उन्हाळ्यातही आणि सुंदर तजेलदार चेहरा पाहिजे असेल तर काय करावे

0
502
उन्हाळ्यातही आणि सुंदर तजेलदार चेहरा पाहिजे असेल तर काय करावे
उन्हाळ्यातही आणि सुंदर तजेलदार चेहरा पाहिजे असेल तर काय करावे

नमस्कार, मित्रांनो सगळ्यांनाच आपला चेहरा एकदम सुंदर असा असायला हवा, असे वाटतेय. तसेच काही जण त्यांच्या त्वचेची काळजी घेतात. पण काही लोक जणांना कामानिमित्त, धावपळ, निमित्त त्यांना त्यांच्या त्वचेची काळजी घ्यायला, वेळ मिळतच नाही. तसेच बदलत्या वातावरणामुळे, अवेळी खानपानमुळे, वाढलेल्या प्रदूषणामुळे, उन्हाळ्यातही बाहेर जाणे यासारख्या गोष्टींमुळे त्याचा परिणाम त्वचेवर होतो. तसेच प्रत्येकाची वेगळी असते, तर कोणाची तेलकट असते, तर कोणाची रुक्ष, तर कोणाची सेंसिटिव असते, या तीन प्रकारची त्वचा असलेल्यांना वेगवेगळ्या सीजन मध्ये त्यांच्य त्यांचे फायदे व तोटे मिळतात. तेलकट त्वचेला हिवाळ्यामध्ये फायदा होतो, कारण त्यांच्या त्वचेचे तेलकटपणामुळे संरक्षण होते. तर रुक्ष त्वचेचे हिवाळ्यात खूप जपावे लागते.

कारण त्यामध्ये त्वचेला कोरडेपणा जास्त येतो, तसेच उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेला खूप जपावे लागते. कारण उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेवर पिंपल्स, फुटकुळ्या, काळवंडणे यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तसेच ते काही मेकप करता तो लवकर खराब होतो. तसेच उन्हाळ्यामध्ये गरम हवा त्वचेला लागून, त्वचेचे इन्फेक्शन भरपूर जणांना होते.काहीजणांना घामोळ्या जास्त प्रमाणात येतात. तर काहीना  घामाची ॲलर्जी होते, तर आज आपण जाणून घेणार आहोत, की उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला सुंदर तजेलदार चेहरा हवा असेल तर त्यावर कोणते उपाय करावे? व काय काळजी घ्यावी? चला तर मग जाणून घेऊयात! 

उन्हाळ्यामध्ये सुंदर व तजेलदार चेहर्यासाठी काही घरगुती उपाय ? 

सगळ्यांना आपली त्वचा एकदम सुंदर व तजेलदार असावी, असे वाटते. पण उन्हाळ्यामध्ये हा त्रास खूप जणांना होतो, की त्यांच्या चेहऱ्यावर काळवंडणे, येणे पुटकुळ्या होणे, या साऱ्या गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो. तसेच उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेला फार जपावे लागते, कारण त्यांच्या तैलीय ग्रंथी उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर तेल जास्त आणतात, त्यामुळे त्यांना पुटकुळ्या व मुरूम च्या गोष्टींना सामना करावा लागतो, व चेहऱ्यावर काळे डाग पडतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ते करून बघुयात ! 

वाचा  चेहऱ्यावरील नको असलेले केस काढणे

काकडीचा वापर करा :

उन्हाळ्यामध्ये काकडी ही रसदार असतेच, पण ती चेहर्यासाठी थंडावा ही देते. ती तुमच्या चेहऱ्यातील उष्णता शोषून घेण्याचे काम करते, तसेच जर तुमच्या चेहऱ्यामध्ये आग होत असेल, जळजळ होत असेल, यावरही प्रभावशाली ठरते. तसेच ती चेहर्यासाठी नॅचरल ग्लो करण्याचे काम करते. जर तुमच्या चेहऱ्यावर उन्हाळ्यात काळपटपणा आला असेल, अशावेळी जर तुम्ही काकडी किसून तुमच्या चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावून ठेवली, तर तुमचा चेहरा उजळण्यासाठी मदत मिळते. शिवाय चेहऱ्यावरील काळपटपणा ही लवकर निघतो, व पुटकुळ्या येऊन, पडलेले काळे डाग ही त्याने जाण्यास मदत मिळते. 

कोरफड चा वापर करा :

हो, कोरफड चा वापर हा अगदी पूर्वीच्या काळापासून, उन्हाळ्यामध्ये चेहर्यासाठी केला जात आहे. कोरफडी प्रत्येकाच्या घरात असतेच. त्यासाठी तुम्हाला कोरफड ही चेहरासाठी वापरायचे आहेत. कारण कोरफड मध्ये अँटीएक्सीडेंट, ऐंटीफंगल इन्फेक्शन, वर मात करण्याची क्षमता असते. त्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावर काळे डाग, व्रण तसेच त्वचेची जळजळ होणे, आग होणे, यासारख्या समस्या असतील, तर त्यावर खूप फायदा मिळतोच. त्यासाठी तुम्हाला कोरफड कापून तीचा जेल काढून चेहऱ्यावर, दिवसातून तीन वेळेस त्याने मसाज करायचा आहे. चेहऱ्यावर मसाज करताना गोलाकार पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटे संपूर्ण चेहऱ्याला त्याने मसाज करून, नंतर पंधरा मिनिटे कोरफड जेल चेहर्‍यावर तसाच राहू द्यायचा आहे. त्याने तुमच्या चेहरा उजळण्यासाठी मदत मिळते. शिवाय काळे डाग, चेहरा काळवंडला असेल, तसेच चेहऱ्याची जळजळ होत असेल, यासारख्या या समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळतो. शिवाय अतिरिक्त तेलही चेहऱ्यावरून जाण्यास मदत मिळते. 

पपईचा वापर करा :

पपई ही जरी उष्ण असते, तरी चेहर्यामधील उष्णता शोषून घेण्याचे काम करते. चेहऱ्या साठी पपई रामबाण उपाय आहे. तुमचा चेहरा काळवंडणे, त्यावर पपई एक फळ आहे, की तुमचा चेहरा लवकर उजळण्यास मदत करते, त्यासाठी तुम्हाला पपईचा गर काढून चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावायचे आहे, त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल, जर हा उपाय तुम्ही हप्त्यातून चार वेळेस जरी केला, तरी तुमचा चेहरा लवकर उजळेल. शिवाय उन्हाळ्यातील चेहरा काळवंडलेला पणा, अतिरिक्त तेल, हे जाण्यास मदत मिळते. तसेच पपईमध्ये आवश्यक ते व्हिटॅमिन्स तुमच्या चेहऱ्यासाठी असतात, त्यामुळे त्याचाही फायदा तुम्हाला होतो. 

वाचा  व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाल्याने काय होते व उपाय काय?

गुलाब जल वापरा :

उन्हाळ्यामध्ये त्वचेला दमट हवा लागल्यामुळे, त्वचा कोरडी पडते, शिवाय त्वचेवर अतिरिक्त तेल बाहेर येते, अशा वेळी तुम्ही गुलाब जल चा वापर केला, तर तुम्हाला आराम मिळेल. त्यासाठी तुम्हाला गुलाब पाणी हे दिवसातून चार ते पाच वेळेस चेहऱ्याला लावायचे आहे, त्याने कापसाच्या बोळ्यावर गुलाबजल घेऊन, चेहरा व माने चा भाग पुसून घ्यावा. असे केल्याने तुम्हाला उष्णतेचा त्रासही होत नाही. 

चंदन चा वापर करा :

चंदन हे थंड वनस्पती आहे, चेहर्यासाठी अगदी शीतल व थंडावा देतो, त्यासाठी चंदन पावडर घेऊन तुम्हाला त्यात चिमूटभर हळद टाकून, त्यामध्ये मुलतानी मातीचा पावडर अर्धा चमचा व त्यामध्ये गुलाबजल यांचे मिश्रण करून, चेहर्याला पंधरा मिनिटे लावायचे आहेत. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला थंडावा मिळतोच. शिवाय चेहऱ्यातील अतिरिक्त तेल असेल, तर तेही बाहेर जाण्यास मदत होते. शिवाय हा उपाय उन्हाळ्यामध्ये फार प्रभावशाली आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला सुंदर सतेज मुलायम व नॅशनल ग्लो मिळतो. 

