पायाला कुरूप झाल्यावर उपाय

0
5122
पायाला कुरूप झाल्यावर उपाय
पायाला कुरूप झाल्यावर उपाय

नमस्कार मित्रांनो, आपले शारीरिक स्वास्थ्य हे चांगले रहावे तसेच आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हे चांगले असावे यासाठी आपण आपल्या शरीराची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायला हवी. हल्लीच्या काळामध्ये सर्व जण कामाच्या बाबतीत व्यस्त झालेले दिसतात. कामात तर कुणालाच चुकत नाही ते करावेच लागतात. त्याचबरोबर आपल्या आरोग्य सांभाळणे हे देखील फार महत्त्वाचे असते. आजकाल फॅशनच्या बाबतीत देखील सर्वजण जागृत असतात. फॅशन म्हणून वेगवेगळे प्रकारचे कपडे परिधान करणे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल सॅंडल काढणे हे तर सामान्य बाब झालेली आहे. बऱ्याच वेळा एक फॅशन म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चपला सॅंडल घालत असतो. एखादी नवीन चप्पल खरेदी केल्यावर ती घातल्याने आपल्याला सुरुवातीला तिचा त्रास देखील जाणवत असतो. म्हणजेच सांगायचे झाले तर त्याला सोप्या भाषेत आपण चप्पल चावणे असेदेखील म्हणत असतो. आणि बऱ्याच वेळा असे झाल्यामुळे त्या ठिकाणी पायाला कुरूप देखील येऊ शकते.

एखाद्या कामाच्या गडबडीत अथवा घाईघाईने आपण जर आणि आणि बाहेर गेलो, आणि त्या गडबडीत जर एखादा बारीक खडा अथवा काटा पायाला रुतला तर त्यामुळे कुरूप ची समस्या येऊ शकते. आणि पायाला जर कुरूप झाले तर त्यामुळे त्या ठिकाणची जागा देखील दुखू लागते. पूर्वीच्या काळी चे लोक तर अनवाणी पायांनी एखादा कामानिमित्ताने बाहेर पडत असे. आणि त्या काळातून जंगलांमधून जावे लागत असे. मग अशा वेळी त्यांच्या पायात काटा रुतण्याची अथवा खडे टोचण्याची व त्याचे समस्या येतच असे आणि अशा कारणामुळे त्यांच्या पायाला कुरूप येण्याची समस्या येत असे. परंतु त्याकाळचे उपायदेखील वेगळ्या प्रकारचे असायचे.

म्हणजेच ज्या ठिकाणी कुरूप आलेले आहे त्या ठिकाणी चटका देण्याची पद्धत होती. आणि तो चटका म्हणजेच एखाद्या गुळाचा अथवा पूर्वीच्या काळी लोक खापर वापरत असे तर त्या खापराचा चटका देत असे. आणि अशा केल्यामुळे त्यांचा पाय हा ठणठणीत बरा देखील होत असे. परंतु आजच्या काळामध्ये हे अघोरी उपाय मानले जातात. कुरूप म्हणजेच पायाच्या ज्या ठिकाणी कुरूप आलेले आहे तेथे एक अशी जाडसर त्वचा तयार होते. आणि त्यामुळे तेवढ्या भागात त्रास जाणवू लागतो. तर मित्रांनो आज आपण कुरूप झाल्यावर कोणते उपाय करू शकतो या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग कुरूप झाल्यावर आपल्या प्रकारचे उपाय करता येतील या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

पायाला कुरूप होण्याची कारणे नेमकी कोणती असू शकतात ?

पायाला कुरूप होण्याची नेमकी कारणे कोणती असू शकतात याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊयात.

