सिझेरियन नंतर घ्यावयाची काळजी.

0
1602
सिझेरियन नंतर घ्यावयाची काळजी
सिझेरियन नंतर घ्यावयाची काळजी

 

सिझेरियन नंतर घ्यावयाची काळजी

नमस्कार मित्रांनो. मातृत्व मिळवणे हा एक गोंडस अनुभव प्रत्येक स्त्रीच्या जीवनातला असतो. त्यामुळे घरातील गर्भवती महिलेची खूप काळजी घेतली जात असते. तिला काय हवं काय नको तसेच, तिच्या आहारात योग्य घटकांचा समावेश करणे तिच्याकडून बंद करून घेणे इत्यादी प्रकारे काळजी घेतली जात असते. प्रत्येक गर्भवती महिला असे वाटत असते की आपली डिलिव्हरी ही सुखरूप आणि नॉर्मल व्हावी. डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य त्या पद्धतीने काळजी घ्यायला हवी असते. त्याचप्रमाणे, सुरुवातीपासूनच व्यायाम करण्याची सवय ठेवली तर शरीर हे ॲक्टिव्ह बनत असते आणि त्यामुळे डिलिव्हरी देखील नॉर्मल होण्यास मदत होत असते. परंतु प्रत्येक जणांची डिलिव्हरी हे नॉर्मल पद्धतीने होते असे नाही. शेवटी शेवटी काही अडचणी आल्यामुळे किंवा आईला व बाळाला दोघांनाही धोका असल्यामुळे इच्छा नसताना देखील सिझेरियन करावे लागत असते. कारण, त्याशिवाय दुसरा पर्याय नसला तर सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी करावी लागत असते. आणि हे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत असते आपले बाळ सुखरूप रहावे अशी प्रत्येका आईची इच्छा असते त्यामुळे इच्छा नसताना देखील सिजरियन करावे लागत असते. सिझेरियन करणे ही देखील एक मोठी सर्जरी असते. कारण सिझेरियन करताना खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागत असते. आणि तसेच सिझेरियन झाल्यानंतर देखील खूप काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. सिझेरियन करताना गर्भवती महिलेला भुलचे इंजेक्शन दिले असते. त्यामुळे, तेव्हा त्या वेदना जाणवत नाही जेव्हा ही भूल हळूहळू उतरायला लागते तेव्हा मात्र असह्य वेदना होत असतात. म्हणून सिझेरियन झाल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागत असते. तर मित्रांनो, आज आपण सिझेरियन नंतर कोणती काळजी घेणे आवश्यक ठरते? तसेच कशाप्रकारे काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग, सिझेरियन नंतर घ्यावयाची काळजी कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी, याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

      सिझेरियन का करावे लागत असते?

      प्रत्येक गर्भवती महिलेला असे वाटत असते की आपली डिलिव्हरी ही नॉर्मल आणि सुखरूप व्हावी. म्हणून आपली डिलिव्हरी नॉर्मल व्हावी यासाठी ते सुरुवातीपासून योग्य त्या प्रकारे काळजी घेत असतात. आराम मध्ये योग्य त्या पोषक घटकांचा तत्त्वांचा समावेश करत असतात. दर महिन्याला तपासणीसाठी डॉक्टरांकडे वेळेत जात असतात. तर गर्भधारणेदरम्यान व्यायाम देखील करत असतात. परंतु एवढे सर्व प्रयत्न करून देखील शेवटी काही जणांवर सिझेरियन करण्याची वेळ येत असते. पंधरा दिवस आधीच माझ्या मैत्रिणीची देखील डिलिव्हरी झाली. ती देखील पहिल्यापासूनच खूप काळजी घेत होती त्याचप्रमाणे तिच्या गर्भधारणेदरम्यान नियमित व्यायामाची सवय देखील तिने ठेवलेली होती. तिचे मिस्टर आणि तिचे सासू-सासरे हे देखील तिची व्यवस्थित प्रकारे काळजी घेत होते. अगदी तिला जड सामानाला हात देखील लाऊ देत नव्हते. एवढी सगळी काळजी घेऊन देखील तिला सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी करावी लागली. कारण, तिच्या पोटातील बाळ हे  आडव्या पोझिशन मध्ये होते. आणि डॉक्टरांनी सांगितले की त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. म्हणून इच्छा नसताना देखील तिला सिजरियन पद्धतीने डिलिव्हरी करावी लागली. माझी मैत्रीण आणि तिचे बाळ हे दोघेही सुखरूप आहेत, परंतु सिझेरियन झाल्यानंतर तिला खूप काळजी घ्यावी लागली. आणि हे बऱ्याच जणांच्या बाबतीत देखील घडत असते. कुणाचे बाळ उलट्या दिशेने असल्यामुळे, तर कुणाचे बाळ आडवे असल्यामुळे, तर कुणाची गर्भजल पिशवी फुटल्यामुळे, आई व बाळ यांना धोका असल्यामुळे सिजर करावे लागत असते. या सर्व कारणांमुळे सिजेरियन पद्धतीने डिलिव्हरी करावे लागत असते.

