सकाळी लवकर उठण्याचे फायदे ? व केव्हा उठावे

0
1276
सकाळी लवकर उठण्याचे फायदे व केव्हा उठावे
सकाळी लवकर उठण्याचे फायदे व केव्हा उठावे

नमस्कार, मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीच्या काळापासून माझी आई, आजी, बाबा, मामा, मावशी, हे सकाळी लवकर उठायचे, म्हणजे सकाळच्या चार वाजता ते उठायचे, व त्यांच्या उद्योगाला लागायचे. तसेच माझी आजी सकाळी लवकर उठून बाहेरचे अंगण झाडायची. तसेच माझे बाबा लवकर उठून आंघोळ करून, अंगणामध्ये व्यायाम करायचे. गावाकडील वातावरणही तसेच असते. सकाळची पहाट म्हणजे एकदम निराळेच असते. सकाळच्या वेळी त्या बैलांच्या व गाईंच्या गळ्यातील घुंगरू त्यांचा आवाज, मोहून जातो. सकाळच्या पक्षांचा किलबिलाट किती सुंदर असतो ना ! तसेच शेतामध्ये जाणाऱ्या लोकांची गर्दी, तर काही जणांची दूध काढण्याची घाई, तर काही जण मंदिरात जाऊन देव पूजा करण्याची घाई, हे बघून म्हणाला, अगदी मोहून जाते. तसेच सकाळचा सूर्योदय, सकाळची पहाट किती सुंदर असते ना ! पण हल्लीच्या जीवनशैलीमध्ये सकाळची पहाट हि लोक अकरा-बारा वाजता बघतात.

सकाळचा सूर्योदय होऊन, तो माथ्यावर येईपर्यंत, काही जण अंथरुणातच असतात. पण खरं सांगू हे आपल्या शरीरासाठी घातक ठरते. जर तुम्ही नियमित सकाळी लवकर उठले, तर त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते. पूर्वीच्या काळापासून पूर्वजांचे आरोग्य त्यामुळेच इतके सुंदर, निरोगी आहेत. आताच्या हायब्रीडच्या दुनिया मध्ये, अनेक जणांना आजार होतात, आणि समस्या बघायला मिळतात. तसेच उशिरा उठले म्हणजे दारिद्र्य अंगावर घेणे, अशी त्यांची म्हण होती, तसेच लहानपणी माझी आई मला खूप, रागवायची ग बाई दहा वाजले, कधी उठशील, त्यावेळी मला राग यायचा, मला सकाळी उशिरा उठायला आवडते, असे मी म्हणायची, पण आता मी मोठी झाली, आता मला त्यामधील खूप माहिती झाली आहे, आता मीच लवकर उठते. सकाळची पहाट आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असते, हे जाणून घेऊयात, की लवकर उठण्याचे फायदे नेमके आपल्या शरीरासाठी कोण कोणते असू शकतात? चला तर जाणून घेऊयात! 

सकाळी नेमके किती वाजता उठायला हवे ? 

पूर्वीच्या काळी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे सकाळच्या चार साडेचारच्या दरम्यान ते लोक उठायचे. पण आताच्या हल्लीच्या धावपळीच्या जीवनात रात्री झोपायला उशीर होऊन जातो, अशा वेळेस सकाळी जाग कशी येणार, तसेच काही जणांचे काम रात्री बारा ते एक वाजेपर्यंत असते. त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही, व लवकर उठल्याने त्यांना डोळ्यांची आग जळजळ सारख्या, समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळेस तुम्ही सकाळी सुर्योदया पूर्वी किंवा सूर्य उगवतो, त्यावेळी उठले तरी तुम्हाला त्याने फायदा होईलच. तसेच तुमच्या लवकर उठल्यामुळे तुम्हाला  ताजेतवाने वाटते व तुमचे मन अगदी फ्रेश राहते. आणि सूर्योदयापूर्वी जर तुम्ही उठले, तर तुम्हाला शारीरिक बिघाड या गोष्टींना सामना करावा लागत नाही. सूर्योदयानंतर जर उठले, तर तुमची कफ प्रवृत्ती, पित्त प्रवृत्ती, तसेच वात प्रवृत्ती होते, त्यामुळे तुम्हाला या सारख्या गोष्टीचा सामना करावा लागतो. 

वाचा  तांदळाचे पाणी पिण्याचे फायदे

सकाळी लवकर उठण्यासाठी काय करावे ? 