  • सौंदर्याच्‍या बाबतीत सर्व जण जागृत असतात. त्यासाठी केसांची फॅशन करणे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करणे तसेच पायात घालण्यासाठी वेगळ्या प्रकारचे सँडल्स अथवा चप्पल्स वापरणे. वेगळ्या प्रकारची सँडल्स अथवा फिट चप्पल वापरल्यामुळे त्याचा त्रास पायाला होऊ शकतो. यालाच  चप्पल चावणे असे देखील म्हटले जाते. तर या अशा कारणांमुळे पायाला कुरूप होण्याची समस्या देखील येत असते.
  •  काही लोकांचे काम हे उभे राहून काम करणे अशा प्रकारचे असते. तरी यामुळे शरीराचे वजन हे पायांवर  पडत असते. पायांवर सतत शरीराचे वजन पडल्यामुळे त्या ठिकाणी घाम आल्यामुळे तेथील बाजूमध्ये कुरूप येण्याची शक्यता असते. पायांवर जास्त वजन पडल्यामुळे अथवा उपायांना जास्तीचा घाम आल्यामुळे पायातील त्या त्वचेमध्ये कुरूप येऊ शकते.
  •  बऱ्याच जणांना शेतामध्ये कामे करावे लागत असतात. आणि शेतामध्ये अनेक प्रकारचे बारीक-बारीक झाडेझुडपे देखील असतात. शेतात मध्ये घाईघाईने चालल्यामुळे एखाद वेळेस पायाला जखमा देखील होतात किंवा  काटा पायात रुतल्या मुळे त्या ठिकाणी कुरूप होऊ शकते. पायात काटा रुतला मुळे तो लवकर निघत नाही आणि तेथील भाग सुजून कुरूप होत असतो.
वाचा  लहान मुलांना उन्हाळी लागणे या समस्येवर घरगुती उपाय

तर वरील सर्व प्रकारच्या कारणांमुळे पायाला कुरूप होण्याची शक्यता असते. म्हणून आपण आपल्या पायांची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या पायांना कुरूप होणार नाही.

पायाला कुरूप झाले असे कसे समजावे ?

बऱ्याच जणांना पायाला कुरूप झाले याबद्दल लवकर कळत नाही. म्हणजेच एखाद्या कारणामुळे किंवा काही वृत्ती यामुळे पाय दुखत असेल असे त्यांना वाटत असते. परंतु याकडे दुर्लक्ष केल्यास पायाला कुरूप होण्याची शक्यता असते. कुरूप म्हणजेच ज्या ठिकाणी पायाला कुरूप झाले असेल त्या ठिकाणची त्वचा हीच जाडसर होते. आणि तेथे ज्या ठिकाणी कुरूप झाला असेल त्या ठिकाणी मध्यभागी देखील पांढऱ्या रंगाचा डॉट दिसू लागतो. 

  1. जर पायाची त्वचा ही जाड व कडक झालेली असेल, तर समजून घ्यावे कुरूप झालेले आहे.
  2. पायाच्या ज्या ठिकाणी पांढऱ्या कलरच्या डॉट दिसत असेल म्हणजेच तेथील त्वचा जाडसर होऊन मध्ये देखील पांढरा रंगाचा डॉट असेल तर समजून घ्यावे कुरूप झालेले आहे.
  3. जर पायाची त्वचा ज्या ठिकाणी कुरूप झाले असेल त्या ठिकाणची त्वचा ही एक सारखी दुखत असेल, तर त्या ठिकाणी कुरुप झालेले आहे, असे समजून घ्यावे.
  4. तसेच चालताना पाय हा सारखा सारखा दुखत असेल तर देखील समजून घ्यावे की पायाला कुरूप झाले आहे.

वरील प्रकारची लक्षणे जर आढळून आली तर समजून घ्यावे, तुमच्या पायाला कुरूप झालेला आहे. तर कुरूप झाल्यास कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करता येतील याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

कुरूप झाल्यास कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करता येतील ?

बऱ्याच वेळा एखादी काटा पायात रुतल्यामुळे कुरूप होत असतो. अथवा खडा रूतल्यामुळे त्या ठिकाणी स्वरूप येण्याची शक्यता असते. आणि अशा मुळे पायाला त्रास होऊ लागतो. तर पायाला कुरूप झाल्यास आपण कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  नाकाचे हाड वाढणे घरगुती उपाय

कुरूप झाल्यास रुईचे झाडाचा उपयोग करून बघा :-

रूईचे झाड हे तर सर्वांनाच ठाऊक असते. तर कुरूप झाल्यास आपण रुईच्या झाडाचा उपयोग आपण करू शकतो. रुईचे झाड हे सर्वत्र ठिकाणे दिसून येतात. आपल्या आजूबाजूच्या परिसरात तर हमखास रुईचे झाड आढळून येते. तर मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला आता रूतला असेल, तू काढायला गेलो तर पूर्ण निघत नाही. काट्याचा पुढचं जे टोक असते ते अर्धवट पायामध्ये तसेच राहते. आणि ते अर्धवट राहील यामुळे पायाला कुरूप येऊ शकते. तर त्यासाठी तुम्ही रुईच्या झाडाचा वापर करू शकता.