वाचा   गावरान तूप खाण्याचे फायदे

      सिझेरियन नंतर घ्यावयाची काळजी कशाप्रकारे असावी?

बर्‍याच गर्भवती महिलांना नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे वाटत असते परंतु काही क्रिटिकल कंडिशन मुळे नाही तर आई व बाळ यांना दोघांना धोका असल्यामुळे दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी करावी लागते. सिझेरियन पद्धतीमध्ये सुरुवातीला गर्भवती महिलेच्या कमरेला भुल चे इंजेक्‍शन दिले जाते. यानंतर थोड्यावेळाने गर्भवती महिलेच्या पोटावर कट मारला जात असतो. आणि ही क्रिया खूप विचार करून करावी लागत असते. अशा पद्धतीने पोटातून बाळ बाहेर काढले जाते. आणि बाळ बाहेर काढल्या नंतर ज्या ठिकाणी कट मारलेला आहे त्या ठिकाणी टाके मारले जातात. अर्थातच ही देखील खूप मोठ्या प्रकारची सर्जरी असते. म्हणजे, ज्याप्रमाणे ऑपरेशन केल्यावर टाके पडले की त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागत असते त्याचप्रमाणे सिजरियन पद्धती नंतर देखील टाक्यांची व गर्भवती महिलेची काळजी घेणे आवश्यक ठरत असते. म्हणतात ना डिलिव्हरी म्हणजेच बाई चा दुसरा जन्म असतो. सिजरियन पद्धतीने डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भवती महिलेची कशा प्रकारे काळजी घेणे आवश्यक ठरते याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊया.

