आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे काय?

0
1193
आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे काय?
आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो. आपली मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण त्याची वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे. परंतु आपला हा मानवी देह असा आहे की एक ना अनेक प्रकारच्या समस्या या येतच असतात. मित्रांनो आज आपण आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे काय? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नकळतपणे काही व्यक्तींनाही समस्या येत असतात. आणि ही समस्या उद्भवल्यामुळे शस्त्रक्रिया ही करावीच लागते. परंतु, आत्रपुच्छ शस्त्रक्रिया ही का केली जाते? ही समस्या नेमकी आहे तरी काय? याबद्दल आपण आता जाणून घेऊयात. जर आत्र पुच्छ या यामध्ये जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यामुळे व्यक्तीला तीव्र वेदना होऊ लागतात. आत्रपुच्छ म्हणजेच याला अपेंडिक्स असे देखील म्हटले जाते. जर ही समस्या आली, तर तत्काळ सर्जरी ही करावीच लागते. चला तर मग ही समस्या येण्यामागील कारणे काय असू शकतात आणि यावर कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

आंत्रपुच्छ म्हणजे काय?

आंत्रपुच्छ म्हणजे जर व्यक्तीच्या आंत्रपुच्छ यामध्ये जंतुसंसर्ग झालेला असेल, तर या समस्यामुळे त्या ठिकाणी पू येणे, तसेच त्याच्या आजूबाजूच्या भागाला सूज येऊ लागते. त्या ठिकाणी पोट हे विशिष्ट प्रकारे दुखू लागते आणि वेदना देखील असह्य होऊ लागतात. तसेच त्या व्यक्तीला ताप देखील येऊ लागतं उत्तर काही वेळा उलट्या या देखील होऊ लागतात. त्याचप्रमाणे आत्रपुच्छ यांच्या टोकाला रक्ताचा पुरवठा हा अगदी कमी प्रमाणात होऊ लागतो. अगदीच कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यामुळे त्या ठिकाणी जागा ही निर्जीव होऊ लागते. परिणामी आंत्रपुच्छ हे फुटू शकते. ही समस्या निर्माण झाल्यास अनेक प्रकारची लक्षणे दिसून येतात जसे की,

  • सर्वप्रथम बेंबीच्या आजूबाजूची जागा ही दुखू लागते आणि या वेदना देखील असह्य होऊ लागतात.
  • वरच्या पोटात दुखू लागते तर काही तासांनी खालच्या किंवा उजव्या बाजूच्या पोटातही दुखू लागते.
  • थोडी हालचाल केली तर त्या ठिकाणी दुखू लागते.
  • शिंकल्यास अथवा खोकला आल्यास देखील त्या ठिकाणची जागा दुखू लागते.
  • भूक नाहीशी होणे किंवा जेवणाची इच्छा मरणे.
वाचा  पोटातून आवाज येणे

यासाठी वेळीच उपचार घ्यावे लागतात, वेळीच शस्त्रक्रिया केली जाते.तर या साठी कुठल्या प्रकारचे शस्त्रक्रिया केली जाते? याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया
आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया

ही समस्या उद्भवण्यामागील कारणे:- Reasons 

आंत्रपुच्छ ही समस्या काही कारणांमुळे उद्भवत असते जसे की,

  • सतत बद्धकोष्ठता होणे.
  • आतड्यांमध्ये अन्नाचे कण जाणे.
  • फळांच्या बिया या आंत्रपुच्छ या मध्ये अडकल्यास.
  • जेवणातून फायबरची मात्रा न मिळणे.

अशा प्रकारच्या कारणांमुळे ही समस्या येऊ शकतो. म्हणून आपण सुरुवातीपासूनच खबरदारी बाळगणे फार गरजेचे ठरते.

 आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया : Aantrpuch Kadhnyachi Shastrkriya

ही समस्या उद्भवल्यास वेळीच उपचार पद्धती अवलंब व्हावे लागते आणि या समस्येसाठी वेळीच शस्त्रक्रिया केली जाणे खूप महत्त्वाचे ठरते तर यासाठी केली जाणारीशस्त्रक्रिया बद्दल माहिती-

पारंपारिक शस्त्रक्रिया पद्धती : Paramparik Shastrkriya Padhati

आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया करताना पेशंटला सर्वप्रथम भूल दिली जात असते भूल दिल्यामुळे ऑपरेशन करताना वेदना या जाणवत नाहीत. कमरेच्या मणक्यामध्ये इंजेक्ट करून भूलचे औषध सोडले जाते. यामुळे कमरेखालचा भाग हा असंवेदनशील होतो. त्यानंतर पोटाच्या खालच्या बाजूस उजव्या बाजूला व्यवस्थित काळजी घेऊन छेद केला जातो. पोटातील स्नायू वेगळे करून आत्रपुच्छ शोधून त्यावर निदान केले जाते. आंत्रपुच्छ याला दोरीच्या साह्याने बांधून त्यातून वेगळे केले जाते. ही शस्त्रक्रिया व्यवस्थित झाल्यानंतर पोट हे व्यवस्थित शिवले जाते. तसेच ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर पेशंटला काय काळजी घ्यावी कुठल्या गोळ्या औषध घ्यावे याबद्दल देखील सूचना दिल्या जातात.

तर मित्रांनो,आंत्रपुच्छ म्हणजे काय त्यामधील कारणे कोणती असू शकतात आणि आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया याबद्दल माहिती आपण जाणून घेतली आहे तर मित्रांनो, आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, याबद्दल तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here