नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय करावे?

0
1953
नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय करावे
नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय करावे


नमस्कार मित्रांनो. घरात कुणीतरी नवीन पाहुणा येणार त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता लागलेली असते. बाळ सुखरूप राहो, बाळाची वाढ चांगली असायला हवी, म्हणून प्रत्येक जण होणाऱ्या बाळाच्या आईची खूपच काळजी घेत असतात. त्यामुळे बाळाच्या आईला खूप जपले जात असते. आणि अगदी काही जण तर  होणाऱ्या बाळाच्या आईला खूप नाजूकच बनवून ठेवतात. म्हणजेच कुठलेही प्रकारचे काम करू देत नाहीत. परंतु मित्रांनो असे करणे हे देखील चुकीचे ठरते कारण, होणाऱ्या बाळाच्या आईने नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी जमतील तितके, शक्य होईल तसे काम करायला करायला हवे.

कारण जर सारखे सारखे बसून राहिले, सगळ जागेवरच मिळत राहिले तर याने बाळाच्या आईचे नुकसान होऊ शकते. डिलिव्हरी सुखरूप व्हावी, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी यासाठी प्रेग्नेंट बाईला जितके काम करता येईल तितके तिने काम केले पाहिजे. काम करावे म्हणजे एकदम जड अवघड कामे करावे असे नाही तर प्रेग्नेंसी मध्ये अवघड व जड कामे शक्यतो टाळावे. तर मित्रांनो, नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी कोणती कामे केली पाहिजेत. तसेच नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी कुठले उपाय केले पाहिजे याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय केले पाहिजे हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय करायला हवे ?

  पूर्वीच्या काळी तर गर्भवती महिला या खूप काम करत असे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामच करत असत. सकाळी लवकर उठून घरातली कामे आवरून शेतात जाणे, घरातली सर्व कामे करणे ओढ्यावरुन पाणी घेऊन येणे, घरातली फरशी ही बसून पुसणे, नदीवर कपडे धुवायला जाणे, विशेष म्हणजे दळण दळणे हे देखील घरच्या घरी केली जात असे. म्हणजेच जात्यावर दळण दळणे इत्यादी सर्व कामे ही गर्भवती महिला करत असे. अशी कामे केल्याने शरीराची हालचाल व्यवस्थित रित्या होत असते आणि शरीर लवचिक असल्यामुळे पूर्वीच्या काळी बऱ्याच गर्भवती महिलांची नॉर्मल डिलिव्हरी होत असे.

आणि विशेष म्हणजे तेही घरच्या घरी करत असे. आणि आताच्या काळातील गर्भवती महिला हे खूप अंग चोरून काम करताना दिसून येतात. घरात कुणीतरी नवीन पाहुणा येणार म्हणून घरातील मंडळी देखील गर्भवतीला काही कामे करू देत नाहीत. गर्भवती महिलांची खूप काळजी घेतली जाते खूप जपवणूक केली जाते. परंतु नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी सुरुवातीपासून कामे करण्याची सवय ठेवल्यामुळे डिलिव्हरी ही सुखरूप आणि नॉर्मल होत असते. तुम्ही त्यांना नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय करावे ? कोणती कामे करावी? तसेच कशाप्रकारचे काळजी घ्यावी ? आणि कोणती कामे करू नयेत? हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

वाचा  स्वप्नात कुबेर दिसणे शुभ की अशुभ

नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी कोणती कामे करावीत ?

          मित्रांनो बऱ्याच जणांना असं वाटतं की गर्भवती महिलेला का इतकी काम करू द्यावी. परंतु डिलिव्हरी नॉर्मल व्हावी सुखरूप व्हावी यासाठी गर्भवती महिलेने घरातील सर्व प्रकारची कामे केली पाहिजे. जसे की कपडे धूने. कपडे धुताना खाली बसावे लागते त्यामुळे कपडे धूतल्यामुळे कमरेचा व्यायाम होत असतो तसेच हातांच्या देखील व्यायाम होत असतो. त्याचप्रमाणे घरातील साफसफाईची तसेच झाडू मारण्याचे कामेदेखील करावीत. झाडणीने घर झाडताना ते खाली वाकून झाडावे लागत असते त्यामुळे देखील कमरेचा व्यायाम होत असतो. तसेच घरातील साधीसुधी कामे स्वयंपाक करणे यांसारखी कामे देखील करावीत.

