वास्तुशास्त्रानुसार बाथरूम कसे बनवावे

0
811
वास्तुशास्त्रानुसार बाथरूम कसे बनवावे
वास्तुशास्त्रानुसार बाथरूम कसे बनवावे

बरेच लोक हे वास्तुशास्त्रानुसार घर बांधत असतात. वास्तुशास्त्रानुसार घरातील बेडरूम कसा असावा ? तसेच वास्तुशास्त्रानुसार घरातील हॉल किचन टॉयलेट कसे असावे ? ही माहिती जाणून घेऊन ते घराचे बांधकाम करत असतात. त्यानुसार वास्तुशास्त्रानुसार बाथरूम कसा बनवावा ? हे देखील जाणून घेणे फार गरजेचे आहे.

अनेक लोक घरातील राहण्याची जागा डिझाईन करून किंवा पुन्हा बदलून घेण्यात बरीच ऊर्जा खर्च करत असतात. आणि मेहनत घेत असतात. यामागील कारण म्हणजे ड्रॉइंग रुम आणि हॉल या जागा आपली पाहुणे बघतात. म्हणून ते प्रस्तुत करणे म्हणजेच दाखवण्या योग्य असावेत असे त्यांना वाटत असते.

घरातली प्रत्येक वस्तू ही योग्य असावी, असे प्रत्येकाला वाटत असते  परंतु घरातील स्नानगृह आणि स्वच्छतागृह या बरेचदा दुर्लक्षित होत असतात. सतत वापराच्या जागेची काळजी न घेणे हे चुकीचे आहे. ज्यांच्या घरातील स्नानगृहे अनुरूप नसतात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते किंवा त्या घरातील संपत्तीची हानी देखील होऊ शकते. आणि याचाच परिणाम म्हणून आरोग्याचा त्रास, ताण-तणाव यांना सामोरे जावे लागत असते.

असं होऊ नये म्हणून घरातील बाथरूम हे वास्तुशास्त्रानुसार बांधणे योग्य ठरू शकते. तर घरातील वास्तुशास्त्रानुसार बाथरूम कसे बनवावे याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. तसेच बाथरूम बनवताना दरवाज्याची योग्य दिशा कशी असावी ? बाथरूम मध्ये कोणकोणते साधने, उपकरणे ठेवावे ? व ते कोणत्या दिशेला असावेत ? बाथरूम मधील खिडकी चे महत्व या विषया पण माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग या विषय आपण माहिती जाणून घेऊया. 

वास्तुशास्त्रानुसार बाथरूम ची दिशा व दरवाजा :

वास्तुशास्त्रानुसार घरातील बाथरूम हे उत्तर किंवा वायव्य म्हणजेच उत्तर -पश्चिम भागात असायला हवेत. अग्नेय दिशा म्हणजेच दक्षिण- पूर्व किंवा नेऋत्य म्हणजेच दक्षिण- पश्चिम या दिशेने स्नानगृह शक्यतो बांधू नका. कारण, त्यामुळे घरातील लोकांच्या आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो, असे वास्तुशास्त्रानुसार सांगितले जाते.

वाचा  जेवणाच्या ताटात हात धुणे योग्य की अयोग्य

वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना दिशांना खूप महत्त्व आहे. शयन कक्ष ते स्नानगृह आणि  स्वयंपाक करते ते ड्रॉइंग रूम पर्यंत प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला असणे, हे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार बाथरूम ची दिशा ही कुठे असावे, याबद्दल आता आपण बोलणार आहोत.

बरेच लोक हे बचत करण्याच्या इच्छेमुळे लाकूड खराब होईल म्हणून बाथरूम मध्ये लाकडी दरवाजे बसवत नाही. मात्र असे करणे चुकीचे ठरते. बाथरूम मध्ये चांगल्या दर्जाचे  लाकडी दरवाजे बसवावे.  आणि जर इच्छा असल्यास लाकडी दरवाजाचे पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून तळाशी ॲल्युमिनियम ची शीट तुम्ही लावू शकतात.

परंतु मित्रांनो बाथरूम मध्ये कधीही धातूचा दरवाजा बसवू नका. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की, धातूचा दरवाजा हा नकारात्मक ऊर्जा रोखत नाही आणि अशा स्थितीत तुमच्या घराचे  वातावरण बिघडते आणि तुमच्या आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो.

