गाजर खाण्याचे फायदे

0
884
गाजर खाण्याचे फायदे
गाजर खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो गाजर हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. ससा चा आवडता खाऊ तर गाजरचा आहे. गाजर हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. गाजर म्हटले, की आपल्या चेहऱ्या समोर पहिले गाजरचा हलवा येतो. गाजरचा हलवा हा सगळ्यांनाच आवडतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सगळ्यांनाच गाजर आवडते. लहानपणी मी तर नुसते, कच्चे गाजर हातात धरून पूर्ण फिरायची, आणि खेळता-खेळता गाजर खायची. त्यावेळी मला आई बोलायची, की शांत बसून खा. ठसका लागेल, खोकला येईल, हो गाजरे लहान मुलांच्या आवडता खाऊ आहे. चला तर मग जाणून घेऊयात गाजर खाण्याचे फायदे. 

तसेच गाजर मध्ये आपल्या शरीरासाठी लागणारे आवश्यक ते घटक आहेत. हिवाळ्याच्या दिवसात गाजर हे आपल्याला मार्केटमध्ये कुठेही दिसतात. हिवाळ्यात गाजर ला फार मागणी असते. गाजर मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर्स, ऑंटीएक्सीडेंट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयरन, प्रथिने, प्रोटीन्स, एवढे मोठे घटक द्रव्य आपल्याला एका गाजर मधून मिळतात, खरंच गाजर आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. तसेच प्रत्येकाची आवड ही गाजर खाण्याचे वेगवेगळी असते, कोणाला गाजरचा हलवा आवडतो, तर कोणाला गाजराचे सलाड आवडतो, तर कोणाला गाजराची भाजी आवडते, तर कोणाला गाजराचा कीस आवडतो, पण तुम्ही गाजर कोणत्याही प्रकारे खा, पण त्याचे गुणधर्म हे तुमच्या शरीराला मिळतातच. चला तर मग गाजर पासून आपल्या शरीराला कशा प्रकारे व कोणते फायदे होतात? ते जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊयात! 

गाजरचे व गाजरच्या ज्यूस चे फायदे? 

गाजर व गाजरच्या ज्यूस पासून, आपल्या शरीराला खूप फायदे होतात. मग तर ते नेमके कोणते? चला तर मग जाणून घेऊयात!

वाचा  मन शांत ठेवण्यासाठी काय करावे या समस्येवर वेगवेगळे उपाय :-

डोळ्यांसाठी लाभकारी आहे

 गाजर खाल्ल्याने ते तुमच्या डोळ्यांसाठी लाभकारी आहे. जर तुम्ही रोजच्या रोज तुमच्या आहारात गाजर चा समावेश केला. तर तुमच्या शरीराला आवश्यक ते विटामिन्स गाजर मधून मिळतात. शिवाय गाजरामध्ये व्हिटॅमिन ए हे गुणधर्म असल्यामुळे, डोळ्यांसाठी ते फार फायदेशीर असते. तसेच जर रोजच्या रोज तुम्ही गाजरचा ज्यूस अर्धा कप जरी पिला, तरी तुमच्या डोळ्याचे आरोग्य सुधारते, शिवाय दृष्टी तेज होते. 

कॅन्सरचा धोका टळतो

हो, गाजरचा रस जर तुम्ही नियमित घेतला, तर कॅन्सरचा धोका हा तुमच्या पासून टळतो, तसेच ज्यांना कॅन्सर आहे. त्यांनीही गाजरचा ज्यूस पिला तर तो लवकर आटोक्यात येतो. खरंच तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की एवढ्याशा गाजर मध्ये तुम्हाला एवढा फायदा होऊ शकतो. कारण गाजर मधील, बीटा कॅरोटीन व  कॅरोटेनोईड या गुणधर्मामुळे, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व ही शक्ती वाढल्यामुळे, कॅन्सरच्या पेशी जागृत पासून ते रोखतात. तसेच काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही नियमित गाजराचा रस पिला, तर तुम्हाला शरीरात उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारचा कॅन्सर हा तुम्ही रोखू शकतात. 

तुमचे वजन कमी होते

हल्ली बदलत्या वातावरणामुळे, तसेच बदलत्या जीवनशैलीत अवेळी खानपान, किंवा मैद्याचे प्रोडक्ट, जास्त खाल्यामुळे, अनेक जणांना वजन वाढीचे समस्या होतात. अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या वजन कमीसाठी गाजर चा उपयोग केला, तर त्यांना खूप फायदा होईल. खरंच गाजर खाल्ल्याने, तुमचे वजन कमी होऊ शकते. कारण गाजर मध्ये 80 ते 85 टक्के पाणी असते, व त्यामध्ये पंचवीस ते तीस टक्के कॅलरीज असते. त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. तसेच गाजरामध्ये फायबर असतात. जर तुम्ही गाजर खात राहिले, तर तुम्हाला पोट भरल्यासारखे जाणवते, व भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यासाठी ते फायदेशीर ठरते. 

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते

गाजर खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारण गाजर मध्ये आपल्या शरीरासाठी लागणारे आवश्यक घटक असतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत मिळते. तसेच गाजर मध्ये विटामिन ए असल्यामुळे, ते अनेक रोगांची लढायला तुम्हाला मदत करते, व तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते. 

