कच्चे दूध चेहऱ्याला लावण्याचे फायदे

0
746
कच्चे दूध चेहऱ्याला लावण्याचे फायदे
कच्चे दूध चेहऱ्याला लावण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कच्चे दूध चेहऱ्याला लावण्याचे फायदे, प्रत्येकाला आपली त्वचा सुंदर आणि गोरी, तजेलदार हवी असते. पण या वाढत्या प्रदूषणामुळे, थंड गरम हवेमुळे, तसेच अवेळी खाणे, अपूर्ण झोप होणे, तसेच बाहेरचे जंकफूड खाणे, या गोष्टींमुळे आपल्या शरीरावर व त्वचेवर त्याचा परिणाम होतो. तसेच वयात येताना किशोरवयीन मुलांच्या-मुलींच्या चेहऱ्यावर तारुण्यपीटिका येतात.

तसेच काहींच्या चेहऱ्यावर काळे चट्टे, चेहरा काळवंडणे, फुटकुळ्या होऊन काळे डाग पडणे, यासारख्या समस्या होतात. मग आपण कोणतेही क्रीम आणून चेहर्याला लावतो. पण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचे रिएक्शन होते. काहींच्या चेहऱ्यावर त्याची लाली पण येते, आणि आपण हताश होऊन जातो. अशा वेळी जर तुम्ही घरगुती काही उपाय केले, तर ते तुम्हाला फायदेशीर ठरतील. मग ते कोणते? तर तुम्ही कच्चे दूध वापरून बघा. चेहर्यासाठी कच्चे दूध लावले, तर तुम्हाला घरगुती साधा सोपा उपाय मिळेलच, शिवाय कोणतेही साइड इफेक्ट न होता, तुमच्या चेहरा अगदी उजळेल. 

चला तर मग आज आपण याच विषयावर जाणून घेणार आहोत, की कच्चे दूध चेहऱ्याला लावल्यास, तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात? चला जाणून घेऊयात. 

कच्चे दूध चेहर्यासाठी कशा प्रकारे वापरावे? 

कच्चे दूध तुम्ही चेहर्यासाठी निरनिराळे प्रकारे वापरू शकतात चला तर मग जाणून घेऊयात

तुम्ही नॅचरली क्लिंजर करू शकतात

हो, कच्चे दूध वापरून तुम्ही घरगुती नॅचरली क्लिंजर करू शकतात. त्यासाठी तुम्हाला कच्चे दूध घ्यावयाचे आहे. त्यामध्ये लिंबू पिळायचे आहेत. आणि मग त्याने तुमच्या चेहर्‍याला व मानेला गोलाकार मसाज करायची आहे. कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही याने मसाज केल्यावर, चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. त्यामुळे तुमच्या घरच्या घरी नॅचरली क्लिंजर होईलच, शिवाय चेहऱ्याला चकाकी येईल व रंगही उजळेल. तसेच तुमची मृदू त्वचा ही निघून जाईल. हा उपाय जर तुम्ही हप्त्यातून तीन ते चार वेळेस केला, तरी तुमच्या चेहऱ्यावरील काळपटपणा ही जाईल. 

वाचा  मनरेगा योजना - जाणून घ्या रोजगार योजने बद्दल

काळे चट्टे व वांग चे डाग जाण्यासाठी मदत मिळेल

कच्चे दूध तुमच्या चेहऱ्यावरील काळे चट्टे व वांग चे डाग जाण्यासाठी प्रभावी ठरू शकते. त्यासाठी तुम्हाला कच्चे दूध घेऊन, त्यात चिमूटभर हळद व मधाचे काही थेंब टाकून, तुमच्या डाग असलेल्या ठिकाणी पाच मिनिटे मसाज केल्यास, त्यानंतर ते चेहऱ्यावर तसेच ठेवून द्यावे. व 15 ते 20 मिनिटाने चेहरा धुऊन घ्यावा. असे रोजच्या रोज केल्यास, तुमचे महिनाभरात काळे डाग ,वांग चे डाग जाण्यासाठी मदत मिळते. 

कच्च्या दुधात जायफळ उगाळून लावा

हो, कच्च्या दुधात जर जायफळ उगाळून लावले, तर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, वांगचे डाग, चट्टे, तसेच डोळ्या खालील काळे वर्तुळे, असल्यास ते जाण्यास मदत मिळते. दुधात जायफळ उगळून हप्त्यातून तीन ते चार वेळेस हा प्रयोग करा, त्याने तुम्हाला यासारख्या समस्येवर आराम मिळेल. 

तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी होईल

आता हल्लीच्या बदलत्या प्रदूषणामुळे, तसेच जागरण केल्यामुळे, अवेळी खानपान मुळे, खूप लवकर लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात, तसेच शारीरिक अथवा मानसिक थकवा आल्यामुळे, ही चेहरा एकदम पडल्यासारखा दिसतो, थकल्यासारखा दिसतो, अश्यावेळी जर तुम्ही रोजच्या रोज चेहऱ्याला कच्च्या दुधाने मसाज केली, तसेच हातापायाला मानेला चेहऱ्याला दुधाने मसाज केली, तर तुमच्या चेहऱ्याची स्किन ही चमकेल. शिवाय सुरकुत्या येत असतील, तर तेही कमी प्रमाणात होतील. तसेच चेहऱ्याला व स्किनला नॅचरली उजळदार त्वचा मिळेल, तसेच तुम्ही  कच्च्या दुधामध्ये+ चंदन पावडर व हळद टाकून चेहऱ्याला व हातापायाला त्याने मसाज केल्याने, तुमच्या चेहऱ्याला चकाकी येईल. 

कच्च्या दुधापासून फेसपॅक बनवू शकतात

कच्च्या दुधाचा वापर करून, तुम्ही चेहऱ्याचे सौंदर्य वाढवून शकतात. तसेच तुमच्या चेहऱ्यावर मुरमाचे डाग, ब्लॅकहेड्स, हे जास्त प्रमाणात असेल, तसेच वांग चे डाग असतील, तर तुम्ही फेसपॅक ही बनवू शकतात. त्यासाठी तुम्हाला

  1. कच्चे दूध+ मुलतानी माती+ चंदन पावडर + चिमूटभर हळद यांचे मिश्रण एकजीव करून,
  2. तो पॅक तुम्ही चेहऱ्याला 15 ते 20 मिनिटे लावावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा,
  3. असे हप्त्यातून तीन वेळेस केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग वांगचे डाग, तसेच मुरूम जाण्यास मदत मिळेल. शिवाय चेहऱ्याचा रंग उजळेल आणि त्वचेला मुलायमपणा येईल.
  4. तसेच तुम्ही कच्चे दूध+ बेसन पीठ+ चिमूटभर हळद+ मध यांचे मिश्रण एकजीव करून, हा पॅक ही लावू शकतात.  त्याने तुमची त्वचा उजळण्यास मदत मिळेल. 
वाचा  आमचूर पावडर म्हणजे काय आमचूर पावडरचे फायदे आणि वापर

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला कच्च्या दुधापासून तुमच्या चेहऱ्याला कोणते व कशाप्रकारे फायदे होतात, ते सांगितले आहेत. तसेच तुम्हाला जर तुमची त्वचा उजळदार चमकदार स्वच्छ हवी असेल, तर तुम्ही हा वापर नेहमी करायचा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

धन्यवाद

चेहऱ्यावर गुलाब जल लावण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here