मासिक पाळीत पोट दुखण्याचे उपाय

0
3277
मासिक पाळीत पोट दुखण्याचे उपाय
मासिक पाळीत पोट दुखण्याचे उपाय

मासिक पाळीत पोट दुखण्याचे उपाय

नमस्कार, मैत्रिणींनो प्रत्येक स्त्री च्या जीवनात हा एक क्षण येतो, तो म्हणजे मासिक पाळी येणे होय. मासिक पाळी ही वयाच्या बाराव्या- तेराव्या वर्षापासून सुरू होते. तर ती चाळीशीच्या पुढे जाते,   तसेच मासिक पाळी मधील वेदना या काही कमी नसतात, ज्यावेळी मासिक पाळी येते, त्यावेळी खूप शारीरिक वेदना काही स्त्रियांना सोसाव्या लागतात. तसेच मासिक पाळी दरम्यान काही स्त्रियांची पोट फार दुखते. तसेच काही जणांना मासिक पाळी मध्ये थकवा आल्यासारखे जाणवते, तर आज आपण याच मुद्द्यावर माहिती जाणून घेणार आहोत, की मासिक पाळी दरम्यान कोणत्या प्रकारचा त्रास होतो? व पोट दुखी का होते? तसेच त्यावर काही उपाय आहे का? चला तर मग जाणून घेऊयात मासिक पाळीत पोट दुखण्याचे उपाय. 

मासिक पाळी मध्ये कोणत्या, समस्यांना समोर जावे लागते? 

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते, मग ते नेमके कोणते चला तर जाणून घेऊयात. 

 • मासिक पाळी दरम्यान, स्त्रियांचे डोकेदुखी होते. 
 • तसेच मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना पोट दुखी, ओटीपोट दुखीचा त्रास बघावयास मिळतो. 
 • काही स्त्रियांना मळमळ होते. 
 • तर काही स्त्रियांना अंगदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. 
 • तसेच काही स्त्रियांच्या पोटात कळ निघते. 

मासिक पाळी दरम्यान पोट का दुखते? 

बऱ्याच वेळेला स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान पोट दुखीची समस्या फार होते. अक्षरशः त्यांना पोटाला हात लावून ठेवावा, असे वाटते. पोट दुखीच्या समस्या मासिक पाळीचा जास्त बघायला मिळते. कारण यावेळी तुमच्या अंगावरून  रक्त प्रवाह जास्त प्रमाणात जात असेल, त्यावेळी जर तुमच्या गर्भाशयाला रक्तपुरवठा कमी प्रमाणात जाणवला, की तुम्हाला तीव्र पोटदुखीचे समस्या उद्भवू शकतात. तसेच त्यामुळे त्यांना कंबर दुखी , डोकेदुखी, अंगदुखी  सारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच जर मासिक पाळी दरम्यान शरीरात पाण्याची कमतरता आली, तर तुम्हाला डीहायड्रेशन सारखे समस्या उद्भवू शकतात. असे वेळी तुम्ही पुरेसे पाणी प्यायला हवेत. 

वाचा  अक्रोड चे फायदे

मासिक पाळी दरम्यान पोट दुखत असेल, त्यावर काय उपाय करावेत? 

मासिक पाळी दरम्यान अनेक स्त्रियांना पोटदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते, अशावेळी त्यांनी काय करावे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात! 

गरम पाण्याच्या पिशवी चा वापर करून बघा

मासिक पाळी दरम्यान, ओटीपोटात, पोटदुखी, कंबरदुखी चा त्रास फार होतो, अशा वेळी जर तुम्ही गरम पाण्याची पिशवीने पोटावर शेक दिला, तर त्या सारख्या समस्येवर तुम्हाला आराम मिळू शकतो. कारण पोटातील स्नायू हे गरम पाण्याच्या पिशवीने शेकले जाऊन, तुम्हाला आराम मिळतो. 

पाणी प्या

मासिक पाळी दरम्यान तुम्हाला शारीरिक व मानसिक थकवा येतो, अशक्तपणा जाणवतो, तसेच मासिक पाळी दरम्यान जर तुम्ही शरीराला पुरेसे पाणी पिले नाही, तर तुम्हाला डीहायड्रेशन सारख्या समस्या होतात. त्यामुळे तुम्हाला तीव्र डोकेदुखी, कंबरदुखी, पोटदुखी यासारख्या समस्या होतात. त्यासाठी जर तुम्ही मासिक पाळी दरम्यान योग्य प्रमाणात पाणी पीत राहिले, तर तुम्हाला फरक जाणवेल. शक्यतो मासिक पाळी दरम्यान तुम्ही कोमट पाणी पिले, तर तुमच्या पोटाचे स्नायू हे शेकले जातात, व तुम्हाला आराम मिळतो. 