मित्रांनो, बाथरूमचा दरवाजा यावर कोणतेही शोपीस किंवा कोणताही धार्मिक पुतळा असे चित्र लावू नका. कारण, असे करणे हे मोठे पाप मानले जाते. यामुळे घरात देखील समस्या निर्माण होतात बाथरूमच्या दारावर कोणत्याही प्रकारची चित्र न लावने चांगले ठरते .

बाथरूम मध्ये कुठल्या दिशेने स्नान करणे योग्य ठरते ?

मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मध्ये कोणत्या दिशेने स्नान करण्याची जागा असावी हे देखील वास्तुशास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. स्नान करण्याची योग्य दिशा हि पूर्व, उत्तर किंवा ईशान्य असावी. वास्तुशास्त्रामध्ये उत्तर दिशा ही आंघोळीसाठी सर्वात योग्य दिशा असल्याचे म्हटले जाते. या दिशेला तोंड करून स्नान करणे देखील शुभ मानले जाते.

तसेच बाथरूम मध्ये पाण्याचा प्रवाह हा उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावा. पाणी फक्त या दिशेने वाहून गेले पाहिजे. घर बांधतना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे,असे केल्यामुळे घरात पैशांचा ओघ हा कायम राहिल.

बाथरूम मध्ये खिडकी असण्याचे महत्त्व :

मित्रांनो, बाथरूम मध्ये खिडकी असणे देखील महत्त्व पूर्ण आहे. कारण बाथरूम मध्ये खिडकी असल्यास सूर्याचा प्रकाश हा बाथरूम मध्ये येऊ शकतो. तसेच हवा देखील आत येते.

वाचा  वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे कसे असावेत

बाथरूम मधील खिडकी ही पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावी. जेणेकरून खिडकीमध्ये सूर्यप्रकाश व हवा व्यवस्थित प्रकारे येऊ शकेल. मित्रांनो, बाथरूममध्ये खेळती हवा असली पाहिजे. जेणेकरून हानीकारक जीवाणू हे बाहेर जाऊ शकतील. बाथरूम मध्ये त्याच दिशेने एक एक्झॉस्ट फॅन देखील बसवावा.

वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मधील साधने व उपकरणे :     

 मित्रांनो, वरील प्रमाणे आपण बाथरूम कुठे असावे, कोणत्या दिशेला असावे, बाथरूम मध्ये खिडकी असेल तर ती कोणत्या दिशेला असावी, याविषयी माहिती वरील प्रमाणे जाणून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे, बाथरूम मधील साधने व उपकरणे हे कोठे असावेत, कोणते असावेत याविषयी देखील जाणून घेणे गरजेचे आहे. बाथरूम मधील साधने व उपकरणे याविषयी माहिती जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मध्ये पाण्याचा पाईप, शावर किंवा पाण्याचा बाथ टब वगैरे बाथरुमच्या ईशान्य कोपर्‍यात ठेवण्यात यावे. पाण्याचा नळ हा उत्तर किंवा ईशान्य दिशेकडे असावा. बाथरूमच्या भिंतीवर निळा किंवा पिवळा रंग दिलेला असावा. पूर्वेकडे बाथरूम असेल तर सर्वात उत्तम. कारण या दिशेने सूर्यप्रकाश याची किरणे आत येऊ शकतात. तसेच बाथरूम मधील वॉश बेसिन हे पश्चिमेकडे असावे. तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी टॉवेल हा वेगवेगळा असावा. बाथरूम मधील गिझर हे आग्नेय किंवा वायव्य दिशेकडे काढावे. बाथरूम मध्ये आरसा लावत असल्यास तो उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा. आणि हा आरसा लावताना तो उंच ठिकाणी लावावा. बाथरूम मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही वॉशिंग मशीन ठेवत असाल तर तो पूर्व दिशेला येईल अशा ठिकाणी ठेवावा.

मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरातील बाथरूम बनवताना तो कुठल्या दिशेला हवा तसेच, बाथरूम मधील रचना कशी असावी, बाथरूम मधील दरवाजाची दिशा हे कोणत्या ठिकाणी असावी, आणि बाथरूम मध्ये कोणकोणती साधने किंवा उपकरणे असावेत व त्यांची दिशा कुठे असावी याविषयी आपण वरील प्रमाणे, बरीच माहिती जाणून घेतली आहे. याविषयी अजून तुम्हाला जर सखोल माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही वास्तुतज्ञ चा सल्ला घेऊ शकतात. मित्रांनो,वरील प्रमाणे आम्ही सांगितले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवू शकतात.

वाचा  घरात रूम फ्रेशनर मारण्याचे फायदे

              धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here