चेहऱ्यावर गुलाब जल लावण्याचे फायदे

0
770
चेहऱ्यावर गुलाब जल लावण्याचे फायदे
चेहऱ्यावर गुलाब जल लावण्याचे फायदे

चेहऱ्यावर गुलाब जल लावण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाला आपली त्वचा मऊ, मुलायम, चमकदार,डाग विरहित असावी, असे वाटत असते. म्हणजेच प्रत्येक जण हे आपले सौंदर्य जपण्याच्या मागे लागलेले असतात. त्याच प्रमाणे आपले केसांचे आरोग्य हे चांगले राहावेत आपले केस निरोगी राहावेत आपले केसांची वाढ ही चांगल्या रीतीने व्हावी यासाठी देखील अनेक प्रयत्न करत असतात. आपली चेहऱ्याची त्वचा ही चमकदार दिसायला हवी तसेच चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचे डाग असेल तर ते काढण्यासाठी अनेक उपाय देखील करत असतात. तर काही जण यासाठी बाजारातून महागडी प्रोडक्स आणून ते चेहऱ्यावर लावत असतात. परंतु, मित्रांनो बाजारातील प्रॉडक्ट हे महागडे तर असतातच. शिवाय, हे प्रोडक्ट्स केमिकलयुक्त देखील असतात. ज्यामुळे आपल्या त्वचेला त्याचे ॲलर्जी देखील होऊ शकते. काही जण हे पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेत असतात. परंतु मित्रांनो काही घरगुती उपाय असे आहेत की ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो.

       आपल्या आरोग्याविषयी तसेच आपल्या सौंदर्याविषयी आपल्याच घरातील काही वस्तू वापरून अनेक प्रकारचे उपाय आपल्याला करता येऊ शकतात. अनेकदा वातावरणातील बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर होत असतो. म्हणजेच चेहरा काळवंडणे चेहरा निस्तेज दिसू लागणे चेहरा कोरडा पडणे अशा प्रकारच्या समस्या वातावरण बदलामुळे आपल्या चेहऱ्यावर घडून येऊ शकतात. तर मित्रांनो या साठी आपण आपल्या चेहऱ्यावर गुलाबजल लावल्यामुळे अनेक फायदे होऊ शकतात. हो मित्रांनो, गुलाब जल हे आपल्या चेहर्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे जल प्रवृत्तीने थंड स्वरूपाचे असते. ज्यामुळे गुलाब जल आपल्या चेहऱ्यावर लावल्यामुळे एक प्रकारे थंडावा आपल्या चेहऱ्याला मिळत असतो. उन्हाळ्यातील वातावरण हे उष्ण प्रकारचे असते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला उष्णते मुळे त्रास होऊ शकतो. तर अशावेळी तुम्ही गुलाबजल चा स्प्रे तुमच्या चेहऱ्यावर मारायला हवा. त्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील काळवंडलेली त्वचा देखील निघून जाण्यास मदत होऊ शकते. तसेच, एक प्रकारे थंडावा तुमच्या चेहऱ्याला मिळण्यास मदत होत असते. तर मित्रांनो हे लावल्यामुळे अजून आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात ह्या बद्दल आपल्याला माहिती असायला हवी. तर आज आपण गुलाब जल हे चेहऱ्यावर लावल्यामुळे कोणत्या प्रकारचा फायदा आपल्याला होऊ शकतात तेव्हा या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, चेहऱ्यावर गुलाब जल लावण्याचे फायदे आपणास होऊ शकतात? तसेच, गुलाब जल हे कधी लावायला हवे? व त्याचा कशा प्रकारे वापर करायला हवा? याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

गुलाबजल चेहऱ्याला का लावायला हवे?

     अनेक वेळा वातावरणातील बदल झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसून येत असतो. वातावरण बदल झाल्यामुळे चेहरा कोरडा पडणे, चेहरा निस्तेज दिसू लागणे, चेहऱ्यावर काळे डाग पडणे, अशा एक ना अनेक प्रकारचे समस्या येत असतात. तसेच उन्हाच्या वेळी देखील चेहऱ्यावर उष्णतेचा परिणाम होत असतो. तर अशावेळी तुम्ही गुलाब जल चेहऱ्यावर लावायला हवे. हे जल चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारे थंडावा निर्माण होत असतो. गुलाब जल चेहऱ्याला लावल्यामुळे तुमचा थकवा देखील जाण्यास मदत होत असते. गुलाब जल चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील काळवंडलेली त्वचा देखील निघून जात असते शिवाय तुमच्या चेहऱ्यावरील जी मृतपेशी असतात ती मृतपेशी निघून जाण्यासाठी देखील गुलाब जल लावल्याने ने मदत होऊ शकते. कुठल्या प्रकारचे फंक्शन असो अथवा लग्नकार्य असो तर अशा वेळी महिला या अति मेकअप करत असतात. परंतु आता ती मेकअप केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर राशेज चा त्रास होऊ शकतो. तसेच अति मेकअप मुळे चेहऱ्यावर त्याचा ताण पडू शकतो. तर अशावेळी गुलाब जल चा वापर केला पाहिजे गुलाबजलचा स्प्रे चेहर्‍यावर केला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. तसेच हे एक प्रकारे मेकअप रिमूवर चे काम देखील करू शकते. एक प्रकारे हे चेहऱ्यावर वापरल्यामुळे चेहऱ्यावरील समस्या जाण्यास मदत होत असते. म्हणून, गुलाबजल हे चेहऱ्यावर लावायला हवे.

