बाळ गुटगुटीत होण्यासाठी

0
2146
बाळ गुटगुटीत होण्यासाठी
बाळ गुटगुटीत होण्यासाठी

 

नमस्कार मित्रांनो. प्रत्येक आईची इच्छा असते की आपले बाळ हे छान असावे. डिलिव्हरी झाल्यानंतर आईच्या कुशीत जेव्हा जन्मलेले बाळ हाती येते तेव्हा तो क्षण खूप आनंददायी असतो. म्हणजेच तो क्षण आई कधीही विसरू शकत नाही असा अनमोल असतो. बाळाच्या जन्मापासूनच आई बाळाचे खूप काळजी घेत असते तसेच आपले बाळ गुटगुटीत गब्बू गब्बू व्हावे असे प्रत्येक आईला वाटत असते. आपल्या बाळाचे वजन हे प्रत्येक महिन्यानुसार योग्यरितीने असायला हवे असे प्रत्येक आईला वाटत असते. नवीन जन्मलेल्या बाळाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते तसेच त्याचे शरीर हे खूप कोमल आणि नाजूक असते. त्यामुळे त्याला पकडताना देखील व्यवस्थित प्रकारे पकडले पाहिजे.

तसेच नुकत्याच जन्मलेल्या बाळाला मान पकडता येत नाही त्यामुळे त्याच्या माने खालील व्यवस्थित हात धरून त्याला पकडले पाहिजे. तसेच त्याला पकडताना डायरेक्ट न पकडता त्याला नरम शाल मध्ये धरून पकडायला हवे. त्यामुळे पकडताना बाळाला देखील इजा पोहोचत नाही. आपले देखील बाळ गुटगुटीत व्हावे यासाठी जन्मल्यापासूनच त्याची व्यवस्थित प्रकारे काळजी घेतली जाणे आवश्यक असते. तर मित्रांनो आज आपण बाळ गोष्टीत व्हावे यासाठी कशाप्रकारे बाळाचे काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग बाळ गुटगुटीत होण्यासाठी आपण काय केले पाहिजे? कशा पद्धतीने बाळाची काळजी घेतली पाहिजे ? याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

बाळ गुटगुटीत होण्यासाठी काय केले पाहिजे ?

     तुम्हाला देखील वाटते का की आपले बाळ देखील गुटगुटीत व्हावे? मग आपले बाळ गुटगुटीत व्हावे यासाठी आपण काय करायला हवे त्याचे कसे पालन-पोषण करायला हवे आपण त्याची कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी याविषयी आपल्याला जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. पहिल्यांदा स्त्री जेव्हा आई होत असते तेव्हा तो तिचा आनंद हा खूपच वेगळा असतो.तो ती कधीही विसरू शकत नाही असा असतो. आणि आई झाल्यावर आपण आपल्या बाळाला कशा प्रकारे गुटगुटीत करायला हवे याबद्दल ती काळजीत असते. म्हणून आपण माळ गुळगुळीत व्हावे यासाठी काय करायला हवे हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते. आपले देखील बाळकूड व्हावे यासाठी काय करायला हवे आहे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

बाळ जन्मल्यावर ६ महिन्यापर्यंत आईचे दुध पाजायला हवे.

बाळ गुटगुटीत होण्यासाठी बाळाचा जन्म झाल्यापासूनच व्यवस्थित प्रकारे काळजी घ्यायला हवी. बाळाचा जन्म झाल्यावर त्याला आईचे दूध देणे अत्यंत आवश्‍यक असते त्याशिवाय तुम्ही काहीही देऊ नका. माझ्या बाळाचा जन्म झाला तेव्हापासून तर सहा महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आणि फक्त आईचेच दूध देणे अत्यंत आवश्यक असते. आईचा आहार जर व्यवस्थित असेल जर आईच्या आहारामध्ये सगळेच विटामिन्स, प्रोटीन्स असतील व पोषक घटक आहारामध्ये मिळत असतील तर ते सर्व घटक, प्रोटीन्स, विटामिन्स हे बाळाला आईच्या दुधापासून मिळत असते. बाळाची तब्येत जर गुटगुटीत करावयाचे असेल तर तुम्ही देखील व्यवस्थित प्रकारचा आहार घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण बाळाला सुरुवातीला फक्त आईचे दूध पाजावे लागत असते त्यामुळे तुम्ही जेवढा आहार चांगला घेणार तेवढे सर्व विटामिन्स बाळाला तुम्ही पाजलेल्या दुधामधून मिळणार आहे.

