जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय आरोग्यासाठी किती धोकादायक असते?

0
893
जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय आरोग्यासाठी किती धोकादायक असते
जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय आरोग्यासाठी किती धोकादायक असते

मित्रांनो,  बरेच लोक हे आपल्या आरोग्याची काळजी स्वतःहून घेत असतात. आपल्या रोजच्या नियमित आहारात काय खावे, काय खाऊ नये, कुठल्या कुठल्या पदार्थाचा समावेश असायला हवा  या विषयी माहिती जाणून त्यात यांचा समावेश हा आहारात करत असतात. तसेच हल्लीच्या काळात जेवणानंतर गोड खाणे हे तर एक फॅशन झालेली आहे.  यालाच जेवणानंतर स्वीट डिश खाने असे देखील काही लोक म्हणतात.भरपेट जेवण झालं की हात धुतल्यानंतर अनेकांना गोड खाण्याची सवय असते. स्वीट डिश म्हणा किंवा डेझर्ट. म्हटलं की तोंडाला पाणी हे सुटणारच.

रोज जेवणानंतर तुम्हाला गोड खाल्ल्याशिवाय राहावलं जात नसेल पण तरीही गोड पदार्थ खाणे टाळावे.आयुर्वेद शास्त्रानुसार  स्वीट डिश हा पाश्चिमात्य संस्कृतीचा एक प्रकार आहे.परंतु हा आरोग्यासाठी चांगला नाही. जेवणानंतर गोड पदार्थ अनेकांना खायला आवडतात. पण आयुर्वेद शास्त्रानुसार जेवणानंतर गोड खाण्याची सवय ही आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट आहे ?या विषयी तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे. तुम्ही जेवणानंतर गोड खातात का? जर तुम्ही जेवणानंतर गोड खात असाल, तर आज आम्ही जी माहिती तुम्हाला सांगणार आहोत त्याविषयी तुम्ही जाणून घेणे फार गरजेचे आहे.

जेवणानंतर गोड पदार्थ खावे की नाही ?

अनेकांना जेवण झाल्यानंतर  गोड पदार्थ खाण्याची सवय असते. आणि त्यांची ती आवडती बनून जाते. परंतु, आयुर्वेद शास्त्रानुसार जेवणानंतर गोड पदार्थ खाणे ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. ती धोकादायक सवय आहे. जर तुम्हाला गोड पदार्थ खावेसे वाटत असेल, तर जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकतात आणि अर्धा तासानंतर तुम्ही जेवण करायला हरकत नाही. परंतु, जेवणानंतर लगेचच  गोड पदार्थ खाऊ नये, हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.आयुर्वेदिक तज्ञांच्या मते गोड पदार्थ पचायला जड असतात  त्यामुळे जेवणाच्या सुरुवातीला  तुम्ही गोड पदार्थाचे सेवन करणे योग्य ठरते. त्याशिवाय  गोड पदार्थाचं सेवन केल्यास त्याचं पचन हे चांगलं होतच. शिवाय गोड पदार्थ खाल्ल्याने पुढच्या जेवणाचं प्रमाणही कमी होतं. पोटभर जेवण झाल्यानंतर हात धुतल्यावर काहींना गोड खाण्याची ही सवय असतेच यालाच स्वीट डिश अथवा डेझर्ट असे म्हटले जाते. परंतु, जेवणानंतर हे सहसा  टाळणे योग्य ठरू शकेल. तसेच, जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खाल्ल्यास पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

वाचा  सिताफळाच्या पानाचे फायदे

जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्यास ते धोकादायक असते का?

  मित्रांनो, “आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की, प्रत्येक व्यक्तीसाठी सकस आहार महत्त्वाचा असतो. आहारात काय खावं,काय खाऊ नये,किती प्रमाणात खावं, जेवताना कसे बसावे इतकच नाही तर आहार कधी घ्यावा, कधी कमी खावा याचीसुद्धा आयुर्वेदात माहिती देण्यात आलेले आहे

 कारण जेवण केल्यानंतर ते प्रत्येकाला पचायला हवे.चांगल्या आरोग्यासाठी जेवण वेळेवर करणे आवश्‍यक आहे. तसेच, खाल्लेले पचन होणे तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु, बऱ्याच वेळा आपण जेवण केल्यानंतर गोड पदार्थ खातो. आणि त्यामुळे आपल्या आरोग्याविषयी समस्या निर्माण होऊ शकतात. जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्यास काय होऊ शकते हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

