वास्तुशास्त्रानुसार घराचा सेप्टीक टॅंक

0
1366

   नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घराचा सेप्टीक टॅंक कसा असावा बरेच जण हे आजकाल वास्तुशास्त्र यावर विश्वास ठेऊन घराचे बांधकाम करताना दिसून येत आहेत. वास्तुशास्त्र म्हणजे काय? वास्तुशास्त्र नुसार घराचे बांधकाम कसे करावे? याविषयी माहिती घेऊन घराचे बांधकाम केले जात आहे. वास्तुशास्त्राचा आधार घेऊन घराचे कंपाऊंड कसे बांधावे? घरात स्वयंपाक घर कुठे असावे? घरातील हॉल कसा व कुठे असावा? तसेच, घरामध्ये देवघर कुठल्या दिशेला ठेवावे? घरातील बाथरूम कुठे व कसे असावे? घरातील टॉयलेट कुठल्या दिशेला असावा? अशा प्रकारची सर्व माहिती जाणून घेऊनच घराचे बांधकाम केले जात असते. घर बांधताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. बरेच लोक हे घरासाठी वाटेल तितका खर्च देखील करताना दिसून येतात. तसेच काही लोक हे घराचे बांधकाम करण्यासाठी आयुष्यभराची जमा पुंजी खर्च करत असतात. परंतु जर घर हे वास्तुशास्त्रानुसार बांधले नाही तर याचा नकारात्मक प्रभाव हा घरावर दिसून येत असतो. मित्रांनो घर बांधकाम करताना जर ते वास्तुशास्त्रानुसार असेल तर घरात नेहमी सकारात्मक वातावरण दिसून येते तसेच अडकलेली कामे देखील मार्गी लागतात. घराचे वास्तूचे बांधकाम करताना कुठली वास्तू ही कुठे असावी त्याचप्रमाणे घरामध्ये सेप्टीक टँक तिची भूमिका देखील महत्त्वाची ठरते. कारण, ती सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी तयार केलेली सुविधा असते. वास्तूची प्राचीन तत्वे अशा  संरचनेचे योग्य बांधकाम आणि स्थानबद्ध तेवर भर देणे गरजेचे असते. जेणेकरून, त्यातून निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा घरावर परिणाम होणार नाही. घराची सेप्टीक टँक जर योग्य दिशेला असेल तर घरात नकारात्मक प्रभाव दिसून येणार नाही. म्हणून घराचा सेप्टीक टॅंक हा देखील योग्य दिशेला असावा. तर मित्रांनो, आज आपण वास्तुशास्त्रानुसार घराचा सेप्टीक टॅंक याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार सेप्टीक टॅंक चे सर्वोत्तम स्थान

मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वास्तू ही ज्याप्रमाणे योग्य दिशेला हवी त्याचप्रमाणे घराचा सेप्टीक टँक हा देखील योग्य दिशेला काढला पाहिजे. सेप्टिक टाकी ही कॉक्रीट किंवा वीटकामाची बनलेली एक जमिनखालील रचना आहे. जी स्वयंपाक घर आणि स्नानगृह मधील कचरा गोळा करते. टाक्या घन कचरा द्रव पदार्थापासून वेगळे करतात. अँनारोबिक बॅक्टेरिया च्या उपस्थित घनआणि द्रव्य गाळ आणि वायूमध्ये मोडण्यासाठी नैसर्गिक प्रक्रिया घडतात. पूर्वीच्या काळात कमी लोकसंख्येमुळे सेप्टिक टाक्या बसवण्याला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. वाढत्या लोकसंख्यसह नागरिकांमुळे घराच्या बांधकामात सेप्टीक टाक्या  महत्त्वपूर्ण बनल्या आहेत. योग्य ठिकाणी सेप्टिक टाकी ची स्थापना करणे महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार, सेप्टिक टॅंक यांच्या चुकीच्या प्लेसमेंट मुळे आर्थिक आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शिवाय टाकीचे कोणतेही नुकसान घरातील ऊर्जेच्या सकारात्मक प्रवाहावर नकारात्मक परिणाम करू शकते. सेप्टिक टाकी ठेवण्यासाठी  कुठली दिशा हि योग्य ठरते हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  पोटात पाणी होण्याची कारणे आणि उपाय

