उगवत्या सूर्य प्रकाश मध्ये बसण्याचे फायदे

0
779
उगवत्या सूर्य प्रकाश मध्ये बसण्याचे फायदे
उगवत्या सूर्य प्रकाश मध्ये बसण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत उगवत्या सूर्य प्रकाश मध्ये बसण्याचे फायदे ,आपल्या शरीराचे आरोग्य चांगले असेल तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी आपण दिवसाच्या सुरूवातीपासून आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी आपण नेहमी सकाळी लवकर उठायला हवे. पूर्वीच्या काळी तर लोक सूर्यकिरणे पडण्याच्या आधीच उठून घरातली सर्व कामं आवरून शेतामध्ये जात असे. त्यामुळे पूर्वीच्या काळचे लोकही आजारांपासून दूरच राहायची. तसेच त्यांची प्रतिकारशक्ती देखील चांगल्या प्रकारे वाढत असे. खरंच मित्रांनो जर आपण सूर्य किरणा निघण्याच्या आत लवकर उठलो म्हणजेच लवकर उठून व्यायाम केला तर आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले राहू शकते.

पूर्वीच्या काळातील लोक ही चार वाजताच उठून कामाला लागायची. सध्या आज-काल धावपळीचे जग असल्यामुळे आपण चार वाजता उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी पाच वाजता तरी उठून व्यायामाचे सराव करायला पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो. सकाळी लवकर उठल्यामुळे पुर्ण दिवस हा ताजातवाना वाटू लागतो शिवाय शरीरातील ऊर्जा दिवसभर टिकून राहण्यास देखील मदत होत असते त्यात जर आपण आजून सकाळच्या उगवत्या सूर्याचे दर्शन घेतले सूर्याची किरणे आपल्या अंगावर पडली तर त्यामुळे अधिकच फायदा आपल्या शरीराला होत असतो.

        सूर्य उगवताना बघणे हे तर शुभ मानले जाते. शिवाय उगवत्या सूर्याची किरणे आपल्या अंगावर पडल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे देखील आपल्याला होत असतात. या पृथ्वी वरील प्रत्येक प्राणी सजीवाला सूर्यकिरण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व आपले शरीर स्वस्थ दीर्घकाळ चांगले राहण्यास देखील मदत होत असते. जर नियमित आपण सकाळी लवकर उठून सूर्याच्या किरणा मध्ये बसल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. आपले आजी आजोबा तर नेहमी सांगत असतात की सूर्याच्या किरणा मध्ये बसले पाहिजे.

एक प्रकारे त्यांचे अनुभव ते आपल्याला सांगत असतात. तर मित्रांनो सूर्यकिरण मध्ये बसल्यामुळे कुठल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याविषयी आपल्याला माहिती असायला हवी. मित्रांनो आज आपण उगवत्या सूर्याचा प्रकाश यामध्ये बसल्यावर आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, उगवत्या सूर्यप्रकाशामध्ये बसल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात तसेच त्यापासून आपल्याला कोणत्या प्रकारची विटामिन्स भेटू शकतात? या विषयाबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  ऑलिव ऑइल याचा वापर केल्या मुळे होणारे शरीराला वेगवेगळे बहुमूल्य फायदे !

उगवत्या सूर्या प्रकाशा मधून आपल्याला कोणत्या प्रकारचे विटामिन्स मिळण्यास मदत होत असते?

       दिवसाची सुरुवात जर आपण सकाळी लवकर उठून केली तर आपला पूर्ण दिवस हा ताजातवाना वाटू लागतो. कारण संपूर्ण दिवसभर टिकून राहण्यासाठी जी ऊर्जा आपल्या शरीराला लागत असते ती दिवसा सकाळी लवकर उठल्यामुळे देखील मिळू शकते. तसेच उगवत्या सूर्यप्रकाशामध्ये बसल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. सकाळच्या सूर्याच्या किरणा मध्ये बसल्यामुळे आपल्या त्वचेला आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. खरतर सूर्याच्या किरणांमुळे अनेक प्रकारची रोगराई नष्ट होण्यास मदत होत असते. आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात जर आपण बसलो तर अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात.

      सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आपण बसल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त विटामिन डी  मिळत असते. विटामिन डी जे आपल्या शरीरासाठी फारच उपयुक्त ठरत असते. तर हे विटामिन डी आपल्याला सकाळच्या कोवळ्या सूर्य प्रकाशा मधून मिळू शकते. विटामिन डी  भेटल्यामुळे त्याचा फायदा आपल्या त्वचेला होत असतो. आपली त्वचा चांगली राहू शकते. तसेच सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये बसल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होत असते. शिवाय सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसल्यामुळे आपल्या शरीराची हाडे ही मजबूत व बळकट राहण्यासाठी देखील मदत होत असते त्यासाठी आपण नियमित सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसायला हवे.

       अगदी नवीन जन्मलेल्या बाळाला देखील सकाळच्या सूर्यकिरणांन मध्ये डॉक्टर्स पकडायला सांगतात. सकाळचे कोवळे ऊन बाळाच्या अंगार पडल्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते शिवाय बाळाला कावीळ देखील होत नसतो. म्हणून नवजात बाळाला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये धरले पाहिजे.

 

उगवत्या सूर्यप्रकाशामध्ये बसण्याचे फायदे:-

      मित्रांनो, सूर्याची किरणे पृथ्वीवर पडल्यामुळे अनेक प्रकारची रोगराई नष्ट होत असते. तसेच सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसल्यामुळे देखील आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होत असतात. तर सकाळच्या उगवत्या सूर्यप्रकाशामध्ये बसल्यामुळे आपल्या शरीरावर कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आता खालीलप्रमाणे जाणून घेऊयात!

  • आपल्या शरीरासाठी विटामिन डी मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. आणि सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसल्यामुळे विटामिन डी हे जास्तीत जास्त आपल्याला मिळत असते. त्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात.
  • दररोज सकाळच्या कोवळ्या प्रकाशामध्ये बसल्यामुळे आपल्या शरीराचे हाडे बळकट होण्यास मदत होऊ शकते.
  • लहान मुलांना कावीळ होऊ नये यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात पकडले पाहिजे. अगदी डॉक्टर सुद्धा स्वतःहून नवीन जन्मलेल्या बाळाला सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाची किरणे देण्यास सांगत असतात. ज्यामुळे त्यांना कावीळ होत नाही.
  • सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही पटापट वाढीस लागत असते. आणि आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती ही चांगली असल्या कारणामुळे आपण अनेक आजारांपासून दूर देखील राहू शकतो.
  • आपली त्वचा ही निस्तेज दिसत असते तर, सकाळी लवकर उठून सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यामुळे आपली त्वचा ही चमकदार दिसण्यासाठी देखील मदत होत असते.
  • दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड सर्कुलेशन हे देखील सुरळीत चालू राहते जेणेकरून आपली त्वचेची पोत देखील सुधारत असते व आपल्या शरीराला देखील अनेक प्रकारचे फायदे होत असतात.
  • दररोज सकाळी लवकर उठून सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये चालण्याचा व्यायाम केल्यामुळे देखील अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात. शिवाय असे नियमित केल्यामुळे दीर्घ काळ चिरतरूण दिसण्यासाठी देखील मदत होत असते.
  • तसेच दररोज सकाळी लवकर उठून कोवळ्या उन्हामध्ये व्यायाम केल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा देखील आपल्या शरीराला व्यवस्थित होत असतो.
  • सकाळच्या उगवत्या सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये जर आपण सूर्यनमस्कार चा व्यायाम केला तर यामुळे अधिक फायदे आपल्या शरीराला होत असतात. असे आपण नियमित केल्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो शिवाय आपले शरीर देखील लवचिक होण्यास मदत होत असते. तसेच, आपली त्वचा देखील ही चमकदार वाटू लागतो. एक प्रकारे नैसर्गिक ग्लो आपल्या त्वचेवर येऊ लागते.
वाचा  पायाचे व्यायाम कोणते व ते केल्यामुळे होणारे शरीराला वेगवेगळे फायदे :-

तर मित्रांनो, सूर्यप्रकाशाची आपल्या पृथ्वीतलावर अत्यंत गरज असते. सूर्य प्रकाश पृथ्वीवर पडल्यामुळे अनेक रोगराई पासून आपण दूर राहू शकतो. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये नियमित बसल्यामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. अनेक आजारांपासून आपला स्वतःचा बचाव करू शकतो. सकाळची सूर्यकिरणे मिळाल्यामुळे आपल्या शरीरातील डी व्हिटॅमिन चे प्रमाण जास्त प्रमाणात वाढू लागते आणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता देखील पटापट वाढू लागते. ज्यामुळे आपण व्हायरल इन्फेक्शन पासून देखील आपल्या स्वतःचा बचाव करू शकतो.

सूर्य करणे आपल्या त्वचेला मिळाल्यामुळे आपली त्वचा चमकदार बनू लागते. तसेच, चिरतरुण देखील राहण्यास आपल्याला मदत होत असते. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही पण सकाळी लवकर उठून सकाळच्या सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये बसायला हवे आणि शक्य असल्यास सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये व्यायामाचा सराव देखील करून बघायला हवा. त्यामुळे नक्कीच तुमच्या शरीराला चांगल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात.

     मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here