मोड आलेले मूग खाण्याचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

0
2706
मोड आलेले मूग खाण्याचे फायदे
मोड आलेले मूग खाण्याचे फायदे

 

 

नमस्कार मित्रांनो मूग हे सगळ्यांना माहिती असतील मूग खाल्ल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात. मूग पासून आपण खूप सारे पदार्थ बनवतो. तसेच खातो ही पण त्यामागे आपल्याला त्यातील गुणधर्म हे माहीत नसतात. हल्ली आपण आपल्या शरीराचे आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे आपल्याला खूपच आजारांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी आपण आपले आरोग्य जपायला हवे. तसेच आपण आपली दिनचर्या व त्याचे टाईम टेबल आखायला हवी. तसेच आपल्या शरीरालासाठी लागणारा आहार आपण नियमित खायला हवा. आपल्या शरीरात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे गुणधर्म मिळाल्याने आपल्या शरीरात एनर्जी येते. तसेच आपल्या शरीरात प्रोटीन ची मात्रा असल्यावर, आपण निरोगी राहतो. अशा वेळी आपण आपल्या आहारात नेमके कोणते पदार्थ खावेत? तर आपण आपल्या आहारात नेमके म्हणजे प्रोटीनयुक्त पदार्थ खायला हवेत. ते कशात असतात? तर ते कडधान्यांमध्ये असतात. जर तुम्ही नियमित कडधान्य तुमच्या आहारात खाल्ले, तर तुमच्या शरीरापासून कितीक साऱ्या समस्या दूर होतात. किती सारे आजार तुमच्यापासून दूर राहतात. अशा वेळी तुम्ही कडधान्ये मोड आणून खायला हवेत. आज आपण कडधान्य मधला एक प्रकार तो म्हणजे, मोड आलेले मूग खाण्याचे फायदे नेमके कोणकोणते? तर ते जाणून घेणार आहोत. मूग हे रंगाने हिरवे असतात, ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. जर तुम्ही मूग पाण्यात भिजवून, त्याला मोड आणून खाल्ले, तर तुमच्या शरीराला कित्तेक सारे फायदे होतात. तर मग मोड आलेले मूग खाण्याचे फायदे नेमके कोणकोणते? चला तर मग जाणून घेऊयात. 

मोड आलेले मूग खाण्याचे फायदे, जाणून घेऊया! 

मित्रांनो मोड आलेले मूग खाण्यापासून आपल्या शरीराला होणारे फायदे खूप  फायदे आहेत. तर मग ते नेमके कोणकोणते? तर चला जाणून घेऊयात! 

मोड आलेले मूग मधील गुणधर्म.

मोड आलेले मूग आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामधील गुणधर्म आपल्या शरीराला सुदृढ बनवण्यास मदत करतात. कारण त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, विटामिन्स, जीवनसत्वे, खनिज, सायट्रोजन, आयर्न, प्रोटीन, फायबर, पॉलिफेनॉल्स, अमिनोऍसिड, अँटीइंफ्लामेंट्स, अँटीमायक्रोबल यासारखे गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर राहतात. त्यामुळे आपल्या शरीरात विविध आजारांचे दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे डॉक्टर आपल्याला आवर्जून मोड आलेले कडधान्य व तसेच मोड आलेले मूग खायला लावतात. 

वाचा  मनुके पाण्यात भिजवलेले खाण्याचे फायदे

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

जर तुम्ही नियमित मोड आलेले मूग खात असाल, तर तुमच्या शरीरात रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत होते. बऱ्याच वेळा काही लोक सारखे- सारखे आजारी पडतात. तसेच त्या लोकांना बाहेर इन्फेक्शन लवकर होते. अशा वेळी जर त्यांनी रोज त्यांच्या आहारात मोड आलेले मूग खाल्ले, तर त्यांना खूप सारे फायदे त्यात होतात. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून, इतर आजारांना त्यांच्यापासून दूर ठेवता येते. त्यामुळे रोज सकाळी उठून त्यांनी कच्चे मूग खाल्ले, तरी चालेल. तसेच गरम पाण्यात उकळून, मीठ टाकून खाल्ले तर त्याचे फायदे अधिक होतात. 

वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

बाहेरचे जंकफूड खाणे उघड्यावरचे खाणे तेलकट-तुपकट खाणे, सारखे बैठे काम जागरण करणे, अपूर्ण झोप होणे, या साऱ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अशावेळी त्यांना वजन वाढी सारख्या आजारांना गोष्टींना तोंड द्यावे लागते. ज्यावेळी वजन वाढते त्या वेळी त्यांना इतर आजार लवकर होण्याची संभावना असते. अशा वेळी जर त्यांनी नियमित मोड आलेले कडधान्य खाल्ले, तर त्यांच्या वजनवाढी सारख्या समस्या कमी होतात. कारण मोड आलेल्या मुगात मध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक तसेच या साऱ्या गोष्टी असल्यामुळे, तुमचे वजन आटोक्यात येण्यास मदत मिळते. त्यासाठी जर त्यांनी नियमित मोड आलेले मूग मिठाच्या पाण्यात उकळून खावेत. त्यामुळे त्यांचे वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय अतिरिक्त चरबी जाते. म्हणूनच तर डायट मध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मोड आलेले म्हणून खायला लावतात. 

तुमची पचन किया सुरळीत राहील.

नियमित मोड आलेले मूग खाल्ल्याने, ते खायला हलके व पचायला सोपे राहतात. तसेच मोड आलेले मूग खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकले जातात. म्हणजेच शरीराील टॉक्सिन बाहेर फेकल्या गेल्यामुळे तुमची अन्नपचनाची क्रिया सुरळीत होते.  तुम्हाला गॅसेस सारख्या समस्या होत नाही. 

वाचा  ब्रोकली खाण्याचे फायदे

मधुमेही लोकांसाठी फायदेशीर ठरतो.

ज्या लोकांना मधुमेह आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात नियमित मोड आलेले कडधान्य तसेच मोड आलेले मूग खावेत. त्याने त्यांच्या शरीराला प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, मिळतातच. तसेच मोड आलेल्या मूग मध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करून, इन्सुलिन लेव्हल सुरळीत काम करण्याचे गुणधर्म असतात, तसेच मोड आलेले मूग हे पचायला हलके असतात. म्हणूनच डॉक्टर लोक हे नेहमी मधुमेही लोकांना त्यांच्या आहारात व कडधान्य खायला सांगतात. 

तुमच्या चेहऱ्यावर व शरीरावर ग्लो येतो.

जर तुम्ही नियमित मोड आलेली कडधान्य, तसेच मोड आलेली मूग तुमच्या आहारात खाल्ले तर तुमच्या शरीरात विटामिन्स, खनिजे, झिंक, प्रोटीन, आयर्न यासारखे गुणधर्म मिळतात. तसेच मोड आलेल्या मूगामध्ये सायट्रोजन या सारखे गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या शरीरावर त्याचा तेजस्वीपणा व ग्लो येण्यासाठी मदत मिळते. 

हृदयरोगापासून वाचू शकतात.

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. पण जर तुम्ही तुमच्या आहारात नेहमी मोड आलेले मूग खाल्ले, तर तुमच्या शरीराला हृदयरोगाचा त्रास होणार नाही. कारण मूग मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, आयर्न यासारखे गुणधर्म असल्यामुळे मूग आपल्याला हृदयरोगापासून वाचू शकतो. मुगा मध्ये आपले हृदय हे निरोगी ठेवण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे जर तुम्ही नियमित मोड आलेले, मूग किंवा त्याची उसळ किंवा धिरडे करून नेहमी खाल्ले, तर तुम्हाला या सारखा त्रासापासून वाचता येतो. तसेच हे पचायला हलके असतात. त्यामुळे तसेच मुग मध्ये  लो-कॅलरी असते. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. 

डिलिव्हरीनंतर फायदेशीर ठरतात.

मोड आलेल्या मूग मध्ये विटामिन्स, जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, फायबर्स, यासारखे गुणधर्म असतात. डिलिव्हरी नंतर अशक्त होऊन जातील जर त्यांनी त्यांच्या आहारात योग्य पदार्थ खाल्ले, तर त्यांच्या शरीरात ऊर्जा मिळण्याचे काम होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आहारात मोड आलेले मूग खावेत. तसेच मोड आलेल्या मुगमध्ये कॅल्शियम असल्यामुळे, त्यांची हाडे व मसल्स मजबूत होण्यास मदत मिळते. डिलिव्हरी नंतर बाळांतीन बाईला तिच्या आहारामध्ये मोड आलेल्या मुगाचा समावेश करावे. कारण त्यामधील गुणधर्म हे तिला मिळतात आणि तिच्या दुधामार्फत बाळाला ही मिळतात. तसेच ते पचायला हलके आणि सोपे असतात. शिवाय ते लो-कॅलरीज असतात. त्यामुळे शरीरातील फॅट ही कमी होण्यास मदत मिळते. 

वाचा  पायात गोळे येणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

 

चला तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला मोड आलेल्या मुगाची पासून तुमच्या शरीराला किती सारे फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स समजू शकतात. 

 

                          धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here