वास्तुशास्त्रानुसार सेप्टिक टँक ठेवण्यासाठी दिशा

  मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घराच्या वायव्य दिशेच्या पश्चिमेला सेप्टिक टाकी बांधली पाहिजे. दक्षिण दिशेला सेप्टीक टॅंक लावू नका. कारण, यामुळे मानसिक शांतता नष्ट होऊन त्रास होऊ शकतो. जर आउटलेट दक्षिणेकडे असेल तर पाईप पूर्व किंवा उत्तर दिशेकडे वळवा. तसेच गटर ही उत्तर-पूर्व किंवा पश्चिम दिशांना बांधले जाऊ शकते. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही टाकीसाठी अयोग्य मानली  जाते.  बहुमजली इमारतींच्या बाबतीत सेप्टीक टॅंक लावताना नैऋत्य कोपऱ्यात ड्रेनेज पाईप स्थापित करणे टाळले पाहिजे. घराच्या बांधकामा दरम्यान शौचालयाचे पाईप चे आउटलेट आणि बाथरूम चे पाईप पश्चिम किंवा वायव्य दिशेला असणे गरजेचे ठरते. किचन पाईप चे आउटलेट हे पूर्व किंवा उत्तर दिशेला काढावे. अथवा तसे नसल्यास ते या दिशा- निर्देशकांकडे वळवले जाऊ शकतात. सेप्टीक टॅंक ठेवण्यासाठी वायव्य दिशा ही आदर्श दिशा आहे. घराची दिशा  ही काहीही असो. परंतु, वास्तुशास्त्रानुसार सेप्टिक टाकी चे योग्य स्थान उत्तर क्षेत्राला नऊ समान भागांमध्ये विभाजित करून निश्चित केले जाते. भाग तयार झाल्यावर सेप्टिक टाकी ही वायव्य दिशेच्या तिसऱ्या भागात ठेवावी.

वास्तु नुसार सेप्टीक टँकचा आकार

वास्तुशास्त्रानुसार, योग्य  परीमानानुसार सेप्टीक टॅंक बांधणे आणि स्थापित करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार, सेप्टीक टॅंक बांधताना ती घराच्या वायव्य दिशेच्या पश्‍चिमेला बांधली पाहिजे. टाकी ठेवताना टाकीची लांबी पूर्व-पश्‍चिम दिशेला असावी आणि टाकीची रुंदी ही  दक्षिण उत्तर दिशेने असावी.

वास्तुशास्त्रानुसार सेप्टिक टँक प्लेसमेंट साठी काही वास्तू टिप्स म्हणजेच काय  करावे आणि काय करू नये. 

        मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार वास्तु जर ही योग्य दिशेला नसेल, तर त्याचा परिणाम हा घरावर होत असतो. म्हणजे घरातील एखादी वास्तू ही योग्य दिशेला नसेल तर त्यांचा नकारात्मक  ऊर्जेचा प्रभाव हा घरावर पडत असतो. म्हणून वास्तूशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वास्तू ही योग्य दिशेला बांधलेली असली, तर त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येत असते. वास्तुशास्त्रानुसार, घरातील सेप्टीक टॅंक हा जर योग्य दिशेला नसेल,तर त्याचे  परिणाम हे घरावर होत असतात.

  • वास्तुशास्त्रानुसार टाकीचे आउटलेट हे कधीही दक्षिण दिशेला नसावेत.
  • घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला सेप्टीक टॅंक कधीही बांधू नये, कारण त्याचा कुटुंबाच्या आरोग्यवर नकारात्मक  परिणाम होताना दिसून येऊ शकतो. 
  • घर बांधताना बेडरूम पूजा खोल्या किंवा स्वयंपाक घर थेट सेप्टीक टॅंक च्यावर  बांधलेले नसावे. 
  • भिंत आणि टाकी यांच्यामध्ये किमान दोन फूट अंतर तरी असावे. 
  • टाकी ही प्लिंथ पातळीच्या वर असू नये किंवा सीमा भिंतीला स्पर्श करू नये. 
  • घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कधीही सेप्टीक टॅंक बांधू नये. 
  • जीने सहसा घराबाहेर बांधले जात असल्याने वास्तुशास्त्रानुसार, जिण्या खाली सेप्टीक ठेवता येऊ शकते. 
वाचा  जेवणाचे ताट ओलांडू नये असे का म्हणतात ?

मित्रांनो वरील प्रमाणे वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घराचे बांधकाम करताना  सेप्टीक टॅंकची दिशा योग्य ठिकाणी ठेवू शकतात. घराचा सेप्टीक टॅंक योग्य दिशेला असेल तर त्याचा सकारात्मक प्रभाव हा घरावर दिसून येत असतो. घराचे बांधकाम करताना सेप्टीक टॅंक चे बांधकाम करताना योग्य त्या दिशेला बांधण्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच घराचे बांधकाम करताना सेप्टीक टॅंक विशेषत तुम्हाला अजून जास्तीची माहिती हवी असेल तर तुम्ही वास्तुशास्त्र तज्ञांचा सल्ला घेऊन सेप्टीक टॅंक चे बांधकाम करू शकतात.

     मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

       धन्यवाद.

वास्तूशास्त्रानुसार बाथरूम कसे बनवावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here