नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत खारीक खाण्याचे फायदे खारी सगळ्यांना माहिती आहे, चवीला गोड असणारे खारीक ड्रायफ्रूट्स मध्ये असते. खारीक ची तीन रूप असतात. ते आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. अगोदर ओली खारीक असते,त्या नंतर, तिचे खजूर बनते त्यानंतर त्याचे रूपांतर खारीक मध्ये होते. खारीक प्रत्येकाच्या घरात घरात असणारा खाद्यपदार्थ आहे. तसेच खारीक चा शिरा, हलवा, तसेच ड्रायफ्रुट्स, लाडू, बर्फी, चिक्की मध्ये अशा निरनिराळ्या प्रकारांमध्ये खारीचा वापर होतो. खारीक आरोग्यदायी आहे. खारीक मध्ये आपल्या शरीराला लागणारे गुणधर्म आहेत. ते म्हणजे कार्बोहायड्रेट, फायबर, साखर, प्रोटीन, लोह, झिंक, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे घटक खारीक मध्ये आहेत. त्यामुळे खारीक खाल्ल्यावर आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्याचे काम होते. खारीकची दोन रंग असतात. एक लाल खारीक, एक काळी खारीक, या दोन्ही खारका आपल्या शरीरासाठी फलदायी आहेत. तर आज आपण खारीक खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? ते जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.
खारीक खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात?
मित्रांनो, खारीक खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोणकोणते? चला तर मग जाणून घेऊया.
हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर ठरतात
हो, हाडांच्या बळकटीसाठी जर तुम्ही खारीक खाल्ले, तर तुम्हाला फायदा होईल. कारण खारीक मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस यासारखे गुणधर्म असल्यामुळे, आपल्या हाडांना मजबूत बनवतात. शिवाय आपले हाड तंदुरुस्त राहतात. तसेच शरीरात उर्जा मिळते. त्यामुळे आपल्या हाडांना बळकटी येते. त्यासाठी जर तुम्ही रोज दोन खारीक जरी खाल्ले, तरी तुमच्या शरीरासाठी फायदे होतील.
ॲनिमियाचा त्रास होत नाही
खारीक तसेच ओले खजूर नियमित खाल्ल्याने, ॲनिमियाचा त्रास होत नाही. खासकरून स्त्रियांना ॲनिमियाचा त्रास भरपूर जास्त प्रमाणात बघायला मिळतो. कारण मासिक पाळी दरम्यान, त्यांच्या अंगातील रक्तस्राव जास्त प्रमाणात गेल्या मुळे, त्यांना अशक्तपणा, थकवा सारखे जाणवते. कमजोरी जाणवते. अशावेळी जर त्यांनी नियमित त्यांच्या आहारात रोज चार ते पाच खारीक खाल्ले, तर त्यांना या त्रासापासून आराम मिळतो. कारण खारीक मध्ये लोह, झिंक, मॅग्नेशियम, फायबरचे, प्रमाण असते त्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर ती वाढण्यास मदत मिळते. म्हणून खारीक खाल्ल्याने हा त्रास होत नाही.
बाळंतीन साठी फायदेशीर ठरते
खारीक बाळांतीन साठी फायदेशीर ठरते. कारण प्रसूतीच्या दरम्यान खूप शारीरिक त्रास होतो. अशा वेळी तिच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी, तसेच अंगावरून गेल्यावर रक्तस्रावाची कमतरता पूर्ण करण्यासाठी, खारीक फायदेशीर ठरते. खारीक मध्ये लोहाचे प्रमाण असते. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण होते. तसेच त्यामध्ये पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस यासारखे गुणधर्म असल्यामुळे, तिच्या शरीरात एक ऊर्जा येते. त्यामुळे तिचे शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. शिवाय खारीक खाल्ल्याने तिचे दूध हे बाळासाठी आरोग्यदायी असते व बाळाच्या शरीरातही त्याचे गुणधर्म मिळतात. त्यामुळे बाळांतीन साठी आवर्जून खारीकचा शिरा, हलवा, खारीक चे लाडू, बर्फी यासारखे पदार्थ बनवून तिला खाऊ घालतात. त्यामुळे तिला पोषक आहार त्या लाडू मधून, तसेच इतर पदार्थांमधून मिळतात. व प्रसूतीनंतरच्या वेदनांनी ती गहाळ, कमजोर झालेली असते. त्यामुळे त्याची कमजोरी दूर होते व ती सशक्त बनते.
