रात्री झोपण्याआधी दूध हळद पिल्याने काय फायदे होतात?

0
923
रात्री झोपण्याआधी दूध हळद पिल्याने काय फायदे होतात?
रात्री झोपण्याआधी दूध हळद पिल्याने काय फायदे होतात?

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत रात्री झोपण्याआधी दूध हळद पिल्याने काय फायदे होतात? दूध प्यायला दिल्यावर, आपल्याला राग येतो तसेच काही जणांना दूध आवडत नाही. तर काहीजण असे आहेत, की त्यांना दूध जीवापार आवडते. पण दुधातील घटक हे काही जणांना माहिती नसतात. दूध हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. कारण दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन व जीवनसत्त्वे असतात. तसेच हळदीचे आहे, हळद हि आपल्या शरीरासाठी फार गुणकारी व लाभकारी आहे. नेहमीच्या जेवणामध्ये हळदीचा आवर्जून वापर केला जातो, कारण हळदीमध्ये नैसर्गिक रंग असतो. जो भाज्यांना येतो, तसेच हळदीच्या चवीचे तर विचारूच नका, प्रत्येक पदार्थ मधे हळद ही राहतेच. तसेच लग्नसमारंभात हळद नवीन जोडप्यांना लावली जाते.

कारण हळदीमध्ये अँटीसेफ्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे हळदीचा वापर केल्यामुळे, त्वचा रोग नाहीसे होतात. हळद आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच हळदी मुळे  डोळ्यांचे आजार हे जातात. हळद आपले रक्त शुद्ध करण्याचे काम करते. त्यामुळे हळद आपल्याला फायदेशीर असते, आणि जर तुम्ही दूध आणि हळद एकत्र करून केले, तर त्याला तर जोडच नाही. कारण ह्या दोघांचे मिश्रण आपल्या शरीरासाठी इतके फायदेशीर असतात, की  बाहेरील व्याधी, आजार आपल्यापासून कित्तेक हात लांब राहतात. म्हणूनच आपण आज जाणून घेणार आहोत, की दूध हळद पिल्याने, आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? चला तर मग जाणून घेऊयात! 

रात्री दूध हळद पिल्याने होणारे फायदे?

मित्रांनो, दूध हळद पिल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोणकोणते आहेत? चला तर मग जाणून घेऊयात. 

वाचा  स्वप्नात सत्यनारायण पूजा दिसणे शुभ की अशुभ

तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते

वाढत्या प्रदूषणामुळे, बदलत्या वातावरणामुळे, थंड गरम हवेमुळे, आपल्या शरीरावर त्याचा परिणाम लवकर होतो. त्यामुळे आपण सारखे सारखे आजारी पडत असतो, त्याला कारणीभूत म्हणजे, आपल्या शरीरात जर रोग प्रतिकार शक्ती कमी असली, तर आपल्याला या सारख्या समस्या लवकर उद्भवतात. जर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहिली, तर तुम्ही कित्येक आजारांपासून दूर रहातात. त्यामुळे जर तुम्ही नियमित रात्री झोपण्यापूर्वी दूध+ हळद टाकून पिले, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.  कारण हळदीमध्ये ऑंटीसेप्टीक, ऑंटीव्हायरल गुणधर्म असतात, व दुधामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक यासारखे गुणधर्म असतात. त्यामुळे या दोघांचे मिश्रण केल्यामुळे, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळते, व आपण आजारांपासून दूर राहतो. 

सर्दी खोकल्यावर आराम मिळतो

मित्रांनो सर्दी खोकल्यावर जर तुम्ही दुध व हळदीचा वापर केला, तर तुम्हाला आराम मिळतो. तसेच काहीजणांना खोकला इतका लागतो, की त्यांना खोकून-खोकून त्यांच्या पोटात दुखायला लागते. अश्या वेळी जर त्यांनी रोज रात्री गरम दूध व हळद एकत्र करून पिले, तर त्यांना खोकल्यावर आराम मिळतो. कारण कोमट दूध हळद पिल्यामुळे त्यांच्या कंठाला सूज आली असेल, तर तीही जाण्यास मदत मिळते. 

रक्त शुद्धीकरण होते

हळदीमध्ये अँटिबायोटिक व अँटीसेफ्टीक गुणधर्म असतात, तसेच हळद हि नॅचरली रक्त शुद्ध करण्यास मदत करते.  तुम्ही नियमित दूध हळद पिले, तर तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतोच. शिवाय रक्तही शुद्ध होते, त्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरही त्याचा फरक पडतो. तुमच्या शरीरात रक्त शुद्ध राहिले, तर चेहऱ्यावर ग्लो येतो. तुम्ही टवटवीत दिसतात. 