बहुतेक वेळेस काही जणांना, सकाळी लवकर जाग येत नाही. अशा वेळी त्यांनी रात्री लवकर झोपायला हवे. रात्री लवकर झोपले, तर लवकर जाग येते. तसेच तुमची रात्रीची झोप पूर्ण होणे, ही महत्त्वाचे आहे. तसेच सकाळी त्यांनी अलार्म लावायला हवा. तसेच सकाळी उठल्यावर खिडक्या उघड्या करून द्यावेत. त्याने घरात सूर्यकिरण घरात येऊन, तुमची झोप जाण्यास मदत मिळेल. सुरुवातीचे काही दिवस त्यांना हा त्रास होईल, नंतर सवय लागल्यावर, त्यांना आपोआपच सकाळी जाग येत जाईल. 

सकाळी लवकर उठण्याचे फायदे ? 

लवकर उठणे, आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी चांगले आहेत. सकाळी उठले की तुमचे मन फ्रेश राहते, तसेच दिवसभराचा ताण- तणाव हा सकाळी लवकर उठल्याने, लवकर निघतो. तसेच लवकर उठून, तुम्ही सकाळच्या सूर्यकिरणात बसले, तर तुमच्या शरीराला विटामिन डी हे मिळते. आपल्या शरीरासाठी विटामिन डी ची आवश्यकता असते, विटामिन डी आपल्या शरीराला मिळाल्याने, आपले हाडे व दात मजबूत होतात. तसेच सकाळची शांतता ही मनाला मोहून जाते. तसेच लवकर उठल्याने, आपल्याला अजून काही फायदे आहेत. ते जाणून घेऊयात. 

  • सकाळी लवकर उठल्याने, मनाला अगदी फ्रेश वाटते. 
  • तसेच आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हातील विटामिन्स मिळतात. 
  • आपले शरीर हे तंदुरुस्त, निरोगी राहते. 
  • तसेच तुम्ही तुमचे मन स्थिर बनवू शकतात, मनावर ताबा ठेवू शकतात. 
  • सकाळी लवकर उठल्यामुळे तुमचे तुमच्या कामात मन लागते. 
  • तसेच लवकर उठल्यामुळे, तुम्हाला भरपूर वेळ दिवसभरात मिळतो. 
  • तसेच लवकर उठून, तुम्ही योगासने करायला हवीत. त्याने तुम्हाला खूप फायदा मिळतो. 

सकाळी लवकर उठून काय करायला हवे ? 

अनेक जणांचे अशा समस्या असतात, की मी लवकर उठल्यावर माझ्या कामाला  जाण्याचा टाईम आणि लवकर उठण्याचा टाईम यामध्ये खूप अंतर असते, अरे यार काय एवढ्या लवकर उठू? पण असे करू नका, जर तुम्ही लवकर उठले, तर तुम्हाला एकदम फ्रेश वाटते, ताजेतवाने वाटते, सुरुवातीचे काही दिवस काही जणांना त्रास होतो. पण एकदाची सवय लागल्यावर, त्यांना आपोआप जाग येते. तसेच लवकर उठल्यावर, अगोदर चूळ भरावी. ब्रश करावा, मग गरम पाणी प्यावे. त्यानंतर चालायला जावे, तसेच चालायला गेल्यामुळे त्यांचे वजन जास्त असते, त्यांचे वजन आटोक्यात येते.

वाचा  बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे

शिवाय कित्येक आजार तुमच्यापासून दूर राहतात. तसेच योगासने करावेत. योगासनांमध्ये सूर्य नमस्कार, धनुरासन, वज्रासन, कपालभारती, अनुलोम- विलोम, नौकासन, यासारखे योगासने करू शकतात. हे तुम्हाला युट्युब वर ही मिळतात. त्याप्रमाणे करावे. त्याने तुमची शरीर व आरोग्य सुधारते. तसेच लवकर उठून, तुम्ही बिना चपलेचे कोवळ्या गवतावर चालल्यामुळे, तुम्हाला खूप फायदे होतात. तसेच नंतर चहा, नाश्ता करावा. नाश्ता करताना त्यामध्ये कडधान्य, इडली, तसेच पोहे, उपमा, रवा या सारख्या पदार्थांचा  समावेश करावा. तसेच तुम्ही नाश्त्यामध्ये दुधीचे थालीपीठ, मेथीचे थालीपीठ, यांचा समावेश करावा. याने तुम्हाला  पौष्टिक घटक तुमच्या शरीरात भेटतात. त्यामुळे तुमचा आरोग्य उत्तम राहते, व तुम्ही सुदृढ राहतात. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की सकाळी लवकर का उठावे, तसेच लवकर उठून तुम्हाला त्यापासून कोणता फायदे मिळतात, हे सांगितलेले आहेत.  तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here