बदाम खाण्याचे फायदे

0
915
बदाम खाण्याचे फायदे
बदाम खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत बदाम खाण्याचे फायदे बदाम हे कोणाला आवडत नाही असे कोणीच नाहीत. लहानपणी तर आम्ही बदामाच्या झाडावरचे बदाम काढून, त्यांना फोडून त्यातले बदाम खायचे. बदाम हे अगदी लहानांपासून, तर मोठ्यांन पर्यंत सगळ्यांचा आवडता खाऊ आहे. तसेच ड्रायफूट मध्ये बदाम ला खूप मागणी असते, बदाम पासून आपल्या शरीराला खूप फायदे होतात.

बदाम हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. बदाम मध्ये ओमेगा 3 असते. तसेच बदाम मध्ये विटामिन ई असते. बदाम मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, खनिजे, विटामिन्स असतात. बदाम खाल्ल्याने आपल्याला खूप फायदे होतात. तसेच बदामाचे तेलही आपल्या शरीरासाठी उपयोगी असते. बदाम हे सौंदर्य वाढवते, तसेच आपली स्मरणशक्ती वाढते. चला तर मग बदाम पासून आपल्याला अजून कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? ते जाणून घेऊयात. 

बदाम पासून तुमच्या शरीराला होणारे फायदे? 

मित्रांनो बदाम खाल्ल्यामुळे, आपल्या शरीराला खूप फायदे होतात. तसेच बदामाचे दूध, बदामाचे तेल, हे आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. चला तर त्यापासून आपण कोण कोणते फायदे, करून घेऊ शकतो. ते जाणून घेऊयात! 

हृदय विकारापासून तुमचे संरक्षण होते

खरंच, मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आहारात बदाम खाल्ले, तर तुम्ही हृदयविकाराच्या धोक्यापासून दूर राहतात. कारण बदाममध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, ओमेगा थ्री, तसेच फॅटी ऍसिड व त्यामधील विटामिन ई मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ते आपल्याला फायदेशीर ठरतात. बदाम खाल्ल्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही. तसेच बदाम खाल्ल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल हे कमी होते. आपल्या रक्तवाहिन्या त्यांचे कार्य सुरळीत करतात व आपल्या हृदयविकाराचा धोका टळतो. 

वाचा  नाकावर असलेले काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

मुलांची स्मरणशक्ती वाढते

हो, रोजच्या रोज जर मुलांनी बदाम खाल्ले, तर त्यांची स्मरणशक्ती वाढते. शिवाय बौद्धिक विकास होतो. कारण बदाम मध्ये विटामिन ई, omega-3,  प्रोटिन्स, अँटिऑक्सिडंट हे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत मिळते. जर तुम्ही मुलांना रोज रात्री चार बदाम पाण्यात भिजवून, सकाळी उपाशीपोटी खायला दिले, तर मुलांची स्मरणशक्ती तेज होते व त्यांची एकाग्रता वाढते, व त्यांचा बौद्धिक विकास होतो. 

वजन कमी होते

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण बदाम खाल्ल्यामुळे तुमचे वजन कमी होते. काही जणांचा गैरसमज असतो, की बदाम खाल्ल्याने वजन वाढते. पण बदाम खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रणात येते. कारण बदाम मध्ये कोलेस्ट्रॉल घटवण्याचे गुणधर्म असतात. तसेच बदाम मध्ये कार्बोदके व फायबर्स असतात. त्यामुळे वजन कमी होते. तसेच जर तुम्ही रोज बदाम खाल्ले, तर तुम्हाला पोट भरल्यासारखे जाणवते. भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजन आटोक्यात येण्यास मदत मिळते. 

तुमचे हाड मजबूत होतात

बदाम खाल्ल्याने तुमचे हाड मजबूत होतात. खरंच जर तुम्ही रोजच्या रोज सकाळी उपाशी पोटी चार ते पाच बदाम भिजवून खायला हवेत. कारण बदाममध्ये कॅल्शियम चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपल्या हाडांसाठी कॅल्शियमच्या ची गरज असते. जर तुम्ही बदाम खाल्ले तर हाडे मजबूत होतात. तसेच तुमची गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, तर तुम्ही बदामाचे तेल घेऊन तुमच्या गुडघ्यावर त्याने मालिश करावी. त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. 

