केस वाढवण्यासाठी राजीव दीक्षित यांचे उपाय

0
945

नमस्कार, आज आपण बघणार आहोत, की केस वाढवण्यासाठी राजीव दीक्षित यांचे उपाय नेमके कोणकोणते आहेत? आता तुम्ही म्हणाल, की केस वाढवण्यासाठी आपण अनेक उपाय बघतो, पण  राजीव दीक्षित हे नेमके कोण आहेत? तुम्हाला माहिती आहे का, चला तर मग जाणून घेऊया की, राजीव दीक्षित नेमके कोण आहेत? 

राजीव दीक्षित यांची माहिती

राजीव दीक्षित हे महान पुरुष आहेत, राजीव दीक्षित हे भारताचे महान समाजसेवक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपण आपल्या भारताच्या स्वदेशी वस्तू वापरायला हव्यात. राजीव दीक्षित यांचे शिक्षण हे जनरिक मधून झाले असूनही, त्यांनी विदेशी कंपन्या, मध्ये भरघोस पगार मिळूनही, काम केले नाही. त्यांनी आपल्या भारतात स्वदेशी वस्तू बनवणे, व आपल्या भारतातील लोकांनी त्या वापराव्यात, यासाठी फार विनंती केली. राजीव दीक्षित यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1967 साली झाला होता. त्यांचा जन्म हा उत्तर प्रदेश मध्ये अलिगड जिल्ह्यातील नाह गावामध्ये झालेला आहे. राजीव दीक्षित यांचे आपल्या भारतावर खूप प्रेम होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, विदेशी कंपनीची लोक हे आपल्या भारतातील लोकांची फसवेगिरी करत आहे, त्यांनी आपल्या भारताच्या विकासासाठी विदेशी कंपनीतील वस्तूंचा वापर करू नका, हा प्रस्ताव मांडला. राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार भारतात जी आयुर्वेदिक औषधी आहे, त्या सारखी औषधे कुठेही मिळणार नाही. त्यांनी स्वदेशी चिकित्सा ही औषधी पुस्तक लिहिले होते. त्यांनी लोकांना विनंती केली, की तुम्ही अ‍ॅलोपॅथीच्या  गोळ्या न घेता, आपल्या देशातील आयुर्वेदिक औषधींचा वापर करावा. त्यांनी स्वदेशी वस्तूंसाठी    9 जानेवारी 2009 मध्ये रामदेव बाबांसोबत भारत स्वाभिमान ट्रस्ट येथे त्यांनी सेक्रेटरी चे काम केले. त्यांनी रामदेव बाबा सोबत मिळून, आपल्या स्वदेशी वस्तू कशा वापराव्यात, या त्याबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांनी आपल्या भारतातील लोकांना शेवटपर्यंत, आपल्या स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी फार विनंती केली. शेवटी 30 नोव्हेंबर 2010 मध्ये त्यांचा हृदयविकाराने गाडीत असताना मृत्यू झाला. 

वाचा  दात दुखीवर आयुर्वेदिक औषधे

चला, तर आपण राजीव दीक्षित यांच्या बद्दल माहिती जाणून घेतली आहे. आता आपण त्यांनी कोणते घरगुती उपाय सांगितले आहेत, ते जाणून घेऊयात. 

राजीव दीक्षित यांचे केसांसाठी काही उपाय

दही वापरून बघा

राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार, तुमचे केस गळत असतील, केस वाढत नसतील, अशा वेळी तुम्ही दह्याचा वापर करून बघा, हो त्यांच्या म्हणण्यानुसार, तुमच्या केस गळतीची समस्या,    वर तुम्हाला दही फायदेशीर ठरेल, त्यासाठी तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये दही झाकून ठेवावे. तीन ते चार दिवस तुम्ही त्या भांड्याला हात लावू नका. दही चा रंग थोडासा हिरवट होईपर्यंत, त्यानंतर तुम्ही त्या दही ने तुमच्या केसांना मालिश करावी. त्यानंतर एक ते दोन तासांनी शिकेकाई रीठाच्या पाण्याने धुवावेत. असे तुम्ही हप्त्यातून एक ते दोन वेळेस केल्यास, तुमच्या केस गळती च्या समस्या कमी होऊन, तुमचे केस वाढण्यास मदत मिळेल. 

