त्रिफळा चूर्ण चे फायदे

0
768
त्रिफळा चूर्ण चे फायदे
त्रिफळा चूर्ण चे फायदे

नमस्कार, मित्रांनो, हल्ली आपल्या शारीरिक व्याधींवर मार्केटमध्ये नवीन नवीन येणारे औषधे उपलब्ध असतात. तसेच आयुर्वेदिक औषधी हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्याचे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. त्यामध्ये एक औषधी त्रिफळा चूर्ण हे एक आयुर्वेदिक औषध आहेत. त्रिफळा चूर्ण म्हणजे तीन  फळांचे मिश्रण होय. त्यामध्ये हरड, बेहडा, आवळा या तीन फळांचे मिश्रण एकजीव करून, ते आपल्या शारीरिक व्याधींवर फायदेशीर ठरते. त्रिफळा ने आपल्याला खूप सारे फायदे होतात. तर मित्रांनो आज आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत, त्रिफळा चूर्ण आपल्या शरीरासाठी कसे फायदेशीर ठरते? तसेच ते कसे घ्यावे? आणि कुठे मिळते? चला तर मग जाणून घेऊयात! 

त्रिफळा चूर्ण घेतल्याने, तुमच्या शरीराला होणारे फायदे? 

मित्रांनो, त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदिक औषध आहे. ते घेतल्याने तुमच्या शरीराला खूप सारे फायदे होतात. पण हे अनेकांना माहिती नसते. चला, तर मग जाणून घेऊयात! 

तुम्ही रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यासाठी मदत मिळते :

मित्रांनो, काहीजण बदलत्या वातावरणामुळे लवकर आजारी पडतात. तसेच त्यांची सहनशीलता कमी असते. त्यामुळे त्यांना वायरल इन्फेक्शन लवकर होते. त्याला कारणीभूत म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असणे होय. अशावेळी त्यांना त्यांच्या आहारामध्ये त्रिफळाचूर्ण याचा समावेश करायला हवा. त्रिफळाचूर्ण तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यासाठी मदत मिळते. त्यासाठी तुम्हाला सकाळ-संध्याकाळ एक ग्लास कोमट पाण्यात, त्रिफळा चुरणा घ्यायचे आहे. त्यामुळे तुमची इम्युनिटी वाढते. 

बद्धकोष्ठतेचा त्रास आवर आराम मिळतो :

त्रिफळा चूर्ण म्हणजे तीन फळाचं मिश्रण, त्यामध्ये आवळा, हरड, बेहडा यासारखे गुणधर्म असल्यामुळे ते बद्धकोष्ठतेचा त्रासावर फायदेशीर ठरते.  बद्धकोष्ठतेचा त्रास म्हणजे, तुम्हाला मल विसर्जनाला त्रास होणे. अशा वेळी त्रिफळाचूर्ण हे यासाठी फार फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्हाला नियमित संध्याकाळी एक ग्लास कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण चे सेवन करायचे आहे. तुम्हाला त्यावर फरक पडेल. 

वाचा  सनस्क्रीन का वापरतात व केव्हा वापरावी

पचनाची संबंधित तक्रारी दूर होतात :

त्रिफळा ने तुमचे पचनाची संबंधित तक्रारी दूर होतात. कारण त्यामध्ये आवळा, हरड, बेहडा याचे प्रमाण असल्यामुळे, तुमच्या पचनसंस्थेमध्ये येणारे अडथळे दूर होतात. तसेच तुमचे पोट साफ होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही नियमित सकाळ-संध्याकाळ त्रिफळाचूर्ण, एक ग्लास कोमट पाण्याबरोबर प्यावेत. असे केल्यास, तुमचे पचनाची  संबंधित तक्रारी दूर होतात. 

वजन कमी होण्यासाठी फायदेशीर ठरते :

हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे, सतत बैठे काम, बाहेरचे जंक फूड खाणे, मैद्याचे पदार्थ खाणे, बेकरी प्रॉडक्ट खाणे, जागरण, अपूर्ण झोपणे, याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. तुमचे वजन वाढायला लागते. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये आयुर्वेदिक औषधांचा वापर केला, तर वजन कमी होण्यास फायदेशीर ठरते. त्यामध्ये जर तुम्ही त्रिफळा चूर्ण सेवन केले, तर तुम्हाला फरक पडेल. पण हा कोर्स तुम्हाला चार ते सहा महिने रेगुलर करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला रोज सकाळ-संध्याकाळ एक ग्लास कोमट पाण्यामध्ये, त्रिफळा चूर्ण याचे सेवन करायचे आहे. असे केल्याने तुमची पोटही साफ राहते, आणि वजन कमी होण्यासाठी मदत मिळते. कारण त्रिफळा चूर्ण हा तुमच्या शरीरातील मेटाबोलिजम सिस्टीम सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतो, त्यामुळे वजन कमी होते. 

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

मित्रांनो, सतत बैठे काम करून मोबाइल, लॅपटॉप, कॉम्पुटर वर नजर लावून डोळ्यांची आग होते. जळजळ होते, तसेच डोळ्यांना लाली येते, तसेच काही जणांना कमी वयातच मोतीबिंदूचा त्रास संभवतो. अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारात त्रिफळा चूर्ण सेवन करायला हवेत. कारण त्रिफळा चूर्ण हे डोळ्यांच्या मांसपेशींना आलेला ताण कमी करण्यास, फायदेशीर ठरतो. तसेच तुम्ही त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळून, त्या पाण्याने तुमचे डोळे धुवावेत. त्यामुळे डोळ्यांची आग होणे, जळजळ होणे, यासारख्या समस्येवर तुम्हाला आराम मिळतो. तसेच तुम्ही नियमित त्रिफळाचूर्ण सकाळ संध्याकाळ एक ग्लास कोमट पाण्याबरोबर पिल्यास, तुम्हाला यासारख्या तक्रारी दूर होतात. जर तुम्हाला पाण्याबरोबर आवडत नसेल, तर तुम्ही दुधासोबत ही पिऊ शकतात. 