वाचा  योगा करण्याचे फायदे

महिलांसाठी पीसीओडी व पीसीओएस वर फायदेशीर ठरते

बऱ्याच महिलांना पीसीओडी व पीसीओएस सारख्या समस्या असतात, त्यामुळे त्यांचे वजन वाढते. अशा वेळी त्यांना हिरव्या पालेभाज्या, तसेच विटामिन ए,बी,सी,डी युक्त भाज्या त्यांना खायला लावतात. तसेच त्यांना ते फळे खायला लावतात. तसेच त्यांच्या आहारात सलाड खायला लावतात. मग सलाड मध्ये त्यांनी गाजराचे काप करून नुसते, खाल्ले तरी चालतात. अश्या वेळी जर त्यांनी गाजरचा वापर आहारात वापर केला, तर यासारख्या समस्या त्यांच्यापासून दूर राहतात. कारण पीसीओडी सारख्या समस्यांना कंदमुळे आवर्जून खाल्ले जातात, त्यावेळी त्यांनी जर गाजर खाल्ले, तर त्याने त्यांना भरपूर फायदा मिळेल. शिवाय त्यांची पोट भरल्यासारखे वाटते, व त्यांची वजन वाढीचे समस्याही दूर होतात. 

दात मजबूत होतात

हो, गाजर खाल्ल्याने दात मजबूत होतात. तसेच गाजर खाल्ल्याने त्यामधील विटामिन्स दातांना व हिरड्यांना मिळतात. त्यामुळे हिरड्यांचे दुखणे असो, की दातांचे दुखणे असो, कच्चे गाजर चावून खाल्ल्यामुळे दातांना मजबूती येते. शिवाय तोंडातून घाण वास येणे, तोंडाची बेचव होणे, यासारख्या समस्येवर जर गाजर खाल्ले, शिवाय तोंडाचा मुखदुर्गंधी ही जाते. 

हृदयाचे आरोग्य राखते

हो, गाजर खाल्ल्याने तुमचे हृदयाचे आरोग्य राखले जाते. कारण गाजर मध्ये कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी होण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे जर तुम्ही गाजर खाल्ले, तर तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, शिवाय गाजर खाल्ल्याने तुम्हाला अंटीएक्सीडेंट चा पुरवठा, तुमच्या शरीराला होतो, व तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच तुमचे हृदयाचे आरोग्य हे सुरळीत राहते. 

गाजरचा हलवा खाण्याचे फायदे

गाजरचा हलवा हा अगदी लहान मुलांपासून, तर म्हाताऱ्या वयस्कर लोकांना आवडतो. जर तुम्ही गाजरचा हलवा नियमित खाल्ला, तर अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात. शिवाय गाजर चा हलवा करताना गावठी तुपाचा वापर होतो, तूप हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकले जातात, ड्रायफूट खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक ते विटामिन्स व गुणधर्म मिळतात. त्यामुळे आपल्या शरीरातील झीज भरून काढण्याचे काम ड्रायफ्रूट्स करतात, आणि गाजरामध्ये विटामीन ए असल्यामुळे, तुमच्या डोळ्यांची आरोग्य सुधारते. त्यामुळे गाजरचा हलवा मधील सगळे घटक द्रव्य आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे, हे आपल्याला आता माहितच झाले असेल, त्यामुळे तुमच्या आहारात नियमित गाजरचा हलवा खा, व निरोगी रहा. 

जाणून घ्या : लाल केळी  खाण्याचे फायदे 

तसेच गाजर पासून अजून काही फायदे होतात ते जाणून घेऊयात. 

गाजर पासुन अजून काही फायदे होतात, मग ते नेमके कोणते चला जाणून घेऊयात. 

  • गाजर नियमीत खाल्ल्याने, तुमचे आरोग्य सुधारते. 
  • तसेच गाजराचा रस पिल्याने, तुमची शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढते. 
  • गाजर खाल्ल्याने तारूण्य येते, 
  • गाजराचा कीस चेहऱ्यावर लावल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्याची मदत मिळते. 
  • तसेच गर्भवती महिलांनी गाजर खाल्ले, तर त्यांना त्यामधील पोषक द्रव्ये मिळतात. शिवाय बाळालाही मिळतात. 
  • तसेच गाजर नियमित खाल्ल्यास, तुमचे हाड मजबूत होतात. कारण गाजरामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. 
  • तसेच गाजराचा रस केसांना लावल्याने केसांना मजबूती येते. 
  • तुम्ही रोजच्या रोज गाजरचा ज्यूस, तसेच सलाड, तसेच हलवा, किंवा गाजर ची भाजी, या प्रकारचे प्रकार करून तुम्ही खाऊ शकतात. या सगळ्यांमुळे तुम्हाला फायदे होतात. 
वाचा  चिंच खाण्याचे फायदे व तोटे

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला गाजरापासून तुमच्या शरीराला किती फायदे होतात. हे सांगितले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला सांगू शकतात. तसेच तुमच्या आहारात नियमित गाजर खा व निरोगी रहा. 

धन्यवाद !!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here