मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्राव होण्याची कारणे, लक्षणे व उपाय

0
2306
मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्राव होण्याची कारणे, लक्षणे व उपाय
मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्राव होण्याची कारणे, लक्षणे व उपाय

नमस्कार, मैत्रिणींनो मासिक पाळी म्हणजे नेमके काय ? तर मासिक पाळी ही मुलींना वयाच्या बाराव्या- तेराव्या वर्षापासून चालू होते, व ती दर महिन्याला येते. म्हणजे अंगावरील लालसर रक्त, व शुद्ध रक्त जाणे, म्हणजे मासिक पाळी होय. मासिक पाळी म्हणजे स्त्रियांच्या शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर काढण्याची क्रिया होय.पूर्वी मासिक पाळी विषयी सगळी गुप्तता असायची. त्यामुळे मासिक पाळी विषयी बोलताना अनेक महिलांना अक्षरशः अनेक महिलांना बोलायलाही गुप्तपणे बोलावे लागायचे. तसेच त्यांना जो त्रास व्हायचा, तो त्यांना स्वतः सहन करावा लागायचा.काहीना मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्त्राव होतो. त्याविषयी ते बाहेर मोकळेपणाने बोलायचे नाही.

पण आत्ता मासिक पाळीच्या बाबतीत मोकळेपणाने चर्चा करता येते, व मासिक पाळी विषयी, तक्रारी विषयी, सगळे मनमोकळेपणाने बोलतात, व समजू शकतात. मासिक पाळी मध्ये अनेकांना तर शारीरिक तक्रारी असतात. तसेच मासिक पाळी मध्ये अनेकांना डोके दुखी, कंबर दुखी, पोट दुखी, तर कोणाला पाळीमध्ये अतिरक्तस्राव होतो, अशक्तपणा येतो, या सारख्या समस्या असतात. त्यातच एक समस्या म्हणजे, आज आपण जाणून घेणार आहोत, की मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव कमी होण्याची कारणे? लक्षणे व त्यावर काय उपाय आहेत का? चला तर मग जाणून घेऊयात ! 

मासिक पाळीत रक्तस्राव कमी प्रमाणात का होतो ? 

मैत्रिणींनो, आता हल्ली भरपूर स्त्रियांना मासिक पाळी मध्ये रक्तस्राव कमी होण्याचे समस्या व्हायला लागलेल्या आहेत. मासिक पाळी हे चक्र असे आहे, ज्यामध्ये अति रक्तस्राव होणे, तसेच कमी रक्तस्राव होणे, ही एक समस्या आहे. त्यामध्ये रक्तस्राव हा व्यवस्थित व सुरळीत प्रमाणातच व्हायला हवा, स्त्रियांना मासिक पाळी मध्ये रक्तस्राव कमी होत असेल, तर त्याची अनेक कारणे आहेत, चला तर मग त्याची कारणे जाणून घेऊयात ! 

 • जर स्त्रिया शारीरिक दृष्ट्या कमकुवत असतील, अशक्त असतील, अशा वेळी त्यांना मासिक पाळी मध्ये रक्तस्राव हा कमी प्रमाणात होतो. 
 • जर स्त्रियांच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, अशा वेळी ही त्यांना मासिक पाळी मध्ये दोनच दिवस  रक्तस्राव होतो. 
 • ज्या स्त्रियांना ॲनिमियाचा त्रास आहे, त्यांना रक्त स्राव कमी होतो. 
 • तसेच बदलत्या जीवनशैलीमध्ये, अवेळी खानपान मुळे, व्यायामाच्या अभाव यामुळे, त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊन, त्यांना मासिक पाळी मध्ये रक्तस्राव कमी होतो. 
 • काही स्त्रियांना गर्भाशयाच्या गाठी असणे, किंवा पीसीओडी सारख्या गाठी असतील, तर त्यांना रक्तस्राव हा कमी प्रमाणात होतो. 
 • थायरॉईड किंवा थायरॉईडचे लक्षणे असल्यास, त्यांना रास मासिक पाळीत रक्तस्राव कमी होतो. 
 • जर स्त्रियांचे रजोनिवृत्तीचे वय आले, तर त्यांना मासिक पाळीत रक्तस्राव हा कमी प्रमाणात व्हायला सुरुवात होते. 
 • काही स्त्रियांचे जरा शरीरातील हार्मोन्स बॅलन्स असतील, तर त्याचा परिणाम मासिक पाळी वर होतो, त्यामुळे मासिक पाळी अनियमित येते, व त्याने रक्तस्रावही कमी होतो. 
 • ज्यांचे वजन हे अधिक असेल, लठ्ठपणा असेल, अशा स्त्रियांना मासिक पाळीत रक्तस्राव कमी होतो. 
 • जर काही स्त्रिया अति व्यायाम करत असणार, तसेच काही खेळाडू असतील, तर त्यांनाही मासिक पाळी मध्ये रक्तस्राव कमी होण्याची समस्या असू शकतात. 
वाचा  मासिक पाळी येण्यासाठी उपाय

मासिक पाळीत रक्तस्राव कमी होत असेल, तर त्याची काय लक्षणे असतात? 