त्यासाठी तुम्ही सर्वोत्तम रुईच्या झाडाचे पान तोडून घ्या. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला काटा रुतला असेल, त्या ठिकाणी एखाद्या सुईच्या साह्याने थोडं करून घ्या म्हणजेच त्या जागेतील थोडं तोंड उघडेल. आणि त्या ठिकाणी तुम्ही रुईच्या झाडाचे चिक लावून घ्या. ते एक रात्रभर तेथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी थोडी सूज आल्यासारखे दिसेल म्हणजेच काटा वर आलेला असेल. आणि तू पसच्या सहाय्याने बाहेर निघून जाण्यास मदत होईल. अशा प्रकारे तुम्ही कुरूप झाल्यास रूईच्या चिकाचा वापर करू शकतात.

क्रीमचा वापर करून बघा :-

बऱ्याच वेळा पायाला कुरूप होण्याची शक्यता असते तर त्यासाठी तुम्ही म्हणजेच कुरूप बरा होण्यासाठी तुम्ही रुईच्या झाडाचा चीक वापरू शकतात, हा तर अत्यंत प्रभावी उपाय आहे. तसेच ज्या ठिकाणी पायाला कुरूप झालेला असेल, अशा ठिकाणी तुम्ही पायाला क्रीम लावायला हवी. डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही क्रीम घेऊ शकतात. जॉब ठिकाणे पायाला कुरूप झालेला असेल त्या ठिकाणी व त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी तुम्ही क्रीम व्यवस्थित लावून घ्यावी. जेणेकरून त्या पायाची परचाही नरम होण्यास मदत होईल. व कालांतराने ग्रुप जाण्यास मदत होऊ शकेल.

तर मित्रांनो,वरील प्रकारे उपाय तुम्ही तुमच्या कुरूप झाल्यास नक्कीच करून बघू शकतात. ज्यामुळे तुमच्या पायाचे कुरूप बरे होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे तुमच्या पायाला कुरूप होऊ नये यासाठी तुम्ही विशिष्ट प्रकारची तुमच्या पायांचे काळजी घेणे देखील अत्यंत आवश्यक ठरते.

  • तुमच्या पायाला कुरूप  होऊ नये यासाठी तुम्ही बाहेर जाताना चप्पल घालूनच घराबाहेर पडावे अनवाणी पायांनी फिरू नये.
  • तसेच तुमच्या पायांना आराम मिळावा यासाठी तुम्ही कोमट पाण्यामध्ये निम्बू आणि थोडं मीठ टाकून त्यामध्ये पाय पंधरा मिनिटे ठेवावेत. जेणेकरून तुमच्या पायांचे घाण देखील निघून जाईल व पायांना व्यवस्थित प्रकारे आराम मिळण्यास मदत होईल.
  • तुम्ही तुमच्या पायांसाठी चप्पल वापरताना ती एकदम फिट असू नये. कारण जर चप्पल ही फीट असली तर त्यामुळे चपलेचा त्रास हा पायाला होण्याची शक्यता असते. आणि चपलेचे सारखे सारखे घर्षण हे पायाला झाल्यामुळे त्या ठिकाणी कुरूप येण्याची समस्या येते. म्हणून तुम्ही तुमच्या पायासाठी मोकळी असणारी चप्पल घ्यावी.
वाचा  खोबरेल तेल पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

तर मित्रांनो, तुमच्या पायाला कुरूप होऊ नये यासाठी तुम्ही वरील सर्व प्रकारची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपण आपल्या शरीराची जेवढ्या चांगल्या प्रकारे काळजी घेऊ तेवढे आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. आपली स्वतःची काळजी जपणे ही फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे. म्हणून स्वस्थ राहा आणि मस्त राहा. मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

 धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here