वास्तुशास्त्रानुसार स्टोर रूम कुठल्या दिशेला असावा

0
1661
वास्तुशास्त्रानुसार स्टोर रूम
वास्तुशास्त्रानुसार स्टोर रूम

नमस्कार मित्रांनो. बरेच लोक हे वास्तुशास्त्राचा आधार घेऊन घराची बांधणी करताना दिसून येत आहे. वास्तुशास्त्रानुसार  घरातली प्रत्येक खोली कुठल्या दिशेला असावी, तसेच टॉयलेट, बाथरूम कोणत्या दिशेला काढावा याविषयीची माहिती जाणून घेऊनच घराचे बांधकाम  करताना  बरेचजण दिसून येत आहेत. स्टोअर रूम नक्कीच घराचा सर्वात महत्त्वाचा भाग नाही. त्याचा मुख्य उपयोग भविष्यात उपयुक्त किंवा न वापरणाऱ्या वस्तूंच्या संग्रहासाठी आहे. परंतु, तो स्टोर रूम हा देखील योग्य दिशेला बांधला पाहिजे. नाहीतर याचे तोटेही अनुभवायला मिळतात. बरेच लोक वास्तुशास्त्राचा आधार न घेता घराचे बांधकाम करत असतात. कोणती खोली कोणत्या दिशेला घ्यावी याचे देखील अनुसरण करताना दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे नुकसान अनुभवास  मिळू शकते. परंतु वास्तूचे बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार केले तर नक्कीच समृद्धी व सुखशांती घरात नांदू शकते. वास्तुशास्त्रानुसार स्टोर रूम  कुठल्या दिशेला हवे तसेच स्टोरमध्ये कोणता सामान ठेवावा आणि कुठला सामान ठेवू नये, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

          वास्तु शी संबंधित नियमांकडे दुर्लक्ष केल्यास जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात  घरातील निर्माण होणारा वास्तुदोष याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. घरामध्ये मंदिर, बेडरूम,दिवाणखाना आणि अभ्यासिका, स्वयंपाक घर इत्यादींची व्यवस्था वास्तुशास्त्रानुसार केली पाहिजे. असे केल्याने घरात शुभता वाढते. सकारात्मकता राहते. जी तुमच्या प्रगतीसाठी आणि जीवनातील प्रगतीसाठी आवश्यक असते. अनेकदा लोक घरात असलेल्या स्टोर रूम शी संबंधित वास्तूंच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात.

           घरामध्ये अशा अनेक वस्तू आहेत ज्या वारंवार वापरले जात नाहीत आणि या ठेवण्यासाठी बहुतेक लोकं घरात स्टोर रूम बनवतात. यासाठी वास्तूचे नियम करण्यात आलेले आहे आणि हेच नियम  घरातील स्टोर रूम ला देखील लागू पडतात. चला, तर मग मित्रांनो स्टोर रूम याविषयीची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

 वास्तुशास्त्रानुसार स्टोर रूम साठी योग्य दिशा

मित्रांनो घरातील स्टोर रूम  हे योग्य त्या ठिकाणी असायला पाहिजे. स्टोर रूम हे जर चुकीच्या दिशेने बांधले  तर वास्तुदोष निर्माण होतो. तसेच योग्य दिशेला न बांधल्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येते व त्याचा परिणाम हा कौटुंबिक सदस्यांवर वाईट होतो. अशा परिस्थितीत घरातील सदस्यांवर होणाऱ्या परिणामाचा दृष्टिकोनातून पाहिले तर स्टोर रूमच्या वास्तू नियमांबद्दल सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

वाचा  घरात रूम फ्रेशनर मारण्याचे फायदे

        वास्तुशास्त्रानुसार स्टोर रूमच्या बांधकामासाठी उत्तर पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम दिशा निर्देश योग्य मानले जातात. आपण धान्य साठवण्यासाठी स्टोर रूम वापरत असाल तर उत्तर-पश्चिम दिशेने रचना करणे चांगले ठरेल. बराच काळ साठवलेल्या वस्तू या दक्षिण-पश्चिम दिशेने ठेवल्या पाहिजेत. गॅस सिलेंडर,इंधन आणि स्वयंपाक इत्यादी साहित्य स्टोर रूममध्ये दक्षिण-पूर्व दिशेने ठेवल्या गेल्या पाहिजेत.