वाचा  राईच्या तेलाचे फायदे

आपले बाळ गुटगुटीत व्हावे यासाठी आपण देखील चांगला आहार घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या बाळाला सर्वच पौष्टिक घटक दुधातून मिळू शकतील. आईचे दूध बाळाला पास झाल्यामुळे सर्व प्रकारची प्रतिकारशक्ती बाळाची वाढत असते. त्यामुळे आहे बाळाला आईचे दुध पाजणे चांगले असते. जर आईला पुरेसे दूध देत नसेल तर आईने पहिल्या सुरुवातीला आपले दूध पाजावे व त्यानंतर तुम्ही वरच दूध पाजण्यास हरकत नाही. बाळ जर आईचे दूध पिता पिता शांत झोपी जात असेल तर तर समजून घ्यावे, की बाळाचे पोट व्यवस्थित प्रकारे भरत आहे. आणि जर बाळ दिवसातून सहा सात वेळा तरी व्यवस्थित प्रकारे सू करत असेल तर तर समजून घ्यावे की बाळाची पोट व्यवस्थित प्रकारे भरत आहे.

त्याचप्रमाणे आईने दूध पाजताना एका साईडने पंधरा ते वीस मिनिटं दूध देणे आवश्यक असते. आणि त्यानंतर तुम्ही दुसरी साईड चेंज करून 15 ते 20 मिनिटं दूध पाजायला हवे यामुळे बाळाचे पोट दुखी व्यवस्थितरीत्या भरत असते. त्याचप्रमाणे यामध्ये दूध पाजायला हवे. बाळ जर उठत नसेल तर त्याला बळजबरी उठून फीडिंग करावी. जेणेकरून त्याचे पोट देखील व्यवस्थित भरेल आणि झोप देखील शांत लागेल व यामुळे बाळ गुटगुटीत होण्यासाठी देखील मदत होऊ शकते. म्हणून सुरवातीला सहा महिने तरी आईचे दूध बाळाला दूध पाजणे अत्यंत आवश्यक असते. तसेच बाळ सारखे सारखे आजारी पडत असेल तर लगेचच डॉक्टरांना दाखवावे. कारण बाळ सारखे सारखे चिडचिड करत असेल रडत असेल आजारी पडत असेल तर त्यामुळे बाळाचे वजन कमी होण्याची शक्यता असते म्हणून वेळेतच डॉक्टरांना दाखवले पाहिजे.

बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर घ्यावयाची काळजी:-

       आईने सुरुवातीचे सहा महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त अंगावरचे दूध बाळाला पाजायला हवे. त्यामुळे बाळाची तब्येत देखील व्यवस्थित राहते. तसेच आईच्या दुधातून बाळाला सर्व प्रकारचे विटामिन्स, प्रोटिन्स,पौष्टिक घटक मिळत असतात. त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती देखील व्यवस्थित राहते. बाळ जेव्हा ६ महिन्याचे होते तेव्हा सहा महिन्यानंतर तुम्ही बाळाला वरचे खाऊ घालायला सुरुवात करू शकतात. कारण बाळाची वाढ ही होत असते त्यामुळे बाळाची भूक देखील वाढत असते. त्यामुळे बाळाचे फक्त आईच्या दुधावरच पोट भरत नाही. म्हणून बाळ सहा महिने झाल्यानंतर तुम्ही त्याला वरचे खायला सुरुवात करायला हवी. जेणेकरून, बाळाची तब्येत देखील चांगली होण्यास मदत होईल. तर बाळ सहा महिने झाल्यानंतर तुम्ही त्याला वरचे पदार्थ कोणते खाऊ घालू शकतात हे देखील जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

