सनस्क्रीन का वापरतात व केव्हा वापरावी

0
763
सनस्क्रीन का वापरतात व केव्हा वापरावी
सनस्क्रीन का वापरतात व केव्हा वापरावी

तर मित्रांनो आज कालच्या जगामध्ये सर्व आपला चेहरा खूप प्रिय आसतो. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपण चांगला दिसावा म्हणून आपला चेहरा आकर्षक दिसावा म्हणून झटत असतो. त्यासाठी ते लोक अनेक प्रयत्न देखील करतात. कधी कधी त्या प्रयत्नांना यश येते तर कधी कधी त्या प्रयत्नांना यश येत नाही. कारण आपल्याकडे पुरेशी माहिती नसते आणि अपुरे माहितीमुळे आपल्याला त्याच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. टीव्हीतले मोठे मोठे कलाकार असो किंवा छोटा छोटा माणूस असो प्रत्येकाला वाटते की आपला चेहरा सर्वांहून अधिक सुंदर दिसावा आपला चेहरा सर्वात आकर्षक दिसावा. पण पृथ्वीचे तापमान एवढे वाढले आहे. वातावरणामध्ये देखील बरेच बदल झालेले आहे. अशावेळी सनस्क्रीन का वापरतात हे लोकांना माहित नसते. त्यामुळे याचा सरळ सरळ परिणाम आपल्या चेहऱ्यावर आपल्या त्वचेवर दिसून येतो. 

वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन साईड-इफेक्ट आपल्या चेहर्‍यावर त्वचेवर होऊ लागतात.या पासून कसे वाचावे यापासून आपण वाचू शकतो का याबद्दल आपणास चर्चा करणार आहोत. तर आपण सूर्यकिरणांपासून तर नक्कीच वाचू शकतो तेही सनस्क्रीनच्या मदतीने. चला तर मित्रानो या बद्दल थोडी अधिक माहिती घेऊ या की नक्की सनस्क्रीन काय असते. ती कशी वापरावी? ती का वापरावी? आणि केव्हा वापरावी? अशा सर्व प्रश्नांची उत्तर आपणास बघणार आहोत तर मग मित्रांनो जाणून घेऊया.

सन स्क्रीन म्हणजे काय ?

तर सन स्क्रीन म्हणजे एक प्रकारचे बॉडी लोशन आहे. म्हणजेच ते तुमच्या शरीराला  व तुमच्या त्वचेला सूर्याच्या इन्फ्रारेड रेज पासून वाचवतो.  म्हणजेच हे एक प्रकारचे बॉडीलोशन आहे जे आपल्या त्वचेला काही होण्यापासून ची व त्वचा जाण्यापासून वाचवते.

वाचा  वास्तुशास्त्रानुसार घराचा सेप्टीक टॅंक

सनस्क्रीन का वापरतात ?

आज-काल वातावरणाच्या बदलामुळे पृथ्वीच्या वरच्या भागातील सर्व म्हणजेच ओझोन लेअर ही कमकुवत होत चाललेली आहे. यामुळे सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक रेज आपल्या पर्यंत पोचतात आणि यामुळे त्वचा काळी पडू लागते. आपल्या त्वचेचे बरेचसे आजार होऊ शकतात. आपला चेहरा विद्रूप होऊ शकतो. या सर्वां पासून आपला बचाव करणारे लोशन म्हणजे सन स्क्रीन आहे. कारण जर तुम्ही सन स्क्रीन लावले असेल तर सूर्याच्या हानिकारक रेज आपल्या त्वचेपर्यंत पोचून देत नाही. म्हणून जे लोक समुद्रकिनारे जवळ राहतात किंवा समुद्राजवळ फिरायला जातात ते लोक मुख्यतः असं स्क्रीनचा वापर करतात. कारण त्या ठिकाणी सूर्याचे तीव्रता जास्त असते.

सनस्क्रीन केव्हा वापरावी ?

जसे की आपण वर बघितले की सनस्क्रीन मुख्यता जे लोक समुद्रकिनारी फिरायला जातात. ते लोक सनस्क्रीनचा वापर अधिक प्रमाणामध्ये करतात. याचप्रकारे ज्या ठिकाणी उन्हाची तीव्रता जास्त असते किंवा जास्त प्रखर ऊन असते त्याठिकाणी देखील तुम्ही सनस्क्रीनचा वापर करावा. याच प्रकारे तुम्ही घरांमध्ये देखील देखील सनस्क्रीनचा वापर करू शकता. जरी तुम्ही उन्हात जात असाल किंवा नसेल तरी देखील तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. याला कोणत्याही प्रकारची वेळेमध्ये मर्यादा नाही तुम्ही कोणत्याही ठिकाणी व कधीही सनस्क्रीनचा वापर करू शकता पण अधिक प्रमाणामध्ये सनस्क्रीनचा वापर टाळावा.

सनस्क्रीन वापरताना कोणती काळजी घ्यावी ?

बऱ्याच वेळेस लोक सनस्क्रीन लावतात पण त्याचबरोबर सनस्क्रीन लावताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी हे लोक जाणून घेत नाही. चला तर मग बघुया सनस्क्रीन लावताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी.

सनस्क्रीनचा थोडासा जाड थर लावावा ?

