पायात काळा धागा बांधणे योग्य कि अयोग्य जाणून घेऊया

0
2386
पायात काळा धागा बांधणे
पायात काळा धागा बांधणे

पायात काळा धागा बांधणे

नमस्कार, मित्रांनो काही लोकांची खूप सवय असते, की हातात धागा, कमरेला धागा, पायाला धागा, बांधतात. त्यांच्या म्हणण्यानुसार पायात काळा धागा  म्हणजे, आपण एक प्रकारे सुरक्षित राहतो. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार काळा धागा बांधला, की  वाइट नजर दूर राहते, म्हणजे आपल्याला कोणाची नजर लागत नाही. अशीही अशी म्हण आहे. तसेच आता ची दुनिया ही तशीच झाली आहे, आता निरनिराळे धागे हे बांधायची फॅशन निघालेल्या आहेत. त्यामध्ये पायाला बांधणे, हाताला बांधणे, किंवा पायात साखळी बांधणे, गळ्यात काळा धागा बांधणे त्यामध्ये फॅन्सी लॉकेट घालने, अशी फॅशन निघालेले आहेतच. सहसा करून मुलींच्या दुनियेत ही फॅशन फार प्रमाणात बघावयास मिळते. पायात काळा धागा बांधणे, म्हणजे फक्त फॅशनच असते का? तर नाही पूर्वीचे लोक लहान मुलांच्या पायात धागा बांधायचे, तसेच हातात ही बांधायचे, त्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण असेलच, त्यामुळे ते बांधायचे! चला तर मग जाणून घेऊया की पायात काळा धागा कोणत्या कारणामुळे बांधतात? चला तर जाणून घेऊयात! 

 काळा धागा का बांधतात? 

पायात धागा बांधणे, ही सवय पूर्वीच्या काळापासून आहे. लहान बाळ झाले, की लगेच आजी त्याच्या हातात धागा बांधते, पायात धागा बांधते, बाळाच्या कपाळावर काळा टिळा लावते, माझी आजी नेहमी म्हणायची की, काळा रंग म्हणजे कुणाची नजर न लागणे होय, तसेच हातात धागा राहू दे ग, कुणाची नजर लागत नाही. पण मला त्या गोष्टीवर विश्वास वाटत नाही, पण त्यामागे अजून काही कारण आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, पायात धागा बांधण्या मागे वैज्ञानिक कारणही आहेत, की आपले शरीर हे पंच तत्त्वांनी बनलेले असते, आपल्या शरीरात पाच तत्वे असतात. या पंचतत्त्व पासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळवून देण्याचे काम होते. आणि ज्यावेळी आपण गळ्यात किंवा हातात काळा धागा बांधतो त्यावेळी, तसेच काळा धाग्यामध्ये उष्णता असते, जे बाहेरील नकारात्मक ऊर्जा शोषून ती नष्ट करतो, व आपल्याला कुणाची नजर लागत नाही. जर तुम्ही लहान बाळाच्या हातात किंवा पायात काळा धागा बांधला, तर त्यांच्या नजर दोष निघतो. तसेच जर पुरुषांनी पायात काळा धागा बांधला, तर अत्यंत शुभ मानले जाते. तसेच पुरुषांनी मंगळवारच्या दिवशी उजव्या पायात काळा धागा बांधावा. त्याने देवी लक्ष्मीची त्यांच्यावर कृपा राहते. शिवाय कुबेर देवही त्यांच्यावर प्रसन्न राहतात. तसेच स्त्रियांनीही त्यांच्या पायात काळा धागा बांधला, तर त्यांना बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्यांच्यावर होत नाही. शिवाय लहान बाळाने पायात धागा बांधला, की त्यांची रोगप्रतिकार शक्ती जर कमी असेल, तर त्यांना बाहेर गोष्टींचा त्रास त्यांना कमी प्रमाणात होतो. 

वाचा  नवरत्न तेल लावण्याचे फायदे

काळा धागा कोणत्या पायात बांधावा? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला पायात काळा धागा का बांधावा, ते सांगितलेले आहेत, व त्या मागील काही फायदे सांगितले आहेतच. तसेच आता आपण जाणून घेणार आहोत, की पायात काळा धागा कोणत्या दिवशी व कोणत्या पायात घालावा, चला तर मग जाणून घेऊयात! 

  • पायात काळा धागा, हा शुभ दिवस बघूनच बांधावा. 
  • पुरुषांनी उजव्या पायात काळा धागा बांधावा. 
  • तसेच महिलांनी डाव्या पायात काळा धागा बांधवा. 
  • काळा धागा बांधतांना, त्याला सात किंवा नऊ या शुभ गाठी बांधूनच बांधावा. 
  • जर तुम्हाला शुभमुहूर्त माहिती नसेल, तर तुम्ही एखाद्या ज्योतिषतज्ञ ला विचारून, तुमच्या पायात काळा धागा हा बांधू शकतात. 
  • तसेच काळा रंग हा शनिदेवाचा असल्यामुळे, त्याला अजून महत्त्व आहे. जर तुम्ही पायात काळा धागा बांधला, तर तुम्हाला शनीचा त्रास कमी प्रमाणात होईल. 
  • तसेच पायात काळा धागा बांधला, तर तुम्हाला वाईट नजरेपासून वाचवले जाते, 
  • पायात काळा धागा बांधूतात, त्या वेळी तुम्ही एखाद्या मंत्राचा जप करून बांधू शकतात. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला, पायात काळा धागा बांधल्यामुळे, तुम्हाला होणारे फायदे सांगितले आहेतच. तसेच त्यांनी सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला शंका असेल, तर तुम्ही एखाद्या ज्योतिषतज्ञला विचारून, पायात काळा धागा बांधू शकतात. तसेच या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                      धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here