पूर्वीच्या काळी तर महिला या घोड्यावरुन पाणी घेऊन येत असे तसेच जात्यावर देखील दळण दळत असते त्यामुळे त्यांचा खूप हा व्यायाम व्हायचा हालचाल व्हायची. आताच्या काळात दळण घरी दळावे तर लागत नाही, परंतु शरीर लवचिक करण्यासाठी शारीरिक हालचाली ह्या खूप प्रमाणात करायला हव्यात. गर्भवती महिलेने सुरुवातीचे फक्त दोन ते तीन महिने काळजी घ्यायला हवी. म्हणजेच, त्यावेळी जड कामे अजिबात करायला नकोत परंतु नंतरच्या महिन्यांमध्ये सर्व प्रकारची कामे करायला हवी. परंतु जड व अवघड कामे अजिबात करू नये.

योग्य आहार घ्या :

            गर्भवती महिलांनी नियमित योग्य आहार घेणे आवश्यक ठरते. आहारामध्ये सर्व प्रकारच्या कडधान्यांचा त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश हा आवर्जून करायला हवा. त्याच प्रमाणे हिरवी पालेभाजी म्हणजेच पालकचे सेवन देखील केले पाहिजे. पालक मध्ये लोहा असल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होत असते. तसेच फळभाज्यांचा देखील समावेश आवर्जून करावा. टोमॅटो, भेंडी, पत्ता कोबी, फुलकोबी, गिलके, दोडके, अशा फळभाज्यांचा समावेश असावा त्याचप्रमाणे आहारामध्ये फळांचा देखील समावेश आवर्जून करावा.

नेहमीचा आहार हा जर चांगला असेल तर गर्भवती महिलेला सर्व पोषक तत्व व पोषक घटक त्याचप्रमाणे विटामिन्स मिळण्यास मदत होत असते. जे गर्भवती महिला व तिच्या होणाऱ्या बाळाला खूप आवश्यक असतात. तसेच गर्भवती महिने गर्भवती दरम्यान चहा कॉफी यांसारखे पदार्थांचे अति सेवन करणे टाळावे कारण यामुळे ॲसिडिटीची समस्या खूप प्रमाणात होत असते. आणि ॲसिडीटी होऊ नये म्हणून तुम्ही दुधाचे सेवन करणे खूप उत्तम घडत असते आणि यामुळे शरीराला पुरेपूर कॅल्शिअम देखील मिळत असते ते आई आणि बाळ या दोघांनाही आवश्यक असते. त्याच प्रमाणे गर्भवती दरम्यान गर्भवती महिलेने शेवटीशेवटी दोन महिने गाईच्या गावरानी तुपाचे सेवन करणे खूप आवश्यक ठरते. यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास खूप मदत होत असते.

वाचा  छातीत व पाठीत दुखणे कारणे आणि घरगुती उपाय

भरपूर प्रमाणात पाणी पिले पाहिजे :

             गर्भवती महिलांनी गर्भावस्थेत दरम्यान खूप पाणी पिणे आवश्यक ठरते. तसेच गर्भावस्थेत दरम्यान शरीरातील तापमान देखील वाढत असते त्यामुळे पाणी पिणे आवश्यक ठरते. त्याचप्रमाणे पाणी पिल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण देखील वाढत असते. गर्भावस्थेत दरम्यान पोट साफ न होण्याची त्रास देखील उद्भवत असतात तर यासाठी तुम्ही पुरेपूर पाणी पिणे आवश्यक आहे यामुळे पोट साफ होण्यास देखील मदत होत असते. तसेच पाणी पिल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित सुरळीत चालू राहते. तसेच गर्भवती महिलेने नारळ पाणी देखील भरपूर प्रमाणात पिले पाहिजे शरीरामध्ये आवश्यक पुरेसे पाणी भेटले तर शरीर हे डीहायड्रेशन होण्यापासून वाचत असते. म्हणून गर्भवती महिलेने पाणी पुणे खूप आवश्यक असते.

पुरेपूर विश्रांती घ्या :

गर्भवती महिलांनी घरातील कामे तर केलेच पाहिजे त्यासोबतच पुरेपूर विश्रांती घेणे देखील खूप आवश्यक आहे. कारण गर्भावस्थेत दरम्यान मध्ये वजन हे वाढत असते तसेच काम करताना देखील थकवा येत असतो आणि यासाठी विश्रांतीची खूप गरज असते. तर गर्भवती महिलांनी पुरेपूर विश्रांती घेतल्यामुळे मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहते. बऱ्याच गर्भवती महिला या गर्भावस्थे दरम्यान ताण- तणावात देखील राहतात.  आपली डिलिव्हरी कशी होणार काही त्रास तर होणार नाही ना वगैरे वगैरे अशा विचार मनात घोळत असतात. तर अशा प्रकारचे ताण तणाव विश्रांतीमुळे देखील दूर होत असतात. म्हणून गर्भावस्थेत दरम्यान गर्भवती महिलेने पुरेपूर विश्रांती घेणे आवश्यक ठरत असते.

