लहान मुलांना शी होण्यासाठी उपाय

0
4047

नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत लहान मुलांना शी होण्यासाठी उपाय घरात लहान बाळ असले म्हणजे सतत त्याची काळजी घ्यावी लागत असते. लहान बाळांच्या प्रत्येक हालचालीवर आईला बारकाईने लक्ष द्यावे लागत असते. बरेच लहान बाळं हि सतत काही चिडचिड करताना दिसून येत असतात नाहीतर रडरड करताना देखील दिसून येत असतात. लहान बाळांना बोलता येत नाही त्यामुळे लहान बाळाच्या रडण्यातूनच त्याच्या भावना व्यक्त करत असतो.काही लहान बाळ हे ओरडून मोठमोठ्याने आवाज करून आणि रडून अशाप्रकारे त्याच्या भावना व्यक्त करत असते. जेव्हा लहान बाळ रडत असते तेव्हा आई त्याला स्तनपान देऊन शांत करत असते परंतु स्तनपान करून देखील जेव्हा बाळ हे सतत रडत असते तेव्हा त्याच्या रडण्या मागील कारण काय असेल हे आईने समजून घ्यायला हवे. बाळाचे रडन्या मागील कारण हे प्रत्येक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते जर बाळाचे पोट दुखत असेल किंवा बाळाला गॅस झाला असेल त्यामुळे देखील बाळ रडू शकते. तसेच जर बाळाला काहीतरी दुखत असेल परंतु ते बोलण्यातून व्यक्त करू शकत नाही त्यामुळे देखील रडू शकते. परंतु बऱ्याच वेळा बाळांना जर शी होत नसेल त्या कारणामुळे देखील बाळ रडू शकते. म्हणून आईने सुरुवातीपासूनच बाळाच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे जेणेकरून बाळ जर रडत असला तर त्यामागील कारण आईला समजू शकेल. तर मित्रांनो आज आपण लहान मुलांना शी होण्यासाठी उपाय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग लहान मुलांना शी होण्यासाठी काय उपाय करू शकतात याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

लहान मुलांना शी न होण्याची कारणे नेमकी कोणती असू शकतात?

बऱ्याच वेळा जेव्हा बाळ हे रडत असते तेव्हा त्याचे पोट साफ न होण्याची समस्याचे हे देखील एक कारण असू शकते. आईने सतत बाळावर लक्ष ठेवले पाहिजे बाळ दिवसातून किती वेळा शी करते किंवा बाळाने किती दिवसापासून शी केली नाहीये या सर्व बाबी लक्षात घ्यायला पाहिजे. लहान मुलांना शी न होण्याची कारणे नेमकी कोणती असू शकतात याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

  • आईला बाळाला स्तनपान करावे लागत असते. जर आईच्या आहारात योग्य त्या पोषक घटकांचा समावेश नसेल तेव्हा आईच्या खाण्यामध्ये बाळाला त्रास होईल असे पदार्थ खाण्यात आले असतील तर या कारणामुळे देखील बाळाला शी न होण्याची समस्या येऊ शकते. तसेच आईने पातळ पदार्थ न खाता कोरडे पदार्थ खाल्ले तर याचा परिणाम हा बाळावर होत असतो. आणि या कारणामुळे देखील बाळाचे पोट साफ होण्याची समस्या येऊ शकते.
  • जर बाळ हे व्यवस्थित रित्या स्तनपान करत नसेल, अथवा त्याचे पोट व्यवस्थित प्रकारे भरत नसल्यास बाळाची शी न होण्याची समस्या येऊ शकते.
  • आईने जर तिच्या स्वतःच्या खाण्यापिण्याच्या वेळा या व्यवस्थित पाल्या नसतील तर याचा परिणाम देखील बाळावर दिसून येतो आणि परिणामी बाळाला शी न होण्याची समस्या येऊ शकते.
  • जर आईला बाळाला स्तनपान करण्यासाठी दुध येत नसेल तर बाळाला वरील पावडर चे दुध पाजण्यात येत असते. तर जी बाळ पावडरचे दुध पीत असतात त्या बाळांना देखील शी न होण्याची समस्या येऊ शकते.
  • एखाद्या वेळेस बाळाला पोटातील जर पचन संस्थेविषयी त्रास होत असेल तर त्यामुळे देखील बाळाला शी न होण्याची समस्या येऊ शकते.
वाचा  घाम कमी येण्यासाठी विविध घरगुती उपाय :-

तर वरील, सर्व प्रकारच्या कारणांमुळे बाळाला शी न येण्याची समस्या येऊ शकते. त्यामुळे बाळ हे सतत रडत असते कारण त्याला पोटा बद्दल त्रास होत असतो. म्हणजेच पोट दुखत असते. आणि पोट व्यवस्थित साफ न झाल्यामुळे बाळ दूध देखील व्यवस्थित प्रकारे पीत नाही यामुळे बाळाची तब्येत देखील खराब असते. म्हणून बाळाकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असते. जर बाळाला शी होण्यास त्रास होत असेल तर तुम्ही काही उपाय देखील करू शकतात. तर बाळाला शी होण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याबद्दल देखील आपण जाणून घेऊयात.