स्टोर रूमची रचना

     घरामधील स्टोर रूम उंची इतर  खोल्यासारखी नसली पाहिजे,स्टोर रूमची उंची जास्त वाढवू नये.एका रंगछटांचे सारख्या फिकट रंगाच्या पांढऱ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या ब्ल्यू चा वापर स्टोर रूम मध्ये केला जाणे आवश्यक आहे. घरातील स्टोर रूम बनवताना आपण त्यात अतिरिक्त सामान ठेवण्याच्या हेतूने बनवत असतो. धान्यांचा बराच साठा, अनेक प्रकारचे सामान बरेच दिवसांपासून स्टोर रूम मध्ये ठेवले जाते. त्यामुळे ते खराब होण्याची देखील शक्यता असते अशा परिस्थितीत स्टोर रूम ची रचना करताना स्टोअर रूम मध्ये वस्तूंची शुद्धता राखण्यासाठी या खोलीत प्रकाश व हवेची पुरेशी व्यवस्था ठेवणे फार महत्वाचे आहे. अशा प्रकारे स्टोर रूमची रचना असेल, तर खोलीत सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह देखील राहतो.  

    वास्तूनुसार, शक्य असल्यास प्रत्येक घरात स्टोर रूम साठी जागा असणे आवश्यक आहे. तथापि त्याचा आकार लहान असावा. कारण जर एखादी व्यक्ती स्टोर रूम मध्ये वेळ घालवते किंवा त्यात राहणे सुरुवात करते तर त्या व्यक्तीचा स्वभाव हा हट्टी आणि चिडचिड होतो. म्हणून स्टोरमध्ये फक्त सामान ठेवण्याची इतकीच जागा असावी.

 

वास्तुशास्त्रानुसार स्टोर रूम चा रंग 

    मित्रांनो, जर घरामध्ये स्टोर रूम असेल तर त्यास भिंतीला मलईचा रंग लावला जाऊ  शकतो. दक्षिण-पश्चिम ठिकाणी स्टोर रूम असेल तर त्या खोलीसाठी हलका पिवळा रंग  लावने हा एक चांगला पर्याय आहे.

 

वास्तुशास्त्रानुसार स्टोर रूम संबंधित काही लक्षात ठेवण्याच्या बाबी 

घरामध्ये स्टोर रूम बांधायचे असल्यास ती कुठल्या दिशेला असावी तिची रचना कशी असावी याविषयी आपण जाणून घेतले आहे तसेच स्टोर रूम संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घतल्या पाहिजे तर शोरूम संबंधित महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आपण कार्यक्रमाने जाणून घेऊया.

  • स्टोर रूम ही वस्तू साठवणे व्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी वापरू नका.
  •  स्टोर रूम पूर्वेकडून दिशेने तयार करू नका.
  • स्त्रीरोग व पश्चिम दिशेला असावी. शोरूमचा काही भाग हा पश्चिम दिशेला किंवा दक्षिण दिशेला असेल तर कुटुंबातील सदस्यांसाठी ते शुभ मानले जाते. यामुळे घरातील प्रमुख चांगले निर्णय घेऊ शकतात.
  • ज्या घरामध्ये ईशान्य दिशेला स्टोर रूमची व्यवस्था आहे तर तिथून लगेच काढून टाकावे. असे मानले जाते की हे खूप अशुभ असेल आणि याचा परिणाम हा घरातल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतो.
  • शक्यतो स्टोरमध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी  ठेवाव्यात. स्टोर रूममध्ये अनावश्यक वस्तूंनी कधीही भरू नका. या शिवाय वेळोवेळी स्टोर रूमची साफसफाई करत रहा.
  • स्टोरमध्ये एक रिकामा कंटेनर ठेवू नका.
  •  दक्षिण-पूर्व कोपऱ्यामध्ये तेल तूप शुद्ध आणि गॅस सिलेंडर साठवावे.
  •  देवाच्या मूर्ती ठेवण्याचे टाळा आपण नेहमी पूर्व भिंत वर भगवान विष्णू यांचे चित्र ठेवू शकतात.
  •   स्टोर रूम मध्ये अनियमित आकार नसावा. खोली एक तर चौकोनी किंवा आयताकृती आकारात असणे आवश्यक आहे.
  • स्टोर रूम मध्ये दाग दागिने रोख किंवा महत्त्वाची कागदपत्रे ठेवणे टाळावे.
  • स्टोर रूम मध्ये पुर्वेकडील भाग रिक्त ठेवावा. 
वाचा  वास्तुशास्त्रानुसार दुकान कसे असावे?

घरातील स्टोर रूम काढताना वरील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. स्टोर रूम ची दिशा ही योग्य दिशेला असायला हवी. म्हणजेच सकारात्मक प्रभाव घरात जाणून येतो. तसेच घरातील स्टोर रूम ही नेहमीच स्वच्छ ठेवावी.

         मित्रांनो घरात जर तुम्ही देखील स्टोर रूम बनवत असाल तर ती कोणत्या दिशेने असायला हवी, स्टोरमध्ये कोणता कलर दिला पाहिजे, याविषयी वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. याविषयी अजून सखोल माहिती घेण्यासाठी तुम्ही वास्तु तज्ञांचा सल्ला घेऊ शकतात. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

           धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here