  • बाळ सहा महिने झाल्यानंतर तुम्ही अंगावरचे दूध तर पाजायलाच हवे, परंतु त्यासोबतच तुम्ही बाळाला नाचणीची खीर देखील खाऊ घालायला हवी. 
  • हल्ली तर आता सेरेलॅक पावडर देखील बाळांच्या वयानुसार मिळत असते. तर ती देण्याआधी तुम्ही,  डॉक्टरांना विचारूनच द्यायला हवी.
  • सहा महिन्यानंतर तुम्ही बाळाला बाळगुटी देण्यास सुरू करू शकतात.
  • बाळाला तुम्ही काजू, बदाम, खारीक याचा एकेक वेढा व्यवस्थित सान वर वाटून देऊ शकतात.
  • तसेच सहा महिने झाल्यानंतर बारा तुम्ही पाणीदेखील पाजायला सुरू करायला हवे.
  • मुगाची डाळ आणि तांदूळ हे समप्रमाणात घ्यावे. हे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे आणि एका कपड्यावर टाकून सुकून घ्यावे. यानंतर मुगाची डाळ आणि तांदूळ हे मिश्र वस्तू सूकून झाल्यानंतर कढईमध्ये व्यवस्थित प्रकारे भाजून घ्यावे आणि हे थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक दळून घ्यावे. आणि एका बरणीत भरून घ्यावे. बाळाला हे जेव्हा भरवायचे असेल तेव्हा एका वाटीमध्ये थोडे चमचाभर हे मिश्रण घ्यावे आणि त्यामध्ये पाणी ॲड करून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आणि हे मिश्रण एकजीव करून गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्यावे. म्हणजेच मुगाची डाळ आणि तांदूळ यापासून बनवलेली पेस्ट तुम्ही बाळाला खाण्यास द्यावी यामुळे बाळाला पोष्टिक घटक तर मिळतील आणि बाळाची तब्येत देखील चांगली होण्यास मदत होईल.
  • बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर तुम्ही बाळाला वरची फळे देखील खायला घालू शकतात. म्हणजेच सफरचंदाचा गर, पपईचा गर, केळ कुस्करून खाऊ घालू शकतात. यामुळे तुमचे बाळ गुटगुटीत होण्यासाठी मदत होईल.
  • तसेच सहा महिन्यात झाल्यानंतर बाळाला तुम्ही मुगाची डाळ आणि तांदूळ युक्त खिचडी देखील खाऊ घालू शकतात परंतु ते एकदम बारीक आणि पतली असावी.
  • तसेच तुम्ही भाज्यांचे सूप वगैरे देखील बाळाला भरू शकतात.
वाचा  अशोकाच्या पानांचे फायदे

बाळाची कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी.

बाळाचा जन्म झाल्यापासून बाळाची व्यवस्थित प्रकारे काळजी घेतली पाहिजे. बाळाला पकडताना डायरेक्ट न पकडता त्याच्या अंगाखाली नरम, मुलायम चादर घ्यावी, अथवा शाल घेतली पाहिजे. कारण बाळाची शरीर हे खूपच नाजूक असते. तसेच बाळाला पकडताना त्याच्या मानेखाली हात ठेवला पाहिजे. कारण सुरुवातीचे काही महिने बाळा मान पकडत नसतो. त्यामुळे, जर तुम्ही बाळाला व्यवस्थित पकडले नाही तर बाळाला मानेला इजा होऊ शकते. म्हणून बाळाला पकडताना व्यवस्थित प्रकारे काळजी घेऊनच पकडले पाहिजे. आपले बाळ गुटगुटित व्हावे यासाठी बाळाची नियमित पणे मालीश करायला हवी. मालिश करण्यासाठी तुम्ही साधे कोकोनट ऑइल किंवा हिमालया बेबी मसाज ऑइल देखील वापरू शकतात.

बाळाची मालिश करताना एकदम जोर लावून मालिश करू नये. तर मालिश करताना हळुवारपणे व्यवस्थित करावी. ज्यामुळे, बाळाला देखील रिलॅक्स वाटू शकेल. बाळाची मालिश झाल्यावर त्याला झोपू द्यावे कारण मालिश  झाल्यावर बाळाला शांत झोप लागत असते. मालिश केल्यामुळे बाळाची स्नायू हे बळकट होण्यास देखील मदत होत असते. बाळ झोपताना एकदम पंख्याखाली झोपू देऊ नये. पंखा लावायचा असल्यास एकदम स्लो लावू शकतात. परंतु, एकदम फास्ट पंखा लावल्यामुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता असते. नाहीतर बाळाला सर्दी देखील होण्याची संभावना असते.

तसेच बाळाला धरणे आधी तुम्ही तुमचे हात स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक असते. कारण जर तुमचे हात खराब असतील त्यामुळे बाळाला त्रास होण्याची शक्यता असते. कारण, लहान बाळांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे तुम्ही कुठलेही काम केले असेल तर बाळाला पकडणे आधी प्रथम तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुवूनच मग त्याला धरावे. त्यामुळे बाळाचे आरोग्य देखील चांगले राहील. तसेच, बाळाला शांत झोप लागावी यासाठी तुम्ही बाळाला झोपताना अंगाई गीत देखील गायले पाहिजे. यामुळे, बाळाला शांत झोप लागू शकते.

वाचा  मनातली भीती घालवण्यासाठी काय करावे

   वरील प्रमाणे, आपले बाळ गुटगुटीत व्हावे, यासाठी आपण काय केले पाहिजे? तसेच बाळाला धरताना आपण कुठल्या प्रकारचे काळजी घ्यायला हवी? बाळांचे वजन चांगले वाढावे आहे यासाठी आपण बाळाला काय खाऊ घातले पाहिजे? याबद्दल, माहिती जाणून घेतली आहे. याविषयी अजून जास्त माहिती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.

     मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

      धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here