मित्रांनो,आपण स्वस्त आणि मस्त हे राहिलेच पाहिजे. असे सगळ्यांनाच वाटत असते. त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो आणि आपण आपल्या आहाराबद्दल देखील फार जागृत असतो. तसेच नियमित आहारात आपण काय खावे काय खाऊ नये हे देखील ठरवून घेत असतो. स्वस्थ राहण्यासाठी आपणाला आपली दिनचर्या आखता आली पाहिजे. बरेच जण आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी नियमित व्यायाम देखील करीत असतात. नियमित व्यायाम केल्याने देखील आपले स्वास्थ्य चांगले राहते. आपली त्वचा ही हायड्रेट व्हावी म्हणून देखील आपण पाणी पिण्यावर भर घालत असतो. जेवणानंतर पाणी पिण्याची योग्य वेळाही जाणून घेणे महत्वाचे आहे.
भरपूर पाणी प्या, पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. पाणी पिल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्त देखील मिळत असते. पाणी हे आपल्या शरीरासाठी असलेला अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक आहे. पाण्याने केवळ तहान भागत नाही तर शरीरातील घातक विषारी द्रव्य बाहेर काढण्यास पाणी मदत करत असते. पाणी प्यायल्याने शरीराची आतल्या भागातील सफाई होत असते आणि पाणी प्यायला ने आपले शरीर हे रोग मुक्त राहण्यास देखील मदत होत असते. मात्र पाणी पिण्या बद्दल अनेकांना गैरसमज झालेला असतो. जसे की दिवसभरात पाणी किती प्यावे ? पाणी केव्हा प्यावे ? जेवणाअगोदर पाणी प्यावे का ? जेवताना पाणी प्यावे का? जेवण झाल्यानंतर पाणी प्यावे का? असे एक ना अनेक प्रश्न बऱ्याच लोकांना पडतात.
आयुर्वेदानुसार, जेवण करण्याआधी,जेवताना व जेवणानंतर पाणी पिणे चुकीचे म्हटलेले नाही. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनानुसार जेव्हा तुम्हाला पाणी प्यावे असे वाटत असेल त्यात हे पाणी पिऊ शकतात. मग ते जेवणाआधी असो जेवणानंतर असो जेवताना असो! परंतु, जेवणाआधी ते पाणी किती प्यावे, जेवताना पाणी कसे प्यावे व जेवण झाल्यानंतर पाणी प्यावे का? हे देखील माहीत करून घेणे गरजेचे आहे. पाणी हे केव्हा प्यावे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर याचा गंभीर परिणाम हा तुमच्या शरीरावर होत असतो. चला तर मग या विषयी आपण सखोल माहिती जाणून घेऊया.
जेवणाच्या अगोदर पाणी पिल्याने काय होते?
मित्रांनो, बरेच जणांना हा प्रश्न पडला असतो कि जेवणाअगोदर पाणी पिल्याने काय होते? जेवणाआधी पाणी पिणे हे जठराच्या आरोग्यासाठी चांगले असते. तसेच त्यामुळे वजन हे कमी होत असते. जेवणाआधी पाणी प्यायल्याने जठरातील द्रव्य सौम्य होतात. ही द्रव्ये पचनक्रियेत मुख्य भूमिका परंतु जेवणाच्या अगोदर म्हणजेच जेवणाच्या दोन तास आधी पाणी पिणे योग्य ठरू शकते. आणि जर जेवणाआधी जर तुम्हाला जास्त पाण्याची तहान लागलेली असेल तर जास्तीत जास्त तुम्ही फक्त एक घोट इतके पाणी येऊ शकतात. एक घोट पाणी पिणे व्यतिरिक्त तुम्ही जास्त पाणी पिणे शक्य तितके चांगले होईल.
जेवणाआधी जर तुम्ही पाणी प्यायला तर तुमची भूक ही मंदावते. म्हणजेच तुम्हाला खूप प्रमाणात भूक लागली असेल आणि जर जेवण न करता जेवण आधी तुम्ही पाणी पिऊन घेतले तर तुमची भुकी नाहीशी होते. जेवणाआधी पाणी प्यायल्यामुळे जठराग्नी ही कुठेतरी कमी पडते त्यामुळे वजन कमी होते. अशा पद्धतीने वजन कमी व्हायला पाहिजे हे बरे नव्हे. वजन कमी होणे हे तर चांगलेच आहे पण,आपली जठराग्नी देखील चांगली असायला पाहिजे. म्हणून मित्रांनो जेवणाआधी पाणी शक्यतो पिणे टाळावे.कारण त्यामुळे तुमची जठराग्नी मंदावते. जेवणाआधी पाणी पिल्यामुळे भूक तर नाहीशी होते शिवाय तुमच्या पचनक्रिये मध्ये देखील बिघाड होऊ शकते. जेवणाआधी पाणी पिणे वर्ज करणे फार उत्तम. आयुर्वेदानुसार जेवणाआधी पाणी पिणे योग्य आहे परंतु ते दोन तासा आधी पिणे योग्य ठरू शकते.
जेवण करताना पाणी प्यावे का?
बर्याच जणांना हा प्रश्नदेखील पडलेला असतो की जेवण करताना पाणी प्यावे का ? तर काहीजण जेवण करताना पाणी पिणे टाळत असतात. जेवण करताना पाणी प्यावे का ? हे देखील जाणून घेणे आपल्याला गरजेचे असते. चला तर मग याविषयी देखील आपण माहिती जाणून घेऊया.
