मासे खाण्याचे फायदे व तोटे

0
1449
मासे खाण्याचे फायदे व तोटे
मासे खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार मित्रांनो तर आजचा आपला विषय आहे मासे खाण्याचे फायदे व तोटे नक्की मासे खाल्ल्याने आपल्या शरीराला किती प्रमाणामध्ये फायदे होतात व तोटे होतात. मुंबईच्या लोकांना व कोकण किनारपट्टीच्या लोकांना मासे फार आवडतात. जर त्यांनी मासे खाल्ले नाही तर त्यांचा आहारा पूर्ण होणार नाही असे म्हटले तरी त्याला काही हरकत नाही. तुम्हाला सर्वांना मासे आवडतात पण नक्की आपण कोणत्या प्रकारचे मासे खातो म्हणजेच आपण गोड्या पाण्याची किंवा खाऱ्या पाण्याची मासे जर खात असू तर नक्की आपण कोणते मासे किती प्रमाणामध्ये खावे. हे मासे आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहे किंवा किती हानिकारक आहे. हे आपण आता समजून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर माशांना त्यांची एक विशिष्ट चव आहे ज्यामुळे जगामध्ये 78 टक्के लोक माशांचे सेवन करतात. सर्वात जास्त माशांचे सेवन हे महाराष्ट्र मधून कोकण किनारपट्टी मध्ये केले जाते. म्हणजे कोळी बंधू आहेत ते माशांचे सेवन जास्त प्रमाणामध्ये करतात आणि विदर्भ व त्याच्या पुढच्या भागांमध्ये माशांचे सेवन कमी प्रमाणामध्ये केले जाते. त्यासाठी त्यात दोन्ही भागांच वातावरण व लोकं कारणीभूत आहेत अस आपण समजू शकतो. चला तर मग आपल्या विषयाला सुरुवात करूया मासे खाण्याचे फायदे व तोटे बघुया.

मासे खाण्याचे फायदे

तसे बघायला गेले तर मासे खाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात चला तर मग जाणून घेऊया की नक्की ते फायदे कोणकोणते आहेत.

वाचा  थंडीत ड्राय स्काल्पमुळे केस गळतात?

वजन नियंत्रण मध्ये राहते

 जर तुम्ही नियमित पणे माशांचे सेवन करत असाल तर तुम्हाला व तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटिन्स व कार्बोहायड्रेट्स मिळतात पण तुमचे वजन नियंत्रणा मध्ये राहण्यासाठी माशांची एक मोठी मदत होईल. तसे बघायला गेले तर चिकन आणि माशांमध्ये एक फरक आहे. की चिकन चे सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते तसेच माशांचे सेवन केल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

डोळे, मेंदू हृदयासाठी चांगले

जर तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला चष्मा असेल किंवा तुमची नजर कमजोर असेल तर तुम्ही नियमित माशांच सेवन करून बघावे. माशांचे सेवन केल्यामुळे नजर तीक्ष्ण होण्यास मदत होते. याच प्रकारे मेंदू तल्लख होण्यास देखील याचा फार मोठा वाटा आहे आणि याचा अजूनही मुख्य फायदा म्हणजे आपल्या हृदयाला रक्तपुरवठा नीट होतो नेहमी आपल्या हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत राहतो तसेच हाय ब्लड प्रेशर अशा आजारांपासून देखील सुटका होण्यास मदत होते.

हाय प्रोटिन्स मिळतात

जे लोक माशांचे सेवन करतात त्या लोकांसाठी माशांचे सेवन करणे हे फार लाभदायी ठरू शकते. कारण माशान मधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हाय प्रोटिन्स मिळतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा देखील माशांपासून मिळते. म्हणून जमलं तर नियमितपणे माशांचे सेवन करावे किंवा महिन्यातून दोनदा तरी आपल्या आहारामध्ये माशांचे सेवन केले पाहिजे.

कोणते मासे कधी व कसे खावे

आपण हे तर बघितले की माशांमुळे आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात. आता आपण जाणून घेऊया की नक्की मासे कसे व कोणत्या प्रकारे खावेत चला तर मग बघुया.

नदितले मासे खावे

नदी मधील मासे तुम्ही खाऊ शकतात ते तुमच्या शरीरासाठी फार लाभदायी ठरतील. पण नदितले मासे खाताना याची काळजी घ्यावी कि मासे हे ताजे असावे नदीतले मासे हे ताजे पकडूनच खावे.