वाचा  शिंगाड्याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

त्रिफळाफळांमध्ये, आवळा, हरड हे दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच तुमच्या हिरड्यांना आलेली सूज, त्यामधून रक्त येणे, तसेच दातामध्ये किडे होणे, यासारख्या गोष्टींवर ते फायदेशीर ठरते. त्रिफळा चूर्ण मध्ये ऑंटीबॅक्टरियल तसेच गुणधर्म असल्यामुळे, ते दातांचे आरोग्य जपण्याचा फायदेशीर ठरते. जर तुमच्या हिरड्या मधून रक्त येत असेल, तसेच दातांची समस्या होत असेल, तर त्यासाठी तुम्हाला दिवसातून तीन वेळा त्रिफळाचूर्ण हातावर घेऊन, दात घासावेत, व चूळ भरून बाहेर थुंकावेत. तसेच दिवसातून दोन वेळेस तुम्ही त्रिफळा चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे. त्यामुळे पोटातील सगळी घाण निघते, आणि दातांचा त्रास ही कमी होतो. 

चेहऱ्यावरील डाग जाण्यास मदत मिळते :

हल्ली शरीरातील हार्मोन्स इनबॅलन्स मुळे, तसेच किशोर वयामध्ये येताना मुलामुलींना चेहऱ्यावर काळे डाग, मुरूम पुटकुळ्या या सारखे, त्रास होतात. अशावेळी जर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये त्रिफळा चूर्णाचा वापर केला, तर त्याचा परिणाम त्यांच्या सौंदर्यावर ही पडतो. करण त्रिफळा मध्ये आवळा चे गुणधर्म असते, आवळ्या मध्ये विटामिन सी स्त्रोत असतो, तसेच त्रिफळा चूर्ण हे पोटातील सगळी घाण बाहेर काढतो, शरीर स्वच्छ राहते, आणि रक्त ही शुद्ध राहते. तसेच चेहर्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाचे असते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग वगैरे असतील, तर ते जाण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्ही नियमित त्रिफळा चूर्ण सकाळ-संध्याकाळ एक ग्लास पाण्यामध्ये प्यायला हवेत. तसेच तुम्ही त्रिफळा चूर्ण एक चमचा पाण्यात उकळून, ते पाणी थंड झाल्यावर त्याने तुमच्या चेहरा स्वच्छ धुवायला हवा. त्यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा निघण्यास मदत मिळते. 

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर राहते :

हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे, त्याचा परिणाम केसांवरही पडतो. तसेच तुमची पोट साफ नसले, तर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तुमचे केसही रुक्ष होतात, गळतात, केसांमध्ये कोंडा, अकाली केस तुटणे, यासारख्या परिणाम  होतो. मग अशावेळी तुम्ही केसांसाठी घरगुती उपाय म्हणून त्रिफळा चूर्णाचा वापर करावा. त्यामुळे तुमचे पोट साफ होते. शिवाय रक्त शुद्ध होते. तसेच केसांमधील कोरडेपणा असेल, तर तोही जाण्यास मदत होते. तसेच तुम्ही त्रिफळाचूर्ण एक चमचा+ शिकेकाई पावडर एक चमचा+ रिठा पावडर एक चमचा यांचे मिश्रण चांगले उकळून, कोमट झाल्यावर त्या पाण्याने केस धुवावेत. त्यामुळे केसातील कोंडा जाण्यासाठी मदत मिळते. शिवाय केस मुलायम व चमकदार होतात. 

वाचा  पोट कमी करण्यासाठी उपाय

त्रिफळा चूर्ण नियमित सेवन केल्याने, हे आजार दूर राहतात ! 

मित्रांनो, त्रिफळा हे आपल्या शरीरासाठी रामबाण उपाय आहे. त्यामध्ये तीन फळांचा मिश्रण म्हणजे आपल्या शरीरावर आरोग्यदायी गुणधर्म होय. त्रिफळा चूर्ण घेतल्याने तुम्हाला मधुमेह, हृदयविकार, तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास, हे आपल्यापासून दूर राहतात. कारण त्रिफळा चूर्ण घेतल्याने, आपले शरीर निरोगी राहते. विशेष म्हणजे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल बाहेर टाकला जातो, रक्त शुद्ध राहते. तसेच त्रिफळा चूर्णाने वजन कमी झाल्यामुळे तुम्हाला शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा धोका तुमचा टळतो. त्यासाठी तुम्ही नियमित हे पावडर, एक ग्लास कोमट पाण्यामध्ये किंवा दुधाबरोबर घ्यावेत. त्यामुळे तुम्ही निरोगी राहणार. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला त्रिफळाचूर्ण घेतल्याने तुमच्या शरीराला किती सारे फायदे होतात, ते सांगितलेल्या आहेतच. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करण्यापूर्वी,  तुम्ही डॉक्टरांना एकदा जरूर विचारून त्रिफळाचूर्ण घ्यावेत. तसेच आम्ही सांगितलेली माहिती, तुम्हाला आवडली असेल, व आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here