विड्याचे पान खाण्याचे फायदे

0
940
विड्याचे पान खाण्याचे फायदे
विड्याचे पान खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो, विड्याचे पान हे सगळ्यांनाच माहिती असेल. कारण विड्याचे पान हे पूजेमध्ये लागणारे महत्त्वाचे स्थान आहे. विड्याचे पानठेल्यावर पूजेला अजूनही महत्त्व येते, विड्याच्या पानाला नागवेलीचे पान असेही म्हणतात. तसेच कळसात नारळ ठेवण्यापूर्वी, पाच विड्याची पाने ठेवतात. तसेच विड्याचे पान हे सुपारी सोबत ठेवतात सुपारी म्हणजे, पूर्वीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार विड्याचे पान हे पुरुष असतो, तर सुपारी ही त्याची पत्नी असते. हे दोघजण मिळाल्यावर, पूजन मध्ये संपन्नता मिळते. तसेच लग्न समारंभ, काही धार्मिक कार्यक्रम असतील, सत्यनारायण ची पूजन त्या पूजेमध्ये पानाचा वापर हा केला जातो.

तसेच लग्नसमारंभात नवरीच्या हातात चा पानाचा विडा तिच्या हातात घेऊन, तिला हळदीला बसवतात. खाण्यासाठी तर विड्याचे पान अगदी चांगले आहे. लग्नसमारंभात, पार्टीमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये पान वेगवेगळ्या प्रकारे खायला देतात. त्याच्या पानामध्ये सुपारी काथा, चुना, चेरी, बडीशोप, गोड दाणे, गुलकंद यासारखे पदार्थ टाकून खायला देतात. कारण हे खाल्ल्यामुळे तुमची मुखदुर्गंधी जाते. शिवाय तुम्ही जे अन्न पदार्थ खातात, ते पचण्यास सोपे जाते. जेवणानंतर काही जण आवर्जून पान खातात. विड्याचे पान खाल्ल्यामुळे ते ओठावरची लाली आणि ते खायलापण अगदी सुंदर लागते. तसेच विड्याचे पान हे पूजेसाठीच नाहीतर खाण्यासाठीही, व त्याचे आपल्या शरीरासाठीही खूप फायदे होतात. चला तर मग आज आपण विड्याच्या पानाचे आपल्या शरीरासाठी अजून कोणकोणते फायदे होतात ? ते जाणून घेणार आहोत. 

विड्याच्या पानाचे आपल्या शरीराला होणारे फायदे ? 

विड्याच्या पानांचे आपल्याला शरीराला खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोणकोणते ? चला तर जाणून घेऊयात. 

वाचा  सिझेरियन नंतर घ्यावयाची काळजी.

विड्याच्या पानातील गुणधर्म :

मित्रांनो, विड्याच्या पानातील गुणधर्म खूप सारे आहेत. विड्याच्या पानामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, ऑंटीएक्सीडेंट, खनिजे, फायबर, प्रोटिन्स, मिनरल्स, विटामिन्स हे घटक असल्यामुळे, आपल्या शरीरातील समस्येवर विड्याचे पान, हे आपल्याला फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही नियमित वेळेचे पान खावेत. 

मुखदुर्गंधी निघते :

काही लोकांचे तोंडाचा खूप घाण वास येतो, त्यांच्या बाजूला बसू नये, असे वाटते. अक्षरशः बोलतानाही चीड येते. कारण त्यांच्या तोंडात किंवा दातात अन्नपदार्थ अडकले असतील, तर की त्याच्या तोंडातून मुखदुर्गंधी येण्याचे समस्या होतात. अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या आहारात विड्याचे पान खाल्ले, तर त्यांना यासारख्या समस्येवर आराम मिळेल. कारण की  विड्याचे पान खाल्ल्यामुळे आपल्या मुखदुर्गंधी जाण्यास मदत होते. विड्याच्या पानांमधील चुना, कात, गुलकंद, बडीशोप व वेलदोडा हे सगळे घटक मुखदुर्गंधी जाण्यास मदत करतात. शिवाय तुमचा माउथ फ्रेशनर चे काम होते. रोज जेवणानंतर पान खा जावे. 

अन्नपचनाची क्रिया सुरळीत होते :

काही जणांना पोट भरल्यासारखे वाटते, अपचन सारखे वाटते, अजीर्ण झाल्यासारखे वाटते याला कारणीभूत म्हणजे, तुमची अन्नपचनाची क्रिया सुरळीत नाहीत. त्यासाठी जर पान खाल्ले, तर तुम्हाला फायदेशीर ठरते. विड्याच्या पानांमध्ये ऑंटी एक्सीडेंट, फायबर, जीवनसत्वे, मिनरल्स, यासारखे गुणधर्म असल्यामुळे, आपले अन्नपचनाची क्रिया सुरळीत होते. जर तुम्ही एक जेवणानंतर रोज विड्याचे पान खाल्ले, तर तुम्हाला तुम्हाला फरक जाणवेल. म्हणूनच तर कोणतेही कार्यक्रमास, लग्नसमारंभ असो, जेवणानंतर पान आवर्जून खायला देतात. 