वजन कमी होण्यास मदत मिळते

हळदीमध्ये खनिजांचे प्रमाण असते, जे आपले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच दूध आणि हळद एकत्र करून पिल्यास, आपल्या शरीराला कॅल्शियम मिळते. तसेच जर तुम्ही दिवसातून दोन वेळा सकाळ-संध्याकाळ दूध पिले, तर तुम्हाला तुमच्या भुकेवर नियंत्रण करता येते. शिवाय वजन वाढीची समस्याही होत नाही. 

वाचा  हळदीचे फायदे

हाडं मजबूत होतात

दुधामध्ये कॅल्शिअम फायबरचे प्रमाण असते. तसेच हळदीमध्ये खनिजांचे प्रमाण असते, दूध आणि हळद एकत्र करून पिल्यास, तुमचे हाड मजबूत होण्यास मदत मिळते. म्हणूनच तर डॉक्टर कधीही सांगतात, की दूध पीत जा, तसेच दुधाचा नियमित वापर केल्यास हाडे ठिसूळ होण्यापासून वाचतात. 

मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात

बऱ्याच महिलांना मासिक पाळी विषयी तक्रारी असतात. पाळी अनियमित येणे तसेच अंगावरून कमी रक्‍तस्राव जाणे, यासारख्या समस्या होतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारात दूध व हळदीचा वापर केला, तर यासारख्या समस्येवर तुम्हाला आराम मिळेल. शिवाय मासिक पाळी मधील होणारा त्रासही कमी होतो. त्यामुळे महिलांनी जर रात्रीच्या वेळी दूध +हळद +त्यामध्ये गूळ यांचे मिश्रण एकत्र करून पिल्यास, त्यांच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. शिवाय मासिक पाळी नियमित येण्यास मदत मिळते. 

हृदयाशी संबंधित तक्रारी दूर होतात

दुधामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम चे प्रमाण असते. तर हळदीत अँटी इंफ्लेमेटरी,ऑंटी सेप्टीक, अँटिबायोटिक, चे गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या हृदयाशी संबंधित त्रास कमी होतो. तसेच हृदयाला जाणारा रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच हळदीमध्ये रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म असल्यामुळे, तुम्हाला हृदयविकाराचा त्रास ही होत नाही. त्यासाठी तुम्हाला नियमित दूध हळद प्यायचे आहेत. तसेच दूध हळद पिल्याने, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते व तुमचे हृदय निरोगी राहते. 

तुमचे सौंदर्य निखारते

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. पण दुधात हळद टाकून पिल्याने, तुमचे सौंदर्य निखारण्यास मदत होते. कारण दुधात हळद टाकल्यामुळे, तुमचे रक्त शुद्ध होते, तसेच चेहऱ्यावर वांगचे डाग, मुरुमाचे डाग, काळपट डाग, डोळ्याखाली काळी वर्तुळे असणे, तसेच केसांमध्ये कोंडा होणे, केस गळतीची समस्या, तसेच तुमची अंगावरील त्वचा रुक्ष असेल, तर या सगळ्या समस्यावर दूध +हळद हे एकमेव फायदेशीर गोष्ट आहे, दुध पिल्याने तुम्हाला यासारख्या समस्यांवर आराम मिळतो. शिवाय तसेच तुम्ही दुधामध्ये हळद टाकून, तुमच्या चेहर्‍याला व हातापायांना लावल्याने, तुमची त्वचा मुलायम होते. शिवाय तुमचा रंगही उजळदार होण्यास मदत मिळते. 

वाचा  स्वप्नात शिंगाडे दिसणे शुभ की अशुभ!

शांत झोप लागते

दुधात हळद टाकून पिल्यास शांत झोप लागते, बऱ्याच वेळेला धावपळीच्या जीवनात, कामाची दगदग, ताणतणाव यामुळे काही जणांची झोप उडते. त्यांना झोप लागत नाही. अशा वेळी जर त्यांनी नियमित रात्रीच्या वेळी दुधात हळद टाकून, त्यात जायफळाची पावडर टाकून पिल्यास, त्यांना शांत झोप लागते व रात्रीची झोप पूर्ण झाल्यामुळे, त्यांच्यात चिडचिडेपणा ताण तणाव हा कमी होतो. 

दूध हळद पासून होणारे नुकसान

मित्रांनो, दूध व हळद एकत्र टाकून पिल्यास, त्यापासून होणारे नुकसान हे फारसे नाहीतच. कारण दोघांमध्ये जे गुणधर्म असतात, ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. पण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, पोटात आग व जळजळ होते, तसेच नाकातून रक्त येण्याची समस्या असतील, अशा लोकांनी दूध आणि हळद चा वापर कमी करावा. कारण हळद ही रक्त पातळ करण्याचे काम करते. शिवाय ज्यांच्या नाकातून रक्त येते, अशा लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला दूध हळद प्यायचे असेल, तर ते रात्रीच्या वेळी झोपताना प्यावे तसेच त्याचे प्रमाण योग्य घ्यावे. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी दूध हळद पिल्याने, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये जर तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही डॉक्टरांना विचारून घेऊ शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

धन्यवाद

अक्रोड चे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here