राजकुमारासारखे राजासारखे गरीबा सारखे जेवण ?

0
398
राजकुमारासारखे राजासारखे गरीबा सारखे जेवण
राजकुमारासारखे राजासारखे गरीबा सारखे जेवण

नमस्कार, बदलत्या जीवनशैली मध्ये आपण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. कोणत्याही वेळी कोणतेही काम करतो. जेवण वेळेवर करत नाही. त्याच्या प्रदुर्भाव आपल्या शरीरावर बघावयास मिळतो. म्हणूनच तर माझी आजी म्हणायची,  की नाश्ता राजकुमारा सारखा, दुपारचे जेवण राजासारखे, व रात्रीचे जेवण गरिबासारखे, करत जा ग बाई!  प्रत्येक म्हणीचा अर्थ हा वेगवेगळा असतो. तो अनेकांना माहिती नसतो. राजकुमारासारखे राजासारखे गरीबा सारखे जेवण ?

पूर्वीच्या काळापासून लोकांनी म्हणी लावून ठेवलेल्या आहेत, आणि त्याचा अर्थ ही योग्यप्रकारे दर्शवला आहे. प्रत्येक गोष्टीला त्यांनी उपमा दिलेली आहेत. त्यांचा अर्थ आपल्याला समजत नाही, आपण याउलट करतो, नाश्ता साधा करतो, दुपारी पोटापुरता करतो, आणि रात्री पोटभर जेवून, मस्तपैकी झोपतो. या म्हणी मध्ये आपल्याला आपल्या आरोग्य कसे जपावे, याचा अर्थ दिलेला आहे.राजकुमारासारखे राजासारखे गरीबा सारखे जेवण ? आपले आरोग्य हे आपल्या आहार वरून राहते. आपण आपला आहार योग्य घेतला  तर आपल्या आरोग्यावर कसलाही तांत्रिक बिघाड होत नाही. आपली तब्येत एकदम ठणठणीत व सुदृढ असते. पूर्वीच्या लोकांनी ही म्हण का लावली, असेल बरं?   चला, तर मग जाणून घेऊया की, त्याच्या अर्थ काय आहेत. 

राजकुमारा सारखे नाश्ता करणे, म्हणजे काय? 

रात्रीच्या झोपे नंतरची सकाळ ही एकदम फ्रेश असते. त्यावेळी सूर्याचे आगमन असते. आपले मन एकदम उत्कृष्ट असते. सकाळचा नाश्ता केल्याने आपल्या शरीरात एनर्जी टिकून राहते. रात्रीच्या जेवणानंतर आपल्या पोटातील अन्नपदार्थ शौचावाटे बाहेर निघून जातात. अशा वेळी आपले पोट रिकामे राहते. रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या नाश्त्याला ब्रेकफास्ट असे म्हणतात. ब्रेकफास्ट  म्हणजे जेवणानंतर चा ब्रेक आणि सकाळचा फास्ट म्हणजे आपण उपवास सोडतो, त्याला सकाळचा ब्रेकफास्ट म्हणतात. सकाळचा नाश्ता तुम्ही पौष्टिक असा करायला हवा. सकाळचा नाश्ता केल्याने, तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. उत्साह वाढतो. सकाळचा नाश्ता केल्याने, आपले आरोग्य शारीरिक व मानसिक दृष्ट्या उत्कृष्ट राहते. त्यासाठी आपण प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, विटामिन युक्त, आयरन युक्त नाश्ता करायला हवा. मग सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण काय खायला हवे, जेणेकरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल,  तर सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही उसळ, उपमा, ओट्स, फळे हिरव्या भाज्या, दही , तांदूळ, कॉर्न, गहू, थालीपीठ, डोसा, इडली, फळांचा ज्यूस यासारखे पदार्थ खाऊ शकतात. जेणेकरून तुमच्या शरीरात चयापचय संतुलन व्यवस्थित राहते. सकाळचा नाश्ता केल्याने तुम्हाला कोणता फायदा होऊ शकतो, ते जाणून घेऊयात. 

 • सकाळचा नाश्ता केल्याने, तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
 • इम्मुनिटी पॉवर वाढते.
 • चयापचयाची निगडित समस्या दूर होतात.
 • कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.
 •  तुम्ही स्वस्थ व निरोगी राहतात.
 • तुमची वजन वाढत नाही.
वाचा  तोंडली खाण्याचे फायदे

राजासारखे जेवण म्हणजे काय? 

राजासारखे जेवन म्हणजे, दरबारात बसून खुर्च्या- चेअरवर बसून जेवणे नाही, तर राजासारखे जेवण म्हणजे, संपूर्ण ताटात थोडे थोडे व्यवस्थित, शरीराला पचतील असे पदार्थ घेणे होय. कारण दुपारच्या वेळी सूर्य आपल्या डोक्यावर असतो, त्यावेळी आपल्या शरीरातील अग्नी सुद्धा प्रदीप्त असतो, अशावेळी आपण परिपक्व आहार घ्यायला हवा. म्हणजेच मग तो कोणता, तर  राजासारखे जेवण म्हणजे सात्विक आहार, जसे की डाळ, भात चपाती, हिरवी भाजी, काकडी, कांदा, टमाटर, लोणचे, पापड आणि एखादा गोडाचा पदार्थ, कडधान्य, प्रोटीन युक्त आहार होय. दुपारचे जेवण केल्यानंतर, आपल्या शरीरात अन्नपदार्थ लवकर पचतात आणि आपण एकदम सुदृढ, निरोगी राहतो. 

रात्रीचे जेवण गरीबासारखे म्हणजे कसे करायचे? 

रात्रीचे जेवण म्हणजे गरीबा सारखे, असायला हवे. मग ते कसे? जसे की  एखाद्या गरीब माणसाला एखादा पदार्थ मिळतो, तर नाही मिळत. कधी तो चतकोर भाकरवर ही त्याची रात्र भागवून घेतो. असे जेवण केल्यास, तुमच्या शरीरात कोणतेही आजार  होण्यापासून दूर राहतात कारण रात्रीचे जेवण हे नेहमी हलका आहार घ्यायला हवा, कारण तुम्ही जर पोटभर  जेवण करून जेव्हा झोपतात, अशावेळी तुमच्या वजन लवकर वाढण्याचे समस्या होतात. रात्रीचा जेवणाचा हलका आहार म्हणजे काय, जसे की डाळ, पातळ खिचडी, किंवा उपमा, दलिया, लापशी, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, नाचणीची भाकर असा हा रात्रीचा हलका आहार होय. 

रात्रीचे जेवण हलके केल्यास, तुम्हाला अनेक समस्या पासून आराम मिळेल. मग त्या नेमक्या कोणत्या, आहेत चला तर मग  जाणून  घेऊयात. 

 • तुमचे वजन वाढणार नाही. 
 • रक्ताभिसरण सुरळीत राहील. 
 • कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. 
 • डायबिटीस ही होणार नाही. 
 • ऍसिडिटी अपचन व पोटाचे विकार होणार नाही. 
 • शिवाय तुमच्या सौंदर्यही निखारेल. 

चला, तर मग तयार आहेत ना!    

 “सकाळचा नाश्ता राजकुमारा सारखा, दुपारचे जेवण राजासारखे, आणि रात्रीचे जेवण गरीबा सारखे”  ही म्हण चालू ठेवण्यात मदत करणार ना! चला तर मग लागा तयारीला. 

वाचा  जिरे याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध बहुमूल्य फायदे :-

 हे आज आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, आणि जर आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये, जरूर सांगावे. 

  धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here