- जेवण करताना पाणी पिल्यामुळे शरीराची वाढ ही समान प्रमाणात होते.
- म्हणजेच ना अति कमी प्रमाणात. जेवणाआधी पाणी पिल्यामुळे भूक नाहीशी होते तर जेवणानंतर पाणी प्यायल्याने शरीराला स्थूलत्व प्राप्त होते.
- आपले शरीर हे समप्रमाणात असले पाहिजे शरीरातील सगळे धातू हे समान असले पाहिजे. जेवण करताना पाणी प्यायला ने धातूंची समानता होते.
- जेवताना मध्ये मध्ये पाणी पीने म्हणजेच एकदा सर्व पाणी पिऊन संपवणे असे नाही. तर मित्रांनो अंदाजे शंभर ते दीडशे एम एल पाणी घ्या. आणि जेवताना ज्यावेळेस आपण घास घेत असतो त्यामुळे जर घास घशाखाली उतरत नसेल त्यावेळेस तुम्ही पाणी पिणे योग्य ठरू शकते.
- जेवताना घास घास अडकत असेल तर तुम्ही थोडे-थोडे करून पाणी येऊ शकतात परंतु, जेवण झाल्यानंतर पाणी प्यायचं नसत.
- जेवण करताना पाणी हे थंड घेऊ नये तर कोमट पाणी प्यावे. थंड पाणी पिल्याने एस बी चे प्रमाण वाढते व पाचन क्रियेत बाधा येऊ शकते.
- जेवणा दरम्यान थोडे-थोडे करून पाणी प्यायल्याने अन्नाचे मोठे-मोठे तुकडे लहान व्हायला मदत होते. त्यामुळे अन्नाचे पचन नीट रित्या होते.
मित्रांनो जेवण आधी पाणी कसे प्यावे? प्यावे का? हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे. तसेच जेवणानंतर पाणी प्यावे का? हा प्रश्न देखील बरेच जण पडलेला असतो. जेवणानंतर पाणी का पिऊ नये? याविषयी देखील आपण सखोल माहिती जाणून घेऊया.
जेवणानंतर पाणी प्यावे का?
मित्रानो, जेवण आधी पाणी पिल्याने काय होते? तसेच जेवण करताना देखील पाणी प्यावे का? हे तुम्ही जाणून घेतले. आणि बर्याच जणांना हा प्रश्न तिकडे पडलेला असतो की जेवणानंतर पाणी प्यावे का? चला तर मग याविषयी आपण जाणून घेऊया.
- बरेच जण हे आपण हेल्दी राहावे म्हणून जेवणाआधी व जेवण करताना पाणी पिणे टाळतात. आणि जेवण झाल्यानंतर हे लोक आवर्जून पाणी पितात. परंतु मित्रानो जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिणे शक्यतो तुम्ही टाळले तर उत्तम होईल.
- जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायला ने शरीराचे वजन वाढीस लागते.
- जेवण झाल्यानंतर पाणी प्यायल्याने स्थूलत्व वाढत असते.
- अमाषयाच्या उर्ध्व भागात म्हणजेच वरच्या भागात छातीमध्ये कप होण्याची दाट शक्यता असते.
- जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने तुमच्या अन्नपचन क्रियेवर याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील अन्नाचे पचन व्यवस्थित रित्या होत नाही.
- अन्न पचन क्रिया जर व्यवस्थित झाली नाही तर तुमच्या शरीरात स्थूलत्व प्राप्त होऊन शरीर जड होते.
- जेवणानंतर पाणी पिल्यामुळे पाचन रस आणि एमझाईमस ची एकाग्रता कमी होते जे पाचन तंत्रामध्ये खूप महत्त्वाचे असते.
- त्यामुळे शरीरातील एसिडिटी चे प्रमाण वाढत असते.
- लगेच पाणी प्यायल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण देखील वाढत जाते.
- जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीराच्या पचन संस्थेला इजा पोचते.
- जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिणे शक्यतो तुम्ही जेवढे टाळणार तेवढे तुमच्या आरोग्यास फायदा होऊ शकतो.
- जेवणात समाविष्ट असलेले विटामिन्स व इतर पोषक तत्व हे शरीरामध्ये शोषून घेण्यास थोडा वेळ देणे गरजेचे असते म्हणून जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिणे शक्यतो टाळावे.
- गंभीर आजार टाळण्यासाठी व आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी जेवणानंतर पाणी शक्यतो टाळणे गरजेचे असते.
- जेवण झाल्यानंतर शक्यतो तुम्ही शतपावली करणे योग्य ठरते.
- जेवण झाल्यानंतर 45 ते 48 मिनिटानंतर तुम्ही पाणी पिऊ शकतात.
आयुर्वेदामध्ये देखील सांगितलेले आहे की जेवण झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिटानंतर पाणी पिणे योग्य ठरते. कारण जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिल्यामुळे त्याचा परिणाम हा पचनसंस्थेवर होत असतो. आणि वजन वाढण्याची देखील दाट शक्यता असते. तुमचे आरोग्य चांगले राहावे असे तुम्हाला जर वाटत असेल तर जेवणानंतर लगेच पाणी पिणे शक्यतो तुम्ही टाळले पाहिजे. अनेक डॉक्टर हे जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने पाणी पिण्याची शिफारस करतात.
मित्रांनो,वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्कीच आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद !