पायातला काटा काढण्यासाठी उपाय

0
2600
पायातला काटा काढण्यासाठी उपाय
पायातला काटा काढण्यासाठी उपाय

नमस्कार, मित्रांनो लहानपणी खेळता-खेळता खुप जणांच्या पायात काटा गेला असेलच. तसेच खूप वेळा लहान मुलांची सवय असते, क्रिकेट खेळतात, तेव्हा झाडा-झुडपांमध्ये जर बॉल गेला, तर ते काढण्यासाठी जातात, त्यावेळी त्यांच्या पायात काटा रुततो. म्हणजेच पायात काटा जातो, त्यावेळी त्यांना ते समजून येत नाही. पण नंतर तो पाय दुखायला लागतो, जर पायातला काटा वेळेवर काढला नाही, तर त्यामध्ये इन्फेक्शन व पस (पु) होण्याची शक्यता असते. मग त्यावेळी तो काटा डॉक्टरांकडे जाऊन काढावा लागतो.

तसेच आपण आपल्या कंपाउंडच्या बाजूला बागकाम करतो, त्यावेळी काटेरी झुडपे हे असतातच, त्यामध्ये गुलाबाचे म्हणा, नींबू, संत्री, चिकू यांच्या झाडांचे काटे हे खाली पडले, की ती आपल्या पायात जाण्याची शक्यता असतेच. तसेच शेती काम करणाऱ्या लोकांचे ही पायात काटे जातात. त्यावेळी त्यांना तीव्र वेदना होतात. कधी कधी काहीजणांना रक्त येते, मग तो काटा आपणास त्यांना वेळीच काढावा लागतो, तर आज आपण जाणून घेणार आहोत, की पायात काटा गेलात, तर त्याला काढण्यासाठी, काही घरगुती उपाययोजना, चला तर मग जाणून घेऊयात. 

पायात काटा गेल्यास काय काळजी घ्यावी ? 

जर तुम्हाला जाणवले, कि तुमच्या पायात काटा गेला आहे, अशावेळी तुम्ही घरी येउन, स्वच्छ पाण्याने पाय धुऊन घ्यावेत. नंतर कोरडे करून, तो काटा कोणत्या ठिकाणी आहे, त्याची पाहणी करून घ्यावे. पायात काटा गेल्यास कुठेही फिरू नका. तो काटा अजून आत मध्ये जाण्याची शक्यता असते, तसेच काही जणांची अशी सवय असते,की काटा केला, की लगेच सुई किंवा टाचण पिन घेतात, आणि काटा काढण्याचा प्रयत्न करतात. कृपया तुम्ही जर पायामध्ये काटा गेला, तर आधी ऑंटीसेप्टीक क्रीमने सुई किंवा टाचण पिन स्वच्छ करून घ्यावेत, नंतरच काटा काढावा. जर तुम्ही तसे केले नाही, तर त्यांचा गंज लागून, पायाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, ही काळजी घ्यावी. 

वाचा  राईच्या तेलाचे फायदे

पायातील काटा काढण्यासाठी, काही घरगुती उपाय ! 

मित्रांनो, जर पायात काटा गेला आणि तो वेळेवर जर नाही निघाला, तर तिथे कुरुप होण्याची शक्यता असतेच. कुरूप म्हणजे एक प्रकारचा एक जाड थर, जो काटा पायात जातो, त्याच्या आजूबाजूला तयार होतो, आणि जास्त दिवस झाले, तर त्यामध्ये इन्फेक्‍शन होते, तिथे पु व तेथून रक्त येते, यासारख्या समस्या आपल्याला बघायला मिळतातच. त्यासाठी आम्ही तुम्हाला जर काटा गेला, तर तो काढण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात ! 

हिंगाचा वापर करून बघा :

मित्रांनो, जर पायामध्ये काटा गेला, की ती जागा खूप दुखते, अक्षरशः चालता येत नाही. आपण लंगडत चालतो, अशा वेळी जर तुम्ही हिंग चा वापर केलाच, तर तुम्हाला फायदा मिळेल. त्यासाठी तुम्हाला हिंग पाण्यामध्ये मिसळून घ्यावेत, नंतर ज्या ठिकाणी तुमच्या पायात काटा गेला आहे, त्या ठिकाणी तर पायाला लावावा, त्यानंतर तुमचा काटा हळू बाहेर निघण्यास मदत मिळते, व इन्फेक्शन होत नाही. 

