बाळंतपणात काय खावे काय खाऊ नये?

0
1907
बाळंतपणात काय खावे काय खाऊ नये
बाळंतपणात काय खावे काय खाऊ नये

बाळंतपणात काय खावे काय खाऊ नये ?

नमस्कार मित्रांनो. योग्य आहार घेणे हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. बऱ्याच स्त्रिया या गरोदर असताना काय खावे काय खाऊ नये? हे विचारूनच डॉक्टरांच्या सल्ला घेऊनच आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश करत असतात. याप्रमाणे बाळ पोटात असताना बाळा साठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे. या विषय आपण जाणून घेऊन तसा आहार घेत असतो. परंतु, याच बायका बाळंतपण झाल्यानंतर आहाराकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. ज्याप्रमाणे बाळ पोटात असताना योग्य त्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे बाळंतपणात काय खावे काय खाऊ नये याविषयी माहिती जाणून त्या पोषक तत्त्वांचा आहारात समावेश करणे आवश्यक ठरते.

कारण बाळंतपण झाल्यानंतर  जर आपण योग्य आहार घेतला नाही तर त्याचा त्रास हा लहान बाळाला होत असतो. म्हणून डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने बाळंतपणात कोणता आहार घ्यावा, हे विचारूनच त्या प्रकारे आहार घेतला पाहिजे. याने लहान बाळ देखील व्यवस्थित राहते तसेच त्यांची वाढ देखील चांगली होते आणि बाळाच्या आईचे आरोग्य देखील चांगले राहू शकते. बाळंतपणात काय खावे? व काय खाऊ नये? याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, बाळंतपणात काय खावे व काय खाऊ नये? याविषयी खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

बाळंतपण म्हणजे काय ?

मातृत्व मिळणे हे फार भाग्याची गोष्ट असते. आई होणे हे फार सोपे नसते. कारण बाळंतपण ही क्रिया एका आईसाठी खूप महत्त्वाची असते. पूर्ण शरीराची ताकद एकवटून आई ही बाळाला जन्म देत असते. त्यामुळे बाळंतपणात स्त्रीचे शरीर हे कमजोर बनते. डिलिव्हरी मुळे आईला बाळाला जन्म देताना खूप रक्तस्राव हा होत असतो. तसेच खूप अशक्तपणा देखील आलेला असतो, शरीराची झीज झालेली असते. तसेच डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला स्तनपान करावे लागत असते.

म्हणून बाळंतपणात आईला योग्य व पुरेसा आहार देणे, आणि शरीराची झीज भरून घेणे देखील खूप जरुरी असते. कारण शरीर हे पूर्ण कमजोर झालेली असते. त्यामुळे पुरेशी ताकद मिळावी तसेच बाळाला देखील स्तनपान करताना दूध या, बाळाचे वजन वाढावे, बाळाची वाढ योग्य व्हावी यासाठी बाळंतपणात योग्य आहार घेणे खूप गरजेचे ठरते. तसेच बाळंतपणात काय खावे व कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करू नये हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे. याविषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  मासिक पाळी महिन्यातून दोनदा येणे

बाळंतपणात काय खावे ?

