लहान मुलांना झोप येण्यासाठी औषध

0
1773
लहान मुलांना झोप येण्यासाठी औषध
लहान मुलांना झोप येण्यासाठी औषध

आजकालची सर्वात मोठी समस्या म्हणजे शांत झोप बऱ्याच लोकांना शांत झोप लागत नाही. यामुळे त्यांच्या पूर्ण दिवस खराब जातो दिवसभरामध्ये कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही. तुम्हाला जर कोणी विचारले की या जगामध्ये सर्वात आनंदी व्यक्ती कोण तर अंथरुणामध्ये पडल्या पडल्या झोप लागते तो व्यक्ती सर्वात आनंदी आहे. माणसे किंवा जनावर इतकंच काय काय तर मोठे मोठे यंत्र यांनादेखील विश्रांतीची गरज असते. तर माणसाला शांत झोप भेटली नाही तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या शरीरावर दिसून येतो. बऱ्याचदा परिणाम इतका वाईट असतो की यामधून माणूस बाहेरच येत नाही आणि आपल्यातच गुंतून जातो. त्याला जगाचे भान उरत नाही आणि तसं सहसा बघायला गेले तर हे चांगले देखील नाही.आजकाल लहान मुलांना झोप येण्यासाठी हि औषधांचा वापर करावा लागतो.

तुम्हाला शांत झोप येत नसेल तर तुम्ही तरी डॉक्टरचा सल्ला घेऊन योग्य ती ट्रीटमेंट चालू करावी. योग्य ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला चांगली प्रमाणामध्ये विश्रांती देखील भेटेल. मोठ्या माणसांचा तर आपण समजू शकतो की कामाचा तणाव किंवा परिवाराचा तणाव यामुळे त्याला पुरेशी विश्रांती भेटत नसेल. पण लहान मुलांचे तसे व्हायला नको लहान मुलं झोपत नसतील तर आपले कर्तव्य आहे की त्यांना पुरेशी विश्रांती भेटण्यासाठी प्रयत्न करावे. कारण त्यांना झोप येत नसेल अश्या समस्यांना सामोरे जावे लागले तर ही एक गंभीर बाब आहे. तर मित्रांनो आपण याच विषयाची चर्चा करणार आहोत कारण बऱ्याच वेळेस मुलांना कोणत्या प्रकारची अडचण असेल तर ते मुलं सांगू शकत नाही की नक्की त्यांना काय होते आहे. अशावेळी आपण त्यांची योग्य ती लक्षणे समजून त्यावर उपाय करावा. चला तर मग जाणून घेऊया की मुलांना झोप येत नसेल तर आपण काय काय करू शकतो.

Table of Contents

लहान मुलांना झोप येत नाही ?

तर मित्रांनो झोप न येण्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघितली आता आपण जाणून घेऊया की लहान मुलांना झोप का येत नाही त्याची कारणे काय असू शकतात चला तर मग बघुया.

कोणत्यातरी प्रकारचा ताण :

               बऱ्याच वेळेस लहान मुलांना जर कोणत्या प्रकारचा ताण तणाव असेल तर ते मोठ्यांना सांगत नाही आणि जरी सांगितलं तरी मोठे लोक लहान मुलांच्या काही गोष्टी ऐकून घेत नाही. असे म्हणतात की हा तर अजून लहान आहे याचं काय महत्वाचं बोलणं असणार आहे. पण असं न करता पालकांनी मुलांच्या कलेने घ्यावं त्यांचे काय म्हणणे आहे हे एकदा ऐकून घ्यावे. बरेच वेळेस तुम्हाला त्यांचा ताण मोठा वाटणार नाही पण तो ज्या वयामध्ये आहे त्या वयामध्ये त्याला तो ताण कदाचित मोठा वाटू शकतो.

एखाद्या प्रकारची भीती :

बऱ्याच वेळेस मुलांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते. मग ती भीती कोणत्याही प्रकारची असू शकते. ती जनावरांची असू शकते. माणसाची असू शकते किंवा एखाद्याला अंधाराची भीती वाटू शकते किंवा एकटेपणाची भीती वाटू शकते. अशा अनेक प्रकारच्या भीती लहान मुलांमध्ये असू शकतात जर तुमच्या मुलाला झोप येत नसेल तर त्याला विचारा की त्याच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची भीती आहे का? असेल तर चार प्रेमाच्या गोष्टी सांगून त्यांची भीती दूर करावी.

मोबाईलच्या अतिवापरामुळे :

बऱ्याच वेळेस लहान मुले रडायला लागली की आपण त्यांना फोन देऊन देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. लहान मुलं रडत असते तेव्हा ते फोन मागत असतील तर त्यांना फोन अजिबात देऊ नका. तसेच जर तुम्ही त्याला काहीतरी शिकण्यासाठी कोणते तुम्ही व्हिडिओ फोनवर दाखवत असाल तर याची काळजी घ्या की दिवसभर मधून एक तासाच्या वर त्याच्याकडे फोन नसावा. तसेच लहान मुलांचे डोळे कवळे असतात म्हणून मोबाईलचा प्रकाशाचा त्यांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच डोळ्या खाली काळी पट्टी येणे डोळे लाल होणे झोप न लागणे अशा समस्यांना सामोरे जाऊ लावू शकते.

