नमस्कार, गुळ तर सगळ्यांनाच माहिती आहे. आता प्रत्येकाच्या घरात गूळ हा असतोच, कारण त्यामध्ये भरपूर विटामिन असतात. गुळ पासून आपण चिक्की, लाडू, चहा, गुळाचा घाटा, गुळाचा शिरा, काकवी, लापसी असे पदार्थ करतो. पण गुळ हा शरीरासाठी कितपत योग्य आहे, हे भरपूर लोकांना माहिती नसते. जेवणानंतर गुळ खाण्याचे महत्व काय? तसेच तो केव्हा खावा, हे सुद्धा माहिती नसते. गुळ हा शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो, जर तुम्हाला थकवा आला असेल अशा वेळी तुम्ही गुळाचा तुकडा चघळू शकतात, त्याने तुमचा थकवा दूर होतो. जर तुम्हाला फिट येत असेल, अशावेळी तुम्ही गुळाचा तुकडा सतत चघळू शकतात. गुळात औषधी गुणधर्म भरलेले आहे. तसेच हिवाळ्यात गुळाचा वापर केल्याने, तुम्हाला अधिक फायदा होईल. त्यात लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, सेलेनियम, विटामिन बी 6, विटामिन 12, प्रोटिन्स, हे मुबलक प्रमाणात आहेत. जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते.
पूर्वीच्या काळी उन्हातून आल्यावर पाहुण्यांना, गूळ आणि पाणी प्यायला द्यायचे. कारण त्याने उष्णतेचा त्रास जाणवायचा नाही, तसेच गुळात नैसर्गिक गोडवा असतो, जो तुमच्या शरीरासाठी घातक ठरत नाही. ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे, अशा लोकांनी गुळाचे प्रमाण हे त्यांच्या आहारात कमी घ्यावेत. विशेष म्हणजे गूळ खाल्ल्याने तुमच्या शरीरात फॅट कमी होतो. जर तुम्ही साखरेऐवजी गुळाचा चहा पिला, तर त्याने तुम्हाला अधिक फायदा होईल. म्हणूनच तर वैज्ञानिक पहिल्यापासून सांगतात, की गुळाचा चहा प्या,निरोगी रहा. गुळ हा आपल्या शरीरासाठी लाभकारी आहे. तसेच गुळ नेमका कोणत्या वेळी, व कसा खावा? हे अनेक जणांना माहिती नसते. जर तुम्ही गुळ जेवणानंतर खाल्ला, तर तुम्हाला अधिक फायदे होऊ शकतात. तर मग नक्की कोण कोणते फायदे आहेत, ते जाणून घेऊयात !
Table of Contents
गुळ खाल्ल्याने होणारे फायदे
जर, तुम्ही गुळ जेवणानंतर खाल्ला, तर तो तुमच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे. तर मग तुम्ही जेवणानंतर गुळ खाल्यावर तुम्हाला नक्की कोण कोणते फायदे होतात, ते जाणून घेऊयात !
- गुळ जेवणानंतर, खाल्ल्याने पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होते.
- जेवणानंतर गुळ खाल्ल्याने, तुमची हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.
- तसेच तुम्ही गुळ आणि शेंगदाणे एकत्र करून खाऊ शकतात, त्यामुळे तुमचे हिमोग्लोबिन व वजन वाढते.
- तुम्ही गूळ आणि पाणी एकत्र करून पिल्यास, तुम्हाला उष्णतेचा त्रास होत नाही.
- ज्या लोकांना गॅस, एसिडिटी, अपचन, यासारख्या समस्या असतात, या लोकांनी जर जेवणानंतर गुळ खाल्ला, तर त्यांना त्या समस्येवर आराम मिळतो.
- जर तुम्ही तुमच्या आहारात गुळाचे सेवन केले, तर तुमची शरीरात इम्युनिटी पावर ही वाढते.
- नियमित गुळ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास हा कमी होतो.
- ती+ गूळ एकत्र करून खाल्ल्याने सर्दीचा त्रास कमी होतो.
- ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी गुळ जेवणानंतर नक्की खावा.
- काही स्त्रियांना मासिक पाळीत अंगावरून रक्तस्राव कमी प्रमाणात होत असेल, त्यांनी जेवणानंतर त्यांच्या आहारात गुळाचा समावेश करावा, त्याने फरक पडेल.
- ज्या लोकांना नेहमी पोटफुगी सारख्या समस्या असतील, त्यांनी जेवणानंतर गुळ+ हळद+ दूध मिक्स करून प्यावे.
- तसेच ज्यांच्या अंगात सारखा ताप असेल, अशा लोकांनी नेहमीच सुंठ+गूळ+ जिरे यांची गोळी करून चघळत राहावेत.
आम्ही तुम्हाला जेवणानंतर गुळ खाण्याचे काही फायदे सांगितलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया गुळ खाल्ल्याने अजून कोणते फायदे तुमच्या शरीरास होऊ शकतात.
तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत होते :
हो, खरंच गुळ हे रक्त शुद्ध करण्यास फार फायद्याचे ठरते. कारण गुळामध्ये लोह असल्यामुळे ते तुमच्या रक्तातील पेशींचे कण वाढण्यास मदत करतात. त्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर ती दूर होईल. तसेच स्त्रियांनी जर त्यांच्या आहारात गुळाचा समावेश केला, तर त्यांचा मासिक चक्रात अशुद्ध रक्त हे बाहेर पडते, व रक्त शुद्ध होते.
बद्धकोष्ठता चा त्रास दूर होतो :
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, त्यांचे पोट साफ होत नसेल, सारखे गॅसेस होत असेल, अशा लोकांनी जर त्यांच्या आरोग्यात गुळाचा समावेश केला, तर त्यांना या समस्येपासून आराम मिळेल. त्यासाठी त्यांनी गूळ आणि तूप एकत्र करून खायला हवे, त्यांना या समस्येवर आराम मिळेल.
तुमची हाडे मजबूत होतात :
हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण गूळ खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतात. कारण गुळामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, हे विविध घटक आहेत. त्यासाठी जर तुम्ही गुळ आणि दूध एकत्र करून पिल्यास तुमची हाडे मजबूत होण्यास तुम्हाला मदत मिळेल, तसेच हाडांमध्ये ठिसूळपणा, हाडांचा आवाज येणे, यासारख्या समस्यांवर तुम्हाला मिळेल.
तुमच्या केसांना चमक येईल :
वाढत्या प्रदूषणामुळे,केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, या समस्या आपल्याला बघावयास मिळतात. जर तुम्ही केस धुण्यासाठी गुळाचे पाणी करून वापरले, तर तुमचे केस मुलायम चमकदार बनतील.
गुळ खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते !
हो, गुळ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. कारण गुळामध्ये सेलेनियम व Anti Oxidant असतात. ते तुमच्या प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतात, व तुमच्या शरीरात एनर्जी टिकून ठेवण्याचे काम करतात.
चला, तर मग आज आम्ही तुम्हाला तसेच जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे सांगितले आहेत व गुळ खाण्याचे फायदे ही सागितले आहेत. ज्या लोकांच्या शरीरात अतिउष्णता असेल, त्या लोकांनी गुळ कमी प्रमाणात खावा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे.
धन्यवाद !