वाचा  जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

गुलाब जल लावल्यामुळे होणारे फायदे

अनेकांना चेहरा संदर्भात काही ना काही समस्या येत असतात. तर अशावेळी तुम्ही जर गुलाब जल चा वापर करत असाल तर त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. तर मी त्यांना हे जल लावल्यामुळे कुठल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

  • गुलाबाचे पाणी हे एक प्रकारे मॉइश्चरायझिंग चे काम करत असते. अनेक वेळा चेहऱ्याची त्वचा ही कोरडी व निस्तेज दिसू लागते. तर अशावेळी तुम्ही हे जल चेहऱ्यावर कापसाच्या मदतीने लावायला हवे. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारे ओलावा टिकून राहण्यास मदत होत असते.
  • गुलाबाचे पाणी चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी देखील मदत होऊ शकते. तसेच चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येण्यास देखील मदत होत असते.
  • गुलाबाचे पाणी चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा आहे अगदी खोलवर पासून स्वच्छ होण्यास मदत होत असते. एक प्रकारे तुमचे चेहऱ्याचे संरक्षण देखील होत असते.
  • अनेकांना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या निर्माण होत असते. आणि चेहऱ्यावर पिंपल्स आल्यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची आग होऊ लागते. अशा वेळी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर गुलाबाचे पाणी लावून चेहरा साफ करायला हवा. तसेच, चेहऱ्यावर गुलाब जल लावल्यामुळे एक प्रकारे थंडावा देखील मिळत असतो व चेहऱ्यावरील पिंपल्स मुळे होणारे आग देखील कमी प्रमाणात होऊ शकते.
  • गुलाब जल चेहऱ्याला नियमित लावल्यामुळे तुमच्या चेहर्‍याची त्वचा ही ताजीतवानी होण्यास मदत होत असते. एक प्रकारे नैसर्गिक ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येण्यास मदत होत असते.
  • गुलाबाचे पाणी  तुम्ही स्किन टोन म्हणून देखील वापर करू शकतात.
  • गुलाब मध्ये लिंबाचा रस मिक्स करुन चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी देखील मदत होऊ शकते.
  • तसेच गुलाब जल मध्ये तुम्ही दही मिक्स करुन चेहऱ्याला लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होऊ शकते. गुलाब जल व दही मिक्स करून लावल्यामुळे चेहऱ्याची त्वचा ही मऊ मुलायम व चमकदार बनण्यास मदत होऊ शकते.
वाचा  चेरी याचे आपण सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे व विविध तोटे :-

तर मित्रांनो, गुलाब जल चेहऱ्यावर लावल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे तुमच्या चेहऱ्याला होऊ शकतात. शिवाय एक प्रकारे थंडावा देखील मिळण्यास मदत होत असते.

गुलाबाचे पाणी हे कशाप्रकारे लावायला हवे?

चेहऱ्यावर गुलाबाचे पाणी लावल्यामुळे चेहऱ्यावरील अनेक समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकतात. तसेच गुलाब जल लावण्यासाठी तुम्ही स्प्रे चा देखील उपयोग करू शकतात. तर चेहऱ्यावर गुलाब जल हे कशाप्रकारे लावायला हवे याबद्दल आता आपण जाणून घेऊयात!

गुलाब जल पासून फेस पॅक

मित्रांनो, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर गुलाब जल हे फेस पॅक बनवून देखील असू शकतात. त्यासाठी तुम्ही लिंबाचा रस दोन चमचे+ग्लिसरीन एक चमचा+ गुलाबाचे पाणी चार चमचे. लिंबाचा रस, ग्लिसरीन आणि गुलाब जल हे एका वाटीमध्ये घेऊन एकत्रित करून व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. हे मिश्रण तुम्ही कापसाच्या बोळ्याने च्या साह्याने तुमच्या चेहऱ्यावर लावून घ्या नाहीतर स्प्रे च्या बॉटल ने देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर याने स्प्रे करू शकतात. हे मिश्रण चेहऱ्याला लावून ते पाच ते पंधरा दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर चेहरा सुकल्यानंतर स्वच्छ थंड पाण्याने धुऊन टाकावा व चेहऱ्यावर कोरफडीचा रस लावून घ्यावे. हा उपाय तुम्ही नियमित केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्याची मदत होऊ शकते.