वाचा  फास्टफुड खाण्याचे नुकसान

मुलांना झोप न येण्याची लक्षणे :

चला तर मग जाणून घेऊया आता मी जर मुलांना झोप येत नसेल तर त्यांची लक्षणे कोणती असू शकतात. जी आपण ओळखून वेळीच त्याच्यावर उपचार करू शकतो 

सतत हालचाल करणे :

बऱ्याच वेळेस मुलांना पाळण्यात टाकल्यावर मुलं हालचाल करतात. त्यांनी कितीही झोपायचा प्रयत्न केला तरी ते सतत कुशी बदलतात किंवा हालचाल करत राहतात. अशा वेळी समजावे की या मुलाला झोप येत नाही आहे आणि वेळीच उपाय करून त्याला शांत झोपावे.

मुलगा चिडचिड करत असेल, डोळे बंद करत नसेल :

अनेक वेळेस मुलं फार चिडचिड करतात हे थांबवण्यासाठी पालक त्या मुलाला पाळण्यात टाकतात जेणेकरून तो झोपेल आणि त्याची चिडचिड थांबेल. पण तरीदेखील तो मुलगा चिडचिड करत राहतो. तसेच पाण्यामध्ये टाकला तरी तो मुलगा डोळे बंद करत नाही इकडे तिकडे बघतच राहतो. तर हे देखील एक लक्षण असू शकते लहान मुलांना झोप न येण्याचे.

लहान मुलांना झोपेच्या आधी कोणते औषध द्यावे :

लहान मुलं झोपत नसेल तर आपण त्यांना झोपेच्या आधी कोणत्या औषध देऊ शकतो जेणेकरून त्यांना झोप चांगल्या रीतीने लागेल चला तर मग बघुया.

जायफळ :

तुम्हाला माहिती आहे का पूर्वीच्या बायका जेव्हा दूध विकायला किंवा कोणत्याही कामासाठी घराच्या बाहेर पडायचं तेव्हा ते लहान मुलांना झोपून साठी जायफळ चा उपयोग करायचे. तर तुमच्या मुलाला देखील झोप लागत नसेल तर तुम्ही थोडेसे जायफळ घेऊन तुमच्याकडे उगणी असेल तर त्याच्यावर उगळावे आणि मुलांना झोपायच्या आधी जेवणानंतर एक चिमूट उगाळून घेतलेले जायफळ द्यावे. असे केल्याने लहान मुलांना झोप लागण्यास मदत होईल. हे एक आयुर्वेदिक औषध आहेत ज्याने लहान मुलांना झोप लागण्यास मदत होते. पण जायफळ देतांना जास्त प्रमाणामध्ये जायफळ देऊ नये याची काळजी घ्यावी नाहीतर तो मुलगा खूप वेळ झोपू शकतो.

वाचा  पोटावर झोपणे.

मुरुडशेंग, एखंड :

तर आपल्या आयुर्वेदामध्ये बरेचसे उपाय आहे जे आपल्याला माहिती नसते. तर बऱ्याच लोकांना माहिती असेल पण काही लोकांना मुरड ची शेंग आणि एक खंड माहिती नसतील. हे तसं बघायला गेलो तर हे लवकर बाजारामध्ये भेटत देखील नाही. जर तुम्हाला या गोष्टी भेटल्या तर तुम्ही मुरुड शेंग आणि खंड हे उगाळून एक चिमूटभर तुमच्या मुलाला देऊ शकता जेणेकरून त्याला शांत झोप लागेल.

मुलांना कसे झोपावे :

मुलांना झोपण्याआधी तुम्ही मुलांची गरम कोमट पाण्यामध्ये आंघोळ घालू शकता. जेणेकरून त्यांना शांत झोप लागण्यास मदत होईल. तसेच बाळाला झोपवताना अगदी मऊ गादी वापरावी तसेच टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक यंत्रणा दुर ठेवावी झोप लागेपर्यंत आई-वडिलांनी त्या मुलाच्या बाजुलाच बसावे. लाईट पूर्णपणे बंद करू नये खोलीमध्ये पुरेसा प्रकाश ठेवावा आणि शक्यतो मुलांना मच्छरदाणी मध्येच झोपवावे आणि मच्छरदाणी मध्ये पुरेशी हवा जाते की नाही याचीदेखील काळजी घ्यावी.

तर आपण आज बर्‍याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली याच प्रकारे मुलांना कसे झोपायचे पासून मुलांना झोप लागत नसेल तर आपण कोणते आयुर्वेदिक उपाय करू शकतो हे देखील बघितले. तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here