    मित्रांनो ज्याप्रमाणे गरोदरपणामध्ये पोषक आहार तत्त्वांचा आहारात समावेश केला जातो त्याचप्रमाणे बाळंतपणात देखील योग्य त्या पोषक घटकांचा समावेश करावा लागतो. बालपणात देखील काय खावे आणि काय खाऊ नये या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. कारण बाळंतपणात जर योग्य घटकांचा समावेश आहारात केला तर पुढे चाळीसी नंतर तुम्हाला फार कमी प्रमाणात समस्या उद्भवू शकतात जसे की कंबर दुखणे पाठ दुखणे गुडघे दुखणे इत्यादी सारख्या. म्हणून बाळा जखमी योग्य आहार यांचा समावेश केला तर तुम्हाला आणि तुमच्या बाळाला यापासून खूप फायदा होऊ शकतो तर बाळंतपणात काय खावे हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 • बाळंतीणीसाठी दूध घेणे हा खूप महत्त्वाचा घटक आहे. मग ती नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिजेरियन डिलीवरी असो. बाळाला जन्म दिल्यानंतर आईने दूध घ्यायला सुरुवात केली पाहिजे कारण दूध घेतल्याने बाळासाठी पुरेसे दूध येण्यास मदत होत असते.
 • तसेच दूध हे सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा घ्यावे. दुधामध्ये शतावरी कल्प दोन चमचे टाकून द्यावे यामुळे बाळाला स्तनपान करण्यासाठी पुरेशा प्रमाणात दूध मिळत असते. दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप प्रमाणात असते त्यामुळे दूध पिणे हे उपयुक्त ठरते.
 • बाळंतिणीच्या आहारामध्ये तुपाचा समावेश हा आवर्जून करावा. शुद्ध ताजे आणि घरी बनवलेले तूप असेल तर फारच उत्तम. पण तुपामुळे वजन वाढेल हा विचार करून अनेक बाळंतिणीने स्त्रिया आहारामध्ये तुपाचा समावेश करायला घाबरतात. डिलवरी मध्ये प्रचंड वात वाढलेला असतो. आणि रुक्षता देखील वाढलेली असते. यासाठी शरीराचे स्नेहन व्हावे यासाठी तूप खाणे खूप फायदेशीर ठरते.
 • तूप हे डायरेक्ट न घेता, बाळंतिणीसाठी जो गव्हाच्या पिठाचा घाटा बनवला जातो त्यामध्ये दोन चमचे तूप घालून द्यावे. तसेच बाळंतिणीच्या लाडू मध्ये तुपाचा आवर्जून समावेश करावा यामुळे शरीराची झीज भरून निघण्यास मदत होते.
 • बाळंतिणीला आहारामध्ये मेथीचे दाणे यांचा वापर करावा तसेच मेथीची भाजी ही आवर्जून खायला द्यावी. त्यामुळे गर्भाशयाचा आकार हा पूर्ववत होण्यासाठी मदत होत असते.
 • बाळंतिणीच्या आहारात हिरव्या पालेभाज्या यांचा आवर्जून समावेश करावा. तसेच भाजी बनवताना ती घट्ट न बनवता पातळ बनवून खायला द्यावी. तसेच, भाजी बनवण्यासाठी तिखट किंवा मिरची चा वापर हा अतिप्रमाणात न करता कमी प्रमाणात करावा. त्यामुळे बाळाला त्याचा त्रास होणार नाही.
 • बाळंतपणा  मध्ये आईला 2900 कॅलरीजची गरज असते. कारण आईला बाळाला दूध पाजावे लागत असते म्हणून आहारात योग्य त्या घटकांचा समावेश केला पाहिजे.
 • बाळंतिणीला पारंपरिक पद्धतीने बनवलेले डिंकाचे लाडू खाऊ घालावेत. काजू बदाम खारीक खोबरे खसखस डिंक आयुक्त लाडू बनवून खाऊ घातल्यामुळे शरीरासाठी योग्य पोषक तत्त्वे मिळतात. तसेच बाळंतपणात डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे हाड मजबूत व बळकट होण्यास मदत होते. तसेच कॅल्शियमची कमतरता देखील यामुळे भरून निघते. डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे पुढे जाऊन दुखीचा त्रास होत नाही.
 • बाळंतिणीला खोबरे आणि खसखस यापासून बनवलेले बट्ट खाऊ घालावे. हे खाल्ल्यामुळे लहान बाळाला शांत झोप येण्यास मदत होते. तसेच खसखस मुळे दुधाचे प्रमाण वाढते त्यामुळे बाळाला पुरेसे दूध मिळते.
 • बाळंतिणीच्या आहारामध्ये निरनिराळ्या कडधान्यांचा जरूर समावेश करावा. डाळ-भात, डाळीची आमटी व त्याला तुपाची फोडणी जरूर द्यावी. 
 • बाळंतिणीच्या आराम मध्ये पालक चा समावेश आवर्जून डिलिव्हरी मध्ये रक्तस्राव हा खूप प्रमाणात झालेला असतो. पालक मध्ये लोह खूप प्रमाणात असते. त्यामुळे बाळंतिणीने पालक खाल्ल्यामुळे रक्ताची कमतरता भरून निघते.
 • निरनिराळ्या फळभाज्या भेंडी, दोडका,गिलके, भोपळा,पत्ताकोबी यांचा आहारात आवर्जून समावेश केला पाहिजे.
 • तसेच बरेच जण या संभ्रमात असतात की बाळंतिणीला फळे खायला  देऊ नयेत. फक्त सुरुवातीचे बारा-तेरा दिवस तुम्ही फळे देणे टाळावे. कारण त्यावेळी फळ खाल्ल्यामुळे रक्तस्राव वाढू शकतो. परंतु, त्यानंतर फळे खाऊ घालावीत. फळे खाल्ल्यामुळे योग्य प्रमाणात  पोषक घटक तसेच विटामिन्स आई व बाळ दोघांना मिळत असते.
 • बाळंतिणीने थंडगार पाणी न पिता पाणी कोमट करूनच प्यावे.
 • बाळंतिणीच्या आहारात मुगडाळ युक्त खिचडी चा समावेश असावा. मूग डाळ ही खूप पौष्टिक असते त्यामुळे बाळंतिणीच्या आहारामध्ये मुगडाळीचा समावेश आवर्जून करावा.
वाचा  स्वप्नात बासरी दिसणे शुभ की अशुभ

