उन्हाळ्यात आहार कसा असावा.

0
732
उन्हाळ्यात आहार कसा असावा.
उन्हाळ्यात आहार कसा असावा.

नमस्कार मित्रांनो. प्रत्येक ऋतूनुसार आपल्याला आपल्या स्वतःची काळजी घ्यावी लागत असते. प्रत्येक ऋतुमानानुसार कोणते कपडे घालावेत, ऋतूनुसार आहार कसा असायला हवा हे अंगी ठरले असते. म्हणजेच प्रत्येक ऋतूनुसार आपल्याला जुळवून घ्यावे लागत असते. उन्हाळा ऋतू म्हटला की उष्ण वातावरणाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. उन्हाळ्यात काय करावे व काय करू नये याविषयी आपलाला माहिती असायला हवी. उन्हाळ्यात आपल्या शरीराचे तापमान देखिल भरपूर प्रमाणात वाढत असते. आणि उन्हाळ्यात भरपूर प्रकारच्या समस्या या देखील येत असतात. उन्हात बाहेर जाताना आपण सन क्रीम लावायला हवी जेणेकरून आपल्या उन्हापासून थोडेफार संरक्षण होऊ शकेल.

उन्हाळ्यात कुठे बाहेर जाताना आपण आपल्या डोक्याचे संरक्षण व्हावे यासाठी आपण डोक्याला रुमाल तरी बांधला पाहिजे तसेच व्हायला हवा जेणेकरून होण्यापासून संरक्षण होईल. उन्हाळ्यात बऱ्याच जणांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील कमी होत असते. उन्हाळ्याच्या जास्त तापमान वाढीमुळे उन्हाळी लागणे, उष्माघात होणे, डोकेदुखी होणे, उलट्या होणे, मळमळ होणे, चेहरा काळवंडणे अशा एक ना अनेक समस्या या प्रत्येकाला होत असतात. तर बऱ्याच जणांना उन्हाळ्यात भूक न लागणे याचा त्रास देखील होत असतो. तर काहींना अपचनाची समस्या देखील होत असते. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचे तापमान वाढल्यामुळे त्वचेची आग-आग देखील होते. हातापायांची आग देखील होते. 

उन्हाळा म्हटला तर एक तर पहिलेच गरम वातावरण असते आणि त्यात आपल्याला थंडच खावेसे वाटत असते. परंतु उन्हाळ्यात जास्त थंड पदार्थ खाणे देखील चुकीचे ठरत असते. उन्हाळ्यात आपण कुठे बाहेर गेलो तरी आपला बाहेरील थंड खावेसे वाटत असते तसेच बाहेरील फास्ट फूड खायला देखील आवडत असते परंतु हे खाणे टाळले पाहिजे. बाहेरील उडवले पदार्थ खाल्ल्यामुळे आपली तब्येत बिघडू शकते. आपल्या शरीराचे आरोग्य जपणे आपल्याच हातात असते. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा अन्नपचन न होण्याच्या समस्या येत असतात.

उन्हाळ्यात एकदम एकाच वेळी जेवण करण्यात येते की आपण टाळायला कारण एकाच वेळी जेवण केल्यामुळे जेवणाचे व्यवस्थित पचन होत म्हणून आपण एकाच वेळेला जेवण करता दिवसातून तीन-चार वेळा खाऊ शकतो. म्हणून, उन्हाळ्यात आपल्याला आपला आहार हा व्यवस्थित प्रकारे घेतला पाहिजे. प्रत्येक ऋतूनुसार आहार हा वेग-वेगळ्या प्रकारचा असतो. तर मित्रांनो उन्हाळा नुसार आहार कसा असायला हवा याविषयी आपल्याला माहिती असायला हवी. आज आपण उन्हाळ्यात आहार कसा असावा या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग उन्हाळ्यात आहार कसा असायला हवा या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा   मोहरी तेल लावण्याचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

उन्हाळ्यात आहार कसा असायला हवा ?

मित्रांनो, उन्हाळ्यात ऋतूनुसार आपण कशा पद्धतीने आहार घ्यायला हवा याविषयी आपल्याला माहिती असायला हवी. जेणेकरून आपल्या शरीराचे तापमान जास्त वाढणार नाही व आपल्या आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकेल.