योग्य आहार घ्या

मासिक पाळी दरम्यान तुम्ही योग्य आहार घ्यायला हवा. जसे की भाज्यांचे सूप, फळांचा ज्यूस, दही, तसेच प्रोटीन युक्त आहार, तुम्ही घ्यायला हवा. मासिक पाळी दरम्यान तुमच्या शरीराला योग्य आहाराची गरज आहे. तसेच मासिक पाळी दरम्यान तुम्ही बेकरीची प्रोडक्स, मैद्याची प्रोडक्स, तसेच तिखट मसालेदार पदार्थ खायचे नाही, त्याने तुमच्या पोटात आग होते, व तुम्हाला जुलाब होण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्ही सात्विक आहार घ्यायला हवा. 

दुध हळद चा वापर करा

हो, मासिक पाळी दरम्यान जर तुम्ही दूध आणि हळद पिले, तर तुम्हाला आराम मिळेल. कारण हळदी अंतीबॅक्टरियल व तसेच ऑंटीसप्तिक असते. जर तुम्हाला पोटात तीव्र वेदना होत असतील, अशा वेळी तुम्ही हळदीचे दूध पिले, तर तुम्हाला फायदा मिळेल. 

वाचा  पाय दुखी वर आयुर्वेदिक उपाय काय आहेत जाणून घेऊया

ओवा चा वापर करून बघा

मासिक पाळी दरम्यान अनेक स्त्रियांना ओटीपोटात दुखणे, हा त्रास खूप जाणवतो. अशावेळी जर त्यांनी ओवा चा वापर केला, तर त्यांना फायदा मिळेल. त्यासाठी त्यांनी ओवा गरम पाण्यात भिजवून, त्यामध्ये सेंधव मीठ टाकून, ते पाणी प्यावेत. हे पाणी त्यांनी मासिक पाळी दरम्यान चार दिवस प्यावे. त्याने पोटात दुखणे, ओटी पोट दुखणे, हा त्रास स्त्रियांना कमी होतो. 

कोरफड ज्यूस प्या

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी कोरफडीचा ज्यूस पिला, तर त्यांना मासिक पाळी मध्ये होणारा त्रास हा कमी प्रमाणात होतो. त्यामध्ये त्यांना कंबरदुखी, पोटदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्येवर आराम मिळतो. त्यांनी रोज सकाळ – संध्याकाळ एक चमचा कोरफड ज्यूस व त्यावर कोमट पाणी प्यावे. 

मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी? 

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी त्यांची काळजी घ्यायला हवी, ती नेमकी कोणती, चला तर मग जाणून घेऊयात! 

 • मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी पुरेसा आराम करायला हवा, विश्रांती घ्यायला हवी. 
 • तसेच मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी जड वस्तू उचलणे शक्यतो टाळावेत. 
 • तसेच त्यांनी पुरेशी झोप घ्यायला हवी. 
 • मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी सात्विक व योग्य आहार घ्यायला हवा. 
 • मासिक पाळी दरम्यान त्यांनी त्यांच्या आहारात रोज एक चमचा शुद्ध तूप खायला हवेत. 
 • तसेच मासिक पाळी दरम्यान, मधुर संगीत ऐकायला हवेत. जेणेकरून त्यांचे मन फ्रेश होते. त्यामुळे त्यांची चिडचिड होत नाही. 
 • तसेच मासिक पाळी दरम्यान संध्याकाळी बाहेर फिरायला चालायला जावे. 
 • तसेच मासिक पाळी दरम्यान तिखट, मसालेदार पदार्थ, खाऊ नयेत. त्यामुळे पोटात आग होते व ऍसिडिटी सारख्या समस्या तुम्हाला त्वरित होतात. 
 • मासिक पाळी दरम्यान पुरेसे पाणी प्या, शरीराला पाण्याची गरज असते. 
 • मासिक पाळी दरम्यान दोन वेळा गरम पाण्याने अंघोळ करावी. जेणेकरून तुमच्या स्नायू हे गरम पाण्याने शेकले जातात व तुम्हाला आराम मिळतो. 
 • तसेच मासिक पाळी दरम्यान तुम्ही सूप, दूध- हळद, फळे खावीत. 
वाचा  खोबरेल तेल चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

चला, तर मग मैत्रिणिनो आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी दरम्यान पोट का दुखते, व त्यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच मासिक पाळी दरम्यान तुम्ही स्वतःची कशी काळजी घ्यावी, काय करावे, काय खावे हेही सांगितलेले आहे. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करूनही, जर तुमचे पोटदुखीचा त्रास कमी होत नसेल, तर तुम्ही एखाद्या स्त्री रोग तज्ञ ला दाखवून द्यावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                      धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here