केसांसाठी फायदेशीर असते

बदाम चे दुध व तेल हे केसांसाठी खूप फायदेशीर असते. कारण बदाममध्ये विटामिन ई असते. विटामिन ई आपल्या केसांसाठी फार गुणकारी असते. जर तुमचे केस रुक्ष असतील, त्याचे तुकडे पडत असतील, किंवा गळत असतील, अशा वेळी जर तुम्ही केसांना बदामाचे तेल लावले, तर तुमच्या केस गळतीची समस्या थांबतात. तसेच जर तुम्हाला केसांना मुलायमपणा हवा असेल, तर तुम्ही केसांना बदामाचे दूध काढून लावावेत.  केसांना बदामाचे दूध लावल्यामुळे, एक चकाकी येते. व केस चमकदार होतात व मुलायम होतात. 

वाचा  बेकिंग सोडा चे सेवन केल्याने होणारे शरीराला विविध फायदे :-

तुमचे सौंदर्य निखरते

वाढत्या प्रदूषणामुळे, अवेळी खानपान मुळे, जागरण मुळे, तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या, तसेच मुरूम, ब्लॅक हेड्स, हे भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. अशावेळी जर तुम्ही बदाम चा वापर चेहर्यासाठी केला, तर तुम्हाला फायद्याचे ठरेल. त्यासाठी तुम्हाला बदाम पावडर त्यामध्ये दूध टाकून यांचे मिश्रण चेहऱ्याला लावावे, व त्याने मसाज करावा. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर वरील काळे डाग व मुरूम जातील. शिवाय तुमचा चेहरा उजळदार होईल. तसेच जर बदामाच्या तेलाने तुम्ही रात्री झोपताना चेहर्‍याला मसाज केली, तर तुमचा चेहरा चमकदार होईल, नॅचरली ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल.

तुमची मृदु त्वचा निघते

या धावपळीच्या जीवनात ताणतणाव तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे, आपल्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स, काळे डाग व आपली त्वचा मृदू होते. अशावेळी तुम्ही बदामा पासून घरच्या घरी फेसपॅक बनवू शकतात. हा फेसपॅक वापरल्याने, तुमची त्वचा उजळ, चमकदार, शिवाय मृदु त्वचा निघण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्हाला बदामाची पावडर+ त्यामध्ये दूध+ अर्धा चमचा मुलतानी माती+ चिमूटभर हळद + मध यांचे एकत्रित मिश्रण करून, तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहे. चेहऱ्यावर लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर, तुम्हाला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचा आहे. असे हप्त्यातून तीन वेळेस केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील काळपटपणा व मृदू त्वचा जाण्यास मदत मिळते. 

तुमच्या त्वचेला थंडावा देतो

बऱ्याच वेळेला काहीजणांची त्वचा ही सेन्सिटिव्ह असते. तिची आग होते, जळजळ होते, अशा वेळी जर तुम्ही चेहर्‍यासाठी व शरीरासाठी बदाम चा वापर केला, तर यासारख्या समस्यावर तुम्हाला आराम मिळतो. कारण बदाम हा थंडावा देतो. जर तुमच्या त्वचेची आग होत असेल, अशा वेळी जर तुम्ही बदाम उगाळून, तुमच्या त्वचेला लावले, तर तुमच्या त्वचेची जळजळ होण्यासारख्या समस्या तुमच्या पासून दूर राहतात. 

बदाम कसे खावेत? 

बदाम हे सहसा करून, काही लोक कच्चे खातात. पण जर तुम्ही बदाम रात्री पाण्यात भिजवून, सकाळी त्याची टरफले काढून खाल्ले, तर तुमच्या शरीरासाठी त्याचे पोषक तत्व अजून वाढतात व तुमच्या शरीरासाठी ते फायदेशीर राहतात. 

वाचा  कानातील मळ काढण्यासाठी उपाय

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला बदाम पासून होणारे फायदे, तसेच बदामाचे तेल व दूध यापासून तुम्हाला कोण कोणते फायदे होऊ शकतात, ते सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

धन्यवाद.

हळदीचे पाणी पिण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here