 गुलाब जल आणि मुलतानी मातीचा फेस पॅक

तुमचे चेहऱ्यावर गुलाब जल पासून बनवलेला फेस पॅक लावल्यामुळे देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यासाठी, दोन चमचे दूध+दोन चमचे गुलाब जल+ दोन चमचे मुलतानी माती. एका वाटीमध्ये दोन चमचे मुलतानी मातीचे टाकून घ्यावे त्यामध्ये दोन चमचे गुलाब जल व दोन चमचे दूध मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित केल्यानंतर चेहऱ्यावर लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा आणि त्यानंतर मिश्रण चेहर्‍यावर ब्रशच्या साह्याने लावून घ्यावे. आणि पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे चेहरा सुकल्यानंतर चेहरा जुने आधी सर्कुलर मोशन मध्ये मालिश करून स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुवावा. असे केल्यामुळे चेहऱ्यावरील ब्लड सर्कुलेशन  चांगल्या प्रकारे होईल. तसेच चेहऱ्यावरील ओईली त्वचा देखील निघून जाण्यास मदत होऊ शकते. शिवाय चेहऱ्यावर मुरूम येण्याची समस्या देखील उद्भवणार नाही. तसेच चेहऱ्यावर काळे डाग असतील तर ते देखील निघून जाण्यास मदत होऊ शकते. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही गुलाबजल  चेहऱ्यावर लावण्याचा फायदा करू शकतात.

वाचा  नाकावर तीळ असणे शुभ की अशुभ

 गुलाब जल कधी लावावे?

अनेक लोकांना हा प्रश्न पडला असतो की गुलाब जल चेहऱ्यावर कधी लावावे? जेणेकरून जास्तीचा फायदा होऊ शकेल. तर मित्रांनो हे तुम्ही चेहऱ्यावर नियमित देखील लावू शकतात. उन्हाळ्यात देखील उष्ण वातावरणाचा प्रभाव हा आपल्या चेहऱ्यावर होत असतो. तर अशावेळी तुम्ही गुलाबाचे पाणी तुमच्या चेहऱ्यावर लावायला हवे जेणेकरून तुमच्या शरीराला थंडावा मिळण्यास मदत होऊ शकेल व तुमच्या चेहऱ्यावरील काळवंडलेली त्वचा देखील निघून जाण्यास मदत होऊ शकते तसेच गुलाब जल चेहऱ्यावर लावल्यामुळे मुरमाची समस्या देखील कमी प्रमाणात येऊ शकते.

    गुलाबाचे पाणी हे चेहऱ्यावर तुम्ही झोपण्याआधी देखील लावू शकतात. त्यासाठी गुलाबजल चे स्प्रे तुमच्या चेहऱ्यावर करावा पण गुलाब जल लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायला हवा. गुलाबजल नेहमीच रात्री लावल्यामुळे देखील सकाळी उठल्यावर त्वचाही ताजीतवानी व फ्रेश दिसू लागते शिवाय चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या देखील कमी प्रमाणात होऊ शकते. कारण चेहऱ्यावर गुलाबाचे पाणी लावल्यामुळे त्वचेच्या मुळापासुन त्वचा ही स्वच्छ होण्यास मदत होत असते. त्यामुळे एक प्रकारे त्वचेचे संरक्षण देखील गुलाब जल लावल्याने होत असते.

      कामानिमित्ताने आपल्याला बाहेर जावे लागत लागत असते र अशा वेळी आणि धुळीचे कण हे आपल्या चेहर्‍यावर चिकटून बसतात. जर अशावेळी आपण मी गुलाबाचे पाणी चेहऱ्यावर लावले तर ते धुळीचे कण निघून जाण्यास मदत होत असते. शिवाय आपली त्वचा देखील स्वच्छ होण्यास मदत होते. गुलाबाचे पाणी हे नियमित रात्री झोपण्यापूर्वी जर लावले तर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील नाहीशा होतात शिवाय सुरकुत्या देखील लवकर पडत नाही. शिवाय रात्री गुलाब जल लावून झोपल्यामुळे आपला शरीराचा थकवा देखील निघून जाण्यास मदत होत असते. एक प्रकारे आपली त्वचा ही ताजीतवानी दिसण्यास देखील मदत होत असते.

      तर मित्रांनो, गुलाबाचे पाणी लावल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. तसेच हे फेस पॅक प्रमाणे जरी लावले तरी अनेक प्रकारचे फायदे आपल्या त्वचेला होत असतात. त्याचप्रमाणे गुलाबजल हे रात्री लावल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपण होत असत आपल्या शरीराचा थकवा देखील एक प्रकारे जाण्यास मदत होत असते तसेच आपल्या त्वचेचे सुरकुत्या पडण्यापासून देखील बचाव होत असतो. तर मित्रानो नक्की तुम्ही देखील तुमच्या चेहऱ्याला गुलाबजल लावायला हवे जेणेकरून तुम्हाला देखील अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात.

      मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

       धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here