वरील दिलेल्या माहिती मध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की मासिक पाळीत कमी रक्तस्राव कोणत्या काळात कारणांनी होतो. आता आपण मासिक पाळीत रक्तस्राव कमी होत असेल, तर त्याची लक्षणे कोणती असतात,  तर मग जाणून घेऊयात. 

 • जय मासिक पाळीत अंगावरून रक्तस्राव कमी होतो, त्यावेळी काळसर रंगाचे रक्त जाते. 
 • तसेच मासिक पाळी मध्ये काही जणांची ओटी पोट दुखते. 
 • तर काही जणांची कंबर व पाठ दुखीच्या समस्या होतात. 
 • तसेच मासिक पाळी मध्ये कमी रक्तस्त्राव जातो, अशा वेळी काहीजणांच्या मांड्या खूप दुखतात. 
 • काही जणांची तीव्र डोकेदुखी होती. 
 • तसेच काही जणांना फक्त नॉर्मल अंगावर जाते किंवा डाग पडतो. 
 • तर काही जणांना रक्तस्राव कमी होत असला, तरी मानसिक व शारीरिक थकवा जाणवतो. 

मासिक पाळीत रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी, काही घरगुती उपाय ! 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहे की मासिक पाळीत रक्तस्राव कमी कोणत्या कारणाने होतो, तसेच त्याची कोणती लक्षणे आहेत, आता आपण त्यावर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात ! 

हळदीचा वापर करून बघा :

हळदी अंतीबॅक्टरियल असते, तसेच हळदीचा वापर केल्याने तुमच्या मासिक पाळीच्या तक्रारी कमी होतात. हळदी उष्ण असल्यामुळे, मासिक पाळी मध्ये रक्त प्रवाह सुरळीत होतो. मासिक पाळी येण्याच्या चार दिवसापूर्वी पासून, तुम्ही जर हळद घातलेले दूध पिलेत, तर तुमची मासिक पाळी मधील रक्तस्राव सुरळीत होतो, तसेच जर तुम्ही रोजच्या रोज एक ग्लास पाण्यात, अर्धा चमचा हळद टाकून ते पाणी पिले, तर मासिक पाळीच्या तक्रारी या तुमच्या दूर होतात. 

पपई खा :

भरपूर  स्त्रियांना मासिक पाळी मध्ये, रक्तस्राव कमी होण्याची समस्या असतात. अशावेळी त्यांनी मासिक पाळीच्या वेळी येण्याच्या, तीन ते चार दिवसापासून जर त्यांच्या आहारात पपईचा वापर केलाच, तर रक्तप्रवाह सुरळीत होतो. शिवाय अशुद्ध रक्त हे मासिक पाळी दरम्यान बाहेर निघते. तसेच पपई खाल्ल्याने मासिक चक्र ही नियमित राहते. 

वाचा  शिंगाड्याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

अननस खा :

अननस हे उष्ण फळ आहे, मासिक पाळी दरम्यान जर तुम्ही अननसाचा ज्यूस पिलात, तर तुम्हाला मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्राव सुरळीत होण्यास मदत मिळते. 

तिळ,गुळ व शेंगदाण्याचे एकत्र सेवन करा :

तिळगुळ हे उष्ण असतात, जर तुम्ही तिळ, गुळ आणि शेंगदाणे हे रोजच्या रोज तुमच्या आहारात खाल्ले, तर तुमच्या शरीरातील रक्ताचे संतुलन सुरळीत राहते. तुम्हाला हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत नाहीत. तसेच तुम्हाला मासिक पाळी मध्ये अनियमितता येणे, तसेच रक्तस्राव कमी होणे, यासारख्या समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळतो. तीळ गुळ शेंगदाणे हे  तुम्हाला दर महिन्याला रोजच्या रोज खायचे आहे. ज्याला उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी हप्त्यातून दोन ते तीन वेळेस खाल्ले तरी चालेल. महिन्याला तुम्ही रोजच्या रोज तिळ, गुळ आणि शेंगदाणे यांचे एकत्र मिश्रण खाल्ले, तर तुम्हाला शारीरिक, मासिक पाळीच्या तक्रारी कमी होतील. 

अद्रक चा वापर करा :

ज्यावेळी तुमचे मासिक चक्र येते, समजा तुमचे मासिक पाळीची तारीख येते, अशा वेळी जर तुम्ही अद्रक चा रस काढून, त्यामध्ये मध टाकून, त्यांचे मिश्रण एकत्र करून, त्याचे चाटण केल्यास, मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव कमी होण्याच्या समस्येवर तुम्हाला आराम मिळतो. 

