कारले खाण्याचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

0
1681
कारले खाण्याचे फायदे
कारले खाण्याचे फायदे

 

नमस्कार मित्रांनो कारले म्हटले, की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर लगेच त्याचे चित्र उभे राहते बाहेरून काटेदार दिसणारे कारले, हे आतून कडवट चवीची असतात. आईने जर कारल्याची भाजी केली आहे हे सांगताच सगळ्यांचे नाक मुरडतात. पण कारले जेवढे कडू असते तेवढे त्याचे गुणधर्म असतात. तसे आपल्या शरीरासाठी कारले हे फायदेशीर असतात. लहान मुलांना कारले आवडत नाही पण जर तुम्ही त्यांना कारल्याचे गुणधर्म सांगितले, तर त्यांना ते आवडतील. शिवाय तुम्ही त्यांना कारल्याची भाजी ही वेगळ्या प्रकारे करून खाऊ घातली तर त्यांना आवडेल. तसेच वयस्कर व्यक्तींसाठी ही कारले फायदेशीर असतात. कारण त्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. तसेच कारल्याचा वापर औषधी गुणधर्म मध्येही करतात. कारले हे लहान-मोठे असतात. तसेच कारल्याचे दोन रंगाचे असून, एक पांढरी कारली, व हिरवी कारली असतात. तसेच कारल्यामध्ये जीवनसत्वे अ, ब, क हे असतात. तसेच कारल्यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. तर चला अजून जाणून घेऊयात, की कारले खाण्याचे फायदे काय आहेत व शरीराला कोणकोणते फायदे होतात? आणि कशाप्रकारे होतात? 

कारल्या पासून शरीराला होणारे फायदे? 

मित्रांनो कारले खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला खूप सारे फायदे होतात. मग ते नेमके कोणते चला तर मग जाणून घेऊयात.

कारले खाण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत. 

 

कारले खाणे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतात

हो ज्या लोकांना मधुमेह आहे अशा लोकांनी जर त्यांच्या आहारात कारले खाल्ले, तर त्यांना त्याचा त्रास कमी प्रमाणात होतो. शिवाय त्याचा त्रास जाण्यास मदत मिळते. कारण कारले खाल्याने तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते व रक्तातील साखर कमी होते, त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात कारले खावे. तसेच ज्यांना कारल्याचे ॲलर्जी असेल अशा लोकांनी डॉक्टरांना विचारूनच खावीत. 

वाचा  उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय.

कारल्याचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन कमी होते

बऱ्याच वेळेला खूप प्रयत्न करूनही जर तुमचे वजन कमी होत नसेल, तर अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारात कारल्याचा समावेश केला तर त्यावर तुम्हाला फायदे होतील. शिवाय तुमचे वजन हे लगेच कमी होतील. जर तुम्ही रोजच्यारोज कारल्याचा रस आणि लिंबूचा रस यांचे मिश्रण एकजीव करून ते प्यायले, तर तुमचे वजन आटोक्यात येण्यास मदत होते. कारण कारल्याचा रस पिल्याने तुमची पचनतंत्र सुधारते व तुम्ही जे खाता, ते पचून तुमची पोट साफ राहते. शिवाय तुमच्या शरीरात होणारे टॉक्सिन्स हे कमी प्रमाणात होतात व तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

कारले खाल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते

खूप वेळा तुम्ही सारखे सारखे आजारी पडतात. तसेच व्हायरल इन्फेक्शन ही लवकर होते. हे कशामुळे होते? तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल त्यामुळे होते. त्यासाठी जर तुम्ही तुमच्या आहारात कारल्याचा वापर केला, तर तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यासाठी जर तुम्ही कारल्याचा रस हा नियमित पिले, तर तुमची रोगप्रतिकारशक्‍ती वाढते. शिवाय जर तुम्ही कारल्याचे पानांचा काढा पिला तरीही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

पोटातील कृमी नाहीसे होतात

लहान मुलांच्या पोटात जंत होणे यासारख्या समस्या भरपूर बघण्यास मिळतात. कारण ते उघड्यावरील खातातजसे कि माती, पेन्सिल आणि गोड पदार्थ जास्त खातात चॉकलेट खातात त्यामुळे त्यांच्या पोटात जंत होतात, कृमी होतात व त्यांचे पोट दुखते. ते जेवायला नाकारतात, शिवाय त्यांना मळमळल्या सारखे वाटते. जर तुम्ही त्यांना कारल्याचा रस दोन चमचे त्यांना नियमित प्यायला दिला, तर त्यांच्या यासारख्या समस्या दूर होतात. पण हल्ली लहान मुले कारल्याचा रस प्यायला नाकारतात. कारण तो चवीला कडू असतो. अशा वेळी जर तुम्ही कारल्याचा रसात मध टाकून त्यांचे मिश्रण त्यांना  प्यायला दिले, तर त्यांच्या या सारख्या समस्या कमी होतात. 

