वास्तुशास्त्रानुसार दुकान कसे असावे?

0
1894
वास्तुशास्त्रानुसार दुकान कसे असावे
वास्तुशास्त्रानुसार दुकान कसे असावे

वास्तुशास्त्रानुसार दुकान कसे असावे

नमस्कार, हल्लीच्या धावपळीच्या जीवनात कोरोना सारख्या महामारी ने आपल्यावर संकट घातले आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांचे व्यवसाय ठप्प झाले आहे. तसेच नोकरीही मिळत नाही, तर काही घरी बसून, वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यात त्यांचा उदरनिर्वाह करणे, अगदी कठीण झालेले आहे. अश्यावेळी काही लोक दुकान घेतात, किंवा दुकानाची जागा भाड्याने घेऊन, तेथे त्यांचा व्यवसायाला सुरुवात करतात, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह होईल. तसेच काही लोकांचे दुकान असूनही त्यांना दुकानात भरभराट होत नाही,  त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, त्यामध्ये काही वास्तुदोष तर नाही ना, याची त्यांनी खात्री करून घ्यावी.त्यांच्या दुकानात काही दिशा चुकत तर  नाही ना, याची माहिती करून घ्यावी, दुकानांमध्ये त्यांनी योग्य दिशा ठेवावी, त्यांच्या दुकानात कोणते देव ठेवावे, त्याचे दुकानाला कोणता रंग द्यावा, याची माहिती करून घ्यावी, व दुकानात भरभराट  होण्यासाठी काही उपाय,  तुम्हाला सांगितले, ते करून बघा.  

दुकानांमध्ये कोणाचे सोन्याचे, तर कोणाचे भांड्यांचे, कोणाचे कपड्यांचे, तर कुणाच्या हार्डवेअरचे दुकान, असतात. तसेच काही महिला ब्लाउज पिको फॉल चे दुकान करून, त्यात त्यांचे काम करतात. तसेच काही लोक मिठाई वगैरे बनवण्याचे दुकान उघडतात. तर कोणी डेअरी, तर काही लोक किराणा बाजाराचे दुकान उघडून, त्यांचे व्यवसायाला सुरुवात करतात. कारण हल्ली कोरनासारख्या महामारी मध्ये नोकरी कोणाला मिळत नाही. त्यामुळे दुकानात यांना पर्याय आहे. मग अशावेळी आपण दुकान उघडतो, आपले काम चालू करतो, अशावेळी जर आपण आपले दुकान योग्य जागेवर तसेच कोणत्या ठिकाणी असावे, कोणती दिशा असावी, हे थोडेफार बघितले, तर आपला व्यवसाय जोरदार चालू होण्यास मदत मिळते. तर आज आपण बघणार आहोत, वास्तुशास्त्रानुसार दुकान कसे असावे? चला तर मग  जाणून घेऊयात! 

वास्तुशास्त्रानुसार दुकानाची दिशा कुठे असावी? 

दुकान हे व्यवसायिक यांचे पोट भरण्याचे साधन असते. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. आपण त्याची जागा योग्य दिशा ठेवली, तर आपल्याला त्याच्यात अजून फायदा होण्याची संभावना असते. तर आज आपण बघणार आहोत, की दुकानाची दिशा नेमकी कुठे असावी, चला तर मग बघुयात. 

 • दुकानाची दिशा नेहमी पूर्व असावी. 
 • तसेच दुकानाची दिशा तुम्ही  उत्तर, नेऋत्य, ईशान्य व पश्चिम दिशेला राहिले, तरी चालेल. दक्षिणमुखी दुकान घेऊ नका. 
 • जर दुकानाचे तोंड उत्तरेला राहिले, तर तुमच्या व्यवसायात वृद्धी होते. 
 • दुकान हे नेहमी आयताकृती व चौरस असले, तर अति उत्तम असते. 
 • दुकानात तुटलेली प्लास्टिक ची वस्तू किंवा कोणतीही वस्तू ठेवू नये, त्यामुळे दुकानात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो.
वाचा  वास्तुदोष म्हणजे नेमके काय ? Vastu Dosh Meaning in Marathi

वास्तुशास्त्रानुसार दुकानाचे दरवाजे कसे असावे? 

