आंबा खाण्याचे फायदे व तोटे

0
440
आंबा खाण्याचे फायदे व तोटे
आंबा खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया आंबा खाण्याचे फायदे व तोटे याबद्दलची माहिती. प्रत्येक ऋतूनुसार मौसमी हंगामी फळे देखील मिळत असतात. आणि प्रत्येक ऋतूनुसार आपण जर फळांचे सेवन करत असेल तर त्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात तशी व आपल्या शरीराचे स्वास्थ्य देखील चांगल्याप्रकारे राहण्यास मदत होत असते. मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात खास करून मे महिना आला म्हणजे आपण आंब्याची वाट बघत असतो. कारण मे महिना आणि आंबे हे तर एक प्रकारे समीकरणच बनलेले आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या सुट्ट्या लागल्या की आपण लगेच मामाच्या गावाला पळतो. शिवाय मे महिन्यामध्ये आखाजी हा सण देखील येत असतो. आखाजी हा सण आला म्हणजेच प्रत्येक घरोघरी तुम्हाला आंब्याचा रस आढळून येईल. आंबा जरी नुसतं म्हटले की लगेच आपल्या तोंडाला पाणी सुटत असते. शिवाय, आंबा हा आपल्या फळांचा राजा देखील आहे. अगदी लहान बाळ पासून मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आंबा चाखायला आवडत असतो.

आंब्याचे सीजन येताच एक प्रत्येक जण आंबा खाण्यास सुरुवात करत असतो. आंब्याची चव इतकी गोड आणि मधुर असते, की एकदा जर आपण आंबा चाखायला सुरुवात केली, तर ती लवकर सोडावेसे वाटत नाही. आंबा तर सर्वांनाच खायला आवडत असतो परंतु आंबा खाल्ल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे हे आपल्या शरीराला होत असतात. आंबा खाल्ल्यामुळे आपल्याला विटामिन्स मिळत असतात. शिवाय, A जीवनसत्त्व हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याशिवाय आंब्यामध्ये पोटॅशियम, झिंक, मिनरल्स आणि अनेक गुणधर्म आढळून येत असतात.ज्याचा आपल्या आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे फायदा होत असतो.

आंबा म्हटला की आंब्यामध्ये अनेक प्रकार येत असतात. आणि त्यातील एक उत्तम प्रकार म्हणजे हापूस आंबा. हापूस आंब्याची चव एकदम मधुर, गोड असते. प्रत्येक जण आपल्या घरोघरी  हापूस आंब्याची मागणी करताना दिसत असतात. आंब्याची तुम्ही कोणताही प्रकार खाल्ला तरी तुम्हाला त्यापासून चांगलेच गुणधर्म मिळत असतात. तर मित्रांनो आज आपण आंबा खाण्याचे फायदे व तोटे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आंबा खाल्ल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे व तोटे होऊ शकतात याबद्दल आम्हाला आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