गुळाचा चहा प्या :

गुळाचा चहा हा मासिक पाळी तारखेच्या 4 ते 5 अगोदर येण्यासाठी ही मदत करतो. तसेच मासिक पाळी दरम्यान तुमच्या अंगावरील रक्तस्राव, कमी होत असेल, तर त्यावरही फायदेशीर ठरतोय. त्यासाठी तुम्ही गुळाचा चहा मासिक पाळीच्या चार दिवस नियमित प्यायला, तर अंगावरून जाणारा रक्तस्राव सुरळीत होतो, शिवाय अशुद्ध रक्त बाहेर निघते. 

गाजर व बीट खात जा :

जर तुम्ही नियमित गाजर आणि बीट यांचा, सलाड करून खाल्ले, तर तुम्हाला हिमोग्लोबिन च्या समस्या जाणवणार नाहीत. तसेच तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन व्यवस्थित राहिले, तर तुम्हाला मासिक पाळी मध्ये रक्तस्राव कमी होण्याच्या समस्या कमी होतात. शिवाय तुम्हाला ॲनिमियाचा त्रास होणार नाही. 

वाचा  लहान मुलांना जंत झाल्यास घरगुती उपाय

कोरफड चा वापर करा :

कोरफडला घृतकुमारी असे म्हणतात, मासिक पाळीच्या तक्रारी वर कोरफड फार फायदेशीर ठरते. जर तुम्हाला अंगावरून कमी जात असेल, अशा वेळी जर तुम्ही करून त्याचा वापर केला, तर तुम्हाला फायदा मिळेल. त्यासाठी तुम्हाला मासिक पाळीच्या सात ते आठ दिवस अगोदर पासून कोरफडीचा गर काढून, सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे. त्याने पाळीतील रक्तस्राव कमी होणे, तसेच कंबर दुखणे, पाठ दुखणे, यासारख्या समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल. 

खजूर खा :

खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिन हे वाढते. तसेच जर तुम्हाला पाळी मध्ये रक्तस्राव कमी असेल, अशा वेळी जर तुम्ही रोजच्या रोज तीन ते चार खजूर+तुप  नियमित खाल्याने, मासिक पाळी मध्ये रक्तस्राव कमी होण्याची समस्या कमी होतात. 

मासिक पाळी आल्यास काय काळजी घ्यावी ? 

बऱ्याच वेळेला मासिक पाळी आल्यावर काही जण खूप काम करतात, की काम केल्याने अंगावरील रक्तस्राव सुरळीत होईल. पण तसे नसतेच, मासिक पाळी आली की तुम्ही भरपूर प्रमाणात आराम करायला हवेत, शारीरिक व मानसिक थकवा मासिक पाळी मध्ये जातो. त्यासाठी तुम्ही भरपूर विश्रांती करायला हवी. तुम्ही शांत मधुर असे संगीत ऐकावं, मासिक पाळीमध्ये हार्मोनल संतुलन बदलत राहते, अशा वेळी स्त्रियांची चिडचिड होणे, अंग दुखणे, त्रास होणे, डोके दुखणे, यासारख्या समस्या बघायला मिळतातच.

त्यासाठी त्यांनी पुरेसा आराम करायला हवा. त्यांनी योग्य आहार घ्यायला हवा. मासिक पाळी दरम्यान त्यांनी शेंगदाणे, खजूर, पपई, बडिशोप, गहू, तांदूळ, शेवगा, या सारख्या पदार्थांचा वापर करायला हवा. जेणेकरून त्यांच्या अंगावर रक्त सरावा सुरळीत होतो. तसेच त्यांनी मासिक पाळी दरम्यान अवजड काम करणे टाळावेत, जास्त जेवण टाळावेत अगदी हलका आहार घ्या, तसेच रात्री झोपताना जर त्यांनी रोजरोज पोटाला तिळाचे तेल लावले, तर अंगावरून कमी जाणे, मासिक पाळीत पोट दुखणे, यासारख्या तक्रारी त्यांच्या कमी प्रमाणात होतात. तसेच मासिक पाळी दरम्यान त्यांनी नियमित अननस, पपई या फळांचा वापर करावा, बीट खावेत, तसेच त्यांनी रात्रीच्या वेळी दोन किंवा दुपारच्या वेळी ताक प्यावे. तसेच अगदी साधे सोपे उपाय असतात, ते आपण मासिक पाळी दरम्यान करायला हवेत. आपली काळजी घ्यायला हवी. 

चला, तर मग मैत्रिणिनो आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव कमी प्रमाणात का होतो, त्याची कारणे व लक्षणे ही सांगितले, व त्यावर काही घरगुती उपायही सांगितले आहेत, तर आम्ही सांगितलेले उपाय करून जर तुम्हाला फरक जाणवत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवून द्यावेत, तसेच आम्ही सांगितलेले उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असेल, तर कमी आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here