तुळशीची पाने खाण्याचे फायदे

0
765
तुळशीची पाने खाण्याचे फायदे
तुळशीची पाने खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो आज आपण जणू घेणार आहोत तुळशीची पाने खाण्याचे फायदे. तुळशी वृंदावन हे प्रत्येकाच्या दारात असते. तुळशी ही देवाचा एक स्वरूप आहे. ज्या घरात तुळशी, त्या घरात आरोग्य व शांतता वैभव ची प्राप्ती होते. तुळशी ची पूजा करणे म्हणजे सौभाग्यप्राप्ती कारक आहे. म्हणूनच दिवाळीनंतर तुळशी विवाहाला फार मान्यता आहे. कारण तुळशी विवाह झाल्यानंतर, उपवर वधूंचे विवाह केले जातात. तुळशी कोणत्याही पूजा मध्ये वापरली जाणारी वनस्पती आहे. तसेच पंचामृत मध्ये तुळशीच्या मानच वेगळा ! तसेच सत्यनारायणाच्या पूजेमध्ये तुळशी शिवाय  पूर्णता येतच नाही.

विष्णूची ची पत्नी म्हणून तुळशीला आपण पूजा करतो. तसेच तसेच तुळशी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. अगदी पूर्वीच्या काळापासून तुळशीचा वापर आयुर्वेदिक वनस्पतींसाठी केला जात आहे. तुळशीच्या वापराने आपल्या शारीरिक समस्येवर आराम मिळतो. तुळशी आपल्यास शारीरिक व्याधींवर उपचार करते. कारण तुळशीमध्ये अँटिबायोटिक्स आणि ऑंटी फंगलइन्फेक्शन,अँटी व्हायरल इन्फेक्शनल गुणधर्म असतात. म्हणूनच तुळशी चा वापर केल्याने आपल्या शरीरासाठी खूप फायदे होतात. तर मित्रांनो तुळशीची पाने खाण्याचे फायदे, आपल्या शरीराला नेमके कोणते होतात ? हे अनेक जणांना माहिती नसते. चला तर मग जाणून घेऊयात, की तुळशी पासून आपल्या शरीराला होणारे फायदे नेमके कोणकोणते ? 

तुळशी पासून आपल्या शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो, तुळशी पासून आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोणकोणते ? चला तर जाणून घेऊयात. 

सर्दी पडसे वर आरामदायी असते :

बदलत्या वातावरणा मुळे, तसेच पाणी बदलामुळे, आपल्याला सर्दी पडसे होते. अशा वेळी काही जणांची सर्दी फार त्रासदायक असते. तर काही जणांची सर्दी की पिकत नाही. अक्षरशः नाक जाम असल्यासारखे वाटते. श्वास घ्यायला त्रास होतो. जर तुम्ही तुळशीच्या पानांचा काढा केला, तर तुमची सर्दी पिकून लवकर बाहेर निघण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्हाला तुळशीचे 15 ते 20 पाने घ्यायचे आहे, त्यामध्ये काळेमिरे टाकायचे आहे, अद्रकचा रस टाकायचा आहे, आणि हे पाणी चांगले खळखळून उकळून, ते पाणी तुम्हाला दिवसातून तीन वेळेस प्यायचे आहेत. त्यामुळे सर्दी लवकर वितळण्यास मदत मिळते. शिवाय सर्दीचा त्रास होत नाही. 

वाचा  जवस भिजवून खाण्याचे फायदे कोणते ?

तुमची रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत मिळते :

जर तुम्ही तुमच्या आहारात तुळशीचे पाने रोज खाल्ली, तर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळते. हो मित्रांनो तुळशीचे पान आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन लवकर होते, तसेच तुम्ही सतत आजारी पडतात, त्याला कारणीभूत म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होय. यासाठी नियमित तुम्ही पाच ते सहा पाने खायला हवीत. तसेच जर तुम्ही तुळशीच्या पानांचा एक चमचा रस, कोमट पाण्याबरोबर घेतला, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत मिळते. 

तुमचे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते :

जर तुमच्या चेहऱ्यावर पुटकुळ्या, मुरुमांचे डाग, काळे डाग, त्वचा काळवंडली असेल, अशा वेळी जर तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला तुळशीचे पंधरा ते वीस पाने वाटून, त्यामध्ये चिमूटभर हळद, व दही याचे मिश्रण, एकजीव करून चेहर्‍याला 15 ते 20 मिनिटे लावावेत. त्यामुळे तुमच्या चेहरा निखारण्यास मदत होते. शिवाय त्वचा मुलायम होते. तसेच तुम्ही तुळशीचा बर्फ तयार करू शकतात. आता तो कसा तयार करायचा? तर तुम्हाला तुळशीचे पाने मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. नंतर आइस ट्रे मध्ये ते पाणी तुम्हाला टाकायचे आहे. नंतर बर्फ झाल्यावर, तुम्ही नियमित चेहऱ्यावर ते फिरवल्यास,  चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. 

