शिंगाडा खाण्याचे फायदे व तोटे

0
908
शिंगाडा खाण्याचे फायदे व तोटे
शिंगाडा खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार, मित्रांनो शिंगाडा हा सगळ्यांनीच बघितला असेल. तुम्ही जर कधी मार्केटमध्ये गेला असाल, तर तुम्ही  काळा रंगाचा दगडासारखा शिंगाडा बघितला असेलच, त्याला फोडून किंवा कापून बघितले, तर त्यामध्ये पांढरा गर असतो. शिंगाडा मधील गर आपल्या शरीरासाठी फार उपयोगी असतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिंगाडे खायला आवडतात. शिंगाडे हे खाण्यासाठी फायदेशीर असतात. हिवाळ्यामध्ये शिंगाड्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते. कारण शिंगाडा हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर व गुणवर्धक असतात.

शिंगाडा हा आपल्या शारीरिक समस्येवर आराम देण्याचे काम करतो. शिंगाडा हा ओला ही खाता येतो, तसेच उकळूनही खातात, तसेच त्याला सुकल्यावर त्याचे पीठ तयार करून, त्याचे घावने किंवा शिरा करून खाता येते. शिंगाडे मधील गुणधर्म आपल्या शरीरात झिज भरुन आणण्याचे काम करतात. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत, की शिंगाडा खाल्ल्याने तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात? तसेच तोटे होतात? चला तर मग जाणून घेऊयात! 

शिंगाडा खाण्याचे फायदे नेमकी कोण कोणते ? 

मित्रांनो, शिंगाडे खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात. पण काही जणांना त्याचे फायदे माहिती नसतात, चला तर मग जाणून घेऊयात. 

शिंगाडा मधील गुणधर्म :

शिंगाडा मध्ये आपल्या शरीराला लागणारे गुणधर्म असतात. जसे की कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन सी, विटामिन बी सिक्स, ऑंटी बॅक्टेरियल, ऑंटीव्हायरल, ऑंटीफंगल इन्फेक्शनल, अँटी अक्सिडेंट, फायबर्स, मॅगनीज, तांबे यासारखे गुणधर्म त्यामध्ये असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे फायदे होतात. 

वाचा  रात्री झोपण्याआधी दूध हळद पिल्याने काय फायदे होतात?

वजन कमी होण्यासाठी फायदेशीर ठरते :

हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे, सतत बैठे काम, अवेळी खाणे ,अपूर्ण झोप होणे, जागरण, तसेच मैद्याचे बेकरी उत्तम पदार्थ खाणे, यासारख्या गोष्टींमुळे तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तुमचे वजन वाढते. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक युक्त शिंगाडा याचा वापर केला, तर तुम्हाला फायदे होतील. शिंगाडा मधील गुणधर्म आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात. तसेच त्याच्यात फायबरचे प्रमाण असते, जर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये शिंगाड्याचे पदार्थ किंवा उकळलेले शिंगाडे खाल्ले, तर तुम्हाला दिवसभर भूक लागत नाही. पोट भरल्यासारखे जाणवते. शिवाय वजन कमी होण्यासही मदत मिळते. 

तुमच्या दातांचे आणि हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरतात :

शिंगाडा मध्ये कॅल्शियम चा स्त्रोत मुबलक प्रमाणात असतो, शिंगाडे आपल्या शरीरातील दातांचे आणि हाडांच्या फायद्यासाठी ते प्रभावशाली ठरते. शिंगाडा मध्ये भरपूर गुणधर्म असल्यामुळे, आपल्या हाडांमधील ठिसूळपणा कमी होते, आणि तसेच दात लवकर पडणे, यासारख्या समस्या कमी होतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित शिंगाड्याचा वापर करावा. 

हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते :

शिंगाडे मध्ये लोह, तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, यासारखे गुणधर्म असल्यामुळे, आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त पुरवठा वाढतो. तसेच शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात नियमित शिंगाडे खायला हवेत. 

