वास्तुशास्त्रानुसार तिजोरी -जाणून घ्या श्रीमंतांचे रहस्य

0
825
वास्तुशास्त्रानुसार तिजोरी
वास्तुशास्त्रानुसार तिजोरी

मित्रांनो, आपण घर बांधताना अनेक गोष्टींची काळजी घेत असतो, जसे की घर वास्तुशास्त्रानुसार बांधले आहे की नाही वास्तुशास्त्रानुसार तिजोरी घरात योग्य ठिकाणी ठेवली आहे का? 

हल्ली बरेच  जण वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना दिसून येत आहेत. घर बांधताना आणि सजवताना वास्तु नियमांची काळजी घेतली नाही तर अनेक समस्या निर्माण होत असतात. अनेक लोक हे घर बांधताना आपल्या आयुष्याची जमापुंजी हे घराच्या बांधकामासाठी खर्च करत असतात.

परंतु, घर बांधून देखील त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. घर बांधताना आपले काही चुकले तर नाही ना ? आपण वास्तुशास्त्रानुसार घर बांधायला हवे होते का ? असे एक ना अनेक विचार त्यांच्या मनात येत असतात.

घर बांधताना योग्य त्या वास्तूच्या नियमांची काळजी घेतली नाही, तर घरातील अनेक सदस्यांची प्रगतीही रोखली जाते तसेच, शारीरिक व मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होत असतो. या सर्व कारणांमुळे आर्थिक नुकसान देखील होत असते. तुम्हालाही तुमच्या घरात या समस्यांना सामोरे जावे लागत आहे का ? तुमच्या घरात देखील पैशांची बचत होत नाही का ? जर तुम्हाला व तुमच्या घरात या प्रकारची समस्या येत असेल, तर तुम्ही त्याविषयी जाणून घेणे फार गरजेचे आहे म्हणजेच घराच्या वास्तूत तुम्ही घराची तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या कुठल्याही वस्तूला कुठल्या जागी ठेवावी, हे जाणून घेणे फार गरजेचे आहे.

घर बांधल्यानंतर घरात वास्तुशास्त्रानुसार तिजोरी कुठल्या दिशेने ठेवावी व कुठे ठेवावी हे जाणून घेणे फार गरजेचे असते तर मग वास्तुशास्त्रानुसार घरात तिजोरी कुठे ठेवावी या विषयावर माहिती जाणून घेऊया. 

वास्तुशास्त्रानुसार तिजोरीला घरात कोठे ठेवावे ?

घर बांधकाम करताना प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक वस्तूंची एक विशिष्ट का अशी जागा असते, या विषयी आपल्याला माहिती जाणून घेणे फार गरजेचे आहे. तसेच, वास्तुशास्त्रानुसार घरात तिजोरी कुठे ठेवावी ? हे देखील जाणून घेणे फार महत्वाचे आहे, तर या विषयावर माहिती जाणून घेऊया. 

वाचा  वास्तुशास्त्रानुसार बाथरूम कसे बनवावे

 वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, घरातील तिजोरी किंवा लॉकर किंवा पैसे ठेवण्यात येणारे इतर कोणतेही कपाट हे दक्षिण दिशेला ठेवावे आणि हे दक्षिण दिशेला ठेवत असताना अशा प्रकारे ठेवावे की त्याचे तोंड हे उत्तर दिशेला किंवा पश्चिम दिशेला उघडेल असे केल्याने घरात समृद्धी येत असते आणि कुटुंबात देखील समृद्धी येते. परंतु, घरातील तिजोरी चे तोंड हे कधीही दक्षिण दिशेला उघडे  होऊ देऊ नये.

वास्तुशास्त्रानुसार घरातील तिजोरी बद्दल या गोष्टीकडे लक्ष द्या.

 •  घरातील तिजोरी नेहमी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचे निवास स्थान असल्याचे मानले जाते त्यामुळे तिजोरीत नेहमी लाल रंगाचे कापड ठेवले पाहिजे. तिजोरी नेहमी स्वच्छ हातानेच उघडा आणि उघडताना शूज किंवा चप्पल घालून ती तिजोरी उघडू नका.
 • तिजोरी कधी अशाप्रकारे ठेवू नका की त्याचा दरवाजा हा टॉयलेट किंवा बाथरूम च्या समोर उघडेल. यामुळे पैशांची बचत होत नाही.
 • जर तुम्हाला घरात समृद्धी राखायची असेल तर घरातील तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका. आणि हा नियम तुमच्या पर्सला देखील लागू पडतो.
 • एखाद्या वेळेस घरात जर कोर्टाचा खटला चालू असेल किंवा तुमच्याकडे कुणाचे वादाचे कागद असतील तर तर ते विसरूनही तिजोरीत ठेवू नका असे केल्यास समोर आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल आणि समस्या देखील वाढू लागतील.
 • तुम्ही अनेक प्रयत्न करून देखील जर तुमच्या घरात पैसे टिकत नसतील तर दर शुक्रवारी 5 कवडी आणा आणल्यानंतर त्या तिजोरीत ठेवा आणि कोणत्याही शुक्रवारी कमळाचे फूल आणा व तिथे तिजोरीत ठेवा दर महिन्याला हे फुल बदलत राहा कवडी आणि कमळ दोघेही श्रीमंतीची देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्यामुळे त्यांची कृपा तुमच्या घरात नांदू शकते.   