  • मित्रांनो जेवण झाल्यावर लगेच गोड पदार्थ खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. परिणामी पोट दुखीची समस्या निर्माण होते.
  • जेवण झाल्या नंतर गोड पदार्थ खाल्ल्यामुळे पोटातील पित्त रस्सा बाबत समस्या निर्माण होतात. किमान जेवण करण्याअगोदर एक ते दीड तास आधी गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता. 
  • जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचे अन्न पचन होण्यास भरपूर कालावधी लागू शकतो. म्हणजेच अन्नपचनाची क्रिया ही मंदावते. तसेच ॲसिडिटीचा त्रास देखील होऊ शकतो. 
  •  गोड पदार्थ पचण्यास जड असल्यामुळे जेवणानंतर ते लगेच ग्रहण केल्यास पोट विकाराच्या समस्या जोडू शकतात.
  • आजकाल लग्नामध्ये पार्ट्यांमध्ये आणि विविध कार्यक्रमांमध्ये जेवणानंतर स्वीट डिश खायला दिली जाते. यात गुलाबजाम, रबडी किंवा जिलेबी यांसारखे पदार्थ असतात. गोड पदार्थ पचण्यास जड असल्याने पोटा संबंधित विकार होण्याची दाट शक्यता असते. 
  • त्यामुळे प्रत्येकाने जेवणानंतर गोड पदार्थ खाताना शंभर वेळा तरी विचार केला पाहिजे. तुम्हाला गोड पदार्थ आवडत असेल, तर ते जेवणापूर्वी खा.म्हणजे त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही.

तर मित्रांनो,जेवण झाल्यानंतर गोड खाणे सहसा तुम्ही जितके टाळलं तितके तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते. आपण जेवण केल्यानंतर पोटातील अन्नाचे पचन शरीरातील अग्नी करतो. दिवसा आपले पचन क्रिया अधिक वेगाने होत असते.परंतु, रात्री ती मंद गतीने होत असते.म्हणून आयुर्वेदिक शास्त्रानुसार रात्री हलका आहार घेणे देखील योग्य असल्याचं म्हटलं गेलेल आहे. आणि रात्रीच्या जेवणा नंतर शक्यतो तुम्ही गोड खाणे जितके टाळले तितके तुमच्यासाठी चांगले ठरेल. तसेच रात्रीचे जेवण सुद्धा खूप उशिरा घेऊ नये. त्यामुळे अन्नाचं पचन नीट होत नाही आणि मग पुढे पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागते. 

वाचा  सिझेरियन का करावे लागते? 

जेवणा नंतर काय खावे व काय खाऊ नये ?

मित्रांनो, “जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ जेवणाच्या मध्ये आंबट व खारट पदार्थ तर जेवणाच्या शेवटी तिखट कडू तुरट पदार्थ खावेत” जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकतात परंतु जेवण झाल्यानंतर तुम्ही कडू, तिखट व तुरट पदार्थ खाणे योग्य ठरते.

जेवण झाल्यानंतर फळे खाणे टाळावे.

 आयुर्वेदीय शास्त्रानुसार, आहार पचायला पहिला काळ हा कफाचा असतो. मुखापासून पोटाच्या वरच्या भागापर्यंत खाल्लेल्या अन्नामध्ये कप मिसळून अन्नाच्या संघात मोडतो. पचनाची क्रिया योग्य रीतीने पुढे नेतो. त्यामुळे अन्नपचनाच्या सुरुवातीला कफवर्धक गोड पदार्थ खावेत. या क्रमात शिवाय आहार घेणे जसे, स्वीट डिश-आईस्क्रीम जेवणाच्या शेवटी घेतले तर मग मलभाग जास्त प्रमाणात तयार होतो. पोषक रस योग्य रीतीने शोषला जात नाही. जेवणाच्या सुरुवातीला मसाला, पापड आदी खाल्ले असता अन्नाच्या संघात ज्या कफाने मोडतो तो योग्य मात्रेत तयार होत नाही आणि यामुळे अन्नाचे पचनाची क्रिया बिघडू शकते . म्हणून जेवणानंतर तुम्ही फळे खाणे जितके टाळले तितके तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते. तसेच बऱ्याच लोकांमध्ये फळ खाण्या बद्दलचे समज – गैरसमज आढळतात. काही लोकांचे असे म्हणणे असते की फळ जेवणाबरोबर खाल्ल्यास पचनशक्ती संथ होते आणि पोटातले अन्न पोटातच राहून ते कुजायला लागत. म्हणून जेवणानंतर तुम्ही सहसा लगेचच फळ खाणे टाळलेले बरे.

    मित्रांनो, जेवणानंतर गोड पदार्थ का खाऊ नये? तसेच गोड पदार्थ जेवणानंतर खाल्ल्यामुळे काय होऊ शकते? आणि जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्यास ते धोकादायक असू शकते का? याविषयी आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. मित्रांनो, याविषयी अजून सखोल माहिती तुम्ही जाणून घ्यावी असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या  डॉक्टरांकडे जाऊन घेऊ शकता. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

वाचा  प्रसूती म्हणजे काय जाणून घेऊया

 

       धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here