मुळव्याधीचे त्रासांमध्ये शिंगाडे फायदेशीर असतात :

ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास आहे, अशा लोकांना शौचास करताना खूप त्रास होतो. अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये शिंगाड्याचा वापर करायला हवा. कारण शिंगाडे हे पचायला हलके असतात, शिवाय पोट साफ करण्यासाठी प्रभावशाली ठरतात. त्यासाठी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये शिंगाड्याचा आहार घ्यायला हवा. जसे की शिंगाड्याचे थालीपीठ, तसेच शिंगाड्याचे धिरडे, शिंगाड्याचा तूप टाकून हलवा, हे फायदेशीर ठरते. 

गर्भवती स्त्रियांसाठी फायदेशीर ठरते :

गरोदरपणामध्ये सकस आहार घेणे, आपल्या शरीरासाठी फार जरुरी असते. अशावेळी जर तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही शिंगाड्याचा वापर केला, तर तुम्हाला फार फायद्याचे ठरते. कारण शिंगाडा मधील गुणधर्म तुम्हाला मिळतात आणि तुमच्या मार्फत पोटातील बाळाला ही मिळतात. शिंगाडा खाल्ल्याने तुमचे आणि बाळाचा आरोग्य उत्तम राहते. तसेच गर्भपाताचा धोका ही टळतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात शिंगाडे युक्त पदार्थ खायला हवेत. 

वाचा  तिळाचे तेल फायदे

शिंगाडे खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते :

शिंगाडे मध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, तांबे, विटामिन या सारखे भरपूर गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी, फायद्याचे  ठरते. म्हणूनच तर उपवास असेल, तर अशावेळी शिंगाड्याचे युक्त पदार्थ उपवासाच्या दिवशी मार्केटमध्ये असतात. तसेच तुम्ही शिंगाड्याचा पिठाचा हलवा, धिरडे, शिंगाड्याचे घावणे, उपवासाच्या दिवशी करून खाऊ शकतात. त्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा टिकून राहण्याचे काम मिळते. 

कावीळ मध्ये फायदेशीर ठरतो :

मित्रांनो, शिंगाडे खाणे हे कावीळ मध्ये फायदेशीर ठरतो. कावीळ झाल्यास तुम्हाला अशक्त पणा जाणवतो, शिवाय थकल्यासारखे जाणवते, भूक लागत नाही शिंगाडा खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत मिळते, शिंगाडा मध्ये ऑंटीॲक्सिडेंट, अँटीव्हायरल, तसेच ऑंटी बॅक्टेरियल चे प्रमाण असते. शिवाय शिंगाडा मध्ये उर्जा देणारे गुणधर्म असल्यामुळे, कावीळ झाल्यावर फायद्याचे ठरतात. 

शिंगाडे खाताना काय काळजी घ्यावी ? व होणारे दुष्परिणाम ? 

मित्रांनो, शिंगाडे खाताना योग्य प्रमाणात खावेत. कोणतीही गोष्ट खाताना प्रमाणातच खावेत, तिचे प्रमाण जास्त झाले, तर आपल्याला त्याचा त्रास संभवतात, तसेच शिंगाडे हे स्वच्छ धुऊन, त्यांना उकळून खावेत. तसेच काही जणांना कच्चे शिंगाडे खायला आवडतात, पण खाल्ल्या नंतर त्यावर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे तुम्हाला घशाची संबंधित, तसेच खोकल्याचा त्रास होऊ शकतो. तसेच शिंगाडे जास्त प्रमाणात खाल्ल्यास, तुम्हाला पोटात बिघाड होऊ शकतो. त्यामुळे तुमची पोटदुखी होऊ शकते. तसेच शिंगाडे जास्त खाल्ल्यास तुम्हाला कफ संबंधित त्रास होऊ शकतो. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला शिंगाडे खाल्ल्याने, तुमच्या शरीराला होणारे फायदे, तसेच शिंगाड्याच्या प्रमाण जास्त प्रमाणात खाल्ल्यास, तुम्हाला त्यामुळे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच शिंगाडे खाण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. तसेच आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, व आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

वाचा  बदाम खाण्याचे फायदे

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here