दीर्घ श्वास घेण्याचे फायदे

0
658

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दीर्घ श्वास घेण्याचे फायदे सध्याचे जग हे धावपळीचे जग म्हणावे लागेल. कारण प्रत्येक जण हे कामात गुंतलेले दिसून येत असतात. अगदी त्यांना त्यांच्या स्वास्थ्याकडे देखील दुर्लक्ष करावे लागत असते. परंतु, मित्रांनो, आपल्याला आपल्या शरीराचे स्वास्थ्य हे जपायला हवे. कारण आपले शारीरिक तंदुरुस्ती ही चांगली असेल तर आपण कुठले काम हे सहज रित्या पार पाडू शकतो. म्हणून आपण आपल्या आहाराची देखील व्यवस्थितपणे काळजी घ्यायला हवी. आपल्या आहारात आपण सर्व प्रकार चे विटामिन्स, प्रोटिन्स, मिनरल्स, पोषक घटक, पोषकतत्व यांचा आवर्जून समावेश करायला हवा. जेणेकरून आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते. तसेच नियमित आपण सुकामेव्याचे देखील सेवन करायला हवे. त्यामुळे, देखील आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी म्हणजेच, एक प्रकारे इंधन मिळावे यासाठी आपण आपल्या शरीराकडून व्यायाम करून घेतला पाहिजे. म्हणजेच रोज योगासनांचा सराव देखील करणे अत्यंत गरजेचे ठरते. योगासनं केल्यामुळे एक प्रकारे आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते. आणि शरीराला चांगली ऊर्जा मिळाल्यामुळे पूर्ण दिवस ती ऊर्जा टिकून राहण्यास मदत होत असते. मग अशा वेळी कोणतेही काम हाती करायला घेतले तर ते न थकता आपण सहज रित्या पूर्ण करू शकतो.

         तर मित्रांनो, व्यायामाचे अनेक प्रकार आपल्याला माहीत असतील. सूर्यनमस्कार, चालण्याचा व्यायाम, कपालभाती, भुजंगासन, शवासन वगैरे इत्यादी अनेक प्रकारचे व्यायाम आपल्याला माहीत असतील. त्यातीलच एक म्हणजेच दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम. तर मित्रांनो रोज जर आपण दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम केला तर यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. आज काल सध्या धावपळीचे जग आहे. तर कामानिमित्ताने आपल्या सर्वांची धावपळ देखील होत असते. अनेक जणांना धावपळ करता करता लवकर थाप लागत असते. म्हणजेच धावताना अथवा पायर्‍या चढताना ते एका साईडला थांबून दीर्घ श्वास घेत असतात म्हणजेच त्यांना लवकर थकवा येत असतो. म्हणजेच थकवा आल्यावर ते लोक दीर्घ श्वास घ्यायला थांबत असतात. थकवा येणे दम लागणे असे आपण म्हणू शकतो. तर जेव्हा थकवा किंवा दम लागत असतो तेव्हा आपल्याला मोठा श्वास घेण्याची आवश्यकता असते. तर मित्रांनो असे धावपळ करताना होऊ नये यासाठी आपण नेहमी दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करायला हवा. जर आपण आपल्या रोजच्या दिनचर्येत व्यवस्थित योगासनांचा सराव करत असाल तसेच दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम करत असाल तर आपण अनेक समस्यांपासून दूर राहू शकतो. जर आपण आपल्या रोजच्या रूटीनमध्ये योगासनांचा सराव करत असाल तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही देखील चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. बऱ्याच लोकांना दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम म्हणजे नेमका कोणता? याबद्दल देखील माहीत नसते. तसेच दीर्घ श्‍वास घेतल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात या विषयाबद्दल देखील आपला माहिती असायला हवी. तर मित्रांनो आज आपण दीर्घ श्वास घेण्याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, दीर्घ श्वास घेण्याचे नेमके फायदे आपल्याला कोणत्या प्रकारचे होऊ शकतात? या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

दीर्घ श्‍वास घेणे म्हणजे नेमके काय करणे?

    आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी आपण दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करणे उत्तम ठरू शकते. तर मित्रांनो दीर्घ श्वास घेणे म्हणजे नेमके काय? दीर्घ श्वास घेणे म्हणजेच मोठा श्वास शरीराच्या आत घेणे आणि नंतर तो श्वास हळुवारपणे शरीराच्या बाहेर सोडणे होय. तर या व्यायामाला तुम्ही अनुलोम-विलोम व्यायाम करणे असे म्हणू शकतात. दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम एका चटईवर आरामदायक स्थितीमध्ये बसून घ्यावे. त्यानंतर मांडीवर दोन्ही हात सरळ ठेवून डोळे बंद करून घ्यावेत. नंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी वर बोट ठेवावे. व डाव्या नाकपुडीने श्वास शरीराच्या आत घ्यावा. त्यानंतर तो श्वास तुम्हाला जितका काळ रोखता येईल तितका वेळ रोखून ठेवावा. आणि नंतर डाव्या नागपुडीवर दुसरा बोट ठेवून उजव्या नागपुडी वरील अंगठा सोडून शरीरात घेतलेली हवा हळुवारपणे बाहेर सोडावी. तर अशी क्रिया तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे करावी. म्हणजेच शरीराच्या आत दीर्घ श्वास घेत रहा आणि तो हळुवारपणे सोडत रहा असे केल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होण्यास मदत होत असते. मित्रांनो, तुम्ही हा व्यायाम रोज सकाळी उठल्यावर करायला हवा. दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम नियमित केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे तुम्ही अनुभवायला लागाल. तर नक्कीच तुम्ही दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करून बघू शकतात. तर यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात हे आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  नाकावर फोड येणे या समस्या वर घरगुती उपाय