मिठाचा वापर करा :

पायाचा काटा गेल्या, की खूप दुखतो, त्यामुळे रक्त येते. इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशावेळी जर तुम्ही मिठाचा वापर केला, तर तुम्हाला फायदा मिळेल. मग आता मीठ कोणते वापरायचे, तर  तुम्ही जाड मीठ किंवा सैंधव मीठ हे वापरू शकतात. त्यासाठी मीठ तुम्हाला पाण्यामध्ये टाकून, तुमचा पाय त्या पाण्यात दोन मिनिटे भिजू द्यावा, आणि त्यानंतर तुम्हाला तो काटा, ट्विंजर च्या साह्याने अँटीसेप्टीक क्रीम लावून तो काटा काढायचा आहे. पाण्यात पाय भिजल्यामुळे, पायातला काटा लवकर निघण्यास मदत मिळतो. 

बाभूळ चा पाला वापरून बघा :

बाबूळ हे झाड आहे. या झाडाचा पाला काटा काढण्यासाठी फायदेशीर ठरतो. जर तुमच्या पायात काटा गेला, आणि तिथे इन्फेक्शन झाले असेल, तसेच तेथे कुरूप झाले असेल, अशावेळी जर तुम्ही बाभळीचा पाला पायाला लावल्यास, तुम्हाला फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला बाभुळ च्या झाडाची पाने आणून, ती कुठून घ्यायची आहे, व गरम करून त्यानंतर ती पाने तुमच्या पायाला ज्या ठिकाणी काटा रुतला आहे, त्या ठिकाणी रात्रभर बांधून ठेवायचे.  नंतर दुसऱ्या दिवशी पाला काढून, तो काटा सुईच्या, ट्विंजर च्या साह्याने तुम्हाला अलगद काढायचा आहे. 

वाचा  रात्री झोपण्याआधी दूध हळद पिल्याने काय फायदे होतात?

बेकिंग सोड्याचा वापर करा :

पायात काटा गेला, की तो कुठे गेला आहे, लवकर कळून येत नाही. अशा वेळी तुम्ही पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळून त्यामध्ये पाय पाच मिनिटे भिजवून ठेवावेत. त्यानंतर पाय बघावे, तुम्हाला हळूच तुमचा काटा वर आलेला दिसेल, मग तुम्ही काटा काढण्याच्या, ट्विंजर च्या सहाय्याने/ चिमटा वापरून काढू शकतात. 

केळाच्या सालीचा वापर करून बघा :

हो, तुम्हाला नवल वाटेल. पण केळ्याची साल ही काटा काढण्यासाठी फायदेशीर ठरते. जर तुमच्या पायात काटा गेला आहे, आणि ती जागा खूप दुखत असेल, अशावेळी जर तुम्ही केळयाची सालीचा वापर केला, तर तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला केळ्याची साल ज्या ठिकाणी पायात काटा गेला आहे, त्या ठिकाणी रात्रभर तशीच बांधून ठेवायचे आहे. सकाळी उठल्यावर तुम्हाला ते काढायचे आहे, या मुळे तुमच्या पायातील काटा अलगद बाहेर निघून जाण्यास मदत मिळते.

पायात काटा गेल्यास, त्या जागेवर कोणते औषध लावावेत ? 

सहसा करून पायात काटा गेला असता, तुम्ही पाय स्वच्छ धुऊन त्या जागेवरील काटा काढून, त्या ठिकाणी अंतीसप्तिक क्रीम लावू शकतात. तसेच जर तो त्रास तुम्हाला जास्त प्रमाणात होत असेल, पायातून रक्त येत असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन औषध घेऊ शकतात. डॉक्टर हे तुम्हाला आणखी  अँटीसेप्टीक क्रिम देतील, शिवाय तुम्हाला धनुर्वाताचे इंजेक्शन हे देतील. 

चला, तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की पायातला काटा केल्यास, काय काळजी घ्यावी, व पायात काटा गेल्यास कशाप्रकारे काढावा, तसेच आम्ही सांगितला माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here