तुमच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर करते
काहीजणांची मासिक पाळीही अनियमित असते. वेळेवर येत नाही. तसेच आल्यास अंगावरून रक्तस्राव हा पुरेसा होत नाही. त्यामुळे कंबर, पोट यासारखे वेदनांना तुम्हाला तोंड द्यावे लागते. अशा वेळी जर तुम्ही नियमित रोज चार ते पाच खारीक खाल्ल्यास, तर तुम्हाला यासारख्या समस्येवर आराम मिळतो. शिवाय तुमची मासिक पाळी रेगुलर येण्यासाठी मदत मिळते. तसेच मासिक पाळी दरम्यान अंगावरून रक्तस्राव होत नसेल, तर तोही सुलभरीत्या जाण्यास मदत होते.
पुरुषांसाठी फायदेशीर राहते
जर पुरुषांनी खारीक नियमित खाल्ल्यास, तर त्यांच्यासाठी खारीकही फायदेशीर असते. काही पुरुषांना वीर्याची कमतरता असते, त्यावेळी त्यांनी खारीक दुधामध्ये रोज संध्याकाळी चार ते पाच खाल्लेत, तर त्यांच्या शरीरात वीर्य कमतरता पूर्ण होते व त्यांच्या शरीरात एनर्जी येते.
तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारते
काही जणांची स्कीन ही रुक्ष असते. तसेच तिला कोरडेपणा असतो. तर शरीरात रक्ताची कमतरता आल्यामुळे, डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. अशक्तपणा असल्यासारखे दिसते, अशावेळी जर तुम्ही नियमित सकाळ-संध्याकाळ दोन दोन खारीक खाल्ली, तर तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होतेच. शिवाय डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी मदत मिळते. तसेच जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील, पिंपल्सचे डाग असतील, तसेच चेहर्यावरील स्किन काळवंडली असेल, तर अशावेळी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर खारीक दुधात उकळून लावावे, असे हप्त्यातून तीन वेळेस जरी केले, तरी चेहऱ्यावर नॅचरली मुलायमपणा येतो.
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
खारीक मध्ये फायबरचे प्रमाण असते. त्यामुळे ते आपल्या शरीरातील अन्नपचनाची क्रिया सुरळीत करतो. त्यामुळे ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा गोष्टींवर त्यांना आराम मिळतो.
हृदयाचे आरोग्य सुधारते
खारीक मध्ये पोटॅशियमचे गुणधर्म असल्यामुळे, ते तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तसेच खारीक मध्ये लोह, फायबर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, यासारखे गुणधर्म असल्यामुळे, शरीरात रक्ताची कमतरता दूर होते आणि रक्ताचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो व तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते.
मधुमेहाचा धोका टळतो
आता तुम्ही म्हणाल, की खारीक ही गोड असते. आणि ती कसे काय मधुमेह कमी करेल, शिवाय मधुमेहाचा धोका टळू शकतो. पण मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच त्याचा धोका टाळण्यासाठी जर तुम्ही खारीक खाल्ली, तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. खारीक मध्ये नैसर्गिक गोडवा आहे. त्यामुळे ती आपल्याला फायदेशीर ठरते. तसेच खारीक मधील असल्यामुळे गुणधर्मामुळे , ते आपल्या शरीरातील ग्लुकोज आपली इन्सुलीन पातळी नियमित राखण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाचा धोका होत नाही.
लहान मुलांसाठी असते फायदेशीर
हल्ली लहान मुलं जेवायला नखरे करतात, त्यांना हे नको, ते नको असे नखरे करून, ते जेवण करत नाही. त्यामुळे ते अशक्त होतात, कमजोर दिसतात, त्यांना खारीक खायला दिली, तर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होते. शिवाय स्नायूंना बळकटी येते. तसेच खारीक खाल्ल्याने, त्यांच्या शरीराला लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंकची कमी दूर होते. त्यामुळे लहान मुलांना जर तुम्ही रोज रात्री खारीक दुधात टाकून, सकाळी उठल्यावर उपाशीपोटी खायला दिले, तर ते त्यांच्या शरीरासाठी व आरोग्यासाठी फायदेशीर राहते. शिवाय खारीक खाल्ल्यामुळे त्यांची तब्येतही ठणठणीत राहील. शिवाय त्यांचा बौद्धिक विकास होईल.
चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला खारीक खाल्ल्याने, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात. ते सांगितलेले आहेतच. पण आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला शंका असतील तर, तुम्ही डॉक्टरांना विचारून खारीक खाऊ शकतात. तसेच आम्ही केलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे.
धन्यवाद