  • सिझेरियन पद्धती नंतर ज्या ठिकाणी टाके पाडलेले असतात त्या टाक्यांची व्यवस्थित प्रकारे काळजी घेतली पाहिजे. आणि जर टाक्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर त्यात अजून इन्फेक्शन होऊ शकते.
  • वेळोवेळी टाक्यांना स्वच्छ करून त्यावर डॉक्टरांनी दिलेला मलम लावणे आवश्यक असते. त्यामुळे टाक्यांची जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
  • डॉक्‍टरांनी दिलेल्या गोळ्या औषधी वेळेवर घेतला पाहिजे. म्हणजेच टाक्यांची जखम लवकर भरून निघण्यास मदत होते.
  • टाके पडल्यामुळे टाक्यांच्या आजूबाजूच्या भागातील सूज येत असते. त्यामुळे तुम्ही त्यावर बर्फाचा शेक घेऊ शकतात. यासाठी तुम्ही आईस बॅक नाही तर बर्फ एखाद्या कपड्यांमध्ये गुणवंत याने शेख आजूबाजूच्या जागेला देऊ शकतात. परंतु ते देणे आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
  • सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी झाल्यामुळे तुम्हाला काही तास पाणी आणि अन्न वर्ज करावे लागत असते. आणि पाणी जर एकदा नाही तर अन्न पोटात गेल्यामुळे अजून जास्त दुखापत होऊ शकते. तुम्हाला पाण्याची तहान लागलेली असेल तर फक्त तुम्ही ओठ ओले होईल इतकच पाणी घेऊ शकतात.
  • सिजर झालेले असल्यामुळे ऊठ-बस करताना टाक्यांवर वर ताण पडत असतो त्यामुळे टाके दुखण्याची संभावना असते. त्यामुळे तुम्ही हालचाल करताना व्यवस्थित प्रकारे करावी जेणे करून  टाक्यांवर ताण पडणार नाही.
  • जर तुम्हाला शौचालयास जायचे असेल आणि डॉक्टरांनी परवानगी दिलेली असेल तर तुम्ही टॉयलेट पर्यंत जाऊ शकतात जातांना कोणालातरी सोबत घेऊन जावे जेणेकरून तुम्हाला आधार मिळेल.
  • सिजर झाल्यानंतर शक्यतो तुम्ही जड अवजड वस्तू उचलू नका किंवा कामे करू नका. नाहीतर त्यामुळे पोटावर ताण पडून टाके दुखण्याची शक्यता असते तसेच टाक्यांतून रक्त देखील येऊ शकते.
  • सिजर पद्धतीने डिलिव्हरी झाल्यानंतर टाके म्हणजेच टाक्यांची जखम भरून निघण्यास वेळ लागत असतो. तिथली जागा पूर्वीसारखी व्हायला खूपच वेळ द्यावा लागत असतो. म्हणून तुम्ही योग्य ती वेळोवेळी काळजी घ्यायला हवी.
  • सिजर झाल्यानंतर तुम्ही काही दिवस तरी घट्ट कपडे घालने टाळावे. कारण तुम्ही घट्ट कपडे अथवा जीन्स वगैरे घातल्या मुळे पोट दाबण्याची शक्यता असते आणि पोट दाबले गेल्यामुळे टाक्यातून रक्त येण्याची संभावना असते. म्हणून तुम्ही अशा वेळी मोकळे कपडे घालावेत.
  • बर्‍याच जणांचे सिजर नंतर पोट सुटण्याची शक्यता असते. म्हणून सिजर झाल्यानंतर लगेच तुम्ही पोट बांधणे शक्यतो टाळावे नाही तर यामुळे पोटावर ताण पडतो आणि ज्या ठिकाणी टाके पडलेले आहेत त्या ठिकाणी दुखण्याची समस्या उद्भवते. म्हणू शकता तुम्ही पोट बांधणे टाळावे.
  • सिजर झाल्यानंतर तुम्ही लगेचच पोट कमी व्हावे यासाठी तुम्ही लगेच व्यायाम करणे शक्यतो टाळावे. कारण तुम्ही लगेच व्यायाम सुरू केल्यामुळे पोटावर ताण पडून पोट दुखण्याची शक्यता असते. आणि टाक यांना देखील त्रास होण्याची शक्यता असते.
  • सिजर झाल्यानंतर जर डोकं दुखत असेल ताप येत असेल किंवा मळमळ वगैरे अशा समस्या उद्भवत असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांशी याबद्दल बोलून घ्यावे. अशा वेळी डॉक्टर योग्य तो सल्ला तुम्हाला देतील.
  • बाळाला दूध पाजण्यासाठी सारखे सारखे करू नका त्यासाठी तुम्ही बाळाला तुमच्या जवळच असू द्यावे जेणेकरून बाळाला दुध पाजण्यासाठी सारखे सारखे उठबस करावे लागणार नाही.
  • सिजर झाल्यानंतर काही दिवस गरम पाण्याने अंघोळ करणे शक्यतो टाळावे नाहीतर त्यामुळे टाक्यांना त्रास होण्याची शक्यता असते.
  • सिजर झाल्यावर पूर्णवेळ झोपून राहणे शक्यतो तुम्ही टाळावे. थोडीफार शारीरिक हालचाल तुम्ही करणे आवश्यक ठरत असते आणि डॉक्टर देखील असा सल्ला देत असतात.
  • सिजर झाल्यानंतर तुम्हाला पोट साफ होण्यास त्रास होऊ नये यासाठी तुम्ही भरपूर पाणी पिणे आवश्यक ठरत असते फक्त सुरुवातीचे जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत पाणी पिऊ नका. त्यानंतर पाणी तुम्ही पिऊ शकतात.
  • सिजर झाल्यानंतर बराच वेळ पोट दुखण्याची समस्या असते म्हणून तुम्ही स्वतःहून पेनकिलर गोळ्या घेणे टाळावे. डॉक्टरांना विचारून योग्य तो सल्ला तुम्ही घ्यायला हवा.
वाचा  बदाम खाण्याचे फायदे

 सिझेरियन पद्धतीने डिलेवरी झाल्यानंतर तुम्ही वरील सर्व प्रकारे काळजी घ्यायला हवी. जास्तीत जास्त त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांची बोलून योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

    मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

        धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here