डोके दुखीचा त्रास यावर आराम मिळतो :

खूप वेळा मानसिक ताणामुळे, काही जणांना डोकेदुखीची त्रास होतो. अशा वेळी जर तुम्ही विड्याच्या पानांचा उपयोग केला, तर तुम्हाला फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला विड्याचे पान पाट्यावर वाटून किंवा मिक्सरमध्ये पेस्ट करून, ती तुमच्या कपाळावर लावायचे आहे. असे दिवसातून दोन वेळेस केल्यास तुमच्याकडे कपाळपाटीचे दुखणे, तसेच डोकेदुखीचे समस्येवर तुम्हाला आराम मिळेल. 

वाचा  घराची अंतर्गत व बाह्य स्वच्छता कशी ठेवावी ?

घशातील कंठ सुधारते, इन्फेक्शन असेल तर जाण्यास मदत मिळते :

 बाहेरच्या धुळीचे कण घशात गेल्यामुळे, घशात इन्फेक्शन होते. कंठ दुखतो, सुजतो, तसेच आवाज घोगरा येतो, घसा खवखवतो, यासारख्या समस्या असतील, तर तुम्ही आवर्जून विड्याच्या पानाचा वापर करावा. त्यासाठी तुम्हाला विड्याचे पान, त्यामध्ये ज्येष्ठमध पावडर, सुंठ पावडर किंवा काळीमिरी पावडर, चिमूटभर टाकायचे आहे, व थोडीशी कात टाकायचे आहेत. या तिघांचे मिश्रण टाकून,हे पान घडी करून, तुम्हाला कच्चे चावायचे आहे. तो रस तुमच्या घशाला लागून, तुमच्या घशातील इन्फेक्शन, घसा खवखवणे, दुखणे तसेच आवाज घोगरा येणे, यासारख्या समस्येवर तुम्हाला आराम मिळतो. 

तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढते :

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. पण विड्याचे पानामुळे तुमच्या चेहर्‍याचे सौंदर्य वाढते. कारण काहीजणांच्या चेहऱ्यावर काळे डाग, मुरूम डाग, काळे चट्टे, डोळ्याखाली वर्तुळे, यासारख्या समस्या असतात. तसेच त्यामुळे त्यांची त्वचा रुक्ष आणि कोरडी होऊन जाते. अशा वेळी जर त्यांनी विड्याच्या पानांची पेस्ट करून, तुमच्या चेहऱ्याला लावली. तर तुम्हाला या सारख्या समस्येवर आराम मिळतो. शिवाय चेहऱ्याला एक चमकदारपणा येतो. कारण विड्याच्या पानांमध्ये अँटी एक्सीडेंट चे प्रमाण असते. तसेच तुम्ही विड्याचे पान, त्यामध्ये कोरफड जेल, चिमूटभर हळद, मध यांचे मिश्रण एकजीव करून, तो लेप तुमच्या संपूर्ण चेहर्‍यावर व मानेवर लावून, त्यावर पाच मिनिटे मसाज करावा. असे नियमित केल्यास, तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत मिळते. शिवाय चेहऱ्यावर स्किन इन्फेक्शन असेल, तर तेही जाण्यास मदत मिळते. 

शरीरावर जखम असेल, तर ती भरून जाण्यास मदत मिळते :

जर तुम्हाला जखम, फोड, खाज येणे, यांसारख्या समस्या असतील, तर अशा वेळी जर तुम्ही विड्याच्या पानाचा उपयोग केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला विड्याचे पान त्यात खोबरेल तेल किंवा एरंडेल तेल व चिमूटभर हळद यांचे मिश्रण करून, तुम्हाला जिथे जखम झाली त्या ठिकाणी तो लेप लावावा. त्याने तुमच्या जखमा लवकर भरून निघतात. 

वाचा  जेवणाचे ताट ओलांडू नये असे का म्हणतात ?

चेहर्यावरील तीळ तसेच मस ल्यास वापरून बघा :

काही जणांच्या चेहऱ्यावर तीळ आणि मस तयार होतो. तीळ आणि मस हा तुमच्या त्वचेमधील बॅक्टेरिया बाहेर निघत नसेल, तर त्या जागेवर त्यांचे रूपांतर होते. अशावेळी तुम्हाला ते जाण्यासाठी विड्याच्या पानाचा फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला विड्याची पानं वाटून, त्यामध्ये थोडा चुना टाकून, या दोघांचे मिश्रण तुम्हाला ज्या जागेवर तीळ आणि मस आहेत त्या जागेवर पाच ते दहा मिनिटे राहू द्यायचे आहेत. असे तुम्ही नियमित केल्यास ते जाण्यास मदत मिळते. 

विड्याचे पान घेताना कसे घ्यावे ? 

विड्याचे पान घेतानाही, अगदी स्वच्छ हिरवे असेल तर चालते. तसेच त्यामध्ये कीड लागलेली नसावी, किंवा फाटके नसावे, खाताना विड्याचे पान हिरवी पोपटी असल्यावर, त्याचे गुणधर्म तुम्हाला अजून मिळतात, त्यापासून तुम्हाला तुमच्या शारीरिक समस्येवर आराम मिळतो. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला विड्याच्या पानापासून तुमच्या शरीराला होणारे फायदे सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, विड्याचे पान वापरून तर तुम्हाला फरक पडत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना एकदा दाखवावे. तसेच तुमची स्किन सेंसिटिव असेल, तर ते वापरण्यापूर्वी स्किन स्पेशलिस्टचा एकदा जरुर सल्ला घ्यावा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये तुम्हाला जर काही शंका-कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

       

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here