मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी

0
1127
मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी
मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी

मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी

नमस्कार मैत्रिणींनो मासिक पाळी येणे, म्हणजे स्त्रीच्या शरीरातील मुख्य घटक होय. मासिक पाळी आली की स्त्रीचे शरीर हे निरोगी बनते. तसेच मासिक पाळी दर महिन्याला वेळेवर येणे, म्हणजे स्त्रीचे शरीर हे निरोगी आहे, असे म्हणतात. जर मासिक पाळी अवेळी येत असेल, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवून, त्यावर उपचार करून घ्यावेत. तसेच मासिक पाळी वर स्त्रीचे शरीरीक चक्र असते. त्यामध्ये बिघाड आला, की त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होतो. काही स्त्रिया मासिक पाळी मधील त्रास व त्यावर ची काळजी घेण्याच्या माहितीबद्दल मोकळेपणाने बोलायला लाजतात. त्याच बाबतीत आपण मोकळेपणाने बोलणार आहोत, मासिक पाळी मध्ये कशाप्रकारे स्वच्छता घ्यावी? तसेच कशाप्रकारे काळजी घ्यावी?  तसेच मासिक पाळी कोणते व्यायाम करावे? काय खावे? काय करावे? याबाबतीत आज आपण काही माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी

मासिक पाळी मध्ये कोणती काळजी घ्यावी? 

काही स्त्रियांची अशी समजूत असते, की मासिक पाळी मध्ये खूप काम करावेत. त्याने शरीराचा व्यायाम होतो, व अंगावरील रक्त प्रवाह सुरळीत होतो. पण तसे नसते, उलट मासिक पाळी मध्ये तुम्ही पुरेसा आराम करायला हवा. कारण मासिक पाळी मध्ये रक्त प्रवाह जातो, त्यामुळेच, स्त्रियांना  अशक्तपणा आणि थकवा आल्यासारखे जाणवते. तसेच काही ज्यांचे मासिक पाळी दरम्यान पोट, कंबर, मांड्या तसेच डोकेदुखी, मळमळणे, यासारखा त्रास संभवतो. अशावेळी तिने जर पुरेसा आराम केला, तर तिचे आरोग्य सुंदर व उत्तम राहते. तसेच मासिक पाळी मध्ये त्यांनी योग्य आहार घ्यायला हवा. हिरव्या पालेभाज्यांचे सूप, फळ,  डाळ- खिचडी, मुगाची डाळ ची भाजी, असा हलका आहार त्यांनी घ्यायला हवा. तसेच मासिक पाळी मध्ये तुम्ही तुमची स्वच्छता घ्यायला हवी, मग ती कोणती ते जाणून घेऊयात! 

 • तर आज कालच्या स्त्रिया या मासिक पाळी मध्ये सॅनेटरी पॅड वापरतात, तसेच सॅनिटरी पॅड तुम्ही योग्य प्रमाणे वापरायला हवेत. 
 • सॅनिटरी पॅड ची निवड करताना, त्याची क्वालिटी पाहूनच निवड करावी. 
 • हल्ली मार्केटमध्ये, तसेच काही स्त्रिया सॅनेटरी नॅपकिन, टेम्पोन्स वापरतात. पण ते वापरताना चांगले ब्रँडेड कंपनीचे वापरावे. 
 • तसेच त्यांना दिवसभर न ठेवता दिवसातून तीन वेळेस सॅनिटरी पॅड बदलावेत. 
 • सॅनिटरी पॅड जास्त वेळ ठेवल्यास, तुम्हाला रॅशेस, खाज येण्याच्या समस्या उद्भवतात. 
 • रॅशेस व खाज आल्यावर तुम्ही डॉक्टरांना विचारून, अशावेळी तुम्ही मांड्यांच्या आजूबाजूला अँटीसेफ्टीक क्रीम लावू शकतात. 
 • मासिक पाळी मध्ये गुप्तअंग तुम्ही स्वच्छ पाण्याने धुऊन, मगच पॅड घ्यावे. 
 • तसेच गुप्तांग धुताना साबण व केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर करू नये. त्याने इन्फेक्शन होण्याची संभावना असते. 
 • तसेच मासिक पाळी मध्ये तुम्ही दोन वेळेस आंघोळ करायला हवी. 
 • तसेच मासिक पाळी मध्ये तुम्ही भरपूर विश्रांती घ्यायला हवी. 
 • एखादे मधुर संगीत ऐकायला हवे, त्याने तुमचे शारीरिक व मानसिक थकवा जाणवल्यास, त्यावर आराम मिळतो. 
 •  जर तुमचा मूड चांगला असेल, तर तुमचे आरोग्यही उत्तम राहते. 
 • ओटी पोटात दुखत असेल तर  कंबरेचा बेल्टचा वापर करत जावे. 
 • मासिक पाळीदरम्यान कठीण परिश्रम असलेली कामे, अति व्यायाम हे करू नयेत. तुम्ही अगदी साधे सोपे व्यायाम करू शकतात. 
 • तसेच मासिक पाळी दरम्यान, म्हणजेच पांढरे, लाईट कपडे घालू नयेत. कारण त्यांना डाग पडून जाण्याची शक्यता असते. 
वाचा  नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

मासिक पाळी दरम्यान ही काळजी का घ्यावी? 

काही स्त्रियांची घरगुती नॅपकिन वापरण्याची सवय असते, तसेच नॅपकिन पाच ते सहा महिन्याच्या वर झाले की, त्याची झीज व्हायला सुरुवात होते, आणि त्यामुळे तुमच्या यौन मार्गाला इन्फेक्शन होण्याची संभावना असते, अशा वेळी तुम्ही पाच ते सहा महिन्यानंतर बदलत राहावेत. तसेच काही वेळेस कामाच्या निमित्त किंवा धावपळीच्या याच्यात स्त्रिया त्यांचे सॅनेटरी पॅड हे बदलावा याला कंटाळा करतात. जर त्याला डाग पडले नसतील, तर ते दिवसभर ही राहू देतात. पण तसे करू नका, त्याने इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. सॅनिटरी पॅड हे दिवसातून तुम्ही तीन वेळेस बदलायला हवेत. जर पॅड दिवस भर घेतले, तर सॅनिटरी पॅड मध्ये बॅक्टेरिया तयार होऊन, तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तसेच टेम्पोन्स पॅड हे फक्त मूलबाळ झालेल्या स्त्रियांनीच वापरावेत. तसेच त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. जर त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही, तर त्यांना शारीरिक दृष्ट्या थकवा येतो, अशक्तपणा जाणवतो. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की मासिक पाळी मध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, तसेच मासिक पाळी येते, तेव्हा ही काळजी घ्यावी, या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                         धन्यवाद

 

                    

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here