आंबा खाल्ल्यामुळे होणारे फायदे :-

उन्हाळा लागताच आपण आंब्याची आतुरतेने वाट बघत असतो. उन्हाळा आणि आंबे जणु हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे. उन्हाळ्यामध्ये आखाजी हा सण येत असतो. तर आखाजी या सणाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरोघरी तुम्हाला आंब्याचा रस हमखास आढळून येईल. आंबा चवीला तर खूपच छान आणि गोड लागत असतो शिवाय आंबा खाण्याची अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात. तर ते कोणते याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • आंबा या फळांमध्ये विटामिन ए आणि सी चे प्रमाण चांगल्याप्रकारे असते. आणि हे विटामिन्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरत असते.
  • आंब्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी ही वितळण्यास मदत होत असते. म्हणजेच त्यांचे जास्तीत जास्त वजन वाढलेले असेल तर त्यांना देखील फायदा होऊ शकतो.
  • आंबा हा चवीने गोड असतो त्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत असते. म्हणजेच आंब्यातील शर्करा मुळे आपल्या शरीरात ऊर्जा चांगल्याप्रकारे वाढण्यास मदत होते. म्हणजेच ऊर्जेचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे आपण कोणतेही काम जर करत असेल तर ते न थकता करू शकतो. आंबा खाल्ल्यामुळे एकप्रकारे एनर्जी देखील आपल्या शरीराला प्राप्त होण्यास मदत होते.
  • आंब्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरावरील त्वचेवरील सुरकुत्या पडलेल्या असतात त्यांचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होत असते. आंब्यामध्ये असे काही पोषक तत्त्वे पोषक घटक असतात की ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या लवकर पडत नाही.
  • आंबा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही देखील वाढण्यास मदत होत असते आणि जर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगले असेल तर अनेक आजारांपासून आपले संरक्षण होत असते. शिवाय, संसर्गजन्य आजार देखील आपल्या लवकर होत नाहीत.
  • जर तुम्ही कैरीचे पन्हे हे देखील बनवून खाल्ले, तरी यामुळे देखील तुमच्या शरीराला चांगल्या प्रकारे फायदा होत असतो शिवाय तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचे प्रमाण देखील चांगल्या प्रमाणे वाढते.
  • आंब्याचे सेवन केल्यामुळे तुमचे हृदयरोगापासून देखील बचाव होऊ शकतो. म्हणजेच आंबा खाल्ल्यामुळे हृदयरोगाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकत नाही.
  • अनेक लोकांना अपचनाचा त्रास होत असतो. म्हणजेच खालेले अन्न हे व्यवस्थित पचन होत नाही. पचन क्रियाही मंदावते तर अशा वेळी जर तुम्ही आंब्याचे सेवन केले तर तुमच्या शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित सुरळीत राहण्यास मदत होत असते. शिवाय पचनक्रिया व्यवस्थित असेल तर आपल्या पोट साफ न होण्याची समस्या देखील उद्भवत नाही एक प्रकारे आंबा खाल्ल्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होऊ शकते.
  • मित्रांनो बाजारातून आंबा आणल्यानंतर तुम्ही, त्यांना तसंच न खाता सर्वप्रथम स्वच्छ पाण्यामध्ये व्यवस्थित धुऊन घ्यावे. पाण्यामध्ये मीठ देखील टाकावे जेणेकरून आंब्यावरील साचलेले घाण केमिकल चामारा हा निघण्यास मदत होऊ शकते. आंबा घरी आणल्यावर स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुतल्या नंतरच आंबा खाल्ला पाहिजे.
  • आंब्याचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे पोषक घटक पोषकतत्वे विटामिन्स हे आपल्याला मिळत असतात जे आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
वाचा  झोपेत घोरणे ही समस्या बंद करण्यासाठी घरगुती उपाय

तर मित्रांनो, उन्हाळा लागल्याबरोबर आपल्याला जणू काही आंब्याची चाहूल लागते. शिवाय आंबा खाणे हे प्रत्येकालाच आवडत असते आंबा हा चवीने मधुर आणि गोड लागत असतो त्यामुळे जर एकदा खायला सुरुवात केली तर आपला लवकर थांबावेसे वाटत नाही. त्याचप्रमाणे आंब्याचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या आरोग्यासाठी होऊ शकतात.

आंबा खाण्यामुळे होणारे तोटे:-

आंबा खाल्ल्या मुळे अनेक प्रकारचे फायदे हे आपल्याला होत असतात. शिवाय आंब्यामध्ये व उपलब्ध असणारे विटामिन्स, मिनरल्स हे आपल्या शरीरासाठी उत्तम देखील घडत असतात. परंतु मित्रांनो निसर्गनियमानुसार कोणतीही गोष्ट ही प्रमाणातच खाल्ली पाहिजे. आणि जर कोणतीही गोष्ट आपण प्रमाणात खाल्ली नाही म्हणजेच अति प्रमाणात त्या गोष्टीचे सेवन केले तर त्यामुळे आपल्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतात. आंबा खाणे आकाशला साठी चांगले ठरते परंतु त्याचे अतिसेवन मात्र हानिकारक ठरू शकते. तर आंब्याची अति प्रमाणात सेवन केल्यामुळे कोणते तोटे होऊ शकतात याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात !

  • आंबा हा चवीने गोड असतो. आंबा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण देखील वाढत असते. ज्या लोकांना डायबिटीस ची समस्या असेल, तर मात्र अशा लोकांनी आंब्याचे सेवन करणे टाळायला हवे. आणि जर आंब्याचे सेवन केले तर त्यामुळे त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण हे वाढू शकते आणि साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना त्रास होण्याची शक्यता असते.
  • आंबा खाण्याचे हे प्रमाण आपण मर्यादेतच ठेवले पाहिजे. दिवसाला एक ते दोन आंब्या शिवाय जास्तीच्या आंब्याचे सेवन करणे शक्यतो टाळा हवे. जास्त प्रमाणात जर तुम्ही आंबे खात असाल, तर त्यामुळे तुमच्या शरीरात साखर जास्तीची जमा होऊ शकते. आणि जास्तीत जास्त तुम्ही आंब्याचे सेवन करत राहिले तर तुम्हाला डायबेटीजची समस्या येऊ शकते.
  • आंबे यामध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे, पोषक घटक आढळून येत असतात. जे आपल्या शरीरासाठी तर फायदेशीर ठरत असते. परंतु, आंब्याचे अति प्रमाणात सेवन केले, तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त उष्णता निर्माण होऊ शकते. आपल्या शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण हे जास्त वाढल्यामुळे त्याचा त्रास आपणास होऊ शकतो. शिवाय, आपल्या शरीराच्या त्वचेवर फोड देखील येण्याची शक्यता येऊ शकते.
  • आंब्याचे जास्तीत जास्त सेवन केल्यामुळे शरीरामध्ये अति उष्णता तयार होऊन त्यामुळे आपल्याला चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या अधिक येऊ शकते.
  • ज्या व्यक्तींना आधीपासूनच संधिवाताची समस्या असेल, तर मात्र अशा व्यक्तीने आंब्याचे सेवन करणे शक्यतो टाळावे. कारण, यामुळे त्यांची संधिवाताचे समस्या अधिक वाढू शकते.
  • बरेच वेळा काही जण बाजारातून आंबे आणल्यावर ते स्वच्छ मीठाच्या पाण्यात न धुता, त्याचे तसेच सेवन करत असतात. परंतु, यामुळे त्यांच्या पोटामध्ये केमिकल जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून बाजारात आंबे आणल्यावर स्वच्छ व पाण्यात मीठ टाकून धुऊन त्यांचे सेवन करणे आवश्यक ठरते.
  • आंबे हे नैसर्गिक रित्या पिकवलेले पाहिजेत. परंतु, आज काल आपला फायदा व्हावा, यासाठी आंब्यांना नैसर्गिक रित्या न पिकवता त्यावर केमिकल युक्त मारा केला जातो. अति केमिकल चा मारा केल्यामुळे आणि त्या आंब्याचे सेवन आपण केल्यामुळे आपल्या शरीराला, आरोग्याला ते हानीकारक ठरू शकते.
वाचा  चारकोल पावडर चा वापर चेहऱ्यावर करण्याचे फायदे

मित्रांनो, आंबा खाण्याचे फायदे आपल्या आरोग्यासाठी तर चांगलेच असते. परंतु, त्याचे अतिप्रमाणात सेवन करणे व आंबे घरी आणल्यावर ते न धुता तसेच खाणे यामुळे, आपल्या शरीराचे आरोग्य बिघडू शकते. कुठलीही गोष्ट खाताना आपण ती मर्यादितच सेवन केली पाहिजे. अतिप्रमाणात जर सेवन केली तर त्यामुळे,त्याचे आपल्याला शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली आंबा खाण्याचे फायदे व तोटे याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here