वरील प्रमाणे तुम्ही घरातील तिजोरी या बद्दल महत्त्वाच्या बाबी जाणून घेतल्या आहेत. तसेच घरातील तिजोरी कोणत्या दिशेला योग्य ठरते हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. याविषयी देखील आपण माहिती जाणून घेऊया.

वाचा  वास्तुशास्त्रानुसार स्टोर रूम कुठल्या दिशेला असावा

वास्तुशास्त्रानुसार तिजोरी दक्षिण दिशेस असल्यास

मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ही दक्षिण दिशेला असली तर शुभ मानले जाते. घर बांधून झाल्यानंतर तसेच दुकानातील तिजोरी कोठे ठेवावी हा प्रश्न हा प्रश्न अनेकांना पडत असतो घर किंवा दुकानात नेहमी बरकत राहावे म्हणून आपण आणि प्रकारच्या उपाययोजना देखील करत असतो वास्तुशास्त्रानुसार तिजोरी रुपये दागदागिने वस्तू इत्यादी नेहमी घरात दक्षिण दिशेला ठेवण्यासाठी शुभ दिशा मानली जाते लक्ष्मी कुबेर याचा दक्षिण दिशेला वास असतो त्यामुळे तिजोरी दक्षिण दिशेला ठेवल्याने धन वृद्धी होत असते म्हणजेच धनात देखील वाढत होत असते.

वास्तुशास्त्रानुसार घरातील तिजोरीत काय काय वस्तू ठेवाव्यात ? कोणत्या वस्तू ठेवू नयेत ? याविषयी देखील जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर मग याविषयी देखीलआपण वाजाणून घेऊया.

घरातील तिजोरीत काय ठेवावे व काय ठेवू नये ?

मित्रांनो पूर्वीच्या काळी मौल्यवान गोष्टी जसे की धन, दागिने ठेवण्यासाठी घरामध्ये तिजोरी बनवली जात होती. बदलत्या काळासोबत या प्रथेमध्ये परिवर्तन आले आणि आता पैसे, दागिने हे बँकेमध्ये ठेवले जाते. परंतु, तुम्ही घरात तिजोरी किंवा लॉकर बनवत असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे जसे की तिजोरी कुठे ठेवावे तिजोरीमध्ये कुठल्या गोष्टी ठेवणे आवश्यक आहे तर कुठल्या गोष्टी ठेवू नयेत हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

 • वास्तुशास्त्रानुसार तिजोरी शक्यतो अशा ठिकाणी ठेवावी तेथे सहजपणे कोणीही पाहू शकणार नाही तिजोरीशी संबंधित माहिती ही फक्त घरातील खास लोकांना असावी.
 • वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला तिजोरी ठेवणे शक्य नसल्यास ईशान्य किंवा पूर्व दिशेला तिजोरी ठेवू शकतात.
 • तिजोरी मध्ये श्रीयंत्र अवश्य ठेवले पाहिजे. त्यामुळे तुमच्या व्यवसायात वाढ होत राहील. यासोबतच धनलाभाचे योग देखील जुळून येतील.
 • तिजोरी मध्ये कोर्ट प्रकरणाची कागदपत्र हे  नगदी रोकड आणि दागिन्यात सोबत  ठेवू नयेत, यामुळे हानी होऊ शकते.
 • वास्तुशास्त्रानुसार घराचे देवता कुबेर यांचा वास हा दक्षिण दिशेला मानण्यात आला आहे त्यामुळे तिजोरी दक्षिण दिशेला ठेवणे शुभ ठरते. 
 •  वास्तुशास्त्रानुसार, तिजोरीमध्ये अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. म्हणजेच अडगळीचे सामान ठेवू नयेत, तिजोरीमध्ये आवश्यक दागदागिन्यांचा पैशांचा समावेश असावा.
वाचा  वास्तुदोष म्हणजे नेमके काय ? Vastu Dosh Meaning in Marathi

वरीलप्रमाणे, आपण घरातील तिजोरीत काय काय ठेवावे, काय काय ठेवू नये, याविषयी माहिती जाणून घेतली आहे. तसेच, वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ला कोणता रंग असावा हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर या विषयी पण आपण जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार तिजोरी चा रंग

मित्रांनो,घराचे बांधकाम झाल्यावर वास्तुशास्त्रानुसार आपण घराला कलर करत असतो. जसे की, हॉलला कोणता कलर द्यावा, किचन मध्ये कोणता कलर द्यावा, बेडरूममध्ये कोणता कलर द्यावा, तसेच तिजोरीला कलर देखील कोणता द्यावा? हे वास्तुशास्त्रानुसार आपण जाणून घ्यायला  हवे. तर मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार तिजोरी चा कलर हा शक्यतो पांढरा असावा. तिजोरीला लाल किंवा हिरवा कलर किंवा कुठलाही भडक कलर देऊ नये. तसेच  तिजोरी च्या बाहेर शक्यतो आरसा ठेवू नये. आणि तिजोरी ही जमिनीपेक्षा उंच असावी. 

मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार तिजोरी घरात कोठे ठेवावी ? तसेच तिजोरी साठी योग्य दिशा कोणती ? घरातील तिजोरीत काय काय ठेवावे ? काय काय ठेवू नये ? आणि तिजोरी ला वास्तुशास्त्रानुसार कोणता कलर द्यावा ? याविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे वरील प्रमाणे सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. मित्रांनो, तिजोरी बद्दल अजून माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या वास्तुतज्ञ यांचा सल्ला घेऊ शकतात. 

 धन्यवाद.          

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here