाज करावा. असे तुम्ही दोन ते तीन आठवडे केल्यास, तुमच्या ओठांचा रंग ही उजळेल, व ओठांना कोरडेपणा यांच्यासारख्या समस्यांवर आराम मिळेल. 

वाचा  पायाला कुरूप झाल्यावर उपाय

चला, तर मग आज आम्ही तुमचे ओठ काळे का पडतात, कशामुळे पडतात, व त्यावर काय घरगुती उपचार करायला हवेत, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले उपचार करूनही तुम्हाला ओठ काळे पडण्याच्या समस्येवर आराम मिळत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना एकदा दाखवावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगावे. 

                        

        धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here