व्यायाम व शारीरिक हालचाली करायला हवी :

     गर्भावस्थेत दरम्यान गर्भवती महिलेने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजे. कारण व्यायाम केल्यामुळे शरीर हे लवचिक राहते आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी देखील मदत होत असते. हल्ली तर आता दवाखान्यांमध्ये देखील गर्भवती महिलांकडून व्यायाम करून घेत आहेत. तर त्या तुम्ही देखील सामील होऊन व्यायाम करायला हवा कारण व्यायाम केल्यामुळे कमरेचा व्यायाम होत असतो तसेच पोटाच्या खालील बाजूच्या भागाचा देखील व्यायाम होत असतो, त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास खूप मदत होत असते. त्याचप्रमाणे रोज सकाळी व संध्याकाळी चालण्याचा व्यायाम देखील करणे आवश्यक ठरते. चालण्याचा व्यायाम शरीर लवचिक राहण्यास मदत होत असते. बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला देखील असतो की चालण्याचा व्यायाम करायला हवा  जसजसे डिलिव्हरी ची वेळ येत असते, तसे बाळा खाली सरकत असतो त्यामुळे, चालण्याचा व्यायाम यासाठी उत्तम ठरत असतो. म्हणून गर्भवती महिलांनी व्यायाम करणे व शारीरिक हालचाली आवश्यक करायला हव्या, यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. तसेच गर्भवती दरम्यान गर्भवती महिलेने तणावमुक्त राहणे खूप आवश्यक ठरत असते. यासाठी गर्भवती महिलेने श्वासाचे व्यायाम करणे देखील उचित ठरते, यामुळे आपण तणाव मुक्त राहू शकतो. त्याचप्रमाणे गर्भवती महिलेने ध्यानधारणा देखील केली पाहिजे सकाळी रोज ओंकारचा व्यायाम देखील केला पाहिजे यामुळे दीर्घ श्वास घेण्यास मदत होत असते.

वाचा  मोड आलेले मूग यांचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला वेगवेगळे फायदे :-

कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी व कोणत्या गोष्टी करायला नकोत :

    गर्भावस्थेत दरम्यान गर्भवती महिलेने घरातील सगळे काम करणे आवश्यक ठरते. कामे करावी परंतु जड व अवजड कामे अजिबात करू नये. यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही व्यायाम करू नये. डॉक्टर जे व्यायाम सांगतील तेच व्यायाम करणे आवश्यक ठरते. जड आणि अवघड व्यायाम अजिबात करू नये. गर्भवती महिलेने झोपताना देखील व्यवस्थित झोपले पाहिजे कुठल्याही पोझिशन मध्ये झोपणे चुकीचे ठरते कारण यावर त्याचा बाळावर इफेक्ट होत असतो. गर्भवती दरम्यान गर्भवती महिलेने चुकूनही पोटावर झोपू नये. गर्भ अवस्थे दरम्यान गर्भवतीने कोल्ड्रिंक्स घेणे, मद्यपान करणे टाळले पाहिजे. डॉक्टरांनी सर्वात आधीच डिलीवरीची तारीख ही दिलेली असते. त्यामुळे शेवटी शेवटी गर्भवती महिलेने घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे कारण डिलिव्हरी ही तारखेच्या आधी देखील होऊ शकते. गर्भवती महिलेने एकदम डायरेक्ट देखील उठू नये. उठताना-बसताना देखील हळूवारपणे उठ – बस  पाहिजे. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधे वेळेवर घेणे आवश्यक ठरते. जर गर्भावस्थेत दरम्यान बेडरेस्ट सांगितला असेल तर विश्रांती घ्यावी डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे कामे अवघड कामे करू नयेत. आणि याबद्दल जास्तीचा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

      तर मित्रांनो, आज आपण वरील प्रमाणे गर्भवस्थेत दरम्यान काय करायला हवे, काय करू नये तसेच आहारामध्ये कुठले पदार्थ घ्यायला हवेत तसेच व्यायाम करणे किती गरजेचे ठरते शारीरिक हालचाली किती महत्त्वाच्या आहेत ज्यामुळे डिलिव्हरी नॉर्मल होण्यास मदत होऊ शकते. आणि जर याबद्दल तुम्हाला अजून जास्तीची माहिती हवी असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.

      मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कसे वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

      धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here