थंड पाणी पिण्याचे फायदे व नुकसान

0
755
थंड पाणी पिण्याचे फायदे व नुकसान
थंड पाणी पिण्याचे फायदे व नुकसान

नमस्कार मित्रांनो.आज जाणून घेऊया थंड पाणी पिण्याचे फायदे व नुकसान. आपल्या शरीराचे आरोग्य हे चांगले राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक बारीक गोष्टींचा विचार करावा लागत असतो. म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी काय खावे काय खाऊ नये, काय प्यावे काय घेऊ नये, काय योग्य काय अयोग्य अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करावा लागत असतो. उन्हाळा म्हटला की उन्हाळ्यात आपल्याला पाणी खुप प्यावेसे वाटत असते. शिवाय, आपले आरोग्य जपण्यासाठी पाणी हे खूपच उत्तम ठरत असते. पाण्याशिवाय आपण जीवन देखील जगू शकत नाही. तसेच, पाणी हे आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित प्रकारे असायला हवे.

जितके जास्तीत जास्त आपण पाणी पिऊ तेवढे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असते. जर आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असली तर आपल्याला डीहायड्रेशन देखील होऊ शकते. म्हणून आपल्या शरीराचे डीहायड्रेशन होण्यापासून आपला बचाव व्हावा यासाठी आपण आणि हे पुरेसे पिणे आवश्यक ठरत असते.बऱ्याच जणांना सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय असते आणि ती आपल्या आरोग्यासाठी देखील उत्तम ठरत असते. शिवाय, माठातील पाणी पिल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात.

उन्हाळा लागल्यावर काही व्यक्ती अथवा सर्वच जणांना थंडगार पाणी पिण्याची सवय असते. उन्हाळ्यातील उष्ण वातावरणामुळे थंडगार पाणी प्यावेसे वाटत असते. म्हणून, बरेच जण उन्हाळा लागता बरोबर फ्रीजमध्ये पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवत असतात. आणि जेव्हा तहान लागत असेल तेव्हा  फ्रिजमधल्या बॉटल मधले पाणी पीत असतात. परंतु मित्रांनो प्लीज मधील थंडगार पाणी पिल्यामुळे आपल्या आरोग्याला त्याचे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतात.

थंडगार पाणी पिण्यामुळे एक तर आपली तहान देखील मागत नाही शिवाय आपल्या आरोग्याला त्याचे अनेक नुकसान झेलावे लागत असतात. तर मित्रांनो थंड पाणी प्यायला हवे किंवा नाही? थंड पाणी पिल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे अथवा नुकसान आपण होऊ शकतात? याबद्दल, देखील आपल्या माहिती असायला हवी. आज आपण थंड पाणी पिण्याचे फायदे व नुकसान या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, थंड पाणी पिल्यामुळे आपला फायदे होऊ शकतात? कि नुकसान होऊ शकते? या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

थंड पाणी पिण्यामुळे होणारे फायदे व नुकसान :-

पाणी हे आपले जीवनच आहे. आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण हे पुरेसे असणे फार आवश्यक ठरत असते. कारण पाण्यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होत असते. आपल्या शरीरातील पाणी जर कमी झाले तर आपल्याला डीहायड्रेशन होण्याची संभावना असते. म्हणून आपल्या शरीराचे डीहायड्रेशन होण्यापासून बच्चा होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पाणी पुरेसे असणे फार आवश्यक ठरते. आपण जितके जास्तीत जास्त पाणी कमी तेवढे आपले आरोग्य चांगले राहू शकते शिवाय आपल्या शरीराची त्वचा देखील चांगली राहण्यास मदत होत असते. परंतु बरेच जण हे थंड पाणी पीत असतात. तर थंड पाणी पिणे आपल्याला फायदे होऊ शकतात की नुकसान याबद्दल आपण जाणून घ्यायला हवे. थंड पाणी पिल्यामुळे होणारे फायदे व नुकसान याबद्दल, आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात !

वाचा  डोळ्यावर पडदा येणे या समस्या ची कारणे आणि घरगुती उपाय :-

थंड पाणी पिण्याचे फायदे :-

उन्हाळा म्हटला, की आपल्याला थंड पाणी प्यावेसे वाटत असते. एक प्रकारे थंड पाणी पिल्यामुळे आपली तहान लगेच भागत असते. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या गरम पाणी प्यावेसे वाटत नाही. त्यामुळे,थंड पाण्याचे आपण सेवन करत असतो. ज्या लोकांना ऍसिडिटी झाली असेल, तर अशावेळी तुम्ही कोमट पाण्याचे सेवन करायला नको. कारण, ऍसिडिटी झाल्यानंतर जर तुम्ही कोमट पाण्याचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुमचे ॲसिडिटी कमी होण्याऐवजी जास्त प्रकारे वाढू लागते. म्हणूनच ज्यावेळी तुम्हाला ॲसिडिटीची समस्या येत असेल, अशावेळी तुम्ही थंड पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते. जर तुम्ही ऍसिडिटी झाल्यानंतर थंड पाणी पिले तर तुमची ऍसिडिटी ही लवकर जाण्यास मदत होते. शिवाय, ऍसिडिटी मुळे होणाऱ्या घशामध्ये होणारी जळजळ हे देखील थांबण्यास मदत होत असते.