बाळाला शी होण्यासाठी कोणत्या प्रकारे उपाय केले पाहिजेत?

जर बाळाला शी न होण्याचा त्रास होत असेल तर बाळ हे सारखे सारखे रडत असते कारण पोट साफ न झाल्यामुळे त्याचे पोट दुखत असते. तर बाळाला शी न होण्याचे कारणे नेमकी कोणती असू शकतात हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेली आहेत. तसेच बाळाचे साफ पोट हे व्यवस्थित प्रकारे साफ व्हायला हवे यासाठी तुम्ही काही उपाय करू शकतात तर बाळाला शी होण्यासाठी कोणते उपाय करू शकतात? ते उपाय कोणते? याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • आईने तिच्या आहारामध्ये योग्य त्या पदार्थांचा समावेश करायला हवा जेणेकरून बाळाला त्रास होणार नाही. तसेच आईने जेवणात कोरडे पदार्थ न घेता पातळ पदार्थ खायला हवेत जेणेकरून बाळाचे पोट साफ होण्यास मदत होईल.
  • तसेच आईने जेवण झाल्यानंतर थंड पाणी न पिता कोमट पाणी प्यावे आणि तीळ, ओवा, बडीशेप, आणि काळे मीठ हे सर्व घटक मिळवलेली बडीशेप खायला हवी. असे तुम्ही प्रत्येक वेळी जेवणानंतर खावे जेणेकरून तुम्ही तुमचे पोटात गेलेले अन्न देखील व्यवस्थित रित्या पचन होईल आणि बाळाचे पोट देखील व्यवस्थित प्रकारे साफ राहील. म्हणजेच बाळाला शी न होण्याचा त्रास होणार नाही.
  • बाळाला जशी न होण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही बाळाच्या पोटावर व्यवस्थित प्रकारे मालीश करायला हवी. म्हणजेच पोटावर थोडं तेल टाकून खालून वर आणि वरून खाली अशा गोलाकार पद्धतीने हळुवारपणे मालीश करायला हवी. जेणेकरून बाळाला शी होण्यास मदत होईल.
  • तसेच आईने भरपूर प्रमाणात थंड पाणी न पिता कोमट पाण्याचेच सेवन करायला हवे. ज्यामुळे बाळाला शी व्यवस्थित प्रकारे होऊ शकेल.
  • तसेच बाळाला शी होण्यासाठी तुम्ही सफरचंदाचा अथवा मोसंबीचा रस काढून थोडा चमचा भर पाजू शकतात, जेणेकरून बाळाला शी होण्यास त्रास होणार नाही. परंतु त्याचा म्हणजेच फळांचा गर मात्र खाऊ घालू नका.
  • तुमचे बाळ थोडे मोठे असेल आणि तुम्ही तुमच्या बाळाला वरचे पदार्थ खायला देण्यास सुरुवात केली असेल तर तुम्ही मउ भात तूप टाकून चांगला बारीक करून खाऊ घालू शकतात. यामुळेदेखील बाळाचे पोट लवकर साफ होण्यास मदत होत असते.
  • तसेच तुम्ही बाळाला पावडर युक्त दूध न देता स्तनपान करू द्यावे बाळाला आईचे दूध जर व्यवस्थित प्रकारे मिळाले तर त्याला शी होण्यास देखील त्रास होणार नाही.
वाचा  प्रेगा न्यूजची माहिती व वापर कसा करायचा

तुमच्या, बाळाला देखील शी न होण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही वरील प्रमाणे उपाय करून बघू शकतात. आणि एवढे सर्व उपाय करून देखील जर बाळाला शी होण्यास त्रास होत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांना भेटून योग्य तो उपचार घ्यावा. जेणेकरून तुम्हाला देखील त्रास होणार नाही. बाळाचा जन्म झाल्यावर सुरुवातीला बाळ हे तीन-चार दिवसांनी शी करत असते. तर काही बाळ हे एक-दोन दिवसांनी शी करत असते. म्हणजेच प्रत्येक बाळा हे वेगवेगळे प्रकारचे असते आणि त्यांच्या कृतीदेखील वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. म्हणून आपले बाळ आहे शी केव्हा करत असते तसेच किती वेळा करत असते यावर बारकाईने लक्ष ठेवायला हवे. जेणेकरून एखादवेळेस जर बाळाला लवकर शी झाली नाही तर बाळ का रडते हे तुमच्या लवकर लक्षात येईल. म्हणून तुम्ही नीट लक्षात ठेवले पाहिजे. जेणेकरून त्याला त्रास होणार नाही.

     मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

       धन्यवाद.

    बाळाला दात येण्याची लक्षणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here