आईचे दूध वाढवण्यासाठी उपाय.

0
3116
आईचे दूध वाढवण्यासाठी उपाय.
आईचे दूध वाढवण्यासाठी उपाय.

नमस्कार मित्रांनो. बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम त्याला आईचे दूध देणे खूप महत्त्वाचे असते. म्हणजेच बाळाचा जन्म झाल्यावर आईने बाळाला स्तनपान दिले पाहिजे. कारण लहान बाळाचा आहार दूध पिणे हाच असतो. दुधा शिवाय त्याला म्हणजेच लहान बाळाला कुठलाही इतरत्र प्रकारचा आहार दिला जात नसतो. दूध पिणे हेच लहान बाळाचे जेवण असते. म्हणून आईने बाळाला हवे तेवढे तितक्या प्रमाणात बाळाला स्तनपान करू द्यावेत. बाळाचा जन्म झाल्यावर सुरुवातीचे दोन दिवस आईच्या दुधा मध्ये चिक असतो तर बाळासाठी खूप अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणून बाळाला वरचे कुठलेही दूध न देता आईचेच दूध दिले पाहिजे. परंतु बऱ्याच बायांना दूध न येण्याची समस्या निर्माण होत असते. त्यावेळी  आईचे दूध वाढवण्यासाठी बरेच उपाय केले जातात.

अशा वेळी मात्र त्यांच्या लहान बाळांना पावडर युक्त दूध दिले जात असते. पर्यंत पावडर युक्त दुधामुळे पाहिजे तेवढे आईच्या दुधा मधले सर्व घटक नसतात. म्हणून बाळाला पावडर दूध पाजणे पेक्षा आईनेच अंगावरती स्तनपान देणे योग्य ठरते.अनेक स्त्रियांना मात्र दूध येण्याची समस्या उद्भवत असते. म्हणजेच त्यांना लहान बाळांना अंगावरचे दूध पाजता येत नाही. त्यामुळे त्यांचा चिंतेचा विषय देखील बनत असतो. परंतु काही उपाय करून आई चे दुध वाढवता येऊ शकते. तर ते नेमके उपाय कोणते करायला हवेत तसेच कशा प्रकारचा आहार घ्यायला हवा याबद्दल देखील माहिती असायला हवी. तर मित्रांनो, आज आपण आईला तिच्या बाळाला स्तनपान करण्यासाठी पुरेपूर दूध यायला हवे यासाठी कोणते उपाय करायला हवेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो आईला दूध येण्यासाठी कोणते उपाय आपण करू शकतो याबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

आईला चांगल्या प्रकारचा आहार द्यायला हवा.

डिलिव्हरी झाल्यावर आईला सर्वप्रथम बाळाला स्तनपान करावे लागत असते. आणि सूरवातीचे स्तनपान बाळाला देणे अत्यंत गरजेचे देखील असते. कारण सुरुवातीचे स्तनपान बाळाने केल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असते. आईला बाळाला स्तनपान करावे लागत असते त्यासाठी तिने तिच्या आहारात चांगल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे. आई होण्याआधी पहिलेचा आहार आणि आई झाल्यानंतरचा आहार यामध्ये खूप फरक असतो. कारण आई झाल्यावर आईला स्तनपान करावी लागत असते आणि स्तनपान करण्यासाठी पुरेपूर दूध देणे अत्यंत आवश्यक असते जेणेकरून बाळाचे पोट व्यवस्थित भरेल. तर आईला दूध हे पुरेपूर यायला हवे यासाठी चांगला आहार देणे अत्यंत आवश्यक असते. आणि आराम मध्ये नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • डिलिव्हरी झाल्यानंतर आईला आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आवर्जून करायला हवा. जेणेकरून आईला व्यवस्थित प्रकारे दूध येण्यास मदत होईल. आणि बाळाचे पोट दुखी व्यवस्थित प्रकारे भरण्यास मदत होईल.
  • आईच्या आहारामध्ये तुम्ही पत्तागोबी चा समावेश आवर्जून करायला हवा. पत्ता गोबी खाल्ल्यामुळे दूध वाढण्यास देखील मदत होत असते.
  • तुम्ही बाळाच्या आईला आहार देताना सुक्या भाज्या बनण्यापेक्षा पातळ भाज्या बनवून खायला द्याव्यात. पातळ भाज्या खाल्ल्यामुळे आईचे दूध वाढण्यास मदत होत असते.
  • तसेच बाळाच्या आईला जेवणाच्या वेळी नाचणीचा पापड आवर्जून खायला द्याव्या. यामुळे आईच्या दुधामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण देखील वाढते.
  • बाळाच्या आईला आहारामध्ये  खोबरे आणि खसखस युक्त बट्ट बनवून द्यायला हवे. खसखस आणि खोबरे युक्त बट्ट खाल्ल्यामुळे आईचे दुध वाढण्याचे प्रमाण वाढत असते. 
  • बऱ्याच जणांचा असा समज असतो की डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या आईला फळे खाऊ देऊ नये. परंतु असे करू नका डिलिव्हरी झाल्यानंतर आईला फळे देखील खाऊ द्या. कारण यामुळे आईचे दूध तर वाढते शिवाय दुधातून बाळाला आवश्यक ती विटामिन्स आणि पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होत असते.
  • त्याचप्रमाणे जर बाळाचे आई ही मांसाहारी पदार्थ खात असेल तर मांसाहारी पदार्थांचा समावेश देखील तुम्ही तिच्या आहारामध्ये आवर्जून  करायला हवा.
  • बाळाच्या आईचे दुध वाढण्यासाठी तुम्ही बाळाच्या आईला डिंकयुक्त लाडू बनवून रोज खायला द्यावेत. यामध्ये खारीक खोबरे खसखस काजू बदाम गुळ आणि डिंक इत्यादी सर्व घटकांचा समावेश असायला हवा. यामुळे आईचे दूध वाढण्यास मदत तर होतेच शिवाय आई व बाळ यांसाठी ते अत्यंत महत्त्वपूर्ण घटक देखील असतात.
  • आईचे दूध वाढविण्यासाठी तुम्ही आईला गव्हाचा गुळ टाकून घाटा बनवून खायला आवर्जून द्यायला हवा आणि त्यामध्ये गाईच्या गावरान तुपाची धार देखील सोडायला हवी. असे तुम्ही नियमित सकाळच्या नाश्त्यामध्ये द्यायला हवे.
  • बाळाच्या आईचे दूध वाढावे, यासाठी तुम्ही आईला गुळवणी देखील खाऊ घालू शकता त्याने देखील दूध वाढण्यास मदत होत असते.
वाचा  घोळ भाजी चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

