उंची वाढवणे स्वागत तोडकर

0
1350
उंची वाढवणे स्वागत तोडकर
उंची वाढवणे स्वागत तोडकर

                 आज-काल सर्वांनाच एक विशिष्ट प्रकारची उंची पाहिजे असते. तसेच ही उंची वाढवणे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न ते करत असतात. पण बऱ्याच लोकांच्या प्रयत्नांना यश येतेच असे नाही बऱ्याच लोकांना अपयश देखील येते. याच प्रकारे बऱ्याच लोकांना तर माहितीही नसते की आपली उंची किती असावी तसेच जर आपले वय 18 च्या आत आहे किंवा 18 बाहेर आहे तर आपली उंची किती असली पाहिजे. कारण वैज्ञानिक अनुसार मुलींची उंची 18 वर्षापर्यंत वाढते व मुलांची उंची साधारणत 21 वर्षापर्यंत वाढते. पण याला काही अपवाद देखील ठरू शकतात असे बऱ्याच लोक आहे ज्यांची उंची 21 किंवा 18 नंतर ही थोडीफार वाढू शकते तर बऱ्याच लोकांची उंची पंधरा वर्षानंतर वाढायची थांबते.

               जे लोक शाळा कॉलेजेसमध्ये असतात त्या लोकांना माहिती असेल तर आपली उंची कमी असेल तर आपले समोरच्या व्यक्तीवर प्रभुत्व पडत नाही तसेच बऱ्याच लोकांचा आत्मविश्वास देखील त्यांची मुळे कमी होतो. पण जर का तुमचे एक विशिष्ट वजन व तुमच्या शरीराला एक विशिष्ट उंची असेल तर समोरच्या वर देखील तुमचा प्रभाव चांगल्या प्रमाणामध्ये पडतो. तसेच उंची ही आत्मविश्वास वाढण्यासाठी हे फार उपयुक्त मानली जाते. तर मित्रांनो आज आपण उंची वाढवण्यासाठी काही उपाय बघणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमची उंची वाढवू शकाल.

स्वागत तोडकर यांची उंची वाढवण्यासाठी उपाय :

                    तर आता आपण बघितले की उंची आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे स्थान ठरवते. म्हणजेच आपली उंची जर कमी असेल तर आपल्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड देखील तयार होतो. उंची वाढवणे हे कसे शक्य होईल हे कळणे महत्वाचे आहे. तर याच विषयाबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. स्वागत तोडकर यांचे उंची वाढवण्यासाठी काही उपाय चला तर मग बघुया.

वाचा  कारल्यासोबत काय खाऊ नये ? जाणून घ्या सोपे उपाय

आत्मविश्वास वाढवा :

                  बरेच लोक असे बोलतात की उंची नसल्यामुळे किंवा कमी उंची असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. पण असे न करता तुम्ही सर्वप्रथम स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. तसेच जर तुमची उंची कमी असेल तर तुमच्या आत्मविश्वासातून ते दिसून आले नाही पाहिजे. प्रत्येक वेळी सकारात्मक विचार करा असे केल्याने देखील तुमची उंची वाढण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकते जरी तुम्हाला वाटेल की हा खूप छोटा उपाय आहे तरी असे केल्याने देखील तुमच्या शरीरामध्ये मोठा बदल घडून येऊ शकतो.

संतुलित आहार घ्या :

                  संतुलित आहार हा आपल्या उंची वाढवणे साठी फार महत्त्वाचा घटक आहे. तसेच हा बदल काही एका दिवसात किंवा एका वर्षात घडून येण्यासारखा नाही. म्हणून तुम्हाला लहानपणापासूनच संतुलित आहार भेटला पाहिजे. कारण याचा परिणाम हळूहळू आपल्या शरीरावर दिसून येतो तसेच फास्टफूड म्हणजेच चायनीज किंवा इतर खाद्य पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. कारण या पदार्थांनी नुसते पोट भरते किंवा शरीरा मधील फ्लॅट वाढतो. पण उंची वाढण्यासाठी यामध्ये पुरेसे घटक नसतात पण जर का तुम्ही दिवसभर मधून एक फळ खाल्लं हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केले तर तुम्हाला मुबलक प्रमाणात पोषण तत्वे मिळतील. तसेच शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी दिले व विश्रांती दिली तरीदेखील असे छोटे बदल करून तुम्ही तुमच्या शरीराची वाढ सुदृढ प्रमाणे करू शकता.