जर प्रखर ऊन असेल आणि जर तुम्ही सनस्क्रीन लावत असेल तर त्या सनस्क्रीनचा जाड थर तुमच्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर लावावा. जेणेकरून सूर्याची हानिकारक किरणा तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचणार नाही. बराच वेळ लोकं सनस्क्रीन लावताना ही चूक करतात की ते किसन स्क्रीनचा खूप पातळ थर लावतात. ज्यामुळे त्यांच्या त्वचेचे पूर्णपणे सूर्याच्या किरणांपासून बचाव होत नाही. अशी चूक करणे टाळावे व थोडासा जाडसर थर आपल्या चेहऱ्यावर सनस्क्रीनचा जाड थर लावावा तसेच सनस्क्रीन जर जिरत असेल तर थोड्या वेळानंतर पुन्हा सनस्क्रीनचा वापर आपल्या त्वचेवर करावा.

वाचा  वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा कसा असावा?

सनस्क्रीन वरील पूर्ण माहिती वाचावी :

बाजारामध्ये अनेक प्रकारच्या सनस्क्रीन उपलब्ध आहेत व अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सनस्क्रीनमध्ये बरेचसे वेगवेगळे घटक वापरले जातात. बरेच सनस्क्रीन या सारख्याच असतात पण काही सनस्क्रीन हा वेगळ्या देखील असतात.  म्हणून कधीही सन स्क्रीन आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर लावण्याआधी त्यावर दिलेली पूर्ण माहिती वाचावी. कारण बऱ्याच लोकांना त्वचेचे इन्फेक्शन असते किंवा सनस्क्रीनमुळे त्यांच्या त्वचेवर कोणते प्रकारचे साईड इफेक्ट होऊ शकतात.

यापासून जर तुम्हाला तुमचा बचाव करायचा असेल तर त्यावर दिलेली माहिती पूर्णपणे वाचावी. तसेच हे देखील पडताळून बघावे किती सनस्क्रीन कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी साठी उपयुक्त आहे. म्हणजेच ही सनस्क्रीन कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त आहे ? किंवा तेलकट त्वचेसाठी उपयुक्त आहे ? की साधारण त्वचेसाठी उपयुक्त आहे. या प्रकारची माहिती देखील तुम्ही पडताळून बघावी आणि मगच सनस्क्रीन तुमच्या चेहर्‍यावर लावावी. तसेच तुम्ही तज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता.

नैसर्गिक सनस्क्रीन प्राधान्य द्यावे :

आज-काल बाजारामध्ये वेगळ्या प्रकारची सन स्क्रीन उपलब्ध आहे. त्यामध्ये तुमच्या त्वचेला चांगली अशी सन स्क्रीन कोणती आहे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि जर तुम्ही एखाद्या प्रकारची सनस्क्रीन वापरत असाल तर त्याच प्रकारची सन स्क्रीन वापरावी. दरवेळेस सनस्क्रीन बदलू नये. कारण जर बऱ्याच प्रकारच्या सनस्क्रीन त्वचेवर लावल्या तर त्याचा साईड इफेक्ट तुमच्या त्वचेवर होऊ शकतो. म्हणून एकाच प्रकारची सन स्क्रीन ही चेहऱ्यावर लावावी.

सन स्क्रीन चा वापर कसा करावा ?

चला तर मग आपल्या पण शेवटच्या मुद्द्याकडे वळूया की नक्की सनस्क्रीनचा आपण वापर कोणत्या प्रकारे व कसा करावा. कारण बऱ्याच लोकांना सनस्क्रीनचा वापर कसा करावा हे माहीत नसल्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने सनस्क्रीन त्यांच्या त्वचेला लावतात. ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करायला लागतो. चला तर मग बघुया सनस्क्रीनचा वापर कोणत्या प्रकारे करावा.

सनस्क्रीन थेट चेहऱ्यावर लावावी :

बऱ्याच वेळेस लोक सनस्क्रीनमध्ये थोडेसे ऑइल मिक्स करून किंवा पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावतात. असे न करता सनस्क्रीन ही थेट चेहऱ्यावर लावावी. तसेच आपल्या चेहऱ्याच्या सर्व भागापर्यंत ति सनस्क्रीन लागेल याची दक्षता घ्यावी.

वाचा  कांद्याची पात याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध बहुमूल्य फायदे

खालीलप्रमाणे देखील सन स्क्रीन लावू शकता :

तर तुम्ही सर्वात पहिले सनस्क्रीन घ्यावी त्यानंतर ती दोन्ही हाताने चोळून तुमच्या चेहऱ्यावर लावावी. चेहऱ्यावर सनस्क्रीन लावताना चेहऱ्याची हळूहळू मसाज करावी. जेणेकरून सनस्क्रीन तुमच्या त्वचेमध्ये जिरेल सनस्क्रीन लावताना पापण्या, कान, मान या ठिकाणीदेखील सनस्क्रीन लागते आहे की नाही याची काळजी घ्यावी.

तर मित्रांनो आज आपण बघितले की सनस्क्रीन म्हणजे काय ? सनस्क्रीन का वापरावी ? ते कोणत्या प्रकारे काम करते ? याच प्रकारे सनस्क्रीन लावताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी ? आपण सनस्क्रीन कोणत्या प्रकारे लागावी ? या प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेतली. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here