  1. उन्हाळ्यामध्ये आपण मसालेदार पदार्थ खाणे शक्यतो टाळायला हवे. कारण उन्हाळ्यात जर आपण मसाले युक्त पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीराचे तापमान हे अधिक वाढत असते. आणि यामुळे आपल्याला अपचनाची समस्या येऊ शकते. तसेच शरीराचे तापमान वाढल्यामुळे त्याचे ॲलर्जी देखील आपल्या शरीराराला होऊ शकते. आणि बऱ्याच वेळेस शरीरातील ऍसिडिटी चे प्रमाण देखील वाढू लागते.
  2. उन्हाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये शरीराचे डिहायड्रेशन होत असते. म्हणून आपल्या शरीराचे डीहायड्रेशन होण्यापासून बचाव व्हावा यासाठी आपण भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवे. तसेच आपण नारळ पाणी देखील प्यायला हवे.
  3. उन्हाळ्यात आपण जास्त जड प्रकारचा आहार घेऊ नये. तर उन्हाळ्यात आपण हलक्या प्रकारचा आहार नेत्याने आपल्या शरीरास फायदेशीर ठरू शकेल.
  4. उन्हाळ्यात आपण आपल्या आहारामध्ये साधी भाजी-भाकरी खावी. भाजी ही कमी तिखट असावी जास्त तिखट नसावी. तसेच डाळ भात गावरानी तुपासह खावा. तूपे टाकून खाल्ल्याने अन्नाचे लवकर पचन होण्यास मदत होत असते.
  5. तसेच उन्हाळ्यात आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करायला हवे. ज्वारीची, नाचनीची भाकरी आवर्जून खायला हवी.
  6. उन्हाळ्यामध्ये तुम्ही ताकाचे सेवन करायला हवे. तसेच दहीचे देखील सेवन करायला हवे.
  7. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी तुम्ही लिंबू सरबत कोकम सरबत कैरीचे पन्हे नारळाचे पाणी उसाचा रस, आवळ्याचे सरबत यांसारख्या पेयांचा आवर्जून समावेश करायला हवा.
  8. जर तुम्ही मांसाहारी पदार्थ यांचे सेवन करत असाल तर ते मांसाहारी पदार्थ हे तुम्ही सकाळी अथवा दुपारच्या जेवणात खायला हवे. परंतु, रात्रीच्या जेवणात ते खाऊ नये यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणजेच अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते.
  9. उन्हाळ्यामध्ये तुम्ही तेलकट पदार्थांचे सेवन म्हणजेच तळलेले पदार्थ खायला नकोत. कारण त्या मुळेच उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो.
  10. उन्हाळ्यामध्ये अनेकांना अपचनाची समस्या येत असते. म्हणून तुम्ही अन्न पचनास त्रास होईल असे पदार्थ खाऊ नयेत असे की बाहेरील अन्न खाणे, फास्ट फूड खाणे, मैदा युक्त पदार्थ खाणे टाळायला हवे.
  11. तसेच उन्हाळ्यामध्ये सकाळचे जेवण आणि दुपारचे जेवण हे व्यवस्थित प्रकारे घ्यायचे परंतु रात्रीचे पचन हे फारच कमी प्रमाणात खायला हवे. नाहीतर अन्नपचन याचा त्रास होऊ शकतो.
  12. उन्हाळ्यात आहारामध्ये तुम्ही कोशिंबीर खायला हवी. कांदा, काकडी, टोमॅटो,दही,लिंबू मिश्रित कोशिंबीर. यामुळे खाल्लेले अन्न लवकर पचनास मदत होत असते.
  13. अनेक जणांना जास्तीचे अन्न हे उरले असेल तर ते नंतर खाण्याची सवय असते. म्हणजे त्याला शिळे अन्न खाणे असे देखील म्हणतात. परंतु मित्रांना उन्हाळ्यात शिळे अन्न खाल्ल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे अण्णा पदार्थात बॅक्टेरिया हे पटापट वाढीस लागतात. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात शिळे अन्न खाणे शक्यतो टाळायला हवे.
  14. उन्हाळ्या च्या दिवसात तुम्ही जेवढे जास्तीत जास्त ताजे अन्न खाल तेवढे तुमच्या शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकेल.
  15. उन्हाळ्याच्तल्या दिवसात आपल्या शरीराचे तापमान हे समप्रमाणात राहायला हवे यासाठी आपण फळांचे सेवन करायला हवे. यासाठी आपण टरबूज, डाळिंब, सफरचंद, द्राक्षे, ड्रॅगन फ्रुट्स, ऊस, मोसंबी यांसारखे फळ आहे आवर्जून खायला हवीत. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी देखील व्यवस्थित राहण्यास मदत होऊ शकेल.
  16. उन्हाळ्या च्या दिवसांमध्ये शक्यतो तुम्ही चहाचे प्रमाण हे कमी करायला हवे किंवा पिऊ नये. तसेच कॉफी देखील शक्यतो घेणे टाळायला हवे. या ऐवजी तुम्ही शरबत नाहीतर दूध घेणे तुमच्या शरीरासाठी लाभदायक ठरू शकेल.
  17. तसेच शरीराचे तापमान वाढू नये यासाठी तुम्ही जिरे, धने आणि बडीशेप मिश्रित पाण्याचे सेवन देखील करायला हवे यामुळे देखील शरीराला एक प्रकारचा थंडावा मिळत असतो.
  18. उन्हाळ्यात आपण आहारासोबत मठ्ठा घेणे देखील आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरू शकते. जर उन्हाळ्यात लग्नसमारंभ असेल तर जेवणाच्या वेळी मठ्ठा हा आवर्जून ठेवला जातो.
  19. उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आहारामध्ये तांदळाची भाकरी देखील आवर्जून खायला हवे. आपल्या आहारामध्ये मुग डाळ युक्त खिचडी चा समावेश देखील आवर्जून करायला हवा.
  20. उन्हाळा लागला की बरेच जण आइस्क्रीमचे सेवन देखील करत असतात. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त आइस्क्रीमचे सेवन केल्यामुळे त्याचा देखील त्रास होऊ शकतो आणि शरीरातील तापमान हे देखील जास्त प्रमाण वाढू शकते. धरण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही एखाद वेळेस आईस्क्रीम खाऊ शकता. परंतु, नेहमी आईस्क्रीम खाने टाळायला हवे.
  21. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही तुमचा आहार जेवढा हलका ठेवा तुमच्या आरोग्यासाठी तेवढे चांगले ठरू शकेल.
वाचा  नखाला बुरशी लागणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

तर, मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात आहार कसा असायला हवा, या विषयाबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. जेणेकरून, शरीराचे स्वास्थ्य हे चांगले राहण्यास मदत होऊ शकेल. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान हे वाढत असते त्यामुळे भरपूर प्रमाणात समस्या ह्या होत असतात. म्हणून जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये योग्य त्याच घटकांचा समावेश केला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच कोणाचे दिवसात तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. आणि उन्हाळ्याच्या दिवसात आहार हलका असायला हवा.

मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here