चामखीळ जाण्यास मदत मिळते :

हल्ली शरीरातील बदलामुळे, हार्मोन्स बदलामुळे, अंगावर चामखीळ येण्याच्या समस्या खूप जणांना होतात. तसेच घामामुळे ही काही जणांना चामखीळ येतात. सहसा करून महिलांच्या मानेवर चामखीळ येण्याचे प्रमाण दिसून येते. गळ्यातील माळेचे इन्फेक्शनमुळे चामखीळ येतात. जर त्यांनी तुळशीच्या पानांचा रस काढून, चामखीळ च्या जागेवर तो लेप 15 ते 20 मिनिटे लावून ठेवल्यास तुमची चामखीळ काही दिवसात जाण्यास मदत मिळते. 

शारीरिक ताण- तणाव नाहीसा होतो :

हल्ली बदलत्या वातावरणामुळे, आपल्याला खूप थकवा येतो. तसेच काहीजणांना टेन्शन असते, ताण- तणाव येतो, चिंता असते, मन अगदी उदास होऊन जाते, पण त्यामधून निघण्यासाठी जर तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर केला, तर अगदी तुम्हाला फायदा मिळेल. कारण तुळशीचे पान हे मन शांत चित्त ठेवण्यास मदत करतात. तुळशीचे पाने आपले मन निरोगी होते. कारण तुळशीचे पान हे आपल्या मज्जासंस्थेला आराम देण्याचे काम करतात. त्यासाठी नियमित तुळशीच्या पानांचा काढा तुम्ही नियमित घेतला, तर तुम्हाला फायदा होईल. तसेच तुम्ही दैनंदिन आहारामध्ये, चहामध्ये किंवा दुधामध्ये तुळशीचे पाने उकळून, ते पिल्यास तुम्हाला फायदा होईल. 

वाचा  स्वप्नात गाजर दिसणे शुभ की अशुभ

मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात :

खूप स्त्रियांना मासिक पाळीच्या तक्रारी होतात. तसेच मासिक पाळी अनियमित येते. तर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये रोज तुळशीच्या बियांचा वापर केला, तर त्यांना फायदेशीर ठरेल, त्यासाठी त्यांनी रोज नियमित एक चमचा तुळशीच्या बियांचे सेवन करायला हवे. त्यामुळे पाळी वेळेवर येण्यास मदत मिळते. शिवाय पाळी मध्ये होणारा त्रास कमी होतो. 

कॅन्सर चा धोका टळतो :

मित्रांनो, तुळशीच्या पानांचा वापर म्हणजे आपल्या आरोग्यासाठी खूप सारे गुणधर्म होईल. तुळशीच्या पानांमध्ये अँटीसबॅक्टरियल, अंटी व्हायरल इन्फेक्शन वर मात करण्याची गुणधर्म असतात. तसेच तुळशीच्या पानांमध्ये ऑंटी इन्फ्लामेट्री गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय आपल्या शरीरातील कॅन्सरच्या पेशीशी लढण्याची ताकद, तुळशीच्या पानांमध्ये असते. तुळशीचे पान आपल्या शरीराचे संरक्षण करतात. जर तुम्ही तुमच्या आहारात नियमित पाच पाने तुळशीचे खाल्ले, तर तुमच्या शरीरापासून अनेक आजार दूर राहतात. 

डोकेदुखीचा त्रास कमी होतो :

काही जणांना डोकेदुखीचा त्रास होत राहतो. अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारात तुळशीच्या पानांचा वापर करायला हवा. त्यासाठी त्यांनी तुळशीचे पान चहात, दुधामध्ये खळखळून ते दूध कोमट झाल्यावर प्यावे. त्यामुळे डोकेदुखी वर आराम मिळतो. 

चर्मरोग नाहीसे होतात :

काहीजणांना त्यांची स्किन मध्ये आलर्जी ची समस्या असते. काही वेळेस त्यांना स्कीन वर कोरडेपणा जाणवणे, कातडी निघणे, तसेच तिथे जखम होणे, खाज येणे, लालसर होणे, यासारख्या समस्या असतात. तसेच शरीराची आग होणे, यासारख्या समस्या असतात. अशा वेळेस तुम्ही नियमित आठ ते दहा तुळशीचे पाने उकळून ते पाणी नियमित पिल्यास तुमच्या शरीरावरील चर्मरोग हा नाहीसा होतो, व ते सुदृढ व निरोगी राहण्यास मदत मिळते. 

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला, तुळशीची पाने खाण्याचे फायदे शरीराला, कोणकोणत्या प्रकारे होतात ते सांगितलेले आहेत. तसेच तुळशीचे पान वापरून, तुम्ही निरोगी राहण्यास मदत मिळते. आम्ही सांगितलेली माहिती, जर तुम्हाला आवडली असेल, तर या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

वाचा  चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे

 

  धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here