पायाला बजरंग लेप कधी व कसा लावल्याने फायदा होतो

0
9670
पायाला बजरंग लेप कधी व कसा लावल्याने फायदा होतो
पायाला बजरंग लेप कधी व कसा लावल्याने फायदा होतो

नमस्कार, मित्रांनो अगदी मी बारा ते तेरा वर्षाचा होतो. त्यावेळी आम्ही विटी दांडू खेळत होतो. खेळता खेळता ती विटी पकडतांना माझा पाय एका खड्ड्यात गेला आणि माझा पाय मुरगळला त्यावेळी माझा पाय एवढा मोठा सुजून गेला. मला उठताही येत नव्हते, मी अक्षरशः घाबरून गेलो. मला वाटले माझे हाड फॅक्चर झालेच समजा. आता घरी जाऊन आईच्या हातचा मार खायला, मी त्या पायाच्या, दुखण्यापेक्षा जास्त घाबरत होतो. मग माझे मित्र मला घरी घेऊन गेले. मग घरी सगळ्यांनी विचारपूस केली, काय झाले कसा पडला, कुठे लागलंय, पाय बघताच मला रडू कोसळले. माझा पाय खुप सुजून गेला होता. मग आजी आली, आजी म्हणाली घाबरू नकोस, मग आजीने एक पुडी आणली, त्याच्यातला औषध काढले, ते गरम पाण्यात टाकून, माझ्या पायाला लागले पाय सुजलाय, त्या ठिकाणी लावले. मग त्याने माझा पाय थोडा दुखला, पण दोन दिवसांनी माझ्या पायावरची सूज उतरली, त्यावेळी मला त्या औषधाचे नाव एवढे ठाऊक नव्हते, पण लेप चांगला आहे, सगळे जण करत होते. तर तो लेप म्हणजे बजरंग लेप होय. आज आपण बजरंग लेप म्हणजे काय? आणि पायाला बजरंग लेप कसा व कोणत्या वेळी लावतात ? ते जाणून घेणार आहोतच, चला तर मग जाणून घेऊयात ! 

बजरंग लेप कोणत्या वेळी लावावा :

बजरंग लेप आयुर्वेदिक लेप आहे, बजरंग लेप ला बजरंगी लेप असेही म्हणतात. या लेपमध्ये आंबेहळद, तुरटी, गेरू, यासारखे अजून औषधी वनस्पती या मध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळतो.  बहुतेक वेळा लहान मुलांचा खेळताना पाय मुरगळला,  त्यामुळे तेथे सूज येते, किंवा पाय मुरगळला, तसेच उंचावरून पडणे, तसेच मुक्का मार लागणे, अशा वेळी पाय सुजून येतो. तसेच हाड फॅक्चर, नॉर्मल हाड फॅक्चर झाल्यास, अशावेळी तुम्ही बजरंग लेप चा वापर करू शकतात.

वाचा  पायात गोळे येणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

ज्या वेळी तुमचा पाय सुजतो, त्या वेळी ती जागा बधीर होते, दुखते, तसेच कमरेचे दुखणे, पायांवर सूज येणे, संधिवात,  तसेच पडल्यावर तिथे रक्त जमा होते, हिरवी-निळसर जागा दिसते. अशा वेळीही तुम्ही बजरंग लेप चा वापर करू शकतात. बजरंग लेप हा आयुर्वेदिक वनस्पती पासून बनवलेले असतो, त्याने तुमची जखम लवकरात लवकर भरून निघण्यास मदत मिळते. या लेप ला वयाची मर्यादा नसते, कोणीही हा लेप लावू शकतात. पूर्वीच्या काळापासून बजरंग लेपचा वापर हा केला जातोय. बजरंग लेप चा वापर हा हाता-पायाचे दुखणे, कुठेही सुजन आल्यास, तुम्ही  त्याचा वापर करू शकतात. 

बजरंग लेप कुठे मिळतो व कितीला मिळतो ? 

हा लेप हा तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअर्समध्ये मिळतो. तसेच जिथे आयुर्वेदिक भंडारात आयुर्वेदिक औषधी व लेप असतात, तिथेही तुम्हाला मिळतोय, तसेच तुम्ही दवाखान्यात डॉक्टरांना विचारूनही तो लेप घेऊ शकतात, बजरंग लेप ची किंमत ही दहा ग्रॅम मागे पंचवीस रुपये आहे. तसेच तुम्ही त्याच्यावरचे ग्राम वाढवले, की त्याचे पैसे वाढतात. हा लेप तुम्हाला पायाची सूज उतरेपर्यंत दोन ते तीन दिवस वापरायचा आहे. 

बजरंग लेप चा वापर कसा करावा ? 

ज्यावेळी तुम्ही तरी बजरंग लेप ची पुडी आणतात, आणि तुमच्या पायाला किंवा हाताला, कमरेला किंवा  मानेला कुठेही सूजन, किंवा लागले असेल, रक्त जमा झाले असेल, तर अशा वेळी तुम्ही हा लेप गरम पाण्यामध्ये टाकून, थोडसं पाच मिनिटे शिजवूनच मग ज्या ठिकाणी लागले, त्या ठिकाणी कोमट कोमट तो लेप लावावा. त्यानंतर तिथे कापसाचा थर लावावा. त्याने तो लेप एक प्लास्टर ऑफ पॅरिसचे काम करतो, मग तुमचा हातावरील किंवा पायावरील जिथे लागले असेल, त्याची सूज कमी होण्यास मदत मिळते.

पण घाबरून जायचे नाही, कारण ज्यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिस जसे हाताला कडक होते, तसा हा लेप याठिकाणी लावलाय, त्या जागेवर कडक पणा होऊन, तिथे ताणल्या गेल्यासारखे वाटते, मग ती जखम बरी होते, हा लेप तुम्ही रोजच्यारोज तुमची जखम बरी होईपर्यंत लावावा, फक्त तो लेप लावण्यापूर्वी पाच मिनिटे शिजवावेत, हा लेप शिजतो त्यावेळी त्याचा वासही येतो, पण तो तुमची सुजन जाण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आराम मिळतो. त्यातील दुखणेही कमी होते, तुम्हाला त्या समस्येवर लवकर आराम मिळतो. 

वाचा  उंदरापासून पसरणारा लासा ताप 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला बजरंग लेप कसा व कोणत्या वेळी लावावा, व तो कुठे मिळतो, हेही सांगितलेले आहेत. त्याचा वापर केल्याने, तुम्हाला कोणते फायदे होऊ शकतात. तेही सांगितले आहेतच, तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका वाटत असेलच, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here