लिंबू चा वापर करा :

हो, उन्हाळ्यामध्ये लिंबू चा वापर चेहर्यासाठी फायदेशीर असतो. कारण लिंबू मध्ये विटामिन सी असते. चेहर्यासाठी आवश्यक असते. जर तुमच्या उन्हाळ्यामध्ये त्वचा तेलकटपणा जास्त असेल, तसेच काळवंडलेली असेल, त्यावर काळे डाग असतील, अशा वेळी जर तुम्ही नींबू चा वापर केला, तर तुम्हाला खूप फायदा होतो. त्यासाठी तुम्हाला निंबु, त्यावर मध व चिमूटभर हळद या तिघांचे एकत्रित मिश्रण करून, चेहर्‍यावर त्याने पाच मिनिटे मसाज करून, चेहऱ्यावर ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यायची आहे. नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे. त्याने तुमचं चेहऱ्यावरील काळपटपणा जाईल, व नॅचरल सुंदरता येण्यास मदत मिळेल. 

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची ? 

उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्वचेची फार काळजी घ्यावी लागते. कारण बाहेरील उष्ण दमट हवेच्या तुमच्या चेहऱ्यावर लगेच परिणाम होतो. त्यामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल येणे, फुटकळ्या होणे, घामोळ्या होणे, यासारख्या समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळतो. त्यासाठी आपण अजून काय काळजी घ्यावी, हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. 

  • उन्हाळ्यात तुम्हाला तुमचा चेहरा दिवसातून, चार ते पाच वेळेस थंड पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे. 
  • तुम्ही चेहऱ्यावर आइसपॅक ही फिरवू शकतात. त्याने चेहरा सतेज दिसण्यास मदत मिळतो. 
  • उन्हाळ्यात बाहेर जाण्यापूर्वी, तुम्हाला चेहऱ्याला सन क्रीम लावायची आहे. 
  • बाहेर जाण्यापूर्वी तुम्हाला डोक्याला रुमाल व डोळ्याला गॉगल याचा वापर करावयाचा आहे. 
  • उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुती, कॉटनचे पांढरेशुभ्र कपडे वापरायचे आहे, त्याने उन्हाळ्यात उन्हाचा त्रास हा कमी प्रमाणात होतो. 
  • उन्हाळ्यामध्ये घामावाटे शरीरातील पाणी हे कमी होते, त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा, डीहायड्रेशन सारख्या समस्या होऊ शकतात, अशा वेळी तुम्ही शरीरासाठी पुरेसे पाणी प्यायचे आहे. 
  • उन्हाळ्यात तुम्ही लेमन ज्यूस, कोकम सरबत, कैरीचं पन्ह, चिंचेचा कोळ व गूळ टाकून त्याचे सरबत, हे तुम्हाला शरीरासाठी प्यायची आहे, कारण यातून तुम्हाला एनर्जी मिळवण्याचे काम भेटते, व उष्णतेचा त्रास होत नाही. 
  • जर उन्हाळ्यात बाहेर काम नसेल, तर जाणे टाळावेत. कारण उष्णतेचा त्रास हा फार होतो. त्यामुळे तुमचे आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. काम असेल, तरच उन्हात जावे, पण तेही रुमाल वगैरे बांधूनच जावे. 
वाचा  स्वप्नात बासरी दिसणे शुभ की अशुभ

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची, शिवाय उन्हाळ्यामध्ये सुंदर तजेलदार चेहरा हवा असेल, तर तुम्ही काय उपाय करू शकतात, व कशा प्रकारे करू शकतात. त्याची संपूर्ण माहिती आम्ही आज तुम्हाला दिलेली आहेतच. तसेच आम्ही दिलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका – कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here