वाचा  भेंडी खाण्याचे फायदे

पोटातील गॅसेस समस्येवर आराम देते

हो कारले खाल्ल्याने तुमच्या पोटातील गॅसचे समस्या वर आराम मिळतो. काहीजणांना अपचन, ऍसिडिटी, पोटात गॅस होणे, गुबारा धरणे, यासारख्या समस्या होतात. अशा वेळी त्यांनी कारल्याचा रस चा वापर करायला हवा. त्यासाठी त्यांनी कारल्याचा रस व त्यात काळे मीठ यांचे मिश्रण एकजीव करून द्यावे त्याने त्यांना फरक पडतो व पोटात दुखणे थांबते. 

 कारले शरीरातील रक्त शुद्धीकरण करते

कारल्या मध्ये अँटी ऑक्सिडेंट्स चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ते रक्तातील  टॉक्सिंस बाहेर काढण्यास मदत करतात, त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त हे शुद्ध होते. त्यासाठी तुम्ही जर रोजच्या रोज तुमच्या आहारात कारल्याची भाजी खाल्ली, तर तुम्हाला त्याचे फायदे होतात. शिवाय तुम्ही कारल्याचा ज्युस करूनही पिऊ शकतात. 

अजून काही शरीरासाठी महत्वाचे असणारे     कारले खाण्याचे फायदे!

कारल्याच्या सेवनाने आपल्या शरीरास अजून कोणते निरनिराळे फायदे होते ते पुढे जाणून घेऊया.

  • कारल्याचे ज्यूस पिल्याने, तुमचे रक्त शुद्ध होते आणि रक्त शुद्ध झाल्यावर, तुमच्या चेहऱ्यावर ही त्याचा प्रभाव दिसतो व चेहरा उजळदार दिसतो. 
  • नियमित कारले खाल्ल्याने तुमचे यकृताचे कार्य सुधारते. 
  • कारले खाल्याने तुमची पचनसंस्था सुधारते. 
  • कारल्याचा ज्युस पिल्यामुळे, तुम्हाला उलट्या, जुलाब होणे यासारख्या समस्यांना पासून आराम मिळतो. 
  • कारले खाल्याने तुम्ही कॅन्सर चे पेशी जागृत होण्यापासून वाचवू शकतात. 
  • डायबिटीस साठी कारल्याचा ज्युस फायदेशीर असतो. 
  • तसेच कारल्याचा रस लिंबूचा रस व त्यामध्ये मध टाकून, चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळण्याचे मदत मिळते. 
  • कारल्याच्या रसात थोडी खडीसाखर टाकून, त्यांचे मिश्रण केल्यास, तुम्हाला मुळव्याध सारख्या समस्या वर आराम मिळतो. 
  • तसेच सर्दी, कफ यासारख्या समस्येवर कारल्याचा ज्युस फायदेशीर राहतो. 
  • तसेच ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी कारल्याचा रस प्यावा. कारण कारल्याचा रस पिल्याने तुमची पचनसंस्था सुरळीत राहते. 

कारल्याचा वापर कोणी करू नये? 

मित्रांनो, कोणतीही गोष्ट ही प्रमाणातच खावेत. जर प्रमाणाच्या बाहेर खाल्ले, तर त्याचा त्रास आपल्याला होतो. तसेच कारल्याचे ही आहे, ती प्रमाणातच खावेत, जर प्रमाणाच्या बाहेर त्याचा वापर केला, तर तुम्हाला जुलाब यासारख्या गोष्टींना, समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच ज्या स्त्रिया गरोदर आहेत, अशा स्त्रियांनी त्यांच्या आहारात कारल्याचा प्रमाण कमी करावेत, तसेच आम्ही सांगितलेले उपायांमध्ये, जर तुम्हाला कारल्या पासून काही त्रास आहे, तर तुम्ही डॉक्टरांना विचारूनच खावेत. 

वाचा  जेवणाचे ताट ओलांडू नये असे का म्हणतात ?

चला तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला कारले खाण्याचे फायदे सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                       धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here