पोटात पाणी होण्याची कारणे आणि उपाय

0
2962
पोटात पाणी होण्याची कारणे आणि उपाय
पोटात पाणी होण्याची कारणे आणि उपाय

 नमस्कार मित्रांनो. प्रत्येक जणांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आपली तब्येत सांभाळणे खूप महत्त्वाचे असते, कारण आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण कुठले काम हे चांगल्या पद्धतीने करू शकतो. आरोग्य चांगले तर आपण आनंदी देखील राहू शकतो. परंतु, शरीराचे अवयव असे असतात की जिथे कुठे ना कुठे कोणता तरी विकार हा जडत असतो. आणि बर्‍याच लोकांना पोट याविषयी जास्तीचा त्रास होत असतो. जसे कि पोटात पाणी होणे.आपले आरोग्य नियमित चांगले ठेवण्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे आपण नियमित व्यायामाचा सराव केला पाहिजे.

सकाळी लवकर उठून घराबाहेर पडून शुद्ध हवेमध्ये वॉकिंग केली पाहिजे. असे जर आपण नियमित केले तर आपल्या आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे दिवस देखील फ्रेश आणि ताजे तवाणा जातो. तसेच आपण आपली जीवन शैली देखील योग्य पद्धतीने ठेवायला हवी. शरीराच्या प्रत्येक अवयवांची योग्य रीतीने काळजी घेतले तसेच आपण आपले काम देखील हसत-खेळत केली पाहिजेत. आपली चुकीची जीवनशैली असली की आपले आरोग्य बिघडत असते. तसेच, आपण आपल्या आहारामध्ये योग्य त्या पोषक घटकांचा, तत्त्वांचा समावेश करायला हवा. जेवणाच्या वेळा व्यवस्थित नीटपणे पाळायला हव्यात. त्याचप्रमाणे, जेवण झाल्यावर शतपावली करणे योग्य ठरते. नाहीतर तर बरेच लोक असे असतात की, जेवण झाल्यावर लगेच झोपून जातात नाहीतर तसेच तासन्तास टीव्ही बघत बसून राहतात. नाहीतर सारखा मोबाईल तरी बघत बसतात. त्यामुळे पोटा बाबत अनेक समस्या उद्भवत असतात.

अन्नपचन याचा त्रास होणे वगैरे-वगैरे. म्हणजेच पोटाचे विकार उद्भवत असतात आणि पोटाचे विकार होण्यास अनेक कारणे असतात जसे की, चुकीची जीवन शैली, जेवण झाल्यावर चुकीच्या पद्धती अवलंबणे म्हणजेच तसेच झोपून राहणे, व्यायाम चा न सराव करणे, एकाच ठिकाणी बैठे काम करणे असे एक ना अनेक कारणे यास कारणीभूत ठरतात. पोट बाबत म्हटले तर एक ना अनेक विकार असतात. जसे की, पोट दुखी, पोटात गाठ होणे, अन्नपचनाची समस्या तसेच एक समस्या म्हणजे पोटात पाणी होणे. तर ही समस्या म्हणजे नेमकी कोणती त्याचे काय लक्षणे असू शकतात त्याचप्रमाणे यावर कोणते घरगुती उपाय करता येतील याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

पोटात पाणी कशामुळे होते व का होते ?

चुकीची जीवनशैली, आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, कुठलाही विकार झाला तर लवकर लक्ष न देणे डॉक्टरांना लवकर न दाखवणे यामुळे अजून जास्तीचे विकार होऊ शकतात. तसेच पोटाच्या समस्या या लवकर लक्ष न दिल्यामुळे अजून जास्तीच्या वाढत असतात. पोटात पाणी होणे ही समस्या कशामुळे होते आणि काय होते याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

वाचा  पोट साफ न होणे या समस्याची लक्षणे व घरगुती उपाय

मित्रांनो, पोटात पाणी होणे म्हणजेच या विकारांमध्ये पोटामध्ये पाणी जमा होत असते. त्यामुळे हा विकार खूप त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष न करता ती वेळीच डॉक्टरांकडे दाखवावे कारण हा त्रास बऱ्याच जणांना उद्भवत असतो आणि वेळीच लक्ष न दिल्यामुळे या समस्यांमुळे मृत्यू देखील होत असतो. 