मित्रांनो, आईचे दूध योग्यरीत्या ने वाढायला हवे यासाठी तुम्ही उपरोक्त सर्वच घटकांचा आहारामुळे समावेश करायला हवा. त्यामुळे आईचे दुधाचे प्रमाण दर वाढीला शिवाय आईच्या दुधातून बाळाला योग्य त्या प्रकारचे विटामिन्स आणि पोषक घटक देखील मिळतील त्यामुळे बाळाची रोग प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होईल.

 आईचे दूध वाढवण्यासाठी अजून काही उपाय:-

  • असे म्हटले जात असते की दुधाने दूध वाढण्यास मदत होत असते. म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही आईला रोज एक ग्लास भरून दूध नियमितपणे पिण्यास सांगावे. सकाळचा नाष्टा सोबत एक ग्लास दुध आणि रात्री झोपण्याअगोदर एक ग्लास दूध. असे केल्यामुळे आईचे दूध नक्कीच वाढण्यास मदत होत असते.
  • त्याचप्रमाणे दूध हे नुसतेच न देता त्यामध्ये तुम्ही शतावरी कल्प टाकून पिण्यास द्यावे. शतावरी कल्प दुधामध्ये टाकून घेतल्याने आईचे दूध हे पुरेपूर प्रमाणात वाढण्यास मदत होत असते. त्यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट दुधामध्ये  दोन चमचे शतावरी कल्प टाकून बाळाच्या आईला पिण्यास द्यावे.
  • त्याचप्रमाणे दूध वाढावे यासाठी आईला पुरेपूर प्रमाणात कोमट पाणी पिण्यास द्यावे. यामुळे देखील दूध वाढण्यास मदत होत असते.
  • तसेच जे काळया शिराचे खोबरे असते ते थोड्या प्रमाणात घ्यावे आणि त्यासोबत खडीसाखर ची पूड असे मिश्रण रोज एक महिना चावून खावे यामुळे देखील दुधामध्ये वाढ होण्यास मदत होत असते.
  • काळी तीळ हे तर सर्वांनाच माहिती असते तर काळी तीळ आणि थोडीशी खडीसाखर असे मिश्रण नियमित खाल्यामुळे देखील दूध वाढण्यास मदत होत असते.
  • खसखस हे तर सर्वांनाच माहीत असते. तर तुम्ही खसखसची बारीक चूर्ण करून दुधामध्ये उकळून पिल्याने देखील दूध वाढण्यास मदत होत असते.
  • तसेच तुम्ही खडीसाखर थोड्या प्रमाणात घेऊन त्यासोबत पांढरे जिरे हे चावून खावे यामुळे देखील दूध वाढण्यास मदत होत असते. हा खूप जुन्या काळापासून चालत आलेला उपाय आहे.
  • काच गोळ्या आणि गुळ हा देखील एक प्रभावी उपाय दूध वाढवण्यासाठी करता येतो. जर तुमच्या घरात एखादी ज्येष्ठ महिला असेल तर तिला हा उपाय नक्कीच माहीत असतो आणि हा उपाय कसा करायचा हे देखील ती व्यवस्थित पणे सांगत असते. काच गोळ्या आणि गुळ यांचे मिश्रण व्यवस्थित प्रकारे एकजीव करून त्याच्या छोट्या गोळ्या बनवल्या जात असतात. आणि सकाळी उठल्यावर बाळाच्या आईला दोन ते तीन दिवस रोज अशाप्रकारे दोन गोळ्या दिल्या जाताना ते दातांना न लागू देता डायरेक्ट पाण्यासकट गिळायला लावत असतात. हा उपाय करताना खूप काळजी घ्यावी लागत असते. परंतु, हा उपाय अगदी प्रभावी ठरत असतो. हा उपाय केल्यामुळे भरपूर प्रमाणात आईचे अंगावरचे दूध वाढत असते.
वाचा  शेंगदाणे व गुळ खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

तर, बाळाच्या आईचे दूध वाढावे यासाठी तुम्ही वरील प्रमाणे देखील उपाय करून बघू शकतात. कारण जर बाळाला आईचे पुरेपूर दूध मिळाले तर त्याचे पालन पोषण व्यवस्थित प्रकारे होत असते. म्हणून बाळाच्या आईचे दुध वाढवणे आवश्यक ठरते. आणि एवढे सर्व उपाय करून देखील जर दूध वाढण्यास मदत होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घेतला पाहिजे.

मित्रांनो, आपण वरील प्रमाणे जाणून घेतले आहे की आईचे दूध वाढवण्यासाठी कशाप्रकारे उपाय करू शकतो तसेच आईने तिच्या नेहमीच्या आहारामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश आवर्जून करायला हवा. तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

    

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here