थंड पाणी पिण्याचे नुकसान :- 

  • पाणी पिण्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया सुलभ राहण्यास मदत होत असते. परंतु, जर आपण थंडगार पाणी पीत असाल, तर आपल्या पचनक्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि आपल्या शरीराची पचन क्रिया ही जर बिघडली तर आपण खाल्लेले अन्न हे व्यवस्थित रित्या न पचता त्याचे चरबीत रूपांतर होत जाते म्हणजेच कालांतराने लठ्ठपणा येण्यास सुरुवात होत असते.
  • तुम्ही नियमितपणे जर व्यायाम करत असाल, वजन कमी होण्यासाठी शरीराच्या अनेक कसरती करत असाल, परंतु हे झाल्यानंतर जर तुम्ही थंड पाणी पिले तर तुमची मेहनत वाया जाऊ शकते. कारण, थंड पाणी पिल्यामुळे वजन तर कमी होणार नाही. उलट थंडगार पाणी पिल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
  • थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला पोट साफ न होण्याचा त्रास देखील होऊ शकतो. आपण जवलेले अन्न नीट पचण्यासाठी आपल्या शरीराची पचनक्रिया व्यवस्थित असावी लागते परंतु जर आपण थंडगार पाणी पीत असाल तर त्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊन पचन क्रिया आणि जड होते कालांतराने पोट साफ न होण्याची समस्या देखील येऊ शकते.
  • जर तुम्ही माठातील साधे पाणी पीत असाल तर कोमट पाणी घेत असेल तर त्यामुळे तुमचे अनेक आजारांपासून बचाव देखील होत असतो. परंतु जर तुम्ही नेहमीच थंड पाणी पीत असाल तर त्यामुळे तुम्हाला सर्दीचा त्रास होण्याची शक्‍यता असते शिवाय खोकला देखील लागू शकतो. एक प्रकारे तुम्हाला नेहमी सर्दी खोकल्याचा त्रास राहण्याची संभावना असते.
  • थंड पाणी पिल्यामुळे आपले शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही देखील कमी होत जाते शिवाय आपल्या शरीरामध्ये कफ होण्याचे प्रमाण देखील वाढत जाते. जर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर तुम्ही सारखे सारखे आजारी देखील पडू शकतात.
  • अतिशय थंड पाणी पिल्यामुळे आपल्या हृदया संबंधी देखील त्रास होण्याची शक्यता असते. थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला आपल्या हृदयाचे काम हे हळूहळू गतीने देखील होऊ शकते.
  • साध्या पाण्यापेक्षा आपणास थंड पाणी प्यावे असे वाटत असते परंतु, कारण साध्या पाण्यापेक्षा थंड पाणी ही तहान भागवल्या सारखे वाटते. परंतु, थंड पाणी पिणे आपल्या शरीरासाठी फार धोकादायक ठरू शकते.
  • आपल्या शरीरासाठी दिवसभर ऊर्जेची गरज असते. योग्य प्रकारे जर आपल्या शरीराला ऊर्जा मिळाली तर दिवस हा व्यवस्थित जात असतो शिवाय कुठलेही काम न थकता आपण करू शकतो. म्हणून बरेच जण सकाळी लवकर उठून योगासने करत असतात. ज्यामुळे त्यांना ऊर्जा ही व्यवस्थित प्रकारे मिळण्यास मदत होत असते परंतु योगासने केल्यावर काही जण साधा पाणी न देता थंड पाण्याचे सेवन करावा त्यामुळे त्यांच्या शरीराला मिळालेली ऊर्जा ही लगेच जाऊ शकते. म्हणजे जेवढा व्यायाम केला तेवढा शरीराला त्याचा फायदा होऊ शकत नाही.
  • अतिशय थंड पाणी पिल्यामुळे सर्दी खोकला यांसारखे प्रमाण तर वाढतेच परंतु, डोकेदुखी देखील होण्याचा त्रास होऊ शकतो.
  • आपल्या शरीराचे तापमान याचा विचार करून आपण पाण्याचे सेवन करायला हवे. जर गरम मध्ये थंड पाणी मिसळले तर आपल्याच शरीराला त्याची हानी पोचू शकते.
  • बरेच जण हे उन्हाळ्याच्या दिवसात फ्रिजमधील थंडगार पाणी देत असतात. परंतु फ्रिजमधे थंडगार पाणी पिल्यामुळे आपल्याला मूळव्याध यासारखे आजार देखील जडू शकतात. ज्यामुळे तसा त्रास आपल्या शरीराला होऊ शकतो.
  • अनेक जणांना जेवण झाले की नंतर लगेच थंड पाणी पिण्याची सवय असते. परंतु यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. शिवाय आपले खाल्लेले अन्न हे देखील पचत नाही. परिणामी, पोट दुखीची समस्या देखील येऊ शकते.
वाचा  पायाचा अंगठा दुखणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय :-

तर मित्रांनो, थंड पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी किती हानिकारक असू शकते हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. थंड पाणी पिल्यामुळे एक प्रकारे आपली तहान भागत असते परंतु त्याचे अनेक प्रकारचे हानीकारक त्रास आपल्या शरीराला होऊ शकतात. शिवाय आपली शरीराची पचन क्रिया हेदेखील मंद गतीने होऊ शकते. ज्यामुळे शरीरामध्ये अजून कुठल्यातरी व्याधी जडण्याची शक्यता असते. शिवाय जर आपल्या शरीराची पचनक्रिया ही मंदावली कमी झाली तर खाल्लेल्या अन्नाचे चरबी मध्ये रूपांतर होऊन जाते. जेणेकरून आपल्याला वजन वाढीची समस्या देखील होऊ शकते.

म्हणून आपण जितके जास्तीत जास्त साधे पाणी माठातले पाणी पिऊ तेवढे आपल्या शरीराचे नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो. शिवाय आपण सकाळी रोज उठल्यावर थंड पाणी न पिता कोमट पाण्याचे सेवन करायला हवे. कोमट पाणी पिल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे देखील होऊ शकतात. मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कसे वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून करू शकतात.

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here