व्यायाम करा :

                     बऱ्याच वेळेस व्यायाम केल्याने देखील अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला सहज मिळतात. तसेच या प्रश्नाचे उत्तर देखील व्यायामा मध्येच आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारे व कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू शकता. म्हणजेच मी व्यायामामध्ये योगा करू शकतात. आणि योगामध्ये सर्व मुख्य म्हणजे सूर्यनमस्कार व ताडासन करावे. जेणेकरून तुमची उंची वाढवणे साठी मदत होईल. याच प्रकारे योगामध्ये काही असे आसन देखील आहेत ज्यामुळे तुमची उंची वाढण्यास मदत होईल. पश्चिमोतांनासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन हे काही असे आसन आहे की जे आसन तुम्ही केल्याने तुमची उंची वाढण्यास मदत होईल. याच प्रकारे तुम्ही काही इतर शारीरिक व्यायाम किंवा मैदानी खेळ खेळले तरी देखील तुमची उंची वाढण्यास मदत होईल. या मैदानी खेळांमध्ये सायकलिंग, रशीउडी, मलखाम असे मैदानी खेळ देखील तुम्ही खेळू शकता जेणेकरून तुमची उंची वाढण्यास मदत होईल.

वाचा  गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची विविध कारणे व घरगुती उपचार

उंची वाढवण्यासाठी स्वागत तोडकर यांचे औषध व ते औषध कसे वापरावे?

                      चला आता आपण काही आयुर्वेदिक औषध जाणून घेऊया की आपण आयुर्वेदानुसार आपली उंची कशी व कोणत्या प्रकारे वाढवू शकतो चला तर मग बघुया.

अश्वगंधा वापरा :

                   आयुर्वेदामध्ये अश्वगंधा ला फार मोठा मान आहे. तसेच अश्वगंधा ही बर्‍याच आजारांवर फार प्रभावी ठरते. याच प्रकारात उंची जर वाढत नसेल तर तुमची उंची वाढण्यासाठी देखील आश्र्वागांधा फार मदतीचे ठरेल. तर सुरुवातीस आपण एक ग्लास दूध घ्यावे हे दूध जास्त गरम न करता कोमट ठेवावे. आणि त्यानंतर एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा अश्वगंधा टाकावे. शक्यतो हे दूध रात्री झोपतांना प्यावे याचा पहिला फायदा म्हणजे झोप चांगली लागेल, पचनक्रिया सुधारेल याच प्रकारे उंची साठी देखील हे फायदेशीर ठरेल.

दोन काळीमिरी करेल कमाल :

                  तुम्ही जर दोन काळीमिरी घेतली आणि ती काळी मिरी रोज 20 ग्राम लोणी सोबत घेतली तर तुमची उंची वाढण्यास तुम्हाला फार मदत होईल. कारण लोणी मध्ये आणि काळी मिरी मध्ये काही असे घटक असतात जे तुमचे हाडाची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यास फायदेशीर ठरतील.

देशी गाईचे दूध :

                  तुमचे वय जर 18 वर्षाखालील असेल आणि तुम्ही जर दूधाचे सेवन करत असाल तर शक्यतो देशी गाईच्या दुधाचे सेवन करावे. तसेच शक्य असल्यास त्या दुधामध्ये एक चमचा गावरान तूप टाकून प्यावे त्यामुळे तुमची हाडे बळावतील व तुमच्या उंची मध्ये देखील फरक दिसून येईल.

कवळ्या उन्हामध्ये व्यायाम करा :

                सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये व्यायाम केल्याने तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये विटामिन डी भेटतात त्याचबरोबर तुमची चांगल्या शारीरिक वाढीसाठी पोषक तत्व देखील तुम्हाला मिळतात.

आवळा :

               तुम्ही तुमच्या आराम मध्ये आवळ्याचा कोणत्याही प्रकारे समावेश करू शकता. तुम्ही आवळ्याची पावडरचा देखील वापर करू शकता किंवा आवळ्याचे तुकडे खारट पाण्यामध्ये रात्रभर ठेवावे त्यानंतर सकाळी उठल्यानंतर ते आवळ्याचे तुकडे देखिल तुम्ही खाऊ शकता.

वाचा  वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची पद्धत कशी हवी

बदाम, सोयाबीन, हरभरे :

               बदाम, सोयाबीन व हरभरे यांचे जर तुम्ही नियमितपणे सेवन केले तर तुम्हाला तुमच्या उंची मध्ये एक प्रकारचा फरक जाणून येईल. तसेच बदाम, सोयाबीन, हरभरे या तिघांचे सेवन करताना हे तिने भिजवून खावे. सोयाबीन मध्ये 70% प्रोटिन्स असतात म्हणून सोयाबीनचे सेवन सकाळचे नाश्त्यामध्ये करावे.

                  तर मित्रांनो आज आपण जाणून घेतले आपली उंची जर कमी असेल तर स्वागत तोडकर यांचे काही उपाय देखील आपण आज बघितले. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here