त्रिफळाचा वापर करून बघा

राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार  त्रिफळा हे तुमच्यासाठी फार फायदेशीर आहे. यामध्ये औषधीय गुणधर्म आहेत, जे तुमच्या शरीरासाठी व केसांच्या वाढीसाठी फार फायदेशीर ठरेल. त्यांच्या म्हणण्यानुसार त्रिफळा हे तीन फळांचं संगम आहे, म्हणजेच आवळा, हरड, बेहडा या तिघांचे मिश्रण तुमच्या शरीरातील  शारीरिक व मानसिक  तक्रारी आहेत, ते दूर होण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्ही त्रिफळाचूर्ण सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्यात घ्यावे. तसेच तुम्ही त्रिफळा कोमट पाण्यात गरम करून, त्या पाण्याने केस धुऊन टाकले, तर तुमच्या केसांमधील कोरडे पणा, तसेच तेलकट पणा, ही निघून जाईल. शिवाय तुमचे केसे चमकदार होतील. 

कोरफडीचा रस वापरून बघा

राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या शारीरिक व मानसिक समस्यांसाठी उपचार हे आपल्या घरातच आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार,  ज्या वेळी तुमच्या केसात कोंडा, खाज, डोक्यात फोड, अकाली पांढरे होणे, तसेच तुमचे केस वेळेच्या अगोदर गळत असतील, व केस चमकदार बनवण्यासाठी कोरफड ही फार फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्ही कोरफडीचा गर काढून, तुमच्या केसांना एक तास लावल्यास, तुम्हाला फरक पडेल. असे तुम्ही हप्त्यातून दोन ते तीन वेळेस करावे. 

वाचा  छातीत व पाठीत दुखणे कारणे आणि घरगुती उपाय

भरपूर प्रमाणात पाणी प्या

राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार, जर शरीरात तुमच्या पाण्याची कमतरता आली, तर तुम्हाला शारीरिक व मानसिक तक्रारी वाढतात, त्यांच्या म्हणण्यानुसार शरीरात त्यात पाण्याची कमतरता आली, तर डी हायड्रेशन सारखे समस्या होतेच, अशक्तपणा होणे, अंग दुखणे, ताप येणे, डोके दुखणे, केस गळणे होऊ शकते. यासाठी जर तुम्ही रोज शरीरात  तांब्याच्या भांड्यातले पाणी प्यायले  तर यासारख्या समस्यांवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या घरात उपचार असतात, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. अगदी साधे सोपे उपाय आहेत, करून बघा. 

तुमच्या दोघी हातांची नखे एकमेकांवर घासा

राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही तुमच्या हाताची नखे एकमेकांवर घासले, तर तुमचे केस गळती, अकाली केस पांढरे होणे, तसेच केसांचे तुकडे होणे, यासारख्या समस्यांवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल. करून बघा, अगदी साधा सोपा उपाय आहे, तो आपण कुठेही, कोणत्याही वेळी करू शकतो. 

राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार केसांना कोणते तेल लावायचे

खोबरेल तेल-

राजीव दीक्षित म्हणतात की, ज्या वेळी तुमचे केस अतिशय कोरडे राहतात, डोक्यातील त्वचा कोरडी राहते, अशा यावेळी तुमचे केस गळतीच्या व केसात कोंडा होणे, या समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही तुमच्या डोक्याला तेल लावले, तर यासारख्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. मग कोणते तेल आपण केसांना लावायला हवे, तर राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही खोबरेल तेल केसांना लावले, तर  यासारख्या समस्यांवर तुम्हाला आराम मिळेल. त्यासाठी तुम्ही शुद्ध खोबरेल तेल हे एका वाटीत गरम करून, केसांना व केसांच्या मुळाशी लावावे. 

तिळाचे तेल-

राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार, तिळाचे तेल ही तुमच्या केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. तीळाच्या तेलामध्ये औषधीय गुणधर्म असतात. ते तेल तुम्ही केसांना लावले, तर तुमच्या केस गळती च्या समस्यांवर तुम्हाला आराम मिळेल, पण तीळ शुद्ध व पांढरी असली पाहिजे, जर तुम्ही या तेलाने मालिश केली, तर केस गळतीची समस्या  दूर होतील. 

वाचा  मासिक पाळी महिन्यातून दोनदा येणे

जैतुन तेल-

 राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार, जैतुन चे तेल ही तुमच्या केस वाढीसाठी फायदेशीर ठरते, त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जैतुन तेल केसांना लावले, तर तुमचे अकाली केस पांढरे होणे, तुटणे, केसांमधील त्वचा कोरडी होणे, यासारख्या समस्यांना तुम्हाला आराम मिळेल. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला राजीव दीक्षित हे नेमके कोण आहेत, आणि त्यांनी केस गळती  व केस वाढवण्यासाठी नेमकी कोणते घरगुती उपचार करावे, ते सांगितलेले आहेत. तसेच तुम्हाला आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, काही शंका-कुशंका असेल, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

                         धन्यवाद

लहान वयात केस पांढरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here