 • आपल्या शरीरामधील फुप्फुसे, यकृत स्वादुपिंड यांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास पोटात पाणी होण्याची समस्या उद्भवू शकते. 
 • त्याचप्रमाणे हृदय, पचन संस्था या मध्येदेखील म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास हि समस्या होत असते. 
 • तसेच शरीरामधील ब्लड सर्क्युलेशन मध्ये देखील अडथळा निर्माण झाल्यामुळे पाणी जमा होऊ शकते. 
 • त्याचप्रमाणे शरीरामधील रक्तवाहिन्यांमध्ये कुठला तरी आजार असल्यामुळे देखील पोटामध्ये पाणी होऊ शकते.
 •  तसेच ज्यांना क्षय, कॅन्सर असा आजार असेल त्यांच्या पोटामध्ये देखील पाणी जमण्याची शक्यता असते.

मित्रांनो, वरील प्रमाणे सर्व कारणांमुळे पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते आणि हा विकार खूप त्रासदायक आणि गंभीर स्वरूपाचा देखील होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना त्वरित दाखवल्यामुळे यावर योग्य उपचार करता येऊ शकतो.

पोटात पाणी भरण्याची नेमकी लक्षणे कोणती असू शकतात ?

 मित्रांनो, पोटात पाणी भरणे ही समस्या खूप त्रासदायक व वेदनादायी असते. वरील प्रमाणे आपण पोटात पाणी भरण्याची कारणे कोणती त्याविषयी जाणून घेतलेले आहे. तर या समस्येची नेमकी लक्षणे कोणते असू शकतात हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 • पाणी भरल्यामुळे नेहमीच्या पोटाच्या आकारा ऐवजी म्हणजेच पहिल्या पोटाच्या आकारमानाच्या तुलने पेक्षा पोटाचा आकार हा खूप मोठा वाटत असतो. 
 • पोटात पाणी जमल्यामुळे थोडी जरी चालले तरी दमल्यासारखे होत असते. पोटात पाणी भरल्यामुळे श्वास घेताना देखील त्रास होण्याची समस्या होत असते. 
 • पाणी झाल्यामुळे शांत झोप देखील लागत नाही. त्यामुळे एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर  तसेच दुसऱ्या  कुशीवरून पहिल्या कुशीकडे असे सतत चालत राहते. 
 • या समस्येमुळे मन नेहमी अस्वस्थ वाटण्यासारखे होते. पोटात पाणी जमल्यामुळे पोट साफ न राहण्याची समस्यादेखील उत्पन्न होत असते. 
 • पोटात पाणी जमा झाल्यामुळे थोड्या प्रमाणात देखील हालचाल करताना त्रास होतो म्हणजे चालू शकत नाही,वाकू शकत नाही इत्यादी प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. 
 • पाणी जमा झाल्यामुळे पोटातून पाणी हलण्याचा आवाज देखील बहुधा ऐकायला येतो असतो. 
 • पोटात पाणी जमा झाल्यामुळे पोटाला नेहमी सूज राहते.
 • या समस्येमुळे हृदयाचे ठोके खूप पटापट होताना जाणवून येतात.
 • तसेच, पोटात पाणी जमा झाल्यामुळे नेहमी पोटामध्ये दुखायला होते.
वाचा  घरात कॅलेंडर असण्याचे फायदे

 मित्रांनो, पोटात पाणी जमा झाल्यामुळे वरील प्रकारच्या सर्व समस्या या उद्भवत असतात. आणि या समस्या देखील खूप वेदनादायी असतात.  ही समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवणे खूप गरजेचे ठरते त्यामुळे डॉक्टरांकडून योग्य तो वेळीच उपचार होऊ शकतो. त्याचप्रमाणे पोटात पाणी जमा होणे या समस्या बद्दल काही घरगुती उपाय देखील करता येतील. त्या नेमक्या कोणत्या या विषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

पोटात पाणी जमा झाल्यास कशा प्रकारे काळजी घेता येईल ?

       मित्रांनो, पोटात पाणी जमा होणे या समस्येबद्दल खूप काळजी घेणे आवश्यक आहे. पोटामध्ये पाणी जमा झाल्यास आहारामध्ये योग्य त्या पोषक तत्वांचा घटकांचा समावेश जरूर करायला हवा. तसेच, कुठलेही काम करण्याआधी ते विचार करूनच करायला हवेत, जेणेकरून पोटाला त्रास होणार नाही. पोटामध्ये पाणी जमा झाल्यास कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात. 

 1. रोज सकाळी लवकर उठून बाहेरील फ्रेश म्हणजे ताज्या, शुद्ध हवेमध्ये वॉकिंग केली पाहिजे. तसेच अशावेळी शरीराला थंड हवे पासून संरक्षण करणे आवश्यक ठरते त्यासाठी गरम कपडे घातले पाहिजे. 
 2. पोटात पाणी जमा झाल्यास मुत्राशयावर ताण पडू देऊ नये. 
 3. त्याचप्रमाणे जेवण करताना एकदम पोट भरून जेवण करू नये यामुळे त्रास होऊ शकतो. 
 4. यासाठी तुम्ही थोडा थोडा करून जेवण करू शकतात. 
 5. तसेच पोट साफ होत नसेल तर एनिमिया करून घ्यायला हवा जेणेकरून पोट साफ होण्यास मदत होऊ शकते. 
 6. नेहमी थंड पाण्याने अंघोळ न करता गरम पाण्याचा अंघोळ करणे देखील आवश्यक ठरते.