वाचा  टोमॅटो चेहऱ्याला लावण्याचे फायदे

मासे खाण्याची योग्य वेळ

तुम्ही मासे खात असाल तर एक लक्षात ठेवा की प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. बऱ्याच लोकांच्या शरीरावर मासे रात्री खाल्ल्याने थोडा वाईट परिणाम होतो. म्हणजेच काही लोकांच्या शरीराला रात्री मासे खाणे मानवत नाही म्हणून मासे खाताना सकाळची वेळ ही चांगली असते.

मासे कसे खावे

 मासे खाताना बऱ्याच लोकांना तळलेले मासे खाणे आवडतात. हे चुकीचे आहे असे नाही पण बऱ्याच वेळेस तळलेले मासे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. कारण त्यामध्ये जर आपण तेल वापरले तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. शक्यतो तळलेले मासे कमी प्रमाणामध्ये खावे व मासे खाताना माशांचे सूप किंवा आमटी करून खावी. याच प्रकारे मासे खाताना माशाचा डोळा देखील लहान मुलांना खायला द्यावा. माशाच्या डोळ्यांमध्ये भरपूर वेगवेगळे प्रकारचे प्रोटीन असतात. ज्यामुळे लहान मुलांची नजर तीक्ष्ण होण्यास फायदा होतो. बरेच वेळेस काही माशांमध्ये ऑइल, फॅट याचे प्रमाण अधिक असते अशा माशांचे सेवन करणे टाळावे.

मासे खाताना काही नुकसान होते का

तर आपण मासे कसे खावे माशाचे कोणकोणते फायदे आपल्या शरीराला होतात हे जाणून घेतले आता आपण बघूया की नक्की मासे खाण्याचे काही नुकसान देखील आहेत का तर मग बघूया.

जुने आजार उमळू शकता

 तसे बघायला गेले तर मासे खाण्याचे फार कमी नुकसान आहेत. पण सर्वात मोठा एक नुकसान म्हणजे जे आपल्या शरीराला होते ते म्हणजे आपले जुने आजार उमळू शकतात. हा नुकसान वयस्कर लोकांना किंवा ज्यांचे वय 50 हून अधिक आहे त्या लोकांना हे नुकसान होऊ शकते. म्हणजे जर तुम्हाला कोणतेही जुने आजार असतील तर ते पुन्हा येऊ शकता याची काळजी घ्यावी. म्हणून वयस्कर लोकांनी किंवा 50 ते 60 वयानंतर मासे खाण्याचे प्रमाण थोडे कमी करावे व आपला आहार नियंत्रण मध्ये ठेवावा.

वाचा  चेहऱ्यावर निर्माण झालेले फोड जाण्यासाठी घरगुती उपाय

मासे खाताना कोणती काळजी घ्यावी

मासे खाताना एक काळजी घ्यावी की कोणत्याही गोष्टीचा आहार किंवा कोणतीही गोष्ट प्रमाणामध्ये केली तर ती चांगली असते. एकदा का ती गोष्ट प्रमाणाच्या बाहेर गेली तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. तसेच जर तुम्ही सुके मासे खात असाल सुक्या माशां मधे देखील अनेक प्रकार आहेत. तर तुम्ही सुके मासे खाताना देखील त्यामध्येही ताजे मासे खावे जास्त दिवस झालेले मासे खाऊ नये. सुक्या माशांच्या तुलनेने ओले माशांचे सेवन अधिक प्रमाणामध्ये करावे. मासे खाण्याची देखील पद्धत तुम्ही बदलू शकता ती म्हणजे मासे फ्राय करून खाण्याऐवजी तुम्ही त्याचे सूप करून खाल्ले तर ते तुमच्या शरीरासाठी अतिउत्तम होईल. काही लोक माशांचे डोके फेकून देतात. असे न करता ते आमटी मध्ये टाकावे किंवा त्याचे वेगळे सूप बनवावे. हे सुख तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकतात पण त्यामध्ये काटा आहे की नाही हे नीट बघून लहान मुलांना सूप द्यावे.

 

तर आज आपण बघितले की मासे खाण्याचे आपल्या शरीरावर नक्की कोणते फायदे होतात कोणते तोटे होतात. तसेच कोणत्या प्रकारचे मासे खावे याच प्रकारे आपण शेवटी बघितले की मासे खाताना कोणती काळजी घ्यावी. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

बदाम खाण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here