 • दुकानाचे दरवाजे हे पूर्वाभिमुख, असल्यास चांगले असते. 
 • तसेच दुकानाचे दरवाजे उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेला असावे. 
 • सहसा करून दुकानांना काचेची दरवाजे असतात. अशावेळी तुम्ही दरवाज्याच्या बाहेर शटर दरवाजे, प्रोटेक्शन साठी लावू शकतात.
 • दुकानाच्या दरवाजावर स्वस्तिक असावी. 
 • दुकानाचे दरवाजेही आतून सागवानी लाकडी, व बाहेरून लोखंडी ग्रील चे असावे. कारण लोखंडी ग्रील हे सेफ्टी असतात. 
 • दुकान के दरवाजे क्रीम, पिवळा, पांढरा किंवा फिकट, कलर चे असल्यास चांगले असते. 
 • तसेच दुकानात बसणाऱ्या  व्यवसायकाचे तोंड हे उत्तरेला असावे. 
 • जर दुकानाच्या खिडक्या उत्तर व पूर्वेला असेल तर भरपूर प्रगती होते. 
 • दुकानाचा गल्ला, कपाट हा दक्षिण दिशेला असावा. 
 • दुकानाच्या बाथरूमच्या खिडकी मध्ये, काचेच्या वाटीत मिठाचे खडे ठेवावे, ते अमावस्या-पौर्णिमेला बदलावे, म्हणजे जेणेकरून दुकानातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघण्यास मदत मिळेल.

वास्तुशास्त्रानुसार दुकानाला कोणता रंग द्यावा? 

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दुकानाला पिवळा, हलका गुलाबी, हलका निळा, तसेच एव्हेरी हे कलर दिले, तर तुमच्या दुकानात शुभ संकेत मिळतात, शिवाय दुकानात तुम्ही झेंडूच्या माळा व आंब्याची पाने यांनी दुकान सजवू शकतात, दुकानात लाल, गडद, काळा, मरून, हे कलर लावू नये. 

तसेच दुकानात गुडलक बांबू, मनी प्लांट यासारखी झाडे तुम्ही लावू शकतात. 

वास्तुशास्त्रानुसार दुकानात कोणत्या देवाची पूजा करावी? 

नोकरी प्रमाणे दुकानही आपले उदरनिर्वाहाचे साधन आहे. दुकानात देवघर असणे, आवश्यक आहे. दुकानातले छोट्या देवघराची दिशा उत्तर-पूर्व असावी.  तुम्ही तुमच्या दुकानात सकाळी गेल्यावर, देवतांची पूजा करावयाची आहे.  तुमच्या दुकानात तुम्ही कोणते देव ठेवावेत?

 तर तुम्ही कुबेर, माता लक्ष्मी तसेच गणपतीची पूजा करू शकतात. दुकानात तुम्ही कळस ठेवावा. तसेच तुम्ही दुकानात व्यापार वृद्धि यंत्र व श्री यंत्र ठेवावे, पण त्याची प्राणप्रतिष्ठा करून ठेवावी. 

दुकानात तुम्ही तांब्याचा कळस घेऊन त्यात, नागवेलीची किंवा आंब्याची पाच पाने ठेवून, नारळाचा कळस ठेवून त्याची रोज पूजा करावी. नारळावर स्वस्तिक काढून रोज पूजा करावी. तसेच तुम्ही दर दिवसाला ते पाणी बदलावे. दुकानात नेहमी प्रसन्न वातावरण ठेवावे. धूप- उदबत्ती लावावी. म्हणजे जे ग्राहक येणार, त्याचे मन तिथे आल्यावर शांत होईल, व तुमच्या व्यवसायात वृद्धी होण्यास मदत मिळेल. दुकानाचे वातावरणात नेहमी प्रसन्न राहावे, आणि  व्यवसायीकाने रोज चंदनाचा टिळा लावावा. म्हणजे तुमचे मस्तिष्क काही शांत राहते. दुकानात संध्याकाळच्या वेळी कापूर जाळावा. घंटानाद करावेत, म्हणजे सगळी नकारात्मक ऊर्जा, बाहेर निघते. व कोणाची नजर हे लागले असेल, तर ते बाहेर जाते. तसेच तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये एक पिवळा डाग नसलेला निंबू ठेवावा. त्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर निघते. तसेच तुम्ही दुकानात अजून कोणाची नजर लागू नये, यासाठी दरवाज्याच्या बाहेर लिंबू-मिरची लटकवू शकतात.

वाचा  वास्तुशास्त्रानुसार तिजोरी -जाणून घ्या श्रीमंतांचे रहस्य

चला, तर आज आम्ही तुम्हाला दुकानाची दिशा, व दुकानात कोणत्या देवतांचे पूजन करावे, व दुकानाला कोणता रंग द्यावे. हे सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले, काही उपाय करून जर तुम्हाला दुकानात भरभराट येत नसेल, तर तुम्ही एखाद्या वास्तुतज्ञला दाखवून, तुमच्या दुकानाची पाहणी करून घ्यावी. आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                       धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here