वरील प्रमाणे, बाळंतिणीच्या आहारात योग्य त्या पोषक तत्व असलेला घटकांचा समावेश जरूर करावा. यामुळे आई आणि बाळ दोघांचीही तब्येत चांगली राहील. आणि पुरेसे विटामिन्स  व पोषक तत्व त्यांना आहारातून मिळतील.

बाळंतपणात काय खाऊ नये?

    बालपणात योग्य त्या पोषक घटकांचा तत्त्वांचा समावेश केल्याने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. तसेच बाळंतपणामध्ये त्वचे विषयी आणि केसान विषयी तक्रारी होतात. म्हणून बालपणात काय खाऊ नये हे देखील जाणून घेणे फार गरजेचे आहे तर बांधण्यात काय खाऊ नये हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 • बाळंतिनीला खूप तिखट, मसालेदार युक्त पदार्थांचा समावेश आहारात करू नये. यामुळे आईला व बाळाला दोघांनाही त्रास होण्याची शक्यता असते.
 • बाळंतिणीने शक्यतो जास्तीत जास्त चहा चे सेवन करू नये.
 • बाळंतिणीच्या आहारात कडधान्यांचा समावेश करावा परंतु, त्या कडधान्यांना जास्तीत जास्त मोड येऊन देऊ नये कारण जास्तीत जास्त मोड आलेले कडधान्य दिल्यामुळे बाळंतिणीचे वात वाढण्याची शक्यता असते.
 • तसेच  बाळंतिणीने बाहेरचे उघड्यावरचे अन्न पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
 • बाळंतिणीने थंडगार पाणी इथेच कोल्ड्रिंग पिणे टाळावे.
 • पचनास जड युक्त घटकांचा आहारात समावेश करणे टाळावे.
 • काही दिवस दही, वांगे, बटाटे, गवार आणि मटकी यांसारखा पदार्थांचा समावेश आहारामध्ये टाळावा.
 • बाळंतिणीने मैदा युक्त तसेच जास्त साखर युक्त पदार्थ खाणे टाळावेत. कारण ये खाल्ल्यामुळे जास्तीत जास्त वजन वाढवण्याची शक्यता असते.

वरील प्रमाणे काही घटकांचा समावेश हा बाळंतिणीच्या आहारात करू नये. तसेच बाळंतीण आहारामध्ये मैदा युक्त मिठाई युक्त पदार्थ खाणे टाळावेत. बाळंतिणीने नेहमी पौष्टिक घटकांचा समावेश आहारात करावा. यामुळे बाळ आणि आई दोघांचे आरोग्य चांगले राहते. मित्रांनो, वरील प्रमाणे आपण बाळंतपणात काय खावे? काय खाऊ नये? याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. तसेच, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

वाचा  देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवाल

 

धन्यवाद !

      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here