दीर्घ श्वास घेण्याचे शरीराला होणारे फायदे:-

मित्रांनो,आपण दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम हा नियमित केला पाहिजे. यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात, तर ते कोणते? हे आता आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

मानसिक ताण तणाव पासून आपण दूर राहू शकतो

   हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक जण कामामध्ये गुंतलेले दिसून येतात. त्यामुळे कामाचा लोड घेणे, कामामुळे आराम करायला न होणे वगैरे व अशा अनेक प्रकारच्या समस्या येत असतात. तर यामुळे बऱ्याच लोकांना मानसिक ताण तणाव येत असतो. आणि ताण तणाव आल्यामुळे डोकेदुखी वगैरे असे समस्या येत असतात. तर मित्रांनो, आपला मानसिक ताण तणाव घालवण्यासाठी आपण दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करणे आवश्यक ठरते. दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम केल्यामुळे एक प्रकारे आपण मानसिक ताण तणावापासून दूर होत जातो. शरीराच्या आत हवा घेतल्याने व बाहेर सोडल्यामुळे आपला थकवा देखील निघून जाण्यास मदत होत असते. दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करताना आपल्याला एक प्रकारे शांततेचा अनुभव देखील येत असतो. जर तुम्हाला मानसिक ताण-तणाव यापासून दूर रहावयाचे असेल, तर तुम्ही नियमितपणे दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम चा सराव करायला हवा.

दीर्घ श्वास घेतल्यामुळे मन शांत राहण्यास मदत होत असते

     जर सतत कामांमध्ये गुंतुन असाल तर त्यामुळे मन हे सैरावैरा फिरत असते. म्हणजेच कामाचे टेन्शन घेणे, तसेच दिलेल्या वेळात काम पूर्ण करणे वैगरे यामुळे मनात सतत काही ना काही धावपळ चालत असते. यामुळे आपले मन शांत न राहता सतत काही ना काही विचार करत असते. म्हणजेच एक प्रकारे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होऊ शकतो. म्हणजेच कुठलेही काम करताना चित न लागणे, सतत मनात विचार असल्यामुळे काम व्यवस्थित न करणे वगैरे यांसारख्या समस्या येऊ शकतात. तर आपले मन शांत रहावे यासाठी आपण सकाळी लवकर उठून दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम केला पाहिजे. दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करताना आपले मन स्थिर राहू शकते. तसेच, दीर्घ श्वास आत घेणे व बाहेर सोडणे या प्रक्रियेमुळे आपले मन हे शांत देखील होऊ लागते. म्हणून दीर्घ श्वास घेण्यामुळे मन शांत राहण्यास मदत देखील होऊ शकते.

वाचा  स्वप्नात आई एकविरा दिसणे शुभ की अशुभ ?

आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते

  दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम केल्यामुळे एक प्रकारे आपल्या शरीरातील ऑक्सीजन पातळी ची वाढ देखील होऊ शकते. बऱ्याच लोकांना काम करताना धावपळ झाल्यामुळे, तसेच कुठल्याही प्रकारच्या पायऱ्या चढल्यामुळे लवकर थकवा येत असतो. म्हणजेच त्यांना लवकर दम लागत असतो. जर आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी ही चांगली असली तर लवकर दम लागत नाही. शिवाय, ते काम करताना आपण ते व्यवस्थित देखील करू शकतो. जर आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी ही व्यवस्थित ठेवायची असेल तर आपण दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम नियमित करायला हवा. आणि हा दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम पहाटे लवकर उठून करायला हवा. जेणेकरून, बाहेरील शुद्ध ताजी हवा ही आपल्या शरीरात जाऊ शकेल.

दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते

आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी आपण नियमित व्यायामाचा सराव करायला हवा. त्याचप्रमाणे, आपण दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम देखील नियमित करायला हवा. दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही देखील चांगली होत असते. शिवाय, आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती देखील वाढण्यास मदत होत असते. सकाळी लवकर उठून हा व्यायाम केल्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. सकाळी हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे चांगल्याप्रकारे असते. तसेच सकाळची ताजी हवा ही शुद्ध देखील असते. आणि अशावेळी जर आपण लवकर उठून दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम केला तर सकाळची शुद्ध ताजी हवा ही आपल्या शरीरात जाते. ज्यामुळे, आपल्या शरीरातील ऑक्सिजन ची पातळी ही देखील चांगल्या प्रकारे वाढते. शिवाय, रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होत असते. तसेच सकाळची शुद्धता आपल्या शरीरात गेल्यामुळे आपल्या शरीराचे स्वास्थ्य देखील चांगले राहू शकते. म्हणून सकाळी लवकर उठून दीर्घ श्वास घेण्याचा व्यायामा चा सराव केला पाहिजे. जेणेकरून सकाळची शुद्ध ताजी हवा ही आपल्या शरीरात जाण्यास मदत होऊ शकते.

वाचा  सिझेरियन का करावे लागते? 

       तर मित्रांनो, दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम नेमका कसा करावा तसेच दीर्घ श्वास घेण्याच्या व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला किती प्रकारचे फायदे होऊ शकतात, हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. तर नक्कीच मित्रांनो तुम्हीदेखील दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करून बघायला हवा जेणेकरून तुमचे शारीरिक स्वास्थ्य चांगले राहू शकते.

     मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

       धन्यवाद.

वजन कमी करण्यासाठी विविध व्यायामाचे प्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here