 मित्रांनो, वरील प्रमाणे पोटात पाणी जमा झाल्यावर सर्व प्रकारचे काळजी घेणे खूप आवश्‍यक ठरत असते. त्याचप्रमाणे पोटात पाणी झाल्यावर कोणत्या प्रकारची घरगुती उपाय करता येतील याविषयी देखील आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

पोटात पाणी जमा झाल्यास कोणत्या प्रकारचे घरगुती उपाय करता येऊ शकतात ?

मित्रांनो, पोटात पाणी जमा झाल्यास कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतले आहे तसेच या समस्येवर  कोणत्या प्रकारचे घरगुती उपाय करता येतील याविषयी देखील आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया. जर तुमच्या देखील पोटात पाणी जमा होण्याची लक्षणे दिसून येत असेल तर खालील उपाय तुम्ही करून बघू शकतात.

 • पाणी जमा झाल्यास कच्चा कांदा हा सारखा सारखा चाऊन खावा. कारण कच्चा कांदा खाल्ल्यामुळे मूत्राशय साप राहण्यास मदत होत असते. त्यामुळे एक आयुर्वेदिक औषध यासाठी ठरू शकते.
 • त्याचप्रमाणे कारल्याचा रस देखील पोटात पाणी जमा झाल्यास गुणकारी ठरू शकतो. त्यासाठी तुम्ही कारल्याचा रस पन्नास ग्रॅम इतके करून घ्यावे आणि ज्याला हि  समस्या उद्भवत असेल त्याला हा कारल्याचा रस तुम्ही देऊ शकतात. आणि कारल्याचा रस हा तुम्ही रोज प्यायला देऊ शकतात त्यामुळे पाणी जमा होण्याचा त्रासास हा उपाय लाभदायक ठरू शकतो. 
 • तसेच, तुम्ही कारल्याचा रस मध्ये थोड मध मिक्स करून ज्या व्यक्तीला हि समस्या झाली असेल, त्या व्यक्तीला रोज घेण्यास द्यावे. त्यामुळे हा विकार नष्ट होऊ शकतो.
वाचा  चेहऱ्याला हळद लावण्याचे उपाय व फायदे

मित्रांनो, वरील प्रकारे या समस्येवर उपाय तुम्ही करून बघू शकतात. आणि जर हा विकार जास्त प्रमाणात होत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार करून घ्यावा.

पोटात पाणी जमा झाल्यास काय करणे टाळावे ?

मित्रानो पोटामध्ये पाणी जमा होण्याची समस्या उद्भवल्यास योग्य त्या प्रकारे काळजी घ्यायला हवी तसेच कुठल्या गोष्टी करू नये याबद्दल ते आपल्याला माहिती करून घेणे आवश्यक आहे. तर पोटात पाणी जमाना झाल्यास कोणत्या गोष्टी करू नये हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 • या समस्येमुळे कुठल्याही प्रकारचे योगासन किंवा योग क्रिया व्यायाम करू नये त्यामुळे त्रास होण्याची समस्या उद्भवू शकते.
 • पोटामध्ये पाणी जमा झाले असेल तर चुकूनही पोटावर झोपण्याचा प्रयत्न करु नका किंवा पोटावर झोपू नका यामुळे जास्त त्रास होऊ शकतो.
 • पोटात पाणी जमा झाला असेल तर मूत्राशयावर अधिक जोर देणे चुकीचे ठरू शकते त्याचप्रमाणे पोट साफ न होणे यामुळे देखील अजून समस्या वाढू शकते.
 •  ही समस्या जास्त त्रासदायक वैज्ञानिक होत असेल तर घरच्या घरी डॉक्टर बनू नका, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे जाऊन संपर्क साधावा व योग्य तो उपचार करून घ्यावा.

मित्रांनो, पोटामध्ये पाणी जमा झाल्यास वरील प्रमाणे गोष्टी तुम्ही चुकूनही करू नका, नाही तर यामुळे समस्या अजून जास्त जास्त वाढू शकते त्यामुळे वेळीच लक्ष देणे आवश्यक ठरते. त्याचप्रमाणे डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार आवश्